माती आणि गणपती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गणपती बाप्पा माझा अतिशय आवडता. गणपतीची चित्रं काढायला, गणपती बनवायलाही खूप आवडतात. सिरॅमिक पावडर किंवा चॉक पावडर वापरून ह्या आधी मी बरेचदा गणपती बनवले. पण ते कश्यावर ना कश्यावर चिकटवावे लागायचे. मग त्याला पर्याय म्हणून एम सिल वापरून पाहिले. पण टेराकोटा किंवा मातिच्या वस्तू किंवा मूर्ती बनवून त्या भाजून बघायच्या हि उत्सुकता खूप वर्षांपासून होती. पण योग येत नव्ह्ता. माती कुठून मिळवायची ? कसं काय करायचं ? किती दिवस लागतात मातिच्या मूर्ती सुकायला? भाजायच्या कश्या ? कुठे ? एक ना अनेक प्रश्न होते मनात. शेवटी एक्दाचा योग आला. आणि मला माती मिळाली.

मातिच्या बर्‍याच वस्तू बनवता येतात. बाप्पा आवडिचे म्हणून मग सुरवात त्यानेच केली. काही छोटे छोटे गणपती आणि काही वेग वेगळ्या वस्तू बनवल्या. दोन तिन इंच उंचिच्या ह्या गणपतींना पक्कं सुकायला चार दिवस लागतात. बर्‍याच लहान सहान वस्तू बनवल्या सुकवल्या आणि कित्येक महिने जिवापाड सांभाळल्या. पण आता त्या भाजायच्या कश्या आणि कुठे? त्यात काही महिने गेले. त्यावर एकदा आमचे अहो म्हणाले मी भाजून देतो उद्या होळी पेटवणार आहेत तशीच आपण गवताची भट्टी करू. Uhoh

पण मग शेवटी गंगेत घोडं न्हालं. एका ड्रॉईंग शिकवणार्‍या सरांच्या ओळखीत छोटीशी भट्टी होती. त्यांनी मला माझ्या ह्या वस्तू भाजून आणून दिल्या.

अतिशचय आनंदाने हावरटासारख्या एका दिवसात रंगवून टाकल्या. बरेच दिवस कसलेच काही पेंटींग न केल्यामुळे खुपसे रंग सुकले होते. मग जे होते त्यातच काम भागवून टाकले. Proud अजून चांगले करता आले असते. किंवा नसते केले तरी छानच दिसत होते.

आराम गणेश

रंगवण्याआधिचे

नंतरचे

गणेश वाद्यवृंद

रंगवून

पिंपळपान

हत्ती उंट घोडा Happy

घोडोबा Happy

मास्क

आणि थोडे गणपती

आशीर्वाद देणारा

आणखी दोन

अजून दोन

डॅफो...
तुमची ही कला मला माहीतच नव्हती...
बाप्पांच्या आगमनाचि हळु-हळु चाहूल लागायला सुरुवात झालिय...
फक्त एकच गोष्ट करा - मातीकाम करताना हाताना आणी बोटांना जरा काळजी पूर्वक जपा... कारण पुढे-पुढे 'त्रास' होण्याचा संभव असतो...
बाकी एकदम 'मस्त' वाटलं....

खुप सुंदर आहेत सगळ्या मुर्ती. मला मातीकामातले काहीच माहित नाही, त्यामुळे हे कसेकाय केले असेल ही उत्सुकता आहे Happy

खुप छान..:)
यंदा गणपतीला गावी गेल्यावर थोडेसे मातीकाम करावेसे मलाही वाटु लागले आहे. काहीच जमले नाही तर कन्यारत्नाला clay work साठी उपयोगी पडेलच..:)

डॅफो,
अगं कसल्या सुंदर आणि रेखिव मुर्ती करतेस तु Happy
मला ही न रंगवलेल्या जास्ती भावल्या, कारण त्यात केलेली कलाकुसर आणि मुर्तीचे भाव जास्ती ऊठून दिसतायत. Happy

Pages