Submitted by फारएण्ड on 3 September, 2010 - 00:35
विविध देशांतील इमिग्रेशन, कस्टम्स वगैरेंच्या नियमाबद्दलची माहिती मिळवण्याकरिता हा धागा उघडलेला आहे. एखाद्या देशात जाताना काय नेता येते, कोणत्या देशात्/विमानतळावर ट्रान्झिट व्हिसा लागतो ई. गोष्टींबद्दल येथे माहिती द्यावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ मत कदाचित अनेकांना आवडणार
माझ मत कदाचित अनेकांना आवडणार नाही कारण माझ्या जवळच्या मैत्रिणींना पण या मताचा राग येतो. पण कोठेही जाताना त्या त्या ठिकाणी असलेले नियम पुर्णपणे पाळावेत. लोक नियमातील पळवाटा पाहून काहीही पदार्थ आणतात्/नेतात. अमेरिकेमधे अनेक गोष्टीं आणायची बंदी आहे. त्या मधे कोणतीही फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ तसेच धान्ये इ. पदार्थ आहेत. लोक - विशेषकरून आपल्या कडे येणारे पालक लोक न विचारता मायेपोटी चुकीच्या वस्तू आणतात. मग चेकिंग मधे अडकलेल्या व्यक्ती धडा घेतात (नेहमीच नाही :)). न अडकलेल्या व्यक्ती फुशारक्या मिरवत बसतात.
आमच्या एका मित्राची आई तूप घेऊन आली मग चेकिन्ग मधे अडकली. बोलता येइना काही कळेना. तूप फेकून दिल्यावर रडायला लागली. मुलीच्या बाळंतपणा साठी आणल होत म्हणे.
माझे काका इथे येताना कच्चे आंबे घेउन आले. चेक मधे सुटले. मग आम्हालाच उपदेश की आम्ही काय मुर्ख आहोत. शेवटी काय प्रत्येकाचा विचार वेगळा. पण नियम तोडू नयेत. देशी लोकांविषयी मत खराब होउ शकते.
आम्हालाच उपदेश की आम्ही काय
आम्हालाच उपदेश की आम्ही काय मुर्ख आहोत <<<< अनुमोदन... ज्यांचे सुटले त्यांना इतर सगळे मुर्ख वाटतात..
आमच्या ओळखीत एकाने आंबे आणले, आणि Declare केले नाहीत. कस्टमवाल्याने आंबे फेकायला तर लावलेच, पण त्यावर $४०० ची फाईन मारली.
नियम तोडू नयेत. << अनुमोदन...
यावेळी मी अमेरिकेत वापस
यावेळी मी अमेरिकेत वापस येताना एकटीच येणार आहे.एच ४ साठी काय कागदपत्रे लागतील, पासपोर्ट , i797 बरोबर ?नेहमी नवरा बरोबर असतो, तोच बघून घेतो
एच वन चे सर्व डॉक्युमेंट्स
एच वन चे सर्व डॉक्युमेंट्स लागतीलच. तुझ्या एच ४ डॉक्सबरोबर.
मॅरेज आणि बर्थ सर्टीफिकेट्स व
मॅरेज आणि बर्थ सर्टीफिकेट्स व त्यांच्या कॉपी नेहमी जवळ असुदे.
एच-४ वर एकटे येणार असाल तरः -
एच-४ वर एकटे येणार असाल तरः
- पासपोर्ट ,एच-४ ची कागदपत्रे
- एच-१ ची प्रत
- लग्न आणि जन्म दाखला. (मुळ मराठीत असल्यास त्याचे इंग्रजी भाषांतरीत नोटराईज्ड प्रत )
- शक्य असल्यास नवर्याच्या कंपनीचे पत्र ज्यात हा माणुस आमच्या कडे काम करतो हे लिहलेले असते
आणि/अथवा
मागील महिन्याची सॅलरी स्लीप.
अमेरीकेतुन भारतात कायमचेच
अमेरीकेतुन भारतात कायमचेच जायचे असेल तर कस्टमचा २५००० रु (ड्युटी फ्री) चा नियम लागु होत नाही का? त्याचे लिमीट जास्त आहे का? आणि त्यासाठी काही पेपर लागतात का? (कायमचे येत असल्याबद्दल)?
धन्यवाद....
आता युके मधे किती तास / दिवस
आता युके मधे किती तास / दिवस वास्तव्य आहे ह्यावर पण अवलंबुन आहे. विमान तळावरुन बाहेर न पडणे किंवा २४ तास असे मी गृहित धरले तर भारताच्या पासपोर्ट धारकाला (नागरिकाला) अमेरिकेचा (किंवा कॅनडाचा) व्हॅलिड विसा असेल तर युके चा ट्रांझिट व्हिसा लागणार नाही.
