इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
मारूती व्हॅन मधे तर
मारूती व्हॅन मधे तर सिक्युरिटीच नाही. जाड पत्रा आणि टफ पत्रा यात फरक आहे का ?
मला बीट आवडलीये. पोलो आणि बीट
मला बीट आवडलीये. पोलो आणि बीट मधे पोलो बीटपेक्षा छान वाटते. पण फोक्सवॅगनचं डीलर नेटवर्क इतकं चांगलं नाही म्हणतात
बाजो सहमत आहे. पत्रा जाड / टफ
बाजो
सहमत आहे.
पत्रा जाड / टफ :- पत्रा नुसताच जाड असेल म्हणजेच स्ट्रेंथ असते असं नाही. मायक्रो कॉर्युगेशन मुळे जास्त सरफेस एरिया मिळतो किंवा विशिष्ट एलेमेण्ट्स ( मॉलिब्डेनम / व्हॅनेडियम ) हे केमिकल कंपोझिशन मधे अॅड केले असता टोटल टफनेस वाढतो ज्यामुळे पत्र्याचा गेज कमी असला तरी चालू शकतो. थोडक्यात समान जाडीच्या स्टीम मधे आणि मायक्रोअलाईड स्टील मधे दुस-या प्रकारातला पत्रा हा जास्त टफ असतो.
४० % क्रॅश टेस्ट : - व्हेईकल कमाल वेगाने आणून त्याच्या ४० टक्के भागाशी ऑब्जेक्टची धडक घडवून आणली जाते. ही डिस्ट्रक्टीव्ह टेस्ट असल्याने सँपलिंग मेथड वापरतात. या टेस्टनंतर ड्रायव्हरच्या डमीला किती दुखापत झालीये हे पाहीलं जातं. एअर बॅग्ज, मेटल टफनेस हे फॅक्टर पाहीले जातात. ही टेस्ट पास केल्यावरच गाडीला विकण्यास योग्य असं प्रमाणपत्र मिळत<
एबीएस - सध्या ब्रेक्ससाठी ही प्रणाली सर्रास वापरली जाते. लषकराच्या टाट्रा व्हेइकल मधे पॉइंट अटू पॉईंट ब्रेक्स विथ सेन्सर अशी प्रणाली आहे. सुपर लक्झरी कार्स मधे ही प्रणाली जशीच्या तशी वापरतात. पण अर्ली सेडान, मिड साईझ सेडान वगैरे मधे टू पॉइंट ब्रेकिंग असतं.
टाट्रा प्रमाणेच फोक्सवॅगनच्या पसाट मधे चारही चाकांना एबीस आहे. ज्या चाकाचा वेग कमी आहे तिथे सेन्सर्सद्वारा कमी ब्रेक अप्लाय केला जातो तर जिथं वेग जास्त आहे तिथं जास्त ब्रेकिंग पॉवर अप्लाय केली जाते. ब्रेक एनर्जी हायड्रॉलिक सिस्टीम द्वारा स्टोअर केली जाते आणि जेव्हा ब्रेक्स रिलीज केले जातात तेव्हा ही एनर्जी फ्लायव्हीलला ट्रान्समिट केली जाते. म्हणजेच ब्रेकिंग मधे वाया जाणारी एनर्जी इथे वापरात येते. तसच सिग्नलला थ्रॉतलिंग नसताना इंजिन बंद होतं ( स्लीप मोड) आणि एक्सीलेटर देताच ते चालू होतं. पसाट ने या तंत्रज्ञानाला ब्ल्यू मोशन टेक्नॉलॉजी हे नाव दिलं आहे.
यात नवीन काहीच नाही. हे जर्मन तंत्रज्ञान लष्करी गाड्यांमधे उपलब्ध आहेच. ते प्रवासी कार्समधे फोक्सवॅगन आणि मर्सिडीज वापरते.
पसाट च्या जवळपास होंडा ची सिवीक आहे. भारतात जेव्हा सँट्रो आलेली तेव्हा भारतातल्या पब्लिकने या कुरूप गाडीला डोक्यावर घेतलं होतं. कारण त्यामगच्या तंत्रज्ञानाचा बोलबाला झाला होता.
भारतीय पब्लिक फार चोखंदळ आहे. पसाट मधे जे तंत्रज्ञान आहे ते सिव्हीक मधे नसेल तर ते पसाट ला पसंती देतील हा अंदाज आहे. स्कोडाला जेमतेम दोन वर्ष झालीत तरी तिची जाहीरात न करता चांगली क्रेझ आहे. या गाड्या दिसायला खास नाहीत. फोक्सवॅगनचीही जेटा दिसायला खास नाही. पण वरच्या रेंजमधे जर्मन गाड्या मला तरी आवडल्या. ( याचा अर्थ बाकिच्या सगळयाच गाड्या टेस्ट ड्राईव्ह घेऊन बसलोय असा होत नाही . .)
किरण्यके.. चांगली पोस्ट...
