Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनिल तो निवडुंगाचाच प्रकार
अनिल तो निवडुंगाचाच प्रकार आहे. पाणी मिळालं तर त्याला पाने येतात नाहीतर नुसतेच एक काटेरी खोड असते. लहान लाल फुले येणारे झाड कॉमन होते. हि जरा मोठी फूले येणारी जात आहे.
बागुलबुवा, ग्रेट.
हा स्वॉलो सारखा पक्षी होता का ? त्या पक्ष्याला अशी घरटी बांधताना बघितले आहे. ते पक्षी आपली लाळ आणि काडीकचरा मिसळून अशी घरटी बांधतात. मी आफ्रिकेत एका व्हिट मिल मधे होतो, तर गव्हातला काडी कचरा वापरुन अशी घरटी वांधली होती. पण तिथले कामगार, त्या भिरभिरणार्या पक्ष्यांना पकडत आणि भाजून खात. एवढुश्या पक्ष्यांने त्यांचे काय पोट भरणार होते, ते तेच जाणे. पण बोलता येत नसे कारण माझ्या दारातली, मॉनिटर लिझार्ड पकडायला पण मला त्यांचीच मदत लागायची.
या फोटोतल्या पक्ष्याने पण आपली लाळ आणि माती वापरली असणार. त्याशिवाय माती इतकी घट्ट होऊन, भिंतिला चिकटणार नाही.
बागुलबुवा कसला ग्रेट, ते
बागुलबुवा कसला ग्रेट, ते चिमणपाखरु ग्रेट. मी कसला दचकलोय ते चिवचिवाट करुन आतून बाहेर आल्यावर. खूप उंचावर होत घरटं आणि अंधारही होता, म्हणून नीट नाय आलाय फोटो.
तो स्वालोसारखाच होता. सुसाट उडाला. शेपटी फोर्कड् होती बहुत्येक.
अरे अम्या.. सही आहे !
अरे अम्या.. सही आहे ! पहिल्यांदाच पाहीले..
मला खालील फोटोतील झाडाचे नाव कुणी सांगेल का.. शांकलीला ते मोहाचे झाड वाटतेय.. मला नाव माहीत नाही पण संजय गांधी उद्यानाच्या जंगलात हे बहरलेले दिसले..

१
२

३


४
विजयजी, धन्यवाद वरूण आणि
विजयजी, धन्यवाद वरूण आणि पाचुंदाचे फोटो टाकल्याबद्दल
राणीच्या बागेतील हि काही झाडे
या झाडाचे नाव माहित नाही पण याचा सुवास अफलातुन होता (मला बकुळीच्या फुलाची आठवण झाली :-)) याच्या जवळुन जाताना याच्याकडे बिलकुल लक्ष नव्हते पण सुगंध जाणवला तसा परत मागे फिरून पाहिले आणि हे झाड दिसले.

हि झाडे मुंबईत भरपूर वेळा पाहिली, पण यांचा बहर पहिल्यांदाच
दिनेशदांनी "आवर्जुन बघ" असे सांगितलेली हि दोन झाडे
स्प्रिंगसारखी फुले

ऑस्ट्रेलियन वंशाचे एक झाड. याचा बहर दिसत नव्हता पण झाडाखाली मस्त हळदी कुंकवाचा सडा पडला होता.
सोनसावरीचा कापूस

