Submitted by फारएण्ड on 3 September, 2010 - 00:35
विविध देशांतील इमिग्रेशन, कस्टम्स वगैरेंच्या नियमाबद्दलची माहिती मिळवण्याकरिता हा धागा उघडलेला आहे. एखाद्या देशात जाताना काय नेता येते, कोणत्या देशात्/विमानतळावर ट्रान्झिट व्हिसा लागतो ई. गोष्टींबद्दल येथे माहिती द्यावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शापित गंधर्व तुमचं बरोबर आहे.
शापित गंधर्व तुमचं बरोबर आहे. मी बहुतेक अर्धवट माहिती लिहीली. मला सेम डे विसा म्हणायचं होतं. former indian nationals साठी renunciation जरूरी आहे. पी आय ओ, विसा, ओ सी आय सगळ्यासाठी. आणि ते एका दिवसात होत नाही . इन पर्सन जाऊन कागदपत्र देता येतील पण विसा मिळायला मात्र वेळच लागेल.
यू एस बॉर्न- यू एस सिटीझन असेल तर सेम डे विसा मिळतो. म्हणून मला माहिती हवी होती की इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आधी भारतीय नागरिक असलेल्यांसाठी काही वेगळी सिस्टीम आहे का?
फारएंड, विसा करून आणण्यासाठी जायचं म्हटलं तर एका दिवसात जाऊन येता येईल इतपत जवळ आहे कॉन्स्युलेट पण नुसत्या चौकशी साठी जायला खूपच लांब
फोन आणि ईमेल ने संपर्क साधायचा प्रयत्न करतेय पण ते फारच अवघड आहे.
फोन आणि ईमेल ने संपर्क
फोन आणि ईमेल ने संपर्क साधायचा प्रयत्न करतेय पण ते फारच अवघड आहे.
----- e-mail करुन ठेवायची आणि फोन वर प्रयत्न करत रहायचा... मी परवा ६०मिनीटे फोन च्या रांगेत होतो (VFS सेवा) पण e-mail ला उत्तर मिळाले.
मी माझ्या यूके वास्तव्या नंतर
मी माझ्या यूके वास्तव्या नंतर कायमचा भारतात परतलो. येताना ४२" टीव्ही घेतला पण त्याचे डायमेंशन जादा असल्यामुळे मी तो माझ्या बरोबर न आणता एका कुरियर तर्फे पाठवून दिला. आता कस्टम्स वाले त्या टीव्ही साठी ३५००० मागत आहेत (टीव्ही ची किंमत ३०००० च्या आसपास आहे). ह्या बद्धल कोणाला काही नियम माहीत आहेत का? टीव्ही १ महीना कस्टम्स वाल्यांकडेच पडून आहे
बिल्वा, This is from the New
बिल्वा,
This is from the New York website. This works for Same day processsing. स्वानुभव आहे.
Processing Time
US citizens born in the US
•In Person Applications - Same day visa applications for US citizens born in the US must be submitted in person to the Outsourcing Office between 9:00am and 11:00am for consideration. You must have an appointment that is selected at the end of the online application form. You will need to pay with Cash or Money Order. Pickup for same day applications, if the visa is granted, is usually between 5:30pm and 6:00 pm. We do not guarantee the visa will be issued same day. Applications received after 11:00am will have the visa issued, if approved, the following working day for non-reference cases. Persons of Indian origin should allow for extra processing time. Processing time cannot be guaranteed and tickets should not be purchased until all visas are granted and in your possession
My daughter, born in India, had an Indian passport. Got the visa the same day.
Within 5 minutes of submitting the application received an e-mail that the application was received. Also got an e-mail stating that it was sent to consulate. Another one for approval and yet another one stating that the passport was now available at the processing center.
This was in May 2010
सॅको, Transfer of residence
सॅको, Transfer of residence क्लेम केला आहे का? कुरियर/शिपिंग वाले तो करतात. टीव्हीवर तरीही कस्टम ड्यूटी पडतेच पण टीआर असेल तर कमी पडते. माझ्या अंदाजाने २० ते ३५ टक्के पडायला हवी.
फारएण्ड, Transfer of
फारएण्ड, Transfer of residence क्लेम कसा करायचा ते प्लीज सांगाल का?
शिपिंग वाल्यांकडे त्याचे
शिपिंग वाल्यांकडे त्याचे फॉर्म्स असतात, कुरियर कंपनी ला विचारून बघा.
