विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत x इंग्लंड आणि इंग्लंड x आयर्लंड या सामन्यात खरा विजय जर कुणाचा झाला असेल तर तो क्रिकेट या खेळाचा ...!
जय हो क्रिकेट ! भारतीय क्रिकेट संघालाच विजेतेपदाचा करंडक मिळू देत ही शुभकामना !

पाकिस्तान दोनशेच्या आत आटोपले तरी कॅनडाकडे तेव्हढे करणारी बॅटिंग आहे का ?

पाकिस्तानचे तर पाचच्या पाच बॉलर पूर्णपणे भिन्न शैलीचे आहेत..>> बस्स काय राव, आपले पाच पण पाच वेगळे होते कि, एक right hand medium pace, एक left hand pacer, एक off spinner, एक legspnner आणि उरलेला left hand orthodox Lol

मला वाटतं खेळपट्टीवर बरंच कांही अवलंबून असेल. >> अनुमोदन. चिन्नास्वामीवर बाकीचे पण चालतील का ?

भारत x इंग्लंड आणि इंग्लंड x आयर्लंड या सामन्यात खरा विजय जर कुणाचा झाला असेल तर तो क्रिकेट या खेळाचा >>>>>

जय हो वेड्या भारतीयांची! जय हो!

भारत x इंग्लंड आणि इंग्लंड x आयर्लंड या सामन्यात खरा विजय जर कुणाचा झाला असेल तर तो बुकीजचा! Proud

आज पकिस्तानी खेळाडुही पेटलेले दिसतात पैसे मिळवण्यासाठी. आजची मैचही क्लोज होणार. आणी भरपुर बेटिंग चालु झालेच असेल आता.

कॅनडाकडे एक चांगला बॅटसमन असता तर आजची मॅच त्यांची असती..
पण छे, अगदीच लिंबूटिंबू...
पण पाकला १८४ मध्ये रोखले ही पण काय कमी कामगिरी नाहीये

आज पकिस्तानी खेळाडुही पेटलेले दिसतात पैसे मिळवण्यासाठी. आजची मैचही क्लोज होणार. आणी भरपुर बेटिंग चालु झालेच असेल आता.
---- क्रिकेट जिंकण्या साठी खेळण्यापेक्षा, बुकीजच्या मर्जी नुसार खेळले तर जास्त पैसे मिळवता येतात. काळाची पावले ओळखा... बाळवट खेळाडू जाळ्यात अडकतात (म्हणजे पकडले जातात)...

भारत - इंग्लंड मॅच चा निकाल शेन वॉर्न ला बरेच तास आधी माहित होता. आता मॅच टाय करणे म्हणजे खरोखरच कौतुकास्पद म्हणजे कठिण कार्य आहे.

गणू वल्ड्कप कोण जिंकणार आहे?

अफ्रिदी पाच विकेट्स
च्यामारी..ते इतके जीव तोडून खेळतायत ना मला आता भितीच वाटायला लागली आहे...कप घेऊन जातात का काय..

>>अफ्रिदी पाच विकेट्स
च्यामारी..ते इतके जीव तोडून खेळतायत ना मला आता भितीच वाटायला लागली आहे...कप घेऊन जातात का काय..

Happy
अफ्रिदी ने २ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत ३ मॅच मधे. फायनल पर्यन्त पोह्न्चतील असे वाटतेय.

गणू वल्ड्कप कोण जिंकणार आहे? >>>

मला माहित असते तर मी नाहि पैसे लावुन जिंकले असते Proud

मैच फिक्स आहे असे समजुन मैच पहाण्यात जास्त मजा येते. भ्रारत जिंकले, हरले तरी काहि वाटत नाहि

<< अफ्रिदी पाच विकेट्स >> कुणी म्हणतात फिक्सींग , मी म्हणतो फिरकीची चलती आतां झालीयच सुरू !! Wink