धनश्री यांच्याशी पुर्णत: सहमत... डेसरी प्रॉडक्ट चालत नसतात पण काही लोकं पेढे, बर्फी किंवा लोण्याचे पदार्थ बिनदिक्कत आणतात. सर्वच नाही अडकत पण काही अडकतात. पालक मंडळी कधी देशाच्या बाहेर पडलेली नसतात त्यामुळे त्यांचे आणणे (भावना) समजू शकतो... पण पालकांची शिकले सवरलेली मुले-मुली आपल्या पालकांना येण्याअगोदर पुर्व सुचना का देत :राग:. ? आज सर्व गोष्टी सर्वी कडे मिळतात... अगदी पान-पराग माणिकचंद देखील :स्मित:.
निवांत पाटील, तुम्ही
निवांत पाटील, तुम्ही विमानातून आपल्याबरोबर जेवढे नेता येते त्यापेक्षा आणखी सामान शिपिंग कंपनी (रिलोकेशन कंपनी) कडून आणणार आहात काय? तसे असेल तर ते ती डॉक्युमेंट्स तुम्हाला देतील. ड्यूटीच्या लिमीट चे नीट माहीत नाही.
Transfer of residence बद्दल सर्च केल्यास आणखी माहिती मिळेल.
धन्यवाद फारएण्ड... नाही सगळे
धन्यवाद फारएण्ड... नाही सगळे सामान मी स्वतः घेउन जाणार आहे. फक्त ऐकिव माहिती एवढी मिळाली की जर भारतात कायमचे जाणार असु तर बर्याच जास्त किमतीचे सामान (स्वतःचे) घेवुन जायला परवानगी आहे. शोधाशोध केल्यावर जास्त काही माहोती मिळाली नाही... म्हणुन इकडे कुणाला काही कल्पना आहे का ते पहावे म्हणुन विचारले..
आता Transfer of residence बद्दल सर्च करुन बघतो...
पालकांची शिकले सवरलेली
पालकांची शिकले सवरलेली मुले-मुली आपल्या पालकांना येण्याअगोदर पुर्व सुचना का देत <<<
शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काय संबंध? भारतात परत जाताना असे अनेक आजी-आजोबा भेटतात, ज्यांनी २०/२२ किलोचे Carry-on आणलेले असते. या माणसांना स्वतःचा तोल सावरता येत नसतो मग बॅगेचे सोडाच. मग मदत मागतात, बॅगा उचलायला. त्या बॅगा इतक्या जड असतात की पट्टे वगैरे पण तुटलेले असतात. एका एका प्रवासात ६/७ लोकांना मदत करून झाली. त्यानंतर मदत करणं बंद केलं. त्यांची इथे असलेली मुलं बॅगा भरताना आपल्या आईवडिलांना काय झेपेल याचा विचार नाही करू शकत. आणि मदत करावी तर 'काळ सोकावतो'. परत पुढच्या वेळी ते हेच करणार.. भेटतं कुणीतरी म्हणून..
तिकडून येताना: तूप, गुळाची ढेप, तुरीची डाळ, शेवग्याच्या शेंगा (घरच्या), भाकरीचे पीठ, बेसन भाजून (लाडू करायला), काय काय म्हणून आणतील.
आणि इथून जाताना: तर सगळा मॉल बॅगेत..
महागुरु, लंडन एअरपोर्टबद्दल
महागुरु, लंडन एअरपोर्टबद्दल विचारून घेतलेले बरे कारण विविध लोकांकडून विविध अनुभव ऐकले आहेत. माझा मागल्या ऑगस्ट (२०१०) मध्ये मुंबई-लंडन-डॅलस/डलास असा प्रवास होता, ब्रिटिश एअरवेजने. इंग्लंडचा विसा लागला नाही, अमेरिकेचा B1 विसा होता.
सर्वांना धन्यवाद. इथल्या काही
सर्वांना धन्यवाद. इथल्या काही प्रतिसादानंतर भारतातील इंग्लंडच्या सर्व दुतावासांना इ-पत्रे पाठवुन विचारणा केली. एकाने संकेतस्थळावरील मजकुर जसाच्यातसा पाठवला तर दुसर्याने तेच नियम परत लिहुन विमानकंपनीला विचारायला सांगितले. कटकट नको म्हणुन ट्रान्झिट व्हिसा काढण्यासाठी पुण्याच्या व्हिएफएसच्या कार्यालयत वडील जाउन आले पण तिथे सांगितले की (त्यांच्या मताप्रमाणे) लागु नये पण काढायचाच असेल तर कमीतकमी २ आठवडे लागतील. नंतर २ दिवसांनी चेन्नई आणि मुंबई कार्यलयाचे पत्र आले की खालील सर्व अटी पुर्ण होत असतील तर ट्रान्झीट व्हिसा लागणार नाही.
