Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चातका गोडगोजीरे असली तर
चातका गोडगोजीरे असली तर उच्छाद मांडतात रे हे. मागे एकाने हैराण केलं होतं मला. शेवटी लगे रहो मुन्नाभाई ऐवजी दबंग स्टाईलने त्याची "सोय" केली.
कसली आहेत ती उंदराची
कसली आहेत ती उंदराची पिल्लं!!
आणि जागु त्यांचे फोटो काढायला तु इतक्या वर कशी पोचलीस?
हो जागू ...कुठे चढलीस फोटो
हो जागू ...कुठे चढलीस फोटो काढायला? पण बुंध्याला गुळगुळीत पत्रा ठोकून घेणे हा अगदी अक्सीर इलाज आहे या उंदरांवर.
आणि माधव यांनी अगदी कच्च्या फळांचा फोटो दिलाय. ही कढिलिंबाची फळे काळपट करवंदांसारखी दिसतात पिकल्यावर.
नाही मी कुठेच चढले नाही.
नाही मी कुठेच चढले नाही. माझ्या ओटीवरुनच फोटो काढलेत. ह्या नारळाला बुंध्याच्या ४-५ फुटापासुन नारळ लागायला सुरुवात झाली त्यामुळे हे नारळ खालीच लागलेत.
मी कधी तरी वाचलय, इशान्य
मी कधी तरी वाचलय, इशान्य भारतात जेव्हा ( अनेक वर्षांनी ) बांबूला फुलोरा येतो तेव्हा लोक व सरकार उंदीर मारायची विषेश मोहीमच हाती घेतात. इतकी त्यांची संख्या वाढते व ते उच्छाद मांडतात.
कधी तरी...बहुतेक २
कधी तरी...बहुतेक २ महिन्यांपूर्वी ....उगवलेल्या भोपळ्याचे वेल कुंडीतून बाहेर पडताहेत. त्याचं काय करू? ते वेल जमीनीवर यायला हवेत का? कारण पुढे भोपळे आल्यावर त्याला आधार लागतो ना?
योग्य जागा सुचवावी.
मानुषी भोपळ्याचे वेल जमिनीवर
मानुषी भोपळ्याचे वेल जमिनीवर नाहीतर छपरावर सोडले तरी चलतात. भोपळा जमिनीचा आधारानेच मोठा होतो. वेल पसरत असेल तर कोवळे तूरे खुडुन त्याची भाजी करता येते. नर फुलांच्या कळ्यांचीही भाजी होते.
श्रीकांत, बांबूच्या बिया आणि फळे यांची अमाप पैदास होते आणि त्यामूळे उंदिरही वाढतात. अशा योजना सर्वच ठिकाणी हाती घ्याव्या लागतात. या बिया तांदळासारख्या असतात आणि त्याची खीर करतात.
कालच्या (दिनांक २ जुलै)
कालच्या (दिनांक २ जुलै) लोकसत्ता "चतुरंग" पुरवणीतील हे दोन वाचनीय लेख
श्रीमंती- बकुळफुलांची अन्..
आणि
‘वानूर लॅण्ड’: देशी शेतीप्रयोग!
जिप्स्या, त्या बकुळफूलातील
जिप्स्या, त्या बकुळफूलातील किस्सा खुप हळवा करणारा आहे. अगदी अनपेक्षित शेवट केल्याने, ती घटना सत्य असणार यात शंकाच नाही. आणि इतक्या वर्षानंतर हे लिहिण्यात लेखकाचा प्रांजळपणा तरी किती !
दिनेशदा, नारळाच्या झाडावर
दिनेशदा,
नारळाच्या झाडावर चढुन नारळ तोडणार्यांना मात्र या उंदरांची,कधी कधी सापांची,विंचवांची भिती ही असतेच.
लहाणपणापासुनची (नारळ तोडताना) ही भिती मला अजुनही आहेच.