किरण्यके.. चांगली पोस्ट... बरीच टेक्निकल माहिती कळाली.. जर्मन गाड्यां
भारतीय पब्लिक फार चोखंदळ आहे.>> भारतीय पब्लिक फक्त पैशाच्या आणि अव्हरेज बाबतीत चोखंदळ आहे (माझं मत). सेफ्टी फीचर्स वगैरे तर सर्वात शेवटी विचारात घेतल्या जातात आणि त्यासाठी पैसे जास्त पडतात म्हणून त्या नाकारल्या जातात. तंत्रज्ञान वगैरे विचारात घेणारे फारच कमी लोक असतील..
स्कोडाला जेमतेम दोन वर्ष झालीत तरी तिची जाहीरात न करता चांगली क्रेझ आहे. >> स्कोडाला भारतात येउन बरीच वर्षं झाली.
अरे केदार, महेश कारच्या आत
अरे केदार, महेश कारच्या आत असलेल्या जागेबद्दल, हेडरूमबद्दल बोलतोय असं वाटलं. ग्राऊंड क्लिअरन्स, आणि आतली हेडरूम याचा संबंध नसावा असं वाटतं. भारतातल्या मिडसाईझ सेदान कार्सचे उदाहरण घेऊ या- फोर्ड फियेस्टाचा ग्राऊंड क्लियरन्स हा होंडा सिटी आणि फियाट लिनियापेक्षा जास्त आहे, पण आतली हेडरूम या दोन्ही गाड्यांपेक्षा कमी वाटते. हुंडाई वरनाचा ग्राऊंड क्लियरन्स आणि आतली हेडरूम हे दोन्ही चांगले आहेत.
बाकी, ग्राऊंड क्लियरन्स हा मुद्दा आपल्याकडे भलताच महत्वाचा आहे. भारतातल्या कुठच्याही शहरात 'परफेक्टली इंजिनियर्ड स्पीड ब्रेकर्स' असतील असं वाटत नाही. १० लाखांत मिळणार्या होंडा सिटी आणि फियाट लिनिया सारख्या गाड्या रस्त्यावरच्या दगडांना, स्पीड ब्रेकर्सना घासल्या गेल्यामुळे एक्झॉस्ट आणि सायलेंसर असेंब्ली तसेच डिझेल टँकला स्क्रॅचेस येणे, चेपले जाणे, इतकेच काय, पण लीक होणे- असे प्रकार सर्रास घडतात.
किरण्यके, गाडीच्या पत्र्याबद्दल अनुमोदन. वरना / सिटीचा दरवाजा लावतानाचा आणि इटालियन फियाट लिनियाचा किंवा जर्मन फोक्सवॅगन व्हेंटोचा दरवाजा लावतानाचा 'थंक' बघितला, तर हे लगेच लक्षात येते. वरना / सिटीचे दरवाजे हे त्या तुलनेत जरा खेळण्यातले वाटतात. (जरा अतिशयोक्ती झाली). माझा एक मित्र हुंडाईच्या गाड्यांना 'पेपर कार्स' म्हणतो- ते आठवले. यातही भरपूर अतिशयोक्ती असली तरी ते शंभर टक्के खोटंही नाही. ही इमेज पुसून टाकण्यासाठीच हुंडाईने आय२० ही अपमार्केट हॅचबॅक (लैकिकार्थातली स्मॉल कार) काढली. दणकट पत्रा आणि बॉडी, सारे सेफ्टी मेझर्ससह. पण मग किंमत ७ ते ८ लाख!
पण सारेच सेफ्टी स्टॅंडर्ड्स युरोपियन कंपन्या (भारतातही) फॉलो करतात, हे मात्र खरे नाही. शेवटी कितीही केलं, तरी ते कारखानदार. कुणाला काय हवं आहे, आणि किती किंमतीत- याकडे जास्तच लक्ष देणार. उदाहरणार्थ, भारतात एअर बॅग्जची सक्ती नाही. त्यामुळे होंडा, हुंडाई, फोर्ड यांची आहेत- तशी फियाट, फोक्सवॅगन यांच्याही मिडसाईझ सेदान कार्सची एअर बॅग्ज विरहित मॉडेल्स उपलब्ध आहेत. आणि अय गाड्या चक्क ९-१० लाखांच्या रेंजमध्ये इथे विकल्याही जात आहेत!
मारूती आणि टाटा यांनी वर्षानुवर्षे कमी किंमत ठेवता यावी यासाठी- नॉनएसी मॉडेल्स, कुठचेही सेफ्टी मेझर्स नसलेली मॉडेल्स्, लोकांना पाहिजे आहे म्हणून २५-३० स्क्वेअर फूटात आठ माणसे बसता येऊ शकणारी मॉडेल्स- असे अमानुष प्रकार वर्षानुवर्षे केले. आता फोक्सवॅगन असो, फियाट असो, नाहीतर आणखी कुणी. हॅचबॅक आणि मिडसाईझ कार्स घेऊन ते भारतात आले, तर मारूती आणि टाटा- या दोन डॉन लोकांचा विचार तर त्यांना करावाच लागणार. त्यांच्याशीच स्पर्धा करावी लागणार. करतात काय?!
किरण्यके, चांगली पोस्ट.
किरण्यके, चांगली पोस्ट. विशेषतः ब्ल्यु मोशन' बद्दल.
