माती आणि गणपती
गणपती बाप्पा माझा अतिशय आवडता. गणपतीची चित्रं काढायला, गणपती बनवायलाही खूप आवडतात. सिरॅमिक पावडर किंवा चॉक पावडर वापरून ह्या आधी मी बरेचदा गणपती बनवले. पण ते कश्यावर ना कश्यावर चिकटवावे लागायचे. मग त्याला पर्याय म्हणून एम सिल वापरून पाहिले. पण टेराकोटा किंवा मातिच्या वस्तू किंवा मूर्ती बनवून त्या भाजून बघायच्या हि उत्सुकता खूप वर्षांपासून होती. पण योग येत नव्ह्ता. माती कुठून मिळवायची ? कसं काय करायचं ? किती दिवस लागतात मातिच्या मूर्ती सुकायला? भाजायच्या कश्या ? कुठे ? एक ना अनेक प्रश्न होते मनात. शेवटी एक्दाचा योग आला. आणि मला माती मिळाली.
मातिच्या बर्याच वस्तू बनवता येतात. बाप्पा आवडिचे म्हणून मग सुरवात त्यानेच केली. काही छोटे छोटे गणपती आणि काही वेग वेगळ्या वस्तू बनवल्या. दोन तिन इंच उंचिच्या ह्या गणपतींना पक्कं सुकायला चार दिवस लागतात. बर्याच लहान सहान वस्तू बनवल्या सुकवल्या आणि कित्येक महिने जिवापाड सांभाळल्या. पण आता त्या भाजायच्या कश्या आणि कुठे? त्यात काही महिने गेले. त्यावर एकदा आमचे अहो म्हणाले मी भाजून देतो उद्या होळी पेटवणार आहेत तशीच आपण गवताची भट्टी करू.
पण मग शेवटी गंगेत घोडं न्हालं. एका ड्रॉईंग शिकवणार्या सरांच्या ओळखीत छोटीशी भट्टी होती. त्यांनी मला माझ्या ह्या वस्तू भाजून आणून दिल्या.
अतिशचय आनंदाने हावरटासारख्या एका दिवसात रंगवून टाकल्या. बरेच दिवस कसलेच काही पेंटींग न केल्यामुळे खुपसे रंग सुकले होते. मग जे होते त्यातच काम भागवून टाकले. अजून चांगले करता आले असते. किंवा नसते केले तरी छानच दिसत होते.
रंगवून
आणि थोडे गणपती
जबरदस्त हरी ओम नमस्ते गणपतये
जबरदस्त
हरी ओम नमस्ते गणपतये
सुंदर आहेत!! मला पण न
सुंदर आहेत!!
मला पण न रंगवलेल्या मुर्ती फार आवडल्यात.
सहीच... जाम आवडले..
सहीच...
जाम आवडले..
अप्रतिम ! सगळ्याच श्रीमुर्ती
अप्रतिम ! सगळ्याच श्रीमुर्ती एकदम सुरेख जमल्यात. केपीला अनुमोदन. न रंगवलेल्याच जास्त सुरेख वाटतायेत. पिंपळपानावरचे श्री आणि शेवटचे दोन खासच. वाजंत्री मंडळी माझ्या घरी आहेतच अगदी हुबेहुब.
खुप खुप खुप सुंदर आहे तुझी
खुप खुप खुप सुंदर आहे तुझी कला.
मस्त
मस्त
जबरदस्त !!! खासच
जबरदस्त !!! खासच !!!!!!!!!!!!!!!!
धन्यवाद धन्यवाद !! पिके,
धन्यवाद धन्यवाद !!
पिके, जागू, आस, सुकि, बेफी, अजय, अवनि, रैना, सिंडी, दक्षिण, मंजुडी, कमलाकर, सतिश, योडी, सावली, नानबा, श्री, स्वाती, पौर्णिमा आणि चुकुन कुणाचे नाव राहिले असेल तर.. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद
क्युट!
क्युट!
मस्त!
मस्त!
डॅफो, मस्त ग !!! कसल्या क्युट
डॅफो, मस्त ग !!!
कसल्या क्युट आहेत सगळ्या मुर्ती. माझीपण न रंगवलेल्या वाजंत्रीकारांची एक ऑर्डर घेऊन ठेव.
Pages