१. पासपोर्ट संपण्याची मुदत सहा महिन्यापेक्षा जास्त पाहिजे
२. युएस, कॅनडा चा कोणताही व्हिसा असेल तर आणि त्याची मुदत सहा महिने तरी पाहिजे.
३. इंग्लंडमधे ज्या विमानतळावर आलात त्याच विमानतळावरुन पुढचे विमान असले पाहिजे
४. दोन्ही विमानप्रवास एकाच तिकिटावर पाहिजे (मुंबई ते इंग्लंड आणि इंग्लंड ते अमेरीका )
५. तुमचे जाताना-येतानाचे तिकिट कन्फर्म्ड असले पाहिजे.
६. विमान बदलताना लंडनमधील विमानतळावर तुमचा मुक्काम हा २४ तासपेक्षा जास्त नसावा तसेच रात्रभर पण असु नये.
ह्या सर्व अटी पुर्ण होत होत्या म्हणुन ट्रान्झिट व्हिसा काढायचा प्रयत्न केला नाही. मागच्या आठवड्यात वडिल इथे आले. ट्रान्झिट व्हिसा बद्दल काहीही त्रास झाला नाही .. अगदी विचारले पण नाही. व्हर्जिन अटलांटीक चे लोक का इतके व्हिसा पाहिजेच असे का सांगत होते ते कळाले नाही. मी त्यांना मुंबईच्या दुतावासाची इमेल वाचवुन दाखवली त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांच्या मार्गदर्शक सुचनां प्रमाणे व्हिसा लागायला पाहिजे.
परत एकदा सर्वांना धन्यवाद.
बर्याच सरकारी आणि
बर्याच सरकारी आणि विमानकंपन्यांच्या अधिकार्यांना देखील अर्धवट माहीती असते, आणि 'आपल्यावर बालंट नको', म्हणुन वाट्टेल ती उत्तरं दिली जातात.
१. OCI सुरू झाले तेव्हा लंडनला, 'हे काय आहे ते आम्हाला माहित नाही, तुम्ही भारताचा विसा दाखवा' असा हट्ट Boarding च्या वेळी.
२. मुलीच्या पासपोर्टवर Stamped Valid Visa आहे (९४/९५ पर्यंत Ink stamp visa असायचा) पण Sticker विसा नाही ( नंतर स्टीकर चिकटवण्याची पध्दत आली) म्हणून अटकाव.
३. तुम्ही Cancellation Certificate नसताना भारतात गेलात तर 'आमची जबाबदारी नाही' Indian Consulate NY..
असल्या अचरटपणाची आता सवय करून घ्यायलाच हवी. कारण नियम करणारा आणि तपासणी करणारा जबाबदार नसतोच, सगळी जबाबदारी तुमचीच..
visa extension pending असताना
visa extension pending असताना कुणी advance parole वर India ला जावुन परत आलं आहे का?
असेल तर कोण कोणते एक्स्ट्रा कागद पत्र बरोबर ठेवावी लागतील? transit visa काढु की नको?
transit visa काही ठराविक देशांसाठीच आहे म्हणुन मी बर्याच देशाच्या embassy ला मेल करुन विचारलं पण नीट असं उत्तर मिळत नाही आहे. प्रत्येका कडुन वेगळी माहीती मिळाली
कुणाला काहीही माहीती असल्यास सांगा.
रचु, फ्रॅन्कफर्ट जर्मनीला तरी
रचु, फ्रॅन्कफर्ट जर्मनीला तरी ट्रांझिट विसा अॅडवान्स परोल असताना लागला नाही अर्थात ही ८ वर्षापुर्वीची गोष्ट.
माझा एक प्रश्ण जर युएस पासपोर्ट असेल तर युके मध्ये किती काळ विसा शिवाय रहाता येते?
निलिमा फ्रॅन्कफर्ट जर्मनीला
निलिमा फ्रॅन्कफर्ट जर्मनीला आता ट्रांझिट विसा लागतो आता
रचु सॉरी, तु एअर इंडिया ने
रचु
सॉरी, तु एअर इंडिया ने येणार का? आणि ब्रेक केवढा आहे? विमान बदलणार का?