कस्टमची त्याबद्दलची लिन्क - येथे थोडी माहिती मिळेल.
http://www.cbec.gov.in/customs/cs-act/formatted-htmls/cs-rulef.htm
http://mumbaicustoms3.gov.in/htmldocs/tr.htm
खुप खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
मला लंडनवरून मुम्बैला जायचे
मला लंडनवरून मुम्बैला जायचे आहे.
लेकीला सध्या वेंटोलिन माऊथस्प्रे दिलाय. विमानात केबिनमध्ये स्प्रेज नेता येतात का? मला अँटीबायोटिकची बॉटलपण १०० मिलीची न्यायची आहे. नेऊ देतिल का?
साको खालील लिंक्स पहा,
साको
खालील लिंक्स पहा, कस्टम्स ला तुम्ही तुमच्या पासपोर्ट ची कॉपी दाखवून खालचे फायदे घेण्याचा प्रयत्न करून पहा.
मी स्वतः यु.के.हुन मुंबईला सोनीचा ४० इंची टि.व्ही १ वर्षापुर्वी नेला होता, काहीच पैसे भरावे लागले नाही.
तुम्ही नीट चौकशी करा
http://www.cbec.gov.in/customs/cs-act/formatted-htmls/cs-rulef.htm
c) Indian passenger returning after a stay of minimum 365 days during the preceding 2 years on termination of his work, and who has not availed this concession in the preceding three years.
Articles allowed free of duty
(i) Used household articles and personal effects, (which have been in the possession and use abroad of the passenger or his family for at least six months), and which are not mentioned in Annex I, Annexure II or Annexure III upto an aggregate value of Rs.75,000.
प्रफुल्लशिंपी (उच्चार बरोबर
प्रफुल्लशिंपी (उच्चार बरोबर आहे?) त्यात जे अॅनेक्शर-२ (७५००० मधून वगळलेल्या गोष्टी) आहे त्यात रंगीत टीव्ही आहे त्यामुळे तो सरसकट या सूटीत येत नाही. तुमचा टीव्ही किती आधी घेतलेला होता? सॅको यांचा टीव्ही नवीन आहे असे त्यांच्या पोस्टवरून वाटते. एकूणच टीव्हीच्या बाबतीत थोडे कस्टम ऑफिसर्स च्या discretion वर असेल असे वाटते.
जाईजुई - लंडनमधल्या डॉ ची नोट असेल तर नेऊ द्यायला पाहिजे. एअरलाईन आणि एअरपोर्ट दोन्हीकडे कन्फर्म केलेले चांगले. स्प्रे फार महाग नसेल तर एक चेक-इन बॅग मधे ठेवून दुसरा वर ठेवा आणि सोडायला कोणी येणार असेल तर त्यांच्याकडे परत द्या सिक्युरीटी चेक मधे अडवला तर. सिक्युरिटी चेक वाला स्टाफ बहुधा एअरपोर्टचा (कंत्राटी) असतो, त्यामुळे अमेरिकेतल्या TSA सारखी एजन्सी लंडनमधे जी असेल त्यांच्याकडून तुम्हाला नक्की कळेल.
माझाही टीव्ही नवीनच होता,
माझाही टीव्ही नवीनच होता, पॅकींग सकट. पण तुम्ही सांगतांना त्यांना वापरलेला सांगा, मुळ पॅकींग उघडून परत चिकटपट्ट्या चिकटवा
दुसरे असे की पहिल्या २५००० नंतर उरलेली जी रक्कम असेल ( टिव्ही च्या किमती वरील) त्यावर टॅक्स बसतो त्यामुळे तो एव्हढा कसा काय होतोय?
जाईजुई - डॉ ची नोट असेल तर अडवणार नाही तरीही फारएण्ड चा सल्ला बरोबर आहे.
सिक्युरिटी कंत्राटी जरी असला तरी त्यांना त्या देशासाठी लागु असलेलेच सगळे नियम पाळावे लागतात. त्यामुळे शक्यतोवर अडवणार नाही
फारेण्ड आणि प्रकुल्ल,
फारेण्ड आणि प्रकुल्ल, डॉक्टरांनी दिलेल्या औषधावर लेकिचे नाव आणि डोस आहेत. वेगळी चिठ्ठी देखिल लागेल का? त्याचा काही फॉर्मॅट आहे का?