हे फुल कशाचे?
>> अनिल हा कॅकटस चा प्रकार
>> अनिल हा कॅकटस चा प्रकार वाटतोय. >>
बरोबर आहे जागु. इथे मंत्रालयाच्या बाहेर ही रोपं लावली आहेत.
योगेश, तुमच्या १ ल्या फोटो
योगेश, तुमच्या १ ल्या फोटो मधलं झाड माझ्या आई कडे आहे. पहीला पाऊस पडल्यावर खुप बहरत आणि सुगंधाचा घमघमाट...... आणि झाडाखाली पाकळ्यांची पखरण......... या सुंदर झाडाची आठवण करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद....
पहीला पाऊस पडल्यावर खुप बहरत
पहीला पाऊस पडल्यावर खुप बहरत आणि सुगंधाचा घमघमाट...... आणि झाडाखाली पाकळ्यांची पखरण.........>>>>>हो, खरोखरच झाडाखाली पाकळ्यांची पखरण झाली होती, पण हि फुले आत्ताच बहरली आहे (हा फोटो या शनिवारीच काढल आहे. :-))
बागुलबुवा, शेपटी फोर्क्ड
बागुलबुवा, शेपटी फोर्क्ड म्हणजे कोतवाल नसणार. कोतवाल तर मोठ्या झाडावरच बांधतो. माझ्याकडे पक्षिकोष आहे, पण तो भारतात आहे.
यो रॉक्स, ती तामण किंवा ऐन असणार. मोहाची पाने जरा काळपट लाल असतात आणि ती फांद्याच्या टोकाला लागतात. आणि पाने मोठी असतात.
जिप्सी त्या सुगंधी फुलांचे नाव कुंती. घराच्या गेटजवळ लावण्यास उत्तम. त्याला रात्री खुप सुंदर सुगंध येतो.
आणि ते शेवटचे पिवळे खास फूल ना, त्याचे गुलाबी फळ यापेक्षा देखणे असते.
ती जी स्प्रिंगसारखी फूले आहेत, त्याचे झाड मी इतरत्र कुठेही बघितले नाही.
आसुपालाला नंतर जांभळासारखी फळे पण येतात. पण पक्षीसुद्धा खात नाहीत ती. झाडाखालीच पडलेली असतात.
Castanospermum australe हे
Castanospermum australe
हे त्या पिवळ्या नारिंगी फुलांच्या झाडाचे नाव. त्याला चेस्टनट असे चुकिचे नाव दिलेय. चेस्टनट वेगळा असतो, त्याला हिरवी केसाळ फळे येतात.
या झाडाला पांगार्यासारख्याच शेंगा येतात. त्यातल्या बिया चेस्टनट सारख्या दिसत असल्या तरी त्या विषारी असतात.
त्या झाडाचा पर्णसंभार इतका दाट आहे कि या फूलांचा झाडावरचा फोटो काढणे अशक्य होऊन बसते. झाडावर चढूनच काढला पाहिजे.
अच्छा तर हि कुंती का सुवास
अच्छा तर हि कुंती का
सुवास खुपच सुंदर होता या फुलांचा.
आणि ते शेवटचे पिवळे खास फूल ना,>>>>पण त्या फुलाचे नाव काय?
त्या झाडाचा पर्णसंभार इतका दाट आहे कि या फूलांचा झाडावरचा फोटो काढणे अशक्य होऊन बसते. झाडावर चढूनच काढला पाहिजे.>>>>> अगदी अगदी
जिप्स्या, इतकी वर्षे त्याचा
जिप्स्या, इतकी वर्षे त्याचा शोध चालू आहे !
परत तू कधी त्या भागात गेलास, तर मलबार हिल वर एक इंग्लीश ओक चे झाड आहे, त्याला फळे लागलीत का त्याचा शोध घे. मुंबईत हे झाड वाढले तर आहे, पण त्याला फळे लागतात का, ते बघायचे होते. आईस एज मधला तो प्राणी, या फळासाठी जीव टाकत असतो.
तसेच बाबुलनाथ जवळच्या पायर्या सुरु होतात, तिथे एक पायमोज्याचे झाड आहे. त्याची फळे अक्षरशः पायमोज्यासारखीच दिसतात. (बहुतेक त्याला स्टॉकिंग्ज ट्री म्हणतात ) ते आहे का बघ. मला दिसले होते, थोड्या पायर्या चढल्यावर डाव्या हाताला आहे. पण फळे नसतील, तर झाड ओळखता येणार नाही.
जिप्सी, सगळे फोटो आवडले
जिप्सी,
सगळे फोटो आवडले !
दिनेशदा,
कृपया एकदा तुम्ही पाहिलेल्या निसर्गाशी/झाडांशी-पानाफुलांशी/पशुपक्षांशी संबधित,निवडक चित्रपटांची नावे इथे टाकल्यास खुप बरं होईल.