भारतीय पब्लिक फार चोखंदळ आहे. >> हे अजिचबात मान्य नाही. वरच्या पोस्टीत हे थोडे आले आहे.
स्कोडाला जेमतेम दोन वर्ष झालीत तरी तिची जाहीरात न करता चांगली क्रेझ आहे. >> स्कोडाऐवजी फोक्सवॅगन म्हणायचे आहे का?
'टेक्नॉलॉजी नावाची गोष्ट मॅटर्स अ लॉट, हे मान्य. हुंडाई सँट्रो आणि वर्ना- या 'सो कॉल्ड पेपर कार्स' मी काही वर्षे वापरल्यात, अजूनही वापरतो आहे. आणि काहीतरी नवीन कशा पद्धतीने लोकांना द्यायला हवं- हेही 'फियाट' कडून अनुभवतो आहे. शिकतो आहे.
सायकल चालवा. पब्लिक
सायकल चालवा. पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरा, तेल वाचवा.
- एक जागरूक पुणेकर
होंडा सिव्हिक आणि पसाटची
होंडा सिव्हिक आणि पसाटची तुलना कदाचित योग्य नाही. होंडा सिव्हिक ही अमेरिकेत इकॉनॉमी कार म्हणून विकली जाते. त्याच्या तुलनेत टोयोटा करोला, वोक्सवॅगन जेटा वगैरे येतात. पसाट ही मिडसाईझ गाडी आहे. त्याची तुलना टोयोटा कॅम्री, होंडा अॅकॉर्ड यांच्याशी होते.
विश्वासार्हता (रिलाएबिलिटी) ह्याबाबतीत वोक्सवॅगन मार खाते. म्हणून अमेरिकेत त्यांच्या गाड्या खपत नाहीत. चित्रविचित्र प्रॉब्लेम्स येतात असा लोकांचा अनुभव आहे.
किरण छान माहीती.
किरण छान माहीती.
धन्यवाद श्री,
धन्यवाद श्री, साजिरा
फचिन
पसाटची इंजिनक्षमता आणि सिव्हीकची इंजिनक्षमता एकाच सेगमेंट मधे आहेत. भारतात किंमतही एकाच रेंजमधे आहेत. इंजिनच्या सेगमेंटप्रमाणे बर्गीकरण केव्हाही चांगलं.
पसाट १.९८ लिटरचं इंजिन तर सिव्हीक - १.७९ लि इंजिन
पुढचा सेगमेंट २ लि क्षमतेच्या इंजिन्सचा . इथून लक्स्झरी कार्सचा सेग्मेंट सुरू होतो. टोयोटा कॅम्री चं इंजिन २.४३ लिटरचं आहे.
किरण्यके, भारतात लक्झरी कार्स
किरण्यके, भारतात लक्झरी कार्स सेग्मेंट चे जास्त क्षमतेचे इंजिन असणे हे ही (लक्झरी फीचर्स बरोबर) मुख्य फीचर असते का? तसा विचार केला नव्हता कधी.
कार्सचं वर्गीकरण जगभर तिच्या
कार्सचं वर्गीकरण जगभर तिच्या इंजिनावरूनच ठरतं.
भारतात किंमत / इंजिनक्षमता अशा दोन्ही प्रकारे वर्गीकरण केलं जातं. अधिक तपशीलासाठी टीम बीचपी वर आपण माहीती शोधू शकता. किंमत हा क्रायटेरिया नसावा असं माझं वैयक्तिक मत आहे. कारमेकर्सकडून त्या त्या सेगमेंटमधे इतर कार्ससारखे फीचर देण्याचा प्रयत्न होतोच. लक्झरी फीचर्स आणि हाय एन्ड टेक्नॉलॉजी ए किंवा बी सेगमेंतमधे वापरून चालणारच नाही. इथे प्राईस हा मुख्य क्रायटेरिया आहे. सी सेग्मेंटमधे हाय एण टेक्नॉलॉजी चं स्वस्त वर्जन दिलं जातं. जसं एबीएस च्या पॉईंट टू पोईंट ऐवजी फक्त टू पॉइंट ब्रेकिंग. यात एकॉनॉमी आहेच.
ज्याला २ लिटरचं इंजिन परवडतं तो पैशाला मागेपुढे पहात नाहीच. लक्झरी सेग्मेंटच्या ग्राहकामधे सिग्नेचर कार हा क्रायटेरिया असतो. कॅम्री २२ लाखाला मिळत होती तेव्हा तिची इक्विव्हॅलंट मर्सिडीज ४८ लाखाला होती. अर्थात तरीही मर्सिडीजच घेणारे आहेत. या लोकांची विचाराची पद्धत आपल्यापेक्षा निराळीच असणार.. ( सन्माननीय अपवाद सोडून ). म्हणूनच या सेगमेंटमधे जास्तीत जास्त लक्झरी फीचर्स देण्यामागे कंपन्यांची व्यापारी नीती असते.
