Submitted by फारएण्ड on 3 September, 2010 - 00:35
विविध देशांतील इमिग्रेशन, कस्टम्स वगैरेंच्या नियमाबद्दलची माहिती मिळवण्याकरिता हा धागा उघडलेला आहे. एखाद्या देशात जाताना काय नेता येते, कोणत्या देशात्/विमानतळावर ट्रान्झिट व्हिसा लागतो ई. गोष्टींबद्दल येथे माहिती द्यावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला धागा आहे, भारताचे
चांगला धागा आहे, भारताचे कस्टम खात्याचे नियम येथे आहेत.
सध्या एक मेल फिरत आहे - दुबई
सध्या एक मेल फिरत आहे - दुबई मधे खसखस, (विडा) पाने व त्यात घातले जाणारे काही पदार्थ ई. आणायला बंदी केलेली आहे असे त्यात लिहीले आहे. कोणालातरी त्याबद्दल शिक्षाही झाली असेही त्यात आहे. कोणाला काही माहीत आहे का?
दुबईमधे खसखस आणायला बंदी आहे-
दुबईमधे खसखस आणायला बंदी आहे- हे खरे आहे.
विड्याच्या पानाबद्दल खात्रीशीर माहिती नाही. पण या गोष्टी न आणणे हेच उत्तम.
सिंगापूर व ओमान मधेही खसखस
सिंगापूर व ओमान मधेही खसखस आणायला बंदी आहे. खसखस म्हणजे अफूच्या बिया. पण अफू काढून घेतल्यावर खसखशीत कुठलेच मादक द्रव्य उरत नाही, हे त्या देशांना ठाऊक नाही. (असे असले तरी, खसखस असलेले मसाले मात्र ओमानमधे मिळतात.)
ओमानमधे खायची पाने विकणे व खाणे यावर पण बंदी आहे, पण सलालाह मधे ती पिकतात, विकतात आणि खातातही.
भारतासह बर्याच देशात, बिया, झाडे, रोपे, मीट प्रॉडक्ट्स आणायला बंदी आहे.
न्यू झीलंड मधे बहुतेक खाद्यपदार्थ न्यायला मनाई आहे.
ऑस्ट्रेलिया मध्ये दुग्धजन्य
ऑस्ट्रेलिया मध्ये दुग्धजन्य पदार्थ आणण्यास बंदी आहे, विमानतळावर सामानातून काढून टाकतात.
>>ऑस्ट्रेलिया मध्ये दुग्धजन्य
>>ऑस्ट्रेलिया मध्ये दुग्धजन्य पदार्थ आणण्यास बंदी आहे, विमानतळावर सामानातून काढून टाकतात.
हे खरे आहे.लेकाचा बोर्नव्हिटा काढून टाकला होता. आणि १/२-१/२ तास मन लावून सामान चेक करतात.
अमेरिकेत आंबा आणायला जी बंदी
अमेरिकेत आंबा आणायला जी बंदी होती ती काही दिवसांपूर्वी उठवली गेली आहे हे खरे आहे का?
अमेरिकेत आंब्याला बंदी का आहे
अमेरिकेत आंब्याला बंदी का आहे
नमस्कार....मला स्वीडन बद्दल
नमस्कार....मला स्वीडन बद्दल माहिती हवी आहे
अमेरिकेत आंब्याला बंदी का आहे
अमेरिकेत आंब्याला बंदी का आहे << कोणत्याही फळ, भाजी, अगर न शिजवलेल्या ( खारवलेल्या, किंवा वाळवलेल्या) पदार्थातून बॅक्टेरिया येण्याची शक्यता आहे म्हणून...
तशी रोगराई इथेही भरपूर आहे त्यात विदेशी नको म्हणून
आता बंदी नाहिये!!!
आता बंदी नाहिये!!!
अमेरीकेत आंबे तुमच्या
अमेरीकेत आंबे तुमच्या स्वतःच्या सामानातून आणायला बंदी आहे. आयात/निर्यात परवाना असणार्या एखाद्या विक्रेत्याकडून मागवता येतात. उदा. देसाई बंधू. अजुनही आहेत.