जिप्सी, प्रचि. ६ ,७ मधल्या
जिप्सी,

प्रचि. ६ ,७ मधल्या झाडाला आमच्याकडेही सगळे 'अशोक' म्हणतात
मुख्यतः स्त्रियांसाठी खुप औषधी मानला जाणारा वृक्ष म्हणजे हाच अशोक ना ?
जिप्स्या खूप खूप खूप
जिप्स्या
खूप खूप खूप .....छान.
जिप्स्या खूप खूप खूप
जिप्स्या
खूप खूप खूप .....छान.. रे
हि झाडे मुंबईत भरपूर वेळा पाहिली, पण यांचा बहर पहिल्यांदाच >> "अशोक".
चातक आमच्याकडे पण त्याला अशोक
चातक आमच्याकडे पण त्याला अशोक म्हणतात काही जण देवदार म्हणतात. ह्याला फळही धरतात लांबट छोटी.
आमच्याकडे पण त्याला अशोक
आमच्याकडे पण त्याला अशोक म्हणतात पण सितेचा अशोक म्हणुन ओळखला जातो तो वेगळा
आमच्याकडे पण त्याला अशोक
आमच्याकडे पण त्याला अशोक म्हणतात >>>त्यालाच आसु पालव (आसोपालव) पण म्हणतात ना?
राम म्हणु नये राम, नाही
राम म्हणु नये राम, नाही सीतेच्या तोलाचा
सीता माझी हिरकणी, राम हलक्या दिलाचा
लोकगीतातल्या या ओळी म्हणजे मला वाटते कि सीतेचाच हुंदका आहेत. रामभक्तांच्या सर्व आर्ग्युमेंट्स लक्षात घीऊनही, मला असेच वाटते, कि एक स्त्री म्हणुन सीतेवर अन्यायच झाला. ( लोकसाहित्यात मात्र सीतेला योग्य तो मान दिला जातो. फुलांमधेदेखील, सीतेची वेणी, सीतेची आसवं अश्या नावाची फुले आहेत. ) आणि हिच उपेक्षा सीतेच्या अशोकाच्या वाट्याला पण आलीय.
अनेक जण रस्त्याच्या किंवा बंगल्यांच्या कडेला लावणार्या उंचाड्या झाडालाच अशोक समजतात. त्याला अशोकाची सर नाहीच येऊ शकणार. त्याला सावली तरी असते का ? मग अशोकवनात सीता त्याच्या सावलीत कशी विलाप करत बसली असेल ? तो आसुपाल किंवा मास्ट ट्री Polyalthia longifolia जवळपास याचे झाड असेल तर याला फिकट हिरवा फ़ुलोरा आला असल्याचे बघितला असेल. पाच पाकळ्यांची हि फुले रंगामुळे आणि फांद्याच्या ठेवणीमुळे दिसतही नाहीत. याची एक जरा आडवी वाढणारी जात असते, त्या झाडाचा फुलोरा दिसु शकतो. फ़ुलानंतर याला आधी हिरवी आणि पिकल्यावर काळी होणारी फळेही लागतात. पक्षीदेखील ती फळे खात नाहीत. खरे तर सहसा पक्षी या झाडावर बसतच नाहीत.
दारात लावलेल्या रुक्मिणी किंवा ईक्झोरा ला पण काहि जण अशोक समजतात. चार पाकळ्यांच्या फुलांचे अर्धगोलाकार गुच्छ या झुडुपावर जवळजवळ वर्षभर असतात. यात लाल ते पिवळा अश्या छटा असु शकतात. याचे गजरेही करता येतात. याची फुले एकात एक ओवुन लहान मुले खेळतात. माझ्या छोट्या मैत्रिणीने याच्या देठाना बॉलपेनने भोक पाडुन त्यातच दुसर्या फुलाचा देठ ओवुन, मस्त माळ केली होती. या गुच्छात क्वचित तीन किंवा पाच पाकळ्याचे फुल दिसते. आणि ते शोधण्याचा खेळही मुले खेळतात. पण तोही खरा अशोक नव्हेच.
अशोक असा नाही अशोक तसाही नाही, असे नेति नेति म्हणत, आपण अशोकाजवळ कधी पोहोचणार ? खर्या अशोकाचे वर्णन आपल्याकडे अनेक जुन्या काव्यात आढळते.
अशोकानिर्भर्स्तिपद्मरागम, आकृष्टहेमद्युतिकर्णिकारं
मुक्तकलापीकृतसिंधुवारं, वसंत्पुष्पाभरणं वहंती
या श्लोकात अशोकाची फुले, माणकांपेक्षाही सुंदर होती, असे वर्णिले आहे.