सांगायचा मुद्दा हा कि २.० लिटर चं इंजिन असलेली कार कुणी घेतो तेव्हा त्या सेगमेम्टमधे समान लक्झरी फीचर्स असणारच. एखाद्या कारमेकरने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं असेल तर त्याचा फायदा तो घेणार. अर्थात ते जास्त काळ सिक्रेट राहत नाहीच. इतर लोक्स हातावर हात धरून बसलेले नसतात. इतर कार्स अक्षरशः खोलून त्याचा अभ्यास केला जातो आणि लगेचच ते फीचर्स आपल्या कारमधे कंपन्या आणतात.
( जरा जादाच होतंय का आवरिंग नाऊ )
सुपर लक्झरी कोण घेतय
सुपर लक्झरी कोण घेतय ..हम्म
आपली झेप फार तर पोलो किंवा फार तर फार लिनिआ. ते पण कसं बसं.
५ लाखाच्या आत असेल तर बजेट, हप्ता, जागा , मायलेज हे मनासारखं जमेल.
किरण्यके, मी आधीही तुमच्या
किरण्यके, मी आधीही तुमच्या जनरल विधानांविरूद्ध माझे मत प्रदर्शन केले होते आणि आताही करू पाहत आहे, हे केवळ मी कारचा इन्थूझियास्टिक व पॅशन असल्यामुळे करत आहे.
कार्सचं वर्गीकरण जगभर तिच्या इंजिनावरूनच ठरतं. >>>> मला नाही वाटतं. जगभरात तर नाहीच नाही. उदा. BMW १ सिरीज ३.०L आहे तर फोर्ड टोरस ३.६ लिटर्स आणि व्हॉल्वो सी ३० ही केवळ २.५ लिटर्स! फोर्ड ही कुठेही लक्झरी कार म्हणून म्हणविली जात नाही तर बिमर व व्हॉल्वो ह्या नेहमीच लक्झरी म्हणून मिरवतात. साध्या टोयोटो कोरोलाला देखील २.४ लिटर इंजीन आहे तर पॉन्टियाक G8 ही स्पोर्टस सेडान (लक्झरी नाही) ३.६ लिटर व्हि ६ आहे.
वर्गीकरण हे साधारण कॉम्पॅट्, सबकॉम्पॅट, मिडसाईस, फुल, एसयुव्हि असे असते. युरोपियन कार मेकर्स ही डी, सी सेगमेंट म्हणवतात तर अमेरिकन कॉम्पक्ट इ इ. लोअर रेंजचा टोयोटा यारिस देखील १.५ लिटर सहित सोबत सगळे ऑटॉ फिचर्स देते. तसेच लक्झरी कार ही कॉम्पॅट देखील असते. उदा व्हॉल्वो सि ३०, ऑडी ए ४ वगैरे. ह्यात इंजीन कुठलाच रोल प्ले करत नाही! तर साईज करते. त्यामुळे २ लिटरची कार घेतली तर ती लक्झरी फीचर्स वाली असतेच असे नाही.
हे तुम्ही जगभर हा शब्द लिहिलात म्हणून मी उद्युक्त झालो.
खाद्या कारमेकरने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं असेल तर त्याचा फायदा तो घेणार. अर्थात ते जास्त काळ सिक्रेट राहत नाहीच. इतर लोक्स हातावर हात धरून बसलेले नसतात. इतर कार्स अक्षरशः खोलून त्याचा अभ्यास केला जातो आणि लगेचच ते फीचर्स आपल्या कारमधे कंपन्या आणतात. >>
हे विधान देखील फार ठोबळ आहे, उदा व्हॉल्वो ह्या कारमेकरने Collision Warning with Full Auto Brake and Pedestrian Detection टेक्नॉलॉजी आणली, ती कार खोलून वगैरे दुसर्या कार मध्ये आणत येत नाही कारण त्याचे पेटंट व्हॉल्वॉ कडे आहे, तशाच पद्धतीचे फिचर आणन्यासाठी दुसर्या कंपनीला परत रिइन्वेंट द व्हिल करावे लागते. अर्थात त्यात वेळ लागतो. आणि एक दोन वर्षे गेल्यावरच रि डिझाईन मॉडेल बाजारात येते, दरवर्षी आणने शक्य नाही. तसेच जुन्या काळासारखे कार खोलून काहीच कळत नाही कारण ह्या नवीन कार्समध्ये कम्पुटर असतो व की देखील कम्प्युटराईज्ड असते. सगळं काही कम्प्युटर कन्ट्रोल्ड!
भारतात मात्र चित्र नेहमीच उलटे असते. तिथे २ लिटरची कार म्हणजे लक्झरी ठरू शकते. पण ती सामान्य कार आहे. उदा सिव्हीक व होंडा सिटी ह्या लक्झरी म्हणवल्या जातात, अगदी पसाटही लक्झरी म्हणवली जाते पण ती सामान्य कार आहे. ऑडी ही तिची मोठी बहिण लक्झरी मध्ये मोडते व आधी लिहिल्यासारखे ऑडी A4 चे इंजिन पसाट पेक्षा छोटे आहे.
असो कारच्या पॅशन मुळे गप्प बसवले नाही. तुम्हास विरोध करणे हा हेतू नाही.