देसाई बंधू. अजुनही आहेत.>>>>>
देसाई बंधू. अजुनही आहेत.>>>>> काय?... देसाई बंधू ?कि आंबे? कि रोगराई? कि व्हायरस?
मी गेल्या मे मध्ये गेलो
मी गेल्या मे मध्ये गेलो असताना आंबे नेले होते -स्वतःच्या सामानात्.सॅन फ्रॅन्सिस्को च्या इमिग्रेशन व कस्टम वाल्यानी विचारले-आंबे आणलेत का-मी हो म्हणून डिक्लेर पण केले होते-त्यानी नेवू दिले.
नंतर माझ्या जावयानी आता बंदी उठवल्याचे सांगितले.त्यानंतर पुनः बंदी केल्यास माहित नाही.
माझे वडील भारतातुन अमेरीकेत
माझे वडील भारतातुन अमेरीकेत व्हिजिटर व्हिसा वर येणार आहेत. त्यांचे विमान लंडन मार्गे आहे. त्यांना युके ट्रान्झिट व्हिसा लागेल का?
माझ्या माहितीप्रमाणे लागणार
माझ्या माहितीप्रमाणे लागणार नाही.
जर तुमच्याकडे अमेरीकेचा व्हॅलीड (स्टँप्ड) व्हिसा नसेल म्हणजे तुम्ही एक्स्टेंशन स्टँप करून घेण्यासाठी भारतात जाणार असाल तरच युके ट्रान्झिट व्हिसा लागतो.
तुमचे वडील व्हिजिटर व्हिसावर येणार असल्याने ते ह्या कॅटेगरीत बसणार नाहीत त्यामुळे युके व्हिसाची गरज पडणार नाही..
तरीही.. त्यांच्या वेबसाईट वर बघा, एअरलाईनला विचारा वगैरे वगैरे..
जर तुमच्याकडे अमेरीकेचा
जर तुमच्याकडे अमेरीकेचा व्हॅलीड (स्टँप्ड) व्हिसा नसेल म्हणजे तुम्ही एक्स्टेंशन स्टँप करून घेण्यासाठी भारतात जाणार असाल तरच युके ट्रान्झिट व्हिसा लागतो.>>>> अरेच्या मला वाटायच कि विमानात बोर्डींगच करु देत नाहीत. पण ट्रान्झिट व्हिसा मिळतो का जर अमेरीकेचा व्हिसा एक्स्पायर झाला असेल तर?
लंडन ला नाही लागत पण काही
लंडन ला नाही लागत पण काही युरोपीअन देशांत लागतो.
मला वाटतं एअरलाईन्स ला
मला वाटतं एअरलाईन्स ला विचारलं तर बरं. आम्हाला न्युयॉर्क- मुंबई व्हाया लंडन प्रवासासाठी एअर इंडियाने तिकीट काढतानाच ट्रांझिट व्हिजा लागेल असं सांगितलं होतं. लंडनला ३-४ तास टर्मिनल वर असावे लागणार होते म्हणून. पण जाता येता तांत्रिक कारणामुळे आम्हाला विमानातून उतरवलचं नाही. व्हिजा चा काही उपयोगच नाही झाला.
ही गोष्ट ७ वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे नवीन नियम माहिती नाहीत.
महागुरू UK consulate website
महागुरू UK consulate website वर बघून खात्री करुन घ्या.
महागुरु नाही लागत. (तुम्ही
महागुरु नाही लागत. (तुम्ही तरीही खात्री करुन घ्या.) माझे आई वडील मागच्या वर्षी व्हाया लंडन आलेले त्यांना लागला नव्हता.
सर्वांना धन्यवाद. युके च्या
सर्वांना धन्यवाद.
युके च्या साईटवरील माहिती वाचुन फार कळाले नाही पण त्यांच्या मते घ्यावा लागतो. पण व्हिएफएस संकेतस्थळानुसार पुणे कार्यालयातुन मागच्या महिन्यात फक्त ४ ट्रान्झिट व्हिसा प्रोसेस झालेत.