गणू, मॅच फिक्सिंग ची किड पूर्ण नष्ट झाली नाही हे मान्य आहे. तुम्ही म्हणता तशा स्पॉट फिक्सिंग्ज होतही असतील, परंतू एखाद्या संघातील ११ च्या ११ खेळाडूंना विकत घेऊन पूर्ण सामन्याचा निकाल फिक्स करणं पूर्णपणे अशक्य आहे आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊन टाय करण्यापर्यंत फिक्स करणं तर बहुतेक ब्रम्हदेवालाही शक्य होणार नाही. त्यासाठी दोन्ही संघातील २२ खेळाडूंना खरेदी करावं लागेल. त्यांच्या आसपासच्या लोकांना खरेदी करावं लागेल. बेटिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्वेस्ट करावं लागेल. खर्चाच्या दृष्टीने हे शक्य आहे परंतू त्यात लागणार्‍या एफर्ट्स मुळे आणि पकडले जाण्याच्या भीतीमुळे मला नाही वाटत हे शक्य आहे. तसेच आय सी सी ने पकडलेल्या खेळाडूंवर घातलेल्या आजन्म बंदीमुळे मला नाही वाटत कमीत कमी विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळाडू फिक्सिंगमध्ये भाग घेतील. शेवटी खेळले तरच बुकीज त्यांना फिक्सिंग साठी संपर्क करतील नाही का? भारतातल्या बर्‍याच खेळाडूंच चारित्र वरकरणी तरी स्वच्छ वाटतं. तसेच त्यांना फिक्सिंग केलेल्या पैशापेक्षा कित्येक पटीने जास्त पैसे तर केवळ जाहिरातीतून मिळतात. त्यामुळे असं जरी मानलं कि भारत ईंग्लंड सामना जरी फिक्स होता तर तो इंग्लंड हरण्याच्या दृष्टीने फिक्स केला गेला पाहिजे होता. कारणं भारत स्वतःहून तर हरणार नव्हता त्यामुळे भारताला हरवण्याच्या दृष्टीने तो फिक्स होणं शक्य नव्हतं. केवळ इंग्लंड स्वतःहून हरू शकतात. पण त्यांनी ते ही केलेलं दिसत नाही.

अगदी २ मिनिटांसाठी मानलं की हे सामने फिक्सड आहेत तरीही ५० चेंडूत १०० धावा करणं शंभरातल्या ९९ वेळा अशक्य आहे. तसच ३ चेंडूत ३ बळी मिळवणंही अशक्य आहे. वर चर्चिले गेलेले योगायोग निव्वळ योगायोग असू शकतात. शेवटी विश्वचषकासारख्या स्पर्धेत खेळण्याचे दडपण काही औरच असते. तुम्हा आम्हासारख्यांचे काळजाचे ठोके मॅच बघताना चुकतात तर ती मॅच खेळणार्‍यांचे काय हाल होत असतील याचा जरासा विचार करा.

तसेच अजूनतरी ह्या मॅचेस फिक्स झाल्याचे कोणतेही पुरावे हाती आलेले नाहीत (तुमच्याकडे असतील तर द्यावे). त्यामुळे तुम्ही हा मॅच फिक्सींगचा चष्मा काढून उर्वरीत सामने पहावेत. तुम्हाला पूर्ण खात्री असेल की हे सामने फिक्सड आहेत तर पाहू नयेत. पाहिलेत तरी ते फिक्स आहेत ते फिक्स आहेत असे पुराव्यांशिवाय गळा काढून ओरडून आमच्या सारख्या क्रिकेटवर नितांत श्रद्धा असलेल्या प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पाडू नये ही विनंती.

**** विश्वच्षकावरील अवांतर पोस्टीबद्द्ल क्षमस्व ************************************

विश्वच्षकावरील अवांतर पोस्टीबद्द्ल क्षमस्व
--- छे आवांतर कसली... मॅच किंवा स्पॉट फिक्स हे या विश्वचषकाचा अविभाज्य भाग आहे :स्मित:.

अजहर सुरवातीची काही वर्षे किती सुंदर खेळायचा. त्याची फलंदाजी, नेत्रदिपक असे क्षेत्ररक्षण, चेंडू यष्टी रक्षका कडे पळत असतांना फेकायची लकब सर्वच काही कौतुकास्पद... पण नंतर रसाताळाला गेला. हॅन्सी क्रोनिये सारखी क्रिकेट मधली अत्यंत प्रामाणिक व्यक्ती पण यामधे गुरफटली गेली होती. शेवटी या खेळात कुणीच जंटलमन नाही. प्रत्येक सामना, त्यातील छोट्या-छोट्या खेळी तपासायला हवी तर मग खरा आनंद मिळतो.

i think south africa will b the winner.. Chances of winning India is very dim. All hype by media.

Final may b in S.A vs Pakistan OR S.A vs srilanka OR S.A vs. Australia.

पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाल्यामुळे आता मानसिक डावपेच सुरू झालेत. वसिम अक्रम म्हणतो, पाकिस्तानला बाद फेरीत भारतात खेळावे लागणार नाही अशा तर्‍हेने त्यानी उर्वरीत सामने खेळले पाहिजेत. [कारण इथं त्याना प्रेक्षकांचा पाठींबा नाहीच पण रोषच मिळेल]. इम्रान खान वदलेत कीं भारताची फलंदाजी चांगली असली तरी गोलंदाजी गचाळ आहे, तेंव्हा त्यांचं कांही खरं नाही.
पण कुणीतरी या बाहेर देशच्या लोकाना सांगायला नको का, कीं आम्हीच आमच्या संघाचं खच्चीकरण करायला पूर्ण समर्थ आहोत व त्यात कार्यमग्नही आहोत; कशाला तुम्ही ही तसदी घेताय !! Wink