भारतात मार्केट मध्ये १५ लाखाच्या वर कार घेणारे तुलनेने कमी असतील व ८० टक्के पब्लीक हे ५ ते ८ लाख बजेट घेऊन चालतील. कार मेकर्सच्या दृष्टीन तो स्विट स्पॉट आहे त्यामुळे त्या रेंज मध्ये भारतात सर्वात जास्त कार आहेत व अपकमींग कार पाहिल्या तर त्या रेंज मध्ये अजुन कार येत आहेत.
भारतीय कार बाजार अजुन मॅच्युअर व्हायचा आहे. केवळ २ लिटरचे इंजीन आहे म्हणून २० लाख द्यायला कोणी तयार असेल तर त्याला पैश्याची "किंमत" व मिळणारा "मोबदला" ह्यात तफावत आहे हे माहित नाही. आजही अनेक कार्स मध्ये साध्या ड्रायव्हर, पॅसेंजर एअर बॅग नाहीत पण लोकांना कार मात्र हवी. असणारे भयानक मोठ्या मार्केटमुळे कार बाजार अजुन स्वस्त होणार ह्यात वाद नाही. आणि हे कार मेकर्सला माहीती असल्यामुळेच स्वीट स्पॉट कार जास्त येत आहेत व तुलनेने जास्त सोयी ज्या २० लाखाच्या कारला मिळतील त्याच ६ ते ९ लाखाच्या कारला पण मिळतील ह्यात वाद नाही. उदा होन्डा सिटी लोडेड ९.५ लाख व होन्डा अॅकॉर्ड मध्ये बर्याच सोयी कॉमन आहेत. (जागा, रुंदी, हेड, लेग रुम सोडून) आणि इथेच कारचे वर्गीकरण व्हायला सुरू होते. जे भारतात आता चालू झाले आहे. काही वर्षात किंमत सोडून इथे आणि तिथे काही फरक नसेल.
फचिनला अनुमोदन. तसेच
फचिनला अनुमोदन.
तसेच केदारच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन.
भारत हे अजून तरी कॉस्ट ड्रिव्हन मार्केट आहे. किंमतीचा विचार न करणार्यांची टक्केवारी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच असेल. तसेच १० लाखांची कार इथे अजूनही लक्झरी कार म्हणून गणली जाते. तसेच ७-८ लाखांच्या हॅचबॅकलाही कारही लक्झरी/अपमार्केट स्मॉल कार म्हणले जाते. इथे इंजिन क्षमतेचाही फारसा संबंध नाही. (शिवाय समान इंजिनक्षमता अस्णार्या गाड्यांची अश्वशक्तीही वेगवेगळी असते, हा अआणखीच निराळा विषय) आताआतापर्यंत जुनी १.४ लि. वाली इंडिका ४ लाखात मिळत होती. काही मिडसाईझ सेदान कार्स १.३ लि. च्या असूनही १० लाखाच्या स्लॉटमध्ये मिळतात. आणि काही स्मॉल कार्स १.४ लि. क्षमतेच्या असूनही ५-७ लाखांत. तसेच, १.३ लि. च्याच पुंटो, लिनिया आणि फियाट५०० या गाड्यांच्या किंमती अनुक्रमे ५-६ लाख, ९-१० लाख आणि १६-१८ लाख अशा आहेत. याच १६-१८ लाख प्राईस स्लॉटमध्ये १.८ किंवा २ लि. इंजिनक्षमतेच्या जेट्टा, सुपर्ब, क्रुझ, किझाशी इ. सो-कॉल्ड लक्झरी कार्स मिळतात. शिवाय मोजक्या एसयुव्ही देखील. आणि १.८ लि.वाल्याच करोला आणि सिव्हिक या गाड्या १३ ते १५ लाखांत मिळतात. ऑप्ट्रा आणि लान्सरसारखी १.८ वाली काही जुनी मॉडेल्स तर अजूनही १०-११ लाखांत! १.८ ते २ आणि २.२ लि. इंजिनक्षमतेच्या काही (इथे सुपरलक्झरी म्हणवून घेणार्या) काही गाड्या २५-३० लाखांत मिळतात.
जगभरात मोठ्या इंजिनक्षमतेच्या गाड्या वापरल्या जातात. पण तरी 'लक्झरी कार' या संज्ञेशी त्याचा थेट संबंध असेल असं वाटत नाही. गाडीचे रंगरूप, आकार, तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि सोयीसुविधा यांच्याशी मात्र संबंध असेल. मग ते भारतात असो, की परदेशात.
http://www.themanmade.com/car
http://www.themanmade.com/cars/what-does-car-segments-mean-a-b-c-d-car-s...
केदार चांगली पोस्ट आणि चांगलं
केदार
चांगली पोस्ट आणि चांगलं लॉजिक.
हा भाग गोंधळात टाकणारा आहेच. थोडंस समजून घेण्याची गरज आहे. वर लिंक दिलेली आहे...त्यावरून सेगमेंट हा काय प्रकार आहे हे समजून घ्यावं. याहीपेक्षा एक चांगली पण जुनी लिंक आहे.. सापडली तर देतो.
एकतर मी सेग्मेंतसाठी वर्गीकरण हा शब्द वापरलाय. कारचे सेगमेंत ए बी सी डी हे इंजिन वरूनच ठरतात. आपण इथं त्यात लक्झरी आणि सेगमेंटस हे गृहीत धरून एकत्रच चर्चा केलीय.
