माती आणि गणपती
गणपती बाप्पा माझा अतिशय आवडता. गणपतीची चित्रं काढायला, गणपती बनवायलाही खूप आवडतात. सिरॅमिक पावडर किंवा चॉक पावडर वापरून ह्या आधी मी बरेचदा गणपती बनवले. पण ते कश्यावर ना कश्यावर चिकटवावे लागायचे. मग त्याला पर्याय म्हणून एम सिल वापरून पाहिले. पण टेराकोटा किंवा मातिच्या वस्तू किंवा मूर्ती बनवून त्या भाजून बघायच्या हि उत्सुकता खूप वर्षांपासून होती. पण योग येत नव्ह्ता. माती कुठून मिळवायची ? कसं काय करायचं ? किती दिवस लागतात मातिच्या मूर्ती सुकायला? भाजायच्या कश्या ? कुठे ? एक ना अनेक प्रश्न होते मनात. शेवटी एक्दाचा योग आला. आणि मला माती मिळाली.
मातिच्या बर्याच वस्तू बनवता येतात. बाप्पा आवडिचे म्हणून मग सुरवात त्यानेच केली. काही छोटे छोटे गणपती आणि काही वेग वेगळ्या वस्तू बनवल्या. दोन तिन इंच उंचिच्या ह्या गणपतींना पक्कं सुकायला चार दिवस लागतात. बर्याच लहान सहान वस्तू बनवल्या सुकवल्या आणि कित्येक महिने जिवापाड सांभाळल्या. पण आता त्या भाजायच्या कश्या आणि कुठे? त्यात काही महिने गेले. त्यावर एकदा आमचे अहो म्हणाले मी भाजून देतो उद्या होळी पेटवणार आहेत तशीच आपण गवताची भट्टी करू.
पण मग शेवटी गंगेत घोडं न्हालं. एका ड्रॉईंग शिकवणार्या सरांच्या ओळखीत छोटीशी भट्टी होती. त्यांनी मला माझ्या ह्या वस्तू भाजून आणून दिल्या.
अतिशचय आनंदाने हावरटासारख्या एका दिवसात रंगवून टाकल्या. बरेच दिवस कसलेच काही पेंटींग न केल्यामुळे खुपसे रंग सुकले होते. मग जे होते त्यातच काम भागवून टाकले. अजून चांगले करता आले असते. किंवा नसते केले तरी छानच दिसत होते.
रंगवून
आणि थोडे गणपती
ए डॅफो, तू ऑर्डर घेतियेस का?
ए डॅफो, तू ऑर्डर घेतियेस का? मग मला आराम करणारे बाप्पा आणि हत्ती, घोडे, उंट.
डॅफो... तुमची ही कला मला
डॅफो...
तुमची ही कला मला माहीतच नव्हती...
बाप्पांच्या आगमनाचि हळु-हळु चाहूल लागायला सुरुवात झालिय...
फक्त एकच गोष्ट करा - मातीकाम करताना हाताना आणी बोटांना जरा काळजी पूर्वक जपा... कारण पुढे-पुढे 'त्रास' होण्याचा संभव असतो...
बाकी एकदम 'मस्त' वाटलं....
अफलातून न रंगवलेल्या मूर्ती
अफलातून
न रंगवलेल्या मूर्ती जास्त सुंदर दिसतायत. मस्तच !!
खुप छान.
खुप छान.
खुप सुंदर आहेत सगळ्या मुर्ती.
खुप सुंदर आहेत सगळ्या मुर्ती. मला मातीकामातले काहीच माहित नाही, त्यामुळे हे कसेकाय केले असेल ही उत्सुकता आहे
खुपच सुरेख संपदा... माझी पण
खुपच सुरेख संपदा... माझी पण एक वाद्य वाजवणर्या बाप्पांची ऑर्डर घे ग नोंदवून.
डॅफो काय क्यूट आहेत गणपती आणि
डॅफो काय क्यूट आहेत गणपती आणि प्राणी पण!
सुंदर!!!! सगळे बाप्पा आणि ईतर
सुंदर!!!!
सगळे बाप्पा आणि ईतर प्रकार खुप आवडले!
वाद्यवृंद खुप आवडले... मस्तच
वाद्यवृंद खुप आवडले... मस्तच
कसले सुर्रेख बनवले आहेस
कसले सुर्रेख बनवले आहेस डॅफो.
त्या गणेश वाद्यवृंदाची ऑर्डर द्यायची आहे. मेल करू का?
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद !
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद !
प्राचे बंगलोर ला कधी येतेस सांग ? घेतल्या सगळ्या ऑर्डर्स
मला पण न रंगवलेले बाप्पा फार
मला पण न रंगवलेले बाप्पा फार आवडले. मस्त आहेत मूर्ती.
मस्तच ... न रंगविलेले खुप
मस्तच ...
न रंगविलेले खुप आवडले.
मातीचाच रंग मस्त आहे.
डॅफो, अफाट बनवलंयस हे सगळं!
डॅफो, अफाट बनवलंयस हे सगळं! मस्तच.
सगळ्याच मुर्ती झक्कास
सगळ्याच मुर्ती झक्कास
अतिशय सुंदर. तो पिंपळपानामधला
अतिशय सुंदर.
तो पिंपळपानामधला बाप्पा अगदि गोडुल्या दिसतोय
शांकली, रोमा, गजानन, केश्वी,
शांकली, रोमा, गजानन, केश्वी, मनी सगळ्यांना धन्यवाद
सुरेख!
सुरेख!
आवडींग !
आवडींग !
मस्तच!
मस्तच!
सुंदर. गोड आहेत गणुले मला पण
सुंदर. गोड आहेत गणुले
मला पण रंगवायच्या आधीचे जास्त आवडलेत.
बाप्पा काय मस्त वाटतायत.
बाप्पा काय मस्त वाटतायत.
खुप छान.. यंदा गणपतीला गावी
खुप छान..:)
यंदा गणपतीला गावी गेल्यावर थोडेसे मातीकाम करावेसे मलाही वाटु लागले आहे. काहीच जमले नाही तर कन्यारत्नाला clay work साठी उपयोगी पडेलच..:)
सगळेच वैशिष्ट्यपूर्ण .आणि
सगळेच वैशिष्ट्यपूर्ण .आणि सुंदर ॰
डॅफो, अगं कसल्या सुंदर आणि
डॅफो,
अगं कसल्या सुंदर आणि रेखिव मुर्ती करतेस तु
मला ही न रंगवलेल्या जास्ती भावल्या, कारण त्यात केलेली कलाकुसर आणि मुर्तीचे भाव जास्ती ऊठून दिसतायत.
झक्कास!!
झक्कास!!
डॅफो फारच छान.
डॅफो फारच छान.
सुरेख, सगळेच!! पिंपळपान आणि
सुरेख, सगळेच!! पिंपळपान आणि घोडा एकदम मस्त!
खूप मस्त आहेत सगळेच, मला रंग
खूप मस्त आहेत सगळेच, मला रंग द्यायच्या आधीचे जास्त आवडले.
अमेझिंग.
अमेझिंग.
Pages