Saraca indica या नावाचा हा देखणा वृक्ष आता खुपच दुर्मिळ झालाय. याचे झाड तीन ते पाच मीटर्स पर्यंत वाढु शकते. पाने आंब्यासारखीच. पण जरा रुंद आणि टोकाला गोलाकार. फांद्या भरपुर. पानेही भरपुर. याची कोवळी पाने लाल असतात. त्यामुळे याला रक्तपर्ण आणि ताम्रपर्ण अशीही नावे आहेत. या कोवळ्या पानाची आणखी एक गंम्मत म्हणजे हि पालवी अगदी तुटल्याप्रमाणे मिटुन खाली लोंबत असते. वार्याने ते हलते तेंव्हा गरगर फिरेल कि काय असेही वाटत राहते. मग हळुहळु ती पोपटी हिरवी होते आणि जोम धरते.
पण अशोकाचे खरे वैभव म्हणजे त्याची फुले. सुंदर ललनांचा पदस्पर्ष झालेल्या जमिनीतच हा वाढतो, किंवा सुंदर स्त्रीचा लत्ताप्रहार झाला तरच तो फुलतो, असा प्रवाद आहे. ( आमच्या कॉलनीत अश्विनी भावेचे माहेर आहे. आणि त्या सोसायटीच्या दाराशी भरभरुन फुलणारे अशोक आहेत. )
तो लत्ताप्रहाराचा किस्सा कितपत खरा ते नाही सांगता येणार मला, पण अशोकाच्या फुलण्यात एक उन्माद असतो एवढे नक्की. याची फुले केवळ फांद्याच्या टोकानाच येतात असे नाही तर आडव्या फांद्यानाच नव्हे तर जुन बुंध्यालाही ही फुले येतात. फुगीर पोकळ देठाची, पिवळसर रंगाची हि फुले चार गोलाकार पाकळ्यांची असतात. हा पिवळा रंग आधी केशरी आणि मग लाल होतो. एकाच गोलाकार गुच्छात हे सगळे रंग असतात. या फुलाचे लांबलांब पुंकेसर फुलाच्या बाहेर आलेले असतात. झाड जसजसे वयाने वाढते, तसा फुलांचा रंग जास्त गडद होत जातो. ऐन बहरात आलेले झाड खुपच देखणे दिसते. याच्या फुलांचा समावेश पाच मदनबाणात केला जातो. ( इतर चार म्हणजे आंब्याचा मोहोर, कमळ, मोगरा आणि नीलकमल )
मला कधीकधी हे झाड बघुन अपमानास्पद अग्निपरिक्षा देत असलेली सीताच आठवते.
अशोकस्तबकांगार षट्पदस्वननिःस्वनः
मां हि पल्लव्ताम्रर्चिर्वसंताग्निः प्रधक्षति
( अर्थ, हा वसंतरुपी अग्नी मला भस्म करुन टाकेल का, या अशोकाची फुले म्हणजे जणु निखारेच आहेत आणि याची नवी पालवी या अग्नीच्या ज्वाला आहेत तर या फुलांवर आलेल्या भुंग्यांचा गुंजारव म्हणजे अग्निचा चट्चट आवाजच आहे )
फुलानंतर याला लांबट शेंगा येतात. पण आणखी वेगळेपण म्हणजे, फुले सगळ्या झाडभर येत असली, तरी शेंगा मात्र पानांच्या टोकालाच लागतात. श्रीलंकेत अजुनही अशोकवन जोपासलेय. तिथे ही झाडे जोमाने वाढतात. ( तशी आपल्याकडेही जोमाने वाढतात, अर्थात लावली आणि जोपासली तर. )
एकंदर हे झाड स्त्रीसखाच म्हंटले पाहिजे. अंगनाप्रिया असे याचे नावच आहे. अशोकाच्या सालीचा काढा, अशोकारिष्ट म्हणुन प्रसिद्ध आहे. स्त्रीयांच्या अनेक विकारांवर तो वापरतात.
माझ्या यादीतल्या बहुतेक झाडांच्या नावात इंडिका असुनही, आपल्याकडे हि झाडेच दुर्मिळ झालीत.
लेखक : कुणी दिनेश म्हणून होता बॉ !!
दिनेशदा, अप्रतिम माहिती!!!
दिनेशदा, अप्रतिम माहिती!!! (नेहमीप्रमाणेच).
यातील काहिच माहित नव्हते.
मी आता परत त्या पवईच्या बागेत
मी आता परत त्या पवईच्या बागेत जाऊन आलो