वेगळ्या फॉर्मॅट ची गरज
वेगळ्या फॉर्मॅट ची गरज नाहिये, फक्त सोबत बाळगा, डॉक्टरांनी दिलेल्या औषधावर चे लेकिचे नाव आणि पासपोर्ट वरचे नाव फक्त बरोबर आहे का तेवढे बघा.
महत्त्वाचे म्हणजे साधारणता: १०० मि.ली पर्यंत परबानगी देतात, तेवढे पाहा
थोडं नशीब लागेल, तेही घेऊन जा
थोडं नशीब लागेल, तेही घेऊन जा
मला साधारणपणे ३ वेळा दात घासता येईल एवढी टुथपेस्ट टाकावी लागली आहे. (Original ट्युब मोठी होती म्हणुन).
आईची डायबेटिसची औषधे टाकावी लागली आहेत (काय हवी ती आत्ता इथेच घ्या... म्हणजे पूर्ण दिवसला चार गोळ्या असतील तर चारही एकदम घ्या). लंडनला काहीतरी गडबड झाली होती म्हणून..
जाईजुई, prescription medicine
जाईजुई, prescription medicine असेल तर ते त्याच्या ओरिजिनल कंटेनर मधूनच न्यावे कारण त्या कंटेनर वरती सर्व information असते. मग वेगळ्या सर्टीफीकेटची आवश्यकता नाही.
अमेरिका अथवा जर्मनी येथे
अमेरिका अथवा जर्मनी येथे जाण्यासाठी व्हिसा काढताना मागील ३ वर्षांचे इन्कमटॅक्स रिटर्न्स दाखवावे लागतात का ? मी नोकरी सोडून बरीच वर्षे झाली. तसेच माझी टॅक्सेबल इन्कम नाही. त्यामुळे सी. ए. च्या म्हणण्यानुसार इ. रि. भरावा लागत नाही सध्या. पण बाहेर जायची वेळ आलीच तर इ रि लागेल का ? मला या संदर्भात कोठे माहिती मिळेल ? धन्यवाद.
अवल , कोणता व्हिसा? मला एच ४
अवल , कोणता व्हिसा?
मला एच ४ च्या वेळी तर काही गरज पडली नव्हती रिटर्न्स ची,आणि तेव्हा नोकरी सोडून मला २ वर्षे झाली होती..
स्नेहा धन्यवाद. मला
स्नेहा धन्यवाद. मला व्हिजिटर्स व्हिसा बद्दल माहिती हवी होती.
मुम्बई-लंडन-अमेरिका असे विमान
मुम्बई-लंडन-अमेरिका असे विमान असेल तर सामान चेक आउट करून परत चेक एन करावे लागते काय? तसेच लंडन ला इमिग्रेशन चेक होईल का?
एकच तिकीट काढलं असेल तर
एकच तिकीट काढलं असेल तर नाही.. (मुंबई-लंडन मुंबई, आणि लंडन - अमेरिका - लंडन असे असेल तर हे सगळे करावे लागेल)..
लंडन ईमिग्रेशन चेक नाही... (तुम्हाला विमानतळाच्या बाहेर पडायचे असेल लंडनला तरच होईल). लंडनला फक्त सुरक्षा जांच होईल...
तिकीट घेताना लक्ष ठेवा... विमानतळ बदलला तरी हे सगळे करावे लागते
चेक आउट करून परत चेक एन करावे
चेक आउट करून परत चेक एन करावे लागते काय? >> नाही! पण मुंबईला सामान चेच्क ईन करतांना न विसरता थ्रू चेच्क ईन आहे ना ते कन्फर्म करून घ्या
तसेच लंडन ला इमिग्रेशन चेक होईल का? >> हो. देसाई म्हणतात त्याप्रमाणे सिक्युरिटी चेक आणि अमेरिकेचा वॅलिड विजा आहे त्याची पुन्हा पडताळणी. पासपोर्ट वर ईमिग्रेशन स्टँप लागतो का अस प्रशन असेल तर - नाही
धन्यवाद! मेक माय ट्रीप वरून
धन्यवाद! मेक माय ट्रीप वरून कोणी यापूर्वी बुकींग केलय का? कशी सेवा आहे?
मी खूप वेळा पण अमेरिकेतून
मी खूप वेळा पण अमेरिकेतून केलंय... कधीच काही त्रास झालेला नाही.