पुण्यातील बालगंधर्व
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात हा ब्राझीलचा पाहुणा छान रुळलाय. 'तबेबुया'! खूप उंच आणि थोराड आहे हा. आणि ह्याची फुलं मात्र याच्या उलट; खूपच नाजूक आणि तलम! आणि रंगही अगदी फिक्कट गुलाबी.
कुणीतरी खाली पडलेलं हे फूल खोडाच्या बेचक्यात खोचलं होतं. नाहीतर या पावसाळी दिवसांत खाली गळून पडलेल्या फुलांचा सडा चिखलाने माखलेला दिसतो.
हिरव्यागार पानांची छत्री अगदी उठून दिसते. थोडीशी जांभळाच्या पानांची आठवण करून देतात ही पानं.
त्या बकुळफूलातील किस्सा खुप
त्या बकुळफूलातील किस्सा खुप हळवा करणारा आहे. अगदी अनपेक्षित शेवट केल्याने, ती घटना सत्य असणार यात शंकाच नाही. आणि इतक्या वर्षानंतर हे लिहिण्यात लेखकाचा प्रांजळपणा तरी किती !>>>>अगदी अगदी
शांकली, पिवळा टॅबेबुया दिसला
शांकली, पिवळा टॅबेबुया दिसला का ? मला तो जास्त आवडतो.
अनिल, लोकसत्तामधला एक लेख नारळाच्या झाडावरच आहे, वाचला का ?
जिप्स्या, या प्रांजळपणामूळेच ही माणसं थोर वाटतात रे मला.
मी दर शनिवारची वास्तुरंग
मी दर शनिवारची वास्तुरंग पुरवणी वाचते. निसर्गविषयक छान लेख असतात. मी माझा बुलबुलचा पण पाठवला आहे लेख. तो वेटिंगलिस्ट्मध्ये पडलाय.
आज आमच्याकडे एक नवल दिसले.
आज आमच्याकडे एक नवल दिसले. उत्तरायण पूर्ण होउन आता दक्षिणायन सुरु झालेय. आता खालच्या फोटोत बघा.
फोटोत तूमच्या उजव्या हाताला सूर्य मावळलाय, पण प्रभावळीचा उगम मात्र तूमच्या डाव्या बाजूला दिसतोय.
हे असं का झालं माहित नाही, पण मग थोड्याच वेळाने, सूर्याने असे अंधाराचे झोत सोडले !!
मस्त आहे फोटो. श्रीकांत
मस्त आहे फोटो.
श्रीकांत बांबुला साधारण ६० वर्षांनी एकदा फुलोरा येतो. त्यानंतर त्याच्या बिया जमिनीवर पडतात. त्यापासुन नविन रोपे येतात. नविन रोपांना वाढीला वाव मिळायला हवा म्हणुन जुना बांबु (फुलोरा आलेला) मरून जातो. अशी वंदता आहे की बांबुला फुलोरा आल्यावर त्यावर्षी दुष्काळ पडतो. पण याला काही शास्त्रीय आधार नसावा.
मी यावर्षी जपान मधे फिरताना डोंगरावरचे बांबुचे काही काही पॅच एकदम पिवळे झालेले पाहिले. ते फार दुर असल्याने तो फुलोरा होता की त्याची पानेच पिवळी झाली ते कळलं नाही.
बकुळ फुलांचा लेख सुंदर आहे.
बकुळ फुलांचा लेख सुंदर आहे.
वसई किल्ल्यावर दिसलेला हा
वसई किल्ल्यावर दिसलेला हा दुर्मिळ असा बांबुचा फुलोरा
>> अशी वंदता आहे की बांबुला
>> अशी वंदता आहे की बांबुला फुलोरा आल्यावर त्यावर्षी दुष्काळ पडतो. पण याला काही शास्त्रीय आधार नसावा.