कारची क्षमता ( इथं कार हाच घटक अपेक्षित आहे. ट्रकचं इंजिन, जीप प्रकारात मोडणा-या गाड्यांचं इंजिन विचारात घेणार नाही ही अपेक्षा आहेच.) स्पोर्टस कार / कन्सेप्ट कार्स आपल्याला विचारात घेता येणार नाहीत. सगळं एकदम मिक्स केलं कि खूप गोंधळ उडेल. स्पोर्ट्स कारची तुलना फक्त स्पोर्ट्स कार्सशीच होईल. तसच इथं एसयूव्ही/ एमयूव्ही पण आपण विचारात घेत नाही आहोत.
समजा स्विफ्टमधे सगळे लक्झरी फीचर्स दिले तर तिची आणि फेरारीची तुलना आपण करू शकू का ? मारूती अल्टो मधे मर्सिडीझचे फीचर्स दिले तर ती मर्सिडीजशी तुलना करण्याच्या योग्य होईल का ? मुळात तिच्या इंजिनची क्षमता या समान प्लॅटफॉर्मवर दोन कार्स हव्यात. मग त्यात लक्झरी आणि सेफ्टी फीचर्स काय आहेत याची तुलना होईल. उलटं होणार नाही. इथं तुम्हाला वेट टू पॉवर रेशो, टेक्नॉलॉजी हे घटक विचारात घेता येऊ शकतात. तुम्हाला एसी पॉवरफुल्ल हवाय, इतरही फीचर्स जास्त क्षमतेचे हवेत मग इंजिन कडून पावरही लागणारच आहे. नाहीतर मागच्याला एसीची हवा न लागणे, एसी फुल्ल केला कि कारचा स्पीड कमी होणे, आवाज येणे अस आपण पाहीलेलं आहेच.
ए स्टार आणि आय टेनची तुलना होऊ शकत नाही. ( पण मी ती केली ). ए स्टार आणि सँत्रोचीच तुलना होऊ शकते. भारतासाठी ए आणि बी च्या मधे ए + हे सेगमेंट निर्माण केलय. तसच बी आणि सी च्या मधेही बी + हे सेगमेंट निर्माण केलय. याचं कारण म्हणजे या दोन्हीच्या मधे कार घेऊ पाहणारे अनेक ग्राहक भारतात आहेत. मारूतीकडे हीच रेंज खूप जास्त आहे म्हणून मारूतीच्या शोरूममधे गेलं कि गोंधळ उडतो. विशेषतः रिट्झ आणि स्विफ्टमधे !
रिलायबिलिटी हा प्रकार सापेक्ष आहे असं मला वाटतं. तसच ब्रँड लॉयल्टी हा ही प्रकार ग्राहकांच्या बाबतीत असतो. म्हणून खपणारी कार चांगली आणि न खपलेली कार वाईट असं नसत. चांगली असूनही फेल गेली असं कारच्या बाबतीत घडलेलं आहे. मारूती नवीन होती तेव्हाही अॅम्बॅसिडर आणि प्रीमिअर पद्मिनीचा आग्रह धरणारं पब्लिक होतंच. त्या वेळी त्या भारतातील सर्वाधिक खपाच्या कर्स होत्या म्हणून त्या चांगल्या होत्या असं कुणीही म्हणणार नाही. उलट त्यांच्यामुळेच मारूतीचं वेगळेपण उठून दिसलं..
एखाद्याने २.० लि च्या इंजिनात अर्ली सेडानचे फीचर्स दिले तर ती त्या कारमेकरची चूक आहे. ज्या सेग्मेंटमधे कार उतरवताय त्यात इतर मेकर्स जे फीचर्स देतात त्यातले किमान फीचर्स तरी हवेत. समान इंजिनक्षमतेच्या गाड्यांमधे अश्वशक्ती वेगवेगळी असेल तर तुलना करायला आणखी सोपं जातं. कुठलं इंजिन एफिशियंट आहे ते समजून येतं.
याउलट खालच्या सेगमेंटमधे हाय एण्डचे फीचर्स दिले तर त्या कारमेकरचा हा नवा प्रयत्न राहील. कदाचित ग्राहकांन आवडेलही. शेवटी कुणी काहीही ठरवलं तरी घेणारा जो आहे त्याचाच विचार महत्वाचा.
तुम्ही वर ३.५ लि चं उदाहरण दिलय हा सेगमेंट सुपर लक्झरी कार्सचा आहे. या सेगमेंटमधे वापरलं जाणारं इंजिन वापरून त्यातले फीचर्स कारमेकर देणार नसेल तर त्या ब्रॅण्डवर काही न काही शिक्का बसणारच. सुपर लक्झरी सेगमेंटच्या स्पर्धेतून ती कार बाद होणार ..या पेक्षा जास्त काय बोलणार ?
कार खोलून बघण्याबाबत - हे विधान ढोबळच आहे. सगळेच असं करतात असं नाही. याचा अर्थ, इतरांकडे काय आहे ते आपल्याकडे असावं यासाठी काय वाट्टेल ते केलं जातं. असो. नाव बदलून मिळतीजुळती टेक्नॉलॉजी आणण्याचे प्रकार झालेले आहेत. टीव्हीएस आणि बजाज चा वाद आठवून पहा.
