भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
३६ चेंडूत ४० - सामना
३६ चेंडूत ४० - सामना अतिरंगतदार !!
सर्व काहि फिक्स आहे. आपण
सर्व काहि फिक्स आहे. आपण मुर्ख आहोत मैच पहाणारे.
२४चेंडूत २७ हव्यात, ४ विकेट
२४चेंडूत २७ हव्यात, ४ विकेट हातात ! आयर्लंड पहिलं "अपसेट"करणार?
१८ चेडु २० रन
१८ चेडु २० रन
१२ चेंडूत १२ धावा हव्यात;
१२ चेंडूत १२ धावा हव्यात; इं.टेंशनमधे !
इं.टेंशनमधे ! >>> भाउ इ
इं.टेंशनमधे ! >>>
भाउ इ कशाला येइल टेंशनमधे ? त्यांना भरपुर मिळाले आहे.
अरे धमाल चाललेली दिस्तीय. ७
अरे धमाल चाललेली दिस्तीय.
७ आउट.
कोणी कशी फिक्स केली आहे याचीच
कोणी कशी फिक्स केली आहे याचीच मला जास्त उत्सुकता आहे आता, मैच कोणी जिंकली ह्याच्याशी काहि घेणे देणे नाहि. आता परत मजा आहे चैनेल वाल्यांची
४धावा- ७ चेंडू.
४धावा- ७ चेंडू.
६ चेंडु ३ रन
६ चेंडु ३ रन
जिंकले - आयर्लंड छान फिक्स!!
जिंकले - आयर्लंड
छान फिक्स!! वा वा.
आयरीश जिंकले !!! भारताला पण
आयरीश जिंकले !!! भारताला पण टेन्शन येणं स्वाभाविक !!!!!! आयर्लंड अभिनंदन !
जबरी आयर्लंड. १११ वर ५
जबरी आयर्लंड. १११ वर ५ असताना.
अरे ह्या वर्ल्डकपाचे नाव
अरे ह्या वर्ल्डकपाचे नाव टी-50 वर्ल्डकप ठेवणेत यावे अशी मी विनंती करु म्हणतो. टी २० ला आल्यागत बॅटी मोकळ्या सोडल्यात सगळ्यांनी!!! बोलर लोकांचे काही खरं नाही. सगळी कसब पणाला लागणार!
कोणी कशी फिक्स केली आहे याचीच
कोणी कशी फिक्स केली आहे याचीच मला जास्त उत्सुकता आहे आता, मैच कोणी जिंकली ह्याच्याशी काहि घेणे देणे नाहि. आता परत मजा आहे चैनेल वाल्यांची >>
Another field day for Conspiracy theorists.
याचा अर्थ असा घ्यावा का कि
याचा अर्थ असा घ्यावा का कि भारताची बोलींग चांगली आहे??? निदान मॅच हरले तरी नाहीत.
सगळ्या मॅच बेंगलोर ला ठेवल्या तर कसलं भारी!!!
सगळ्या मॅच बेंगलोर ला ठेवल्या
सगळ्या मॅच बेंगलोर ला ठेवल्या तर कसलं भारी!!! >>
पुढची मैच भारत विरुध आयर्लंड बेंगलोर ला आहे.
ती भारत जिंकणार. ओ ब्रायन लगेच आउट होणार कारण त्याच्यावर पैसे लावले जातील आता. भारत सहजासहजी जिंकेल. कारण आयर्लंड चा भाव वधारला असेल. त्यामुळे आयर्लंड वर पैसे लावणार्यांचे पैसे बुडणार जसे भारत वि इंग्लड मैच नंतर आज इंग्लड वर पैसे लावणार्यांचे बुडाले.
मला आत्ता कुठे क्रिकेट समजायला लागले नीट.
मला आत्ता कुठे क्रिकेट
मला आत्ता कुठे क्रिकेट समजायला लागले नीट. >>>>> त्याचा आम्हाला का त्रास पण?
त्याचा आम्हाला का त्रास पण
त्याचा आम्हाला का त्रास पण >>>
तुम्हाला नाहि त्रास, तुम्हि आपली स्वप्न पहात बसा की - क्लिन क्रिकेट्ची
कश्यावरून फिक्स आहे म्हणताय..
कश्यावरून फिक्स आहे म्हणताय.. आजकल फॅडच झालेय.. कुठलीही मॅच रंगतदार झाली की फिक्स होती म्हणायचे..
क्रिकेटची ही खूप दुरावस्था आहे...
असे वारंवार 'फिक्स फिक्स' म्हटले गेले तर मग दुबळे संघ जेव्हा परिश्रम करून जिंकत असतील तर त्यांना श्रेय कधी मिळणार ?? आर्यलंड चे खरे तर अभिनंदन करायला हवे.. त्यांचे आजचे क्षेत्ररक्षण पण क्लास होते.. नि ओ ब्रायन सध्या फॉर्ममध्ये आहे... खरे तर या गटात एकदम दुबळा असा संघ नाहीये.. जसे केनिया नि कॅनडा.. नेदरलँडदेखील मौका मिळाला तर कधीही विजय मिळवेल असे वाटते.. गटस आहेत त्यांच्यात..
आपल्याला शेजारची विकेट मिळणार
आपल्याला शेजारची विकेट मिळणार आहे. बॅटींग विकेटचा प्रयोग खूप झाला. गरा गरा फिरा.