तेथे मला वरूण/वायवर्ण ची दोन झाडे, ऐन, बहावा, बिवळा (?), कुसुम, जाम, सुवर्णपत्र, गायत्री अशी अजुन काही झाडे दिसली
जिप्स्या नाक्यावरचा भेरला माड
जिप्स्या नाक्यावरचा भेरला माड बघून ये.


नवि पालवी - फोटो मोबाईल वर घेतले आहेत. त्या मूळे जास्त ऊठावदार नाहीत.
bastard myrobalan, beach almond, bedda nut tree, beleric myrobalan, belliric myrabolan • Gujarati:बहेड़ा • Hindi: बहेड़ा, बहुवीर्य , भूतवास , कल्क , कर्षफल• Konkani: goting Marathi: बेहडा , बिभीतक , कलिद्रुम , वेहळा Sanskrit: अक्षः , बहुवीर्य , बिभीतकः, कर्षः , कासघ्नः , विभीतकः
जवळून
जिप्स्या नाक्यावरचा भेरला माड
जिप्स्या नाक्यावरचा भेरला माड बघून ये.>>>>>हो विजयजी, त्या सगळ्या लाईनीत खुप माड बहरले आहेत
मी बेहड्याची पालवी कधीच
मी बेहड्याची पालवी कधीच बघितली नव्हती.
खरेच प्रत्येक झाडाचे, प्रत्येक ऋतूमधले रुप आगळे.
ते बिवळा म्हणजे कुठले झाड?
ते बिवळा म्हणजे कुठले झाड? (त्या झाडावर तसे नाव लिहिले होते)
पालवी Indian cottonwood,
पालवी

Indian cottonwood, Indian kapok, red silk-cotton tree, simal tree • Hindi: कांटीसेंबल , रक्त सेंबल, सेमलl, सेमर कंद , सेमुल , सेमुर , शेंबल , शिंबल , सिमल , सिमुल • Marathi: शाल्मली , सांवर , सांवरी , सौर Sanskrit: शाल्मली , शल्मली
अशोकाचा आणखी एक प्रकार,
अशोकाचा आणखी एक प्रकार, सुगंधी अशोक. Polyalthia fragrans याचे झाड खूप उंच वाढते. आणि हि फूले उंचावरच आडव्या फांद्यांवर लागतात. झाडाखालून गेल्यावर सुगंधाचा मारा होणारच. प्रत्येक फूलाचा सुगंध एकमेव असतो म्हणून तूलना करणे योग्य नाही, पण साधारण रातराणीच्या सुगंधाची आठवण येते. रंग हिरवा असला तरी तो पानांपेक्षा वेगळा असतो, म्हणून नीट निरखून बघितली तर फूले दिसतात. पण खुपदा चकायलाही होते. सुगंध कुठून येतोय ते कळत नाही. पण ह झाड साधारणपणे टेकड्यांवर आढळते. मला आठवतेय, पुर्वी कर्नाळ्यावर चढायची जी मुख वाट होती, तिच्या सुरवातीलाच हे झाड होते. आत आहे का ते माहीत नाही
ही फूले मात्र मला दूधसागरची वाट जिथे सुरु होते, तिथे दिसली होती.
दिनेशदा फ्लावरींग कधी ?
दिनेशदा फ्लावरींग कधी ?
विजय हा फोटो २७ नोव्हेंबरचा
विजय हा फोटो २७ नोव्हेंबरचा आहे, म्हणजे दिवाळीच्या आसपास बहर येत असावा. याचेच नायजेरियातले व्हर्जन वर्षभर फूलत असते. ते वेगळे झाड असते, फांद्या उतरत्या असतात, आणि फूले जास्त प्रमाणात लागतात. त्याची फांदी तोडून आम्ही गाडीत ठेवत असू, फ्रेशनर चे काम व्हायचे.
काल अचानक हा दिसला. मन मोहूनच
काल अचानक हा दिसला. मन मोहूनच गेलं माझं. आज सकाळी लेकीला स्कूलबसच्या स्टॉपवर घेऊन जाताना कॅमेरा घेऊन गेले आणि टिपलंच. ताजा टवटवीत, गुलाबी पानांचा पिंपळ. पेनिन्सुला टॉवरच्या गेटबाहेर.
जरा लांबून :
आणखी जरा लांबून :
Pages