शेवटचं जनरल विधान - खूप अभ्यास करत बसलात तर कधीही कार घेऊ शकणार नाही. सध्या मार्केटमधे असणारे सर्वच ब्रॅण्डस चांगले आहेत. डोळे झाकून कुठलीही आवडलेली कार घ्या.. ( तिच्याबद्दल खूपच तक्रारी नसतील तर )
आता मात्र विश्रांती ..
अवांतर : मी तज्ञ नाही. तेव्हा चुकीची दुरूस्ती करणार असाल तर स्वागतच आहे. आणि ते अपेक्षितच आहे. पोस्टचा हेतू माहीती घेणे देणे इथपर्यंत मर्यादित आहे तोपर्यंत मजा येतेच... हेतू निर्मळ नसेल.. तर मग अनुल्लेख करणे योग्य
तुम्ही वर ३.५ लि चं उदाहरण
तुम्ही वर ३.५ लि चं उदाहरण दिलय हा सेगमेंट सुपर लक्झरी कार्सचा आहे. या सेगमेंटमधे वापरलं जाणारं इंजिन वापरून त्यातले फीचर्स कारमेकर देणार नसेल तर त्या ब्रॅण्डवर काही न काही शिक्का बसणारच. सुपर लक्झरी सेगमेंटच्या स्पर्धेतून ती कार बाद होणार ..या पेक्षा जास्त काय बोलणार ? >>
नाही हो तसं नाही परत एकदा सांगतो तो सेगमेंट सुपर लक्झरी कार्सचा नाही. उदाहरण मी फोर्ड टोरस, जी ८ चे दिले, ३ लिटर वाल्या य कार अमेरिकेत आहेत, डॉ़जची प्रत्येक कार ३ लिटर असते, पण ती सेगमेंट लक्झरी कार्सचा नाही, तर रोजच्या कारचा आहे. २.५ वर ३ लिटरच्या कार इथे रोजच्या कार्सच आहेत. आणि त्या लक्झरी नाहीत तसेच लक्झरी कार ही २.५ लिटरची ही असू शकते.
तुम्ही वर लक्झरी व इंजीन असे लिहिल्यामुळे वर ते मोठे पोस्ट टाकले. रादर माझे म्हणने आहे की इंजीन क्षमतेवरून कार "लक्झरी आहे की सुपर लक्झरी आहे" हे ठरत नाही!
टिव्हीस आणी बजाज वगैरे इथे लागू होणार नाहीत कारण भारतात पेंटंटच्या नावाने बोंब आहे. पण एकदाका परदेशी कार आल्या की कॉपी पेस्ट चालणार नाही.
फेरारी, स्पोर्टसकार इ ची तुलना रोजच्या सेडान मध्ये मी करतच नाही, माझा मुद्दाच मुळी इंजिनबेस्ड काहीच नसते हा आहे.
हेतू निर्मळ नसेल.. तर मग अनुल्लेख करणे योग्य >> आताशा हेच मी पाळतो म्हणून हेतू लिहिला कारण परत एक कविता नको. असो भेटत राहूच.
रादर माझे म्हणने आहे की इंजीन
रादर माझे म्हणने आहे की इंजीन क्षमतेवरून कार "लक्झरी आहे की सुपर लक्झरी आहे" हे ठरत नाही!
सहमत. सेगमेंट बद्दल बोलतोय आपण..
माझा मुद्दाच मुळी इंजिनबेस्ड काहीच नसते हा आहे.
असहमत. वर लिंक दिलीय.
अमेरिकन मानसिकतेबद्दल मला काहीच माहीती नाही. तिथे ट्रेक जास्त खपतात असं ऐकलय.
माझा संपूर्ण फोकस सेगमेंटस आणि त्या त्या सेगमेंटसधली तुलना इतकाच आहे.
माझा संपूर्ण फोकस सेगमेंटस
माझा संपूर्ण फोकस सेगमेंटस आणि त्या त्या सेगमेंटसधली तुलना इतकाच आहे. >>> चालेल आपण भारतीय कारची तुलना पण करू.
त्या लिंक मध्ये एका छोट्या पोस्ट शिवाय काही नाही, तसे का असते हे ही नाही.
अनफॉर्च्युनेटली अमेरिकन कार मार्केट जागतीक कार मार्केट ड्राईव्ह करते त्यामुळे इथे मिड म्हणले की जगात ती कार मिड म्हणली जाते.
आता मी निघतो आहे, पण ह्यावर इच्छा असल्यास बोलायला तयार आहे.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Euro_Car_Segment
As per SIAM (Society of
As per SIAM (Society of Indian Automobile Manufacturers)
The classification of segments are done as per length of the vehicle, (Passenger car segment)
A1 - Mini - Upto 3400mm (M800, Nano)
A2 - Compact - 3401 to 4000mm (Alto, wagon r, Zen,i10,A-star,Swift,i20,palio,indica etc)
A3 - Midsize - 4001 to 4500mm (City,Sx4,Dzire,Logan,Accent,Fiesta,Verna etc)
A4 - Executive - 4501 to 4700mm (Corolla,civic,C class,Optra,Octavia, etc)
A5 - Premiun - 4701 to 5000mm (Camry,E class,Accord,Sonata,Laura,Superb,etc)
A6 - Luxury - Above 5000mm (S class,5 series etc)
B1 - Van - Omni, Versa, Magic etc
B2 - MUV/MPV - Innova, Tavera, Sumo etc
SUV - CRV, Vitara etc
A segment, B segment etc were used earlier, tho new terms came, still old one is used most popularly.