तेंव्हा लंडनला नेहेमी
तेंव्हा लंडनला नेहेमी प्रॉब्लेम होत असत पण जर्मनीत नाही. सर्वात सेफ सिंगपोर एअरलाइन मग सिंगपोरला कस्टम खुपच फ्रेन्डली आहे पण प्रवास खुप मोठा होइल.
http://forums.immigration.com
http://forums.immigration.com/threads/199662-Transit-Visa-not-required-f...
अगं मी बॉस्ट्न वरुन जाणार
अगं मी बॉस्ट्न वरुन जाणार आहे, मला डायरेक्ट फ्लाईट नाही आहे मला मधे कुठेतरी चेंज करावीच लागेल. मी अजुन तिकिट बुक केलं नाही आहे. प्रोब्लेम असा आहे की माझ्याकडे ट्रांझिट विसा काढे पर्यंत वेळ नाही आहे म्ह्णुन मला अश्या ठिकाणाचं(via) तिकिट काढयचं आहे की जिथे मला ट्रांझिट विसा लागणार नाही. यासाठी मी माहीती मिळते का ते बघते आहे.
जर नाहीच काही झालं तर आहेच शेवटी एअर इंडिया New York वरुन.
धन्सं गं निलिमा. मी
धन्सं गं निलिमा. मी lufthansaच्या साईटवर त्यांनी ट्रांझिट विसा लागेल असं लिहीलं आहे, बघते तरी embassyला मेल करते
रचु त्यापेक्षा Newark वरून
रचु त्यापेक्षा Newark वरून जाणार्या direct घे. बॉस्टनवरुन तिथे जायला बरेच options मिळतात.
असामीशी सहमत! मी Newark हून
असामीशी सहमत! मी Newark हून Continental ने जुलै मधे गेले होते. डायरेक्ट मुंबई.
फ्रँकफुर्र्ट ला ट्रान्जिट
फ्रँकफुर्र्ट ला ट्रान्जिट व्हिसा लागत नाही जर कनेक्टिंग फ्लाईट असेल तर-७ ते ८ तासात.
फ्रँकफर्ट साठी नाही लागत
फ्रँकफर्ट साठी नाही लागत व्हिझा. दुसरं ऑप्शन अॅमस्टरडॅम. दोन्ही कडून कनेक्शन्स घेतलीत गेल्या दोन तीन वर्षांत अॅडव्हान्स परोल वर. कुठेच प्रॉबलेम नाही आला.
Recently कुणाला भारताचा
Recently कुणाला भारताचा इमर्जन्सी विसा काढण्याचा अनुभव आहे का? पोस्टाने करायचा झाल्यास Renunciation साठी १५ दिवस + विसा प्रोसेसिंगसाठी ९-१० दिवस असा कालावधी आहे वेबसाईटवर. इन पर्सन बंदच केलं आहे. पण इमर्जन्सी मध्ये प्रत्यक्ष जाऊन काम होईल का त्याबद्दल माहिती मिळत नाहीये.
कुणाला अनुभव असल्यास कृपया सांगा.
बिल्वा कॉन्सुलेट लांब नसेल तर
बिल्वा कॉन्सुलेट लांब नसेल तर जाउनच ये आणि इमर्जन्सी समजावून सांग. कदाचित लौकर होईल. वेबवर अगदी लेटेस्ट/अचूक माहिती असतेच असे नाही.
अरेच्या मला वाटायच कि विमानात
अरेच्या मला वाटायच कि विमानात बोर्डींगच करु देत नाहीत. पण ट्रान्झिट व्हिसा मिळतो का जर अमेरीकेचा व्हिसा एक्स्पायर झाला असेल तर?>>>> नाहिचं करुदेत विमानात बोर्डींग... माझा स्वतःचा अनुभव आहे हा.... २४ तास जे.फ्.के विमानतळा वर बसुन कढले आणि मग डिरेक्ट (नॉनस्टॉप) मुंबई फ्लाईट पकडुन आलो.... युके बॉर्डरसेक्युरीटीच्या नियमा नुसार पासपोर्ट वर व्हॅलिड व्हिसा स्टॅंप्ड असणे गरजेचे आहे
इन पर्सन बंदच केलं आहे>>> कधि
इन पर्सन बंदच केलं आहे>>> कधि बंद केल हे? फेब २०११ मधे मी मझ्या मुलाचा भारतीय व्हिसा न्युयॉर्क ऑफिस मधुन इन पर्सन जाऊन बनवला होता... २ दिवसात मिळाला.
Pages