>>
यावर आधारीत एक कार्यक्रम डिस्कव्हरीवर एकदा पाहिला होता. त्यात त्यांनी ही वदंता का रूढ झालीय हे सांगायचा प्रयत्न केला होता. पुर्ण आठवत नाही पण मला वाटतं असं काहितरी होतं की, बांबूच्या बिया अतिशय पौष्टीक असल्याने त्या खाऊन उंदरांची भरमसाठ वाढ होते. हे उंदीर पिकं नष्ट करतात, धान्याच्या कोठारांचा फडशा पाडतात, परिणामी दुष्काळ पडतो.
जिप्सी तुझा फोटो बघुन वाटतय
जिप्सी तुझा फोटो बघुन वाटतय की मी बघितलेला फुलोराच होता. पण मला तिथे जाऊन फोटो घेणे शक्यच नव्हते.
मी अमि, हां हि शक्यता आहे.
स्मिता पाटीलचा एक बंगाली
स्मिता पाटीलचा एक बंगाली सिनेमा होता. दुष्काळाच्या शोधात अशा अर्थाचे बंगाली नाव होते. त्याची कथा या समजावर आधारीत होती. मला वाटतं पथेर पांचाली मधे पण अशी दृष्ये आहेत.
दिनेशदा फोटो मस्त आहे.
दिनेशदा फोटो मस्त आहे.
जिप्सी, मी जो फुलोरा बघितला
जिप्सी, मी जो फुलोरा बघितला होता, किंवा वरच्या दोन्ही चित्रपटात होता, तो तूझ्या फोटोतल्याप्रमाणेच होता. त्यातला बिया तांदळासारख्या असतात, हेही वाचले होते. पण वर्तमानपत्रातल्या एका फोटोत, आसाममधे बांबूला नारळासारखी फळे लागलेली पण बघितल्याचे आठवतेय. (तो फोटो मी स्कॅन करुन इथे पोस्टला पण होता.)
मी_अमि, हो तेच कारण आहे
मी_अमि, हो तेच कारण आहे बांबूचा फुलोरा आणि दुष्काळ यांच्या संबंधाचे. आणखी एक कारण म्हणजे फुलोरा आलेला बांबू वाळून जातो आणि असा वाळलेला बांबू अगदी सहज आगीच्या भक्षस्थानी पडतो. त्यामुळे या काळात पेटणार्या वणव्यांची तिव्रता खूप जास्त असते आणि त्यांच्यामुळे पिकांचे नुकसान होउ शकते.
लंच टाईममध्ये जरा एक राउंड
लंच टाईममध्ये जरा एक राउंड मारताना ऑफिसच्या परीसरातच फुलांनी बहरलेलं मोठ्या करमळचे झाड दिसले. भरपूर फुले/कळ्या आहेत.
आज कॅमेरा नाही, उद्या कॅमेरा घेऊनच ऑफिसला येईन.
@ माधव, वेळ असेल तर आज दाखवतो करमळचं झाड.
जिप्स्त्या, त्याची पाने आणि
जिप्स्त्या, त्याची पाने आणि खोडही देखणे असते. त्यांचेही काढ फोटो. गळलेल्या मांसल पाकळ्या खाऊ शकतोस. मस्त लागतात.
गळलेल्या मांसल पाकळ्या खाऊ
गळलेल्या मांसल पाकळ्या खाऊ शकतोस. मस्त लागतात.>>>दिनेशदा, झाडाखाली पाकळ्यांचा मस्त सडा पडलाय. :-). परत जातो थोड्यावेळाने
जिप्स्या तुला मेल केलाय.
जिप्स्या तुला मेल केलाय.
माधव, वेळ असेल तर आज दाखवतो
माधव, वेळ असेल तर आज दाखवतो करमळचं झाड. >>> दोगंबी एकाच हापिसात हैत का?
अश्वे मी पण तेच विचारणार
अश्वे मी पण तेच विचारणार होते.
अश्वे रोप उगवली का ग ? काल आई कडे गेले होते. तिच्या जांभळाच्या झाडाखाली रोपांचा सडा उगवलाय.
Pages