"मॅन ऑफ द मॅच" अॅवार्ड
"मॅन ऑफ द मॅच" अॅवार्ड घेतल्यावर ओ'ब्रायन म्हणाला कीं इंडीया वि. इंग्लंड सामना पाहिला असल्यामुळे बेंगलूरला ३०० + करणं अशक्य नाही हे जाणवलं होतं ! आता ही मॅच पाहिल्याने ११५- ५ वरूनही जिगरीने खेळलं तर सामना ३००+ करून जिंकता येतो, हें किती संघ शिकतात पाहूं !
वातावरण तापायला लागलंय, हें नक्की !
ही मॅच फिक्स्ड असेल तर मला
ही मॅच फिक्स्ड असेल तर मला अजून अशा मॅचेस बघायला आवडतील.
>> याचा अर्थ असा घ्यावा का कि भारताची बोलींग चांगली आहे??? निदान मॅच हरले तरी नाहीत
त्यांच्या बॅटिंग मधेच गोची आहे. ५० ओव्हरीत फक्त ३२७?
भारत आणि इंग्लंड दोघांना बॅटिंगचा माज नडला आहे. ४२/४३ व्या ओव्हरी नंतर इतकी पडझड कशी होऊ देतात? सगळ्याच बॅट्समनांनी कशाला बॅटी फिरवायला पाहीजेत, तेही आल्या आल्या? शेवटच्या २ ओव्हरीत त्यातल्या त्यात ठीक आहे. तो पर्यंत एक तरी बॅट्समन टिकवला तर ३५० च्या वर जाता येईल.
ही मॅच फिक्स्ड असेल तर मला
ही मॅच फिक्स्ड असेल तर मला अजून अशा मॅचेस बघायला आवडतील >> LOL
चिमण, अगदी!!! आजा ईं. ने पण
चिमण,
अगदी!!! आजा ईं. ने पण तीच चूक केली जी भारताने.... शेवटच्या षटकात वेड्यासारखे मारायला जावून आउट झाले. जसे आपण ३५० करायला हवे होते तसेच आज ईं. ने ३५० करायला हवे होते.. पण तेही आपल्याच वाटेने गेले.
आयर्लंड चे अभिनंदन!!! ईं. चे क्षेत्ररक्षण गचाळ होतेच, शिवाय ओब्रायन चे सोडलेले झेल महागात पडले.
थोडक्यात याच मैदानावर याच खेळपट्टीवर भारताने पुन्हा किमान ३३८ बनवले तरच आयर्लंड विरुध्ध जिंकायची आशा आहे असे म्हणूयात
jokes apart, मला वाटतं भारत वि. आयर्लंड सामन्यात नेमकी फिरकी विकेट बनवतील---- सगळ्यांचेच अंदाज फुस्स!! फिरकी विकेट वर त्यातल्या त्यात भारताचे पारडे थोडे जड आहे असे म्हणता येईल 
झक्कास! विश्वचषक आता रंगात आलाय... ओब्रायनने ईतके वाईट्ट धुतले राव... गल्ली क्रिकेट मध्ये पण एव्हडे बेकार झोडत नाहीत.... ऊद्या ईं. च्या व्रुत्तपत्रांतून काय छापून येते ते पहायला हवे.
--------------------------------------------------------------------------------
आयला काय दिवस आले, भारत वि. आयर्लंड मध्ये भारताचे पारडे थोडे जड असे म्हणावे लागतेय!
एकंदरीत आजूबाजूला ईतकी शतके ठोकली जात असताना साहेब देखिल पेटतील अन सर्वात जास्त धावा करायच्या शर्यतीत "घुसतील" अशी आशा करुयात...
गणू यांच्या सर्व पोस्ट
गणू यांच्या सर्व पोस्ट पटल्या.
ती भारत जिंकणार. ओ ब्रायन लगेच आउट होणार कारण त्याच्यावर पैसे लावले जातील आता. भारत सहजासहजी जिंकेल.
--- ब्रायन लगेच बाद होणारही नाही, भाव थोडा अजुन वाढवणार मग त्याला पाडणार... या आधी पण manipulation करुन केनिया (२००३ सेमी पर्यंत पोहोचला होता), बांग्लादेश यांच्या करवी सुखद धक्के मिळालेले आहेत.
फिक्सींगशिवाय जर लिंबु-टींबू
फिक्सींगशिवाय जर लिंबु-टींबू संघ जिंकूच शकत नसतील तर १९८३च्या वर्ल्डकपवरचं आपलं नांव आपण पुसून टाकणं क्रमप्राप्त आहे !
इंग्लंडनी फारच वाईट बॉलिंग
इंग्लंडनी फारच वाईट बॉलिंग केली... पण केव्हिन ओब्रायननी पट्ट्यातले बॉल अप्रतिम खेचले... आणि ऑफसाईडच्या दोन्ही सिक्सर कडक होत्या... कितीही फिक्सिंग केले तरी ऐनवेळेस असे शॉट मारणे अवघडच असते...
फिक्सींगशिवाय जर लिंबु-टींबू
फिक्सींगशिवाय जर लिंबु-टींबू संघ जिंकूच शकत नसतील तर १९८३च्या वर्ल्डकपवरचं आपलं नांव आपण पुसून टाकणं क्रमप्राप्त आहे>>>
सहमत आहे.
भाऊ आणि यो रॉक्सच्या पोस्टीला
भाऊ आणि यो रॉक्सच्या पोस्टीला अनुमोदन.
फिक्सिंगची कीड अजून पूर्णपणे नष्ट झालेली नाही हे खरंय. पण दरवेळेला त्याच पूर्वग्रहदूषित नजरेनं पाहणं योग्य नव्हे.
कालची मॅच भन्नाटच झाली. खुल्या दिलानं ओ'ब्रायन आणि आयर्लंडचं कौतुक करा.
Pages