But now the segmentation in india is done on the basis of length
http://www.carwale.com/Forums
http://www.carwale.com/Forums/viewthread-3176-p2.html
कन्फुज्ड
>>रादर माझे म्हणने आहे की
>>रादर माझे म्हणने आहे की इंजीन क्षमतेवरून कार "लक्झरी आहे की सुपर लक्झरी आहे" हे ठरत नाही! >>
बट द कॉन्व्हर्स इस ऑल्वेज ट्रू.
लक्झरी कारची इंजीन क्षमता ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असते/असायला हवी; ६/८ सिलिंडर, ३००+ हॉर्सपॉवर इंजीन कमीत्-कमी, नुसत्या स्वँकी इंटीरीअर आणि सोयींवर नाही. नाहीतर म्हणतात ना; "यु कॅन पुट लिप्स्टीक ऑन अ पिग, बट इट्स स्टील अ पिग".
कुटूंब मोठं असल्याने फारसा
कुटूंब मोठं असल्याने फारसा विचार न करता एक इंडिका, ए स्टार आणि स्पार्क या गाड्या थोड्या थोड्या अंतराने घरात आल्या. इंडिका प्रशस्त आहे खरी पण तीन वर्षांनी ट्रकसारखा आवाज करतेय. कारचा फीलच येत नाही. इतर दोन कार्स मस्त आहेत. खरतर या पैशात इनोव्हा आली असती. पण हे धुड घेऊन पुण्यात फिरणं ही कल्पनाच सहन होत नाही..
छोटी कार अनेक दृष्टीनी उपयोगी ठरते.
अरे कोणी लोगन बद्दल सांगा ना
अरे कोणी लोगन बद्दल सांगा ना ?
अरे कोणी लोगन बद्दल सांगा ना
अरे कोणी लोगन बद्दल सांगा ना ?
>>>>>
महेश, लोगान अजिबात घेऊ नकोस
सांगितलं... हुश्श...... !
महेश, लोगनचे नुतनीकरण होऊन
महेश,
लोगनचे नुतनीकरण होऊन तिचे नाव आता व्हेरिटो असे झाले आहे. ह्या महिन्यात ती लाँच होत आहे. घ्यावी की नाही हे मत मी सांगू शकत नाही कारण मी ती चालवलेली नाही.
माझा प्रश्न गॅस कीट च्या
माझा प्रश्न गॅस कीट च्या संदर्भात आहे...
सीएनजी आणि एलपीजी यामधे काय फरक असतो?
मला वॅगनार ला गॅस कीट बसवायचे आहे.
या दोन्ही पैकी कोणते चांगले...
खालील मुद्द्यावर तुलना करता येइल का?
CNG Vs LPG
Per litre cost
Mileage per litre
cost of kit
switching options
safety
space
(याची आधीच कुठे चर्चा झाली असेल तर प्लीज मला लिंक देणे)
धन्यवाद !!
डिझेल कार घेणे
डिझेल कार घेणे परवडते?
पेट्रोल विरुद्ध डिझेल हा वाद नवीन नाही . मात्र , दोन्हींच्या दरात मोठा फरक आहे . पेट्रोल आणि डिझेल इंजिन याचा परिणाम हा दीर्घकालीन वापरामुळे कळतो . पेट्रोल आणि डिझेलच्या दराती फरकामुळे डिझेल कार घ्यावी का , असा प्रश्न अनेक कार घेणाऱ्यांंच्या मनात येत असतो . गेल्या काही महिन्यांमधील पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे असा प्रश्न वारंवार पडणे साहजीकच आहे .
इंधन दरातील फरक
हे गृहित धरा : गेल्या वर्षी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरावरील नियंत्रण उठविले . त्यानंतर म्हणजे जून २०१० पासून पेट्रोलच्या दरात सहा वेळा वाढ झाली असून , एकूण वाढ २२ टक्के आहे . सध्या पेट्रोलचा मंुंबईतील प्रति लिटर दर त्र६८ . ३३ आहे . त्यानतुलनेत डिझेलच्या दरात केवळ एकदाच वाढ झाली आहे . गेल्या आठवड्यात डिझेलच्या दरात प्रति लिटर त्र३ ने वाढ करण्यात आली . मुंबई डिझेलचा प्रति लिटर दर त्र४५ . ०८ आहे . पेट्रोल आणि डिझेल यांच्यातील प्रति लिटर फरक त्र२३ आहे . हा फरक मोठा असल्याने डिझेल इंजिन असणारे वाहन घ्यावे का ?
पूर्ण लेख -> डिझेल कार घेणे परवडते?
Pages