त्यामुळे तुम्ही हा मॅच फिक्सींगचा चष्मा काढून उर्वरीत सामने पहावेत. तुम्हाला पूर्ण खात्री असेल की हे सामने फिक्सड आहेत तर पाहू नयेत. पाहिलेत तरी ते फिक्स आहेत ते फिक्स आहेत असे पुराव्यांशिवाय गळा काढून ओरडून आमच्या सारख्या क्रिकेटवर नितांत श्रद्धा असलेल्या प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पाडू नये ही विनंती >>> पुन्हा एकदा, प्रविणपा यांच्याही पोस्टीला जोरदार अनुमोदन. Happy

पण कुणीतरी या बाहेर देशच्या लोकाना सांगायला नको का, कीं आम्हीच आमच्या संघाचं खच्चीकरण करायला पूर्ण समर्थ आहोत व त्यात कार्यमग्नही आहोत; कशाला तुम्ही ही तसदी घेताय !! >>
खरंय भाऊ, आत्ताशी २नच मॅच झाल्यात भारताच्या आणि ईतका उहापोह आहे या माध्यमांचा. विंडीज, सा.आ. होऊ देत मग घाला किती घालायच्यात तेव्हड्या शिव्या...(असही पैसा व प्रसिध्दी हवी असली कि हे लोक तर शक्यतो भारतीय टीम वा एखादा प्लेअर, खासकरुन सचिन ला टारगेट करतात)

चा-मारी मॅचपेक्षा अ‍ॅनॅलिसिसच जास्त Happy

आज बांग्लादेश विरुध्द वेस्ट इंडीज यांच्यातील सामना रंगेल असे वाटते. बांगलादेश विजय मिळवू शकतो

अमोल
--------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

प्रविणपा, मस्त पोस्ट!!! अनुमोदन.
पण त्याचबरोबर तुम्ही 'आ बैल मुझे मार' केले आहे हे ही लक्षात असू द्या Proud
आधी या धाग्यावर फक्त क्रिकेटचेच तज्ञ असायचे, आता फिक्सिंग कसे असते, समालोचन कसे करावे यांचेही गुरु आले आहेत, मजा आहे!!!

<<पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाल्यामुळे>>

भाऊ, उपांत्य की उपांत्यपूर्व?
सध्या त्यांनी त्यांच्या गटात कोणते स्थान मिळवावे म्हणजे भारतात बाद फेरीचा पहिला सामना खेळावा लागणार नाही याचे प्लानिंग सुरू आहे.

त्यामुळे तुम्ही हा मॅच फिक्सींगचा चष्मा काढून उर्वरीत सामने पहावेत. तुम्हाला पूर्ण खात्री असेल की हे सामने फिक्सड आहेत तर पाहू नयेत. पाहिलेत तरी ते फिक्स आहेत ते फिक्स आहेत असे पुराव्यांशिवाय गळा काढून ओरडून आमच्या सारख्या क्रिकेटवर नितांत श्रद्धा असलेल्या प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण पाडू नये ही विनंती >>> पुन्हा एकदा, प्रविणपा यांच्याही पोस्टीला जोरदार अनुमोदन.

<< भाऊ, उपांत्य की उपांत्यपूर्व? >> उपांत्यपूर्व ! मयेकरानुं, नजरचुकीबद्दल क्षमस्व. [ पाक उपांत्य फेरीत आलेच तर मी पाकच्या बाजूने फिक्सींगमधे सामील होतो, असा गैरसमज कृपया कुणीही करून घेऊ नये/पसरवू नये; माझ्या आय.टी. रिटर्नमधे मी माझी आर्थिक स्थिती [दुरावस्था !] स्पष्टपणे दाखवतो व तीचा आलेख सतत कांहीसा खालीच वळतो आहे !] . Wink

न्यूझीलंड झिम्बाब्वे मॅच मधे एका प्रेक्षकाची प्रतिक्रिया...

Bharathram: "I think the lunch is not yet ready at the Stadium's restaurant. NZ are waiting for the signal from the chef to finish the innings off."

आयला, वेस्ट इंडिजची बॉलिंग पण आपल्या पेक्षा चांगली! बांगलादेश ४८/५ १२ ओव्हर्स! मोअर काँपिटिशन फोक्स!

आम्ही सध्या वेगवेगळे प्रयोग करत आहोत जसे की आपल्या मॅच साठी बॅटींग विकेट ठेवणे. टेस्ट बाय फायर.

नॉक आउट साठी पुर्ण वेगळी स्ट्रॅटेजी असेल. जशी ऑस्ट्रेलिया बरोबर च्या फ्रेंडली मॅच मधे होती तशी. त्यामुळे घाबरायचे काहीही कारण नाही.

विक्रम्...वा वा..काय श्रद्धा आहे तुमची आपल्या टीमवर! छान वाटले बघून Happy
बांगला- ५८/१०

बदलले.

Pages