सुट्टीतला उद्योग - २ - 'कडकु मडकु'
वयोगटः ८ ते १२ वर्षे
लागणारा वेळः १ तास + १ दिवस कलाकृती पूर्ण तयार होण्यासाठी.
साहित्यः
कॉटनचे रंगीत कापड (जुना ड्रेस, दुपट्टा, टेबलक्लॉथ काहिही चालेल, पण कॉटनच हवे), आपल्या आवडीप्रमाणे वाटी/ बोल/ वाडगा, क्लिंग रॅप, कांजी/स्टार्च, कात्री, टाचण्या, सजावटीचे सामान.
कृती:
१. कॉटनच्या कापडाची बाहेरची बाजु वर आणि खाली येइल अश्या रीतीने मधे घडी घाला.
२. सिलेक्ट केलेला बोल कापडावर ठेऊन, बोल पूर्ण कव्हर होऊन कापड आत फोल्ड करता येइल एव्हढे कापुन घ्या.
३. बोल ला क्लिंग रॅप/ प्लॅस्टिक फिल्म लावुन घ्या. त्यावर कापड नीट लावुन घ्या. बोलच्या आतल्या कापडाला टाचण्यांनी टाचुन घ्या (इथे पालकांची मदत लागेल).
४. आता स्टार्च ची पावडर थोड्या पाण्यात कालवुन घट्टसर पेस्ट करा (घट्ट सूप्/कांजी कन्सिस्टंसी).
५. ही पेस्ट तयार बोलला आतुन नीट लावुन घ्या. कापड पूर्ण भिजले पाहिजे.
६. आता बोल एका प्लॅस्टिकच्या पिशवीवर उपडा करा म्हणजे आतला स्टार्च ओघळला तरी टेबल्/ओटा खराब होणार नाही.
७. आता स्टार्चची पेस्ट बाहेरच्या बाजुनेही लावुन घ्या.
८. तयार बोल कडकडीत उन्हात वाळायला ठेवा.
९. बाहेरची बाजु वाळली की बोल सुलटा करुन आतली बाजु वाळवुन घ्या. वाळलेले कापड कडक वाटले नाही तर स्टार्च पेस्टचा सेकंड कोट द्या आणि परत वाळवत ठेवा. बोल पूर्ण वाळु द्या.
१०. वाळलेल्या बोलच्या आतल्या बाजुच्या कापडाला लावलेल्या टाचण्या काढुन कापड उघडा. कात्रीने कडेकडेने कापुन घ्या.
११. हे झालं आपलं कडकु मडकु तयार.
१२. या कडकु मडकु ला आपल्या आवडीप्रमाणे सजवा आणि वापरा.
अधिक टीपा:
- कापड सिलेक्ट करताना रंगीबेरंगी किंवा छान पॅटर्न वाले सिलेक्ट करा. डार्क कापड शक्यतो टाळा कारण स्टार्च चे डाग दिसतात.
- काठ नसलेला बोल/ग्लास सिलेक्ट करा.
- स्टार्च पावडर ऐवजी स्प्रे स्टार्च वापरुन बघितला. पण पावडरच्या स्टार्च ने जो कडकपणा येतो तो स्प्रे स्टार्च ने येत नाही.
- बोल सजवुन तयार झाल्यावर हवं असेल तर वरतुन ग्लॉस स्प्रे/वार्नीश स्प्रे मारा. मी मारलेलं नाही.
- लहान मुलांना जास्त पेशन्स नसतो.३-४ तास बोल उन्हात वाळल्यावर आईने आपल्या हेअर ड्रायर ने बोल वाळवुन द्यायला हरकत नाही
----------------------------------------------------
सुट्टीतला उद्योग: १ : 'अळी मिळी गुपचिळी' http://www.maayboli.com/node/25345
सुट्टीतला उद्योग: ३ : 'ट्विंकल ट्विंकल लिट्टील जार' http://www.maayboli.com/node/25693
हाय बच्चालोग पहिला उद्योग
हाय बच्चालोग
पहिला उद्योग तुम्हाला जसा आवडला तसा हा उद्योग ही आवडेल
नक्की करा आणि फोटो टाका
हॅप्पी हॉलिडेज
अरे वा! मस्तच आहे कडकु मडकु!