एअरलाइनच्या वेबसाईटनुसार लागणार नाही पण कस्टमर सर्व्हिसवाली बाई म्हणाली की तुम्ही विमान बदलता म्हणजे पाहिजेच. बाकी २ मित्रांच्या अनुभवानुसार लागत नाही आणि एका मित्राला मात्र व्हिसा काढावा लागला.
महागुरू, एलएच्या ब्रिटिश
महागुरू, एलएच्या ब्रिटिश एम्बसीला फोन किंवा मेल कर. मागच्या वेळेस व्यवस्थित माहिती दिली होती (ती व्हिसा बद्द्ल होती, पण हे ही त्यांना माहीत असेल).
महागुरू, माझे आई वडील नुकतेच
महागुरू,
माझे आई वडील नुकतेच गेल्या महिन्यात मुंबई-लंडन मार्गे अमेरिकेत आले. मुंबईत अमेरिकन एअर लाईन्स व लंडन पासून ब्रिटीश एअर लाईन्स होती. त्यांना कुठलाही विसा लागला नाही. तुम्ही एअर लाईन्सला विनंती करून त्यांच्यासाठी व्हील चेअर मागवून घ्या. एअर लाईन्स त्यांना विमान बदलवून देईल. काही शंका असल्यास जरूर विपु करा.
सर्वांना परत
सर्वांना परत धन्यवाद.
फारएण्ड, मी ब्रिटिश एम्बसीला मेल केली आहे. उद्या उत्तर अपेक्षित आहे.
त्यांचे मुंबई- लंडन विमान जेट एअरवेज (टर्मिनल ३) आहे आणि नंतर कनेक्टींग प्लाईट व्हर्जिन अटलांटीक आहे ते टर्मिनल ४ वरुन उडणार आहे. व्हर्जिन अटलांटिकच्या म्हणण्यानुसार टर्मिनल बदलते आहे त्यामुळे व्हिसा लागेल. युके बॉर्डरसेक्युरीटीचे नियम वाचले त्यावर टर्मिनल चेंजचा कुठे उल्लेख नाही आणि त्यावरुन तरी व्हिसा लागणार नाही असे वाटते.
युके बॉर्डरसेक्युरीटीचे नियम
युके बॉर्डरसेक्युरीटीचे नियम वाचले त्यावर टर्मिनल चेंजचा कुठे उल्लेख नाही आणि त्यावरुन तरी व्हिसा लागणार नाही असे वाटते.>> हो पण तुम्ही जर "Do I need visa" बघितले तर YES, normally you will need visa" असे सांगतात. All the best figuring out that.
मी सध्या युरोप मधे बेल्जियम
मी सध्या युरोप मधे बेल्जियम मधे रहातो....... I love dry fish....does anyone know if we can can carry dry fish with us on board in a flight? or cargo?
Dry Fish..??? जगात बर्याच
Dry Fish..??? जगात बर्याच ठिकाणी मासे/मटण आयात निर्यातीवर बंधनं आहेत. युरोपाचे नियम तिथल्या Baggage Claim च्या इथे लिहीलेले असतातच.. पण Dry Fish चा वासच इतका असतो की सामानातून शक्यतो नेऊ नये.. सगळ्या कपड्याना वास लागतो. आणि तरी न्यायचं असेल तर अगदी कडक उनात वाळवून, प्लॅस्टीक आणि Aluminium Foil चे थर देऊन, सगळी हवा काढून एकाद्या सील डब्यात भरा..
मी सुके मासे.. चेक इन
मी सुके मासे.. चेक इन सामानतून आणले आहेत.. एकात एक तीन - तीन प्लास्टीक पिशव्यांमधून बांधून, अजुनपर्यंत कधी त्रास झाला नाहिये.. पण सांगू शकत नाही की कोणी पकडणारच नाहीत असे!
धन्यवाद परदेसाइ
धन्यवाद परदेसाइ साहेब्......जाइ जुई......मी रिस्क घ्यायला तयार आहे
Pages