अमेरिकेला येताना Nonstop फ्लाईट नसेल तर कुठेतरी थांबावे लागतेच.. United किंवा तत्सम Nonstop फ्लाईटने आलात तर अमेरिकेत शिरताना पहिल्या Port ला इमिग्रेशन / कस्टम करावे लागेल.
युरोपातून आलात तरीही तेच... मधल्या ठिकाणी सुरक्षा, आणि कागदपत्र तपासले जातील पण बाकी इमिग्रेशन / कस्टम वगैरे करावे लागणार नाही....
मधे उतरून विमानतळाबाहेर जायचे ठरले/ जावे लागले तरच हे सगळे करावे लागते...
मेक माय ट्रिप वरून बुकिंग -
मेक माय ट्रिप वरून बुकिंग - मी केले आहे. चांगली सेवा आहे. कस्टमर सर्विसही चांगली होती. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दोन्ही केले आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
तोषवी, मी पण मेक माय
तोषवी, मी पण मेक माय ट्रीपवरुन दोनदा बुकींग केले आहे. चांगला अनुभव आहे. आणखी माहितीसाठी फोन कर ना!
माझे आईवडिल येत आहेत पुढ्च्या
माझे आईवडिल येत आहेत पुढ्च्या महिन्यात. आंबे आणतो म्हणाले. काय नियम आहेत अमेरिकेत आंबे आणायचे? प्लीज मार्गदर्शन करा.
राया, आपण जेव्हा यु एस
राया, आपण जेव्हा यु एस ईमिग्रेशन फोर्म भरतो त्यावेळी तिथे स्प्श्ट लिहिले आहे की ... fresh fruits seeds , live stocks yes / no ...... इथे NO वर टिक केले तर आरामात बाहेर जातो. पण yes वर टिक केले तर फारच कटकट होते.
एक अनुभव... आमच्या ओळखिच्या एक आज्जी यु एस ला जात होत्या. जाताना त्यान्चभिघडले बीघडले होते म्ह्णुन त्यानी प्रावासात काही खायचे नाही असे ठरवले. आणी बरोबर apple ठेवले. यु एस ईमिग्रशन वाल्यानी जो काही त्रास दिलाय की apple तर त्यान्च्या समोर असे काही टाकले जसा काही बॉम्ब आहे . आणी वाट्टेल तसे बोलले ते . आज्जी असल्याने नीट कळले नाही त्याना . आणी २ - ३ तासानी त्याना clearance मीळाला.
तर अजुन नीट चौकशी करुन्च ठरवावे ....
अजुनही प्रतिक्रिया येतिल च .
>>माझे आईवडिल येत आहेत
>>माझे आईवडिल येत आहेत पुढ्च्या महिन्यात. आंबे आणतो म्हणाले. काय नियम आहेत अमेरिकेत आंबे आणायचे? प्लीज मार्गदर्शन करा.<<
बिलकूल आणू नका सांगा. उगाच त्रास होइल.
कुत्रे फिरत असतात चेक करायला. दुसरे म्हणजे, जबरदस्त फाईन आहे.
माझी तिथल्या शेजारचीची आई पकडली गेली, त्यांचा बैंगनपल्ली आंबे, त्यांचे कोंबडीचे लोणचे वगैरे. कस्टम पेपर मध्ये खोटं लिहिलं होतं असे वाटल्याने तीन दिवस तिला डिटेन केले. मग काहितरी मोठी रक्कम भरली. नशीब इतकेच की ईंग्लिश कळले नाही त्यामुळे फॉर्म चुकीचा भरला गेला असे काहितरी होवून सुटली.
तिचे अमेरीकेत येणे आता कठिण आहे.(दर वेळेला तो रेकॉर्ड उघडला जाईल).
कोणी काहीही सांगितले की, मसाले चालतात, ह्यांव चालतात. घेवून जावु नका. रँडम चेक असते. काही सुटतात, काहि नाही.
(एका चांगल्या हेतुने व कळकळीने हे लिहिलय कारण कोणाच्याही म्हातार्या आई वडीलांचे हाल होवु नये ह्या प्रकारात.)
भारतीय आंबे नाहिच आणू शकत. तसेही बिझिनेस रुल्स नुसार भरपूर पैसे भरून कस्टम वेवर घ्यायला लागेल. आणि नक्कीच तुम्ही इतक्या प्रमाणात आंबे आणत नसाल.
Pages