अरे वा! मस्तच आहे कडकु मडकु!
हेय, मस्तंय कडकु मडकु!
हेय, मस्तंय कडकु मडकु!
सही$$$$
सही$$$$
हाय मस्तच हे गं कडकु मडकु!!
हाय मस्तच हे गं कडकु मडकु!!
मागचा उद्योग बच्चे कंपनी ऐवजी
मागचा उद्योग बच्चे कंपनी ऐवजी मी केला .. मस्त झाली माझी waterproof ब्याग
सुपर आहे हे कडकु मडकु
सुपर आहे हे कडकु मडकु त्याच्या नावासकट
मस्त आहे हे
मस्त आहे हे
मस्त आहे ग कडकु मडकु
मस्त आहे ग कडकु मडकु
ग्रेटच आहे . तुला सगळ कसं जमत
ग्रेटच आहे . तुला सगळ कसं जमत गं!
अय्या कित्ती क्यूट प्रकार आहे
अय्या कित्ती क्यूट प्रकार आहे हा. लाजो, जाडू मडकू पण करता येईल की!
अरे वा......... मस्तच की
अरे वा......... मस्तच की
मस्त
मस्त
जबरीच
जबरीच
धन्यवाद लोक्स तोषवी आवड आहे
धन्यवाद लोक्स
तोषवी आवड आहे त्यामुळे जमतं
अरे वा ! मस्त आहेत हे कदकू
अरे वा ! मस्त आहेत हे कदकू मदकू ! माझ्या बहिणीने, क्रोश्याने विणलेल्या एका गोल रुमालाचा असाच प्रकार केला होता. भारी मस्त दिसत होता. पण हे नाव भारी आहे- कडकू-मडकू ! मस्त गं लाजो !
लाजो मला पण आवडलं हे कडकु
लाजो मला पण आवडलं हे कडकु मडकु... सुंदर आहे, नुसतं केल्यानंतरचं पाहण्यापेक्षा, त्याचा वापर होताना जास्ती सुरेख दिसतंय..
पण जर हे चुकुन भिजलं वगैरे तर नुसतं स्टार्च टाकून चिकटवलेलं कापड बोलपासून सुटं होत नाही का गं? त्याऐवजी चिकट पदार्थ नाही वापरू शकत का? :अओ)
अवांतर - लाल बोल कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय.. आशुच्या बायकोने वाण दिलेलाच आहे का?
दक्षे, बोल काढुनच टाकायचाय...
दक्षे, बोल काढुनच टाकायचाय...
तुमने बरोबर ओळख्या... बोल वैच है
भांड ओलं झालं तर परत थोडा स्टार्च लावायचा
किंवा फेव्हिकॉल लावला तर पाणी
किंवा फेव्हिकॉल लावला तर पाणी लागलं तरी जाणार नाही.
तुमने बरोबर ओळख्या... बोल वैच
तुमने बरोबर ओळख्या... बोल वैच है >> मला पण सकाळीच वाटले होते आता मी पण तो वापरुनच करणार
लाजो मस्त आहे हे पण, दाखवायला
लाजो मस्त आहे हे पण, दाखवायला पाहिजे बच्चेकंला
तोषवीला अनुमोदन. तुझी
तोषवीला अनुमोदन. तुझी क्रियेटीव्हीटी जबरदस्त आहे लाजो.
धन्स लोक्स आता गुरुवारी
धन्स लोक्स
आता गुरुवारी तिसरा भाग टाकेन
मस्त आहे कडकु मडकु
मस्त आहे कडकु मडकु
अरे........ हेही मस्तच!
अरे........ हेही मस्तच!
लाजो... मला पुन्हा एकदा लहान
लाजो... मला पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतय. ही खूप धम्माल आहे. मी ह्या लिन्का माझ्या धाकुल्या मैत्रिणींना पाठवतेय. माझा टोण्या खूपच मोठा झाला.
............
............