भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
अशा वेळी निदान विरू ने
अशा वेळी निदान विरू ने गोलंदाजी करायला हवीच होती. ते एक गूढ कायम आहेच! >> योग त्याचा खांदा दुखावला आहे त्यामुळे त्याने तो सध्या गोलंदाजी करणार नाहि हे सांगितलेय रे.
http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/story/50366...
"Biswal also said Sehwag had "a niggle in his shoulder" that was preventing him from bowling his offbreaks in the matches. "
मागे वार्न ने जाडेजा येत्या २-३ वर्षांमधे best all rounder होईल असेही tweet केले होते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हा सामना फिक्स नसावा. पण
हा सामना फिक्स नसावा. पण बर्याचशा गोष्टी संशयास्पद होत्या हे नक्की. तसेच धोनीची कप्तानकी फारशी चांगली नाही हे देखील दिसून आले. गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात अजिबात सुधारणा झालेली नाही हे देखील दिसून आले. गेल्या वर्षी श्रीलंकेविरूध्द ४१४ धावा करून सुध्दा श्रीलंकेने आपले डोळे पांढरे केले होते (श्रीलंका पाठलाग करताना ५० षटकांत ४११). आफ्रिकेविरूध्द ४५० धावा सुध्दा पुर्या पडतील की नाही खुदा जाने!
असो. आजच्या केनयाविरुध्द च्या सामन्यात मलिंगाने केवळ ५ चेंडूत ४ बळी घेतले (त्यात हॅटट्रिक सुध्दा आहे) व ६ बाद १३७ वरून सर्वबाद १४२ अशी वाईट अवस्था केली. २००७ मध्ये मलिंगानेच आफ्रिका ५ बाद २०५ असताना व जिंकायला त्यांना केवळ ५ धावा करायच्या असताना लागोपाठच्या ४ चेंडूत ४ बळी घेऊन त्यांची ९ बाद २०७ अशी दारूण अवस्था केली होती.
केनया प्रत्येक सामन्यात प्रगती करत आहे. पहिल्या सामन्यात सर्वबाद ६९, दुसर्यात सर्वबाद ११२ आणि आज सर्वबाद १४२. त्यांच्या शेवटच्या सामन्यात ते नक्की २०० चा आकडा पार करतील.
>>त्यांच्या शेवटच्या सामन्यात
>>त्यांच्या शेवटच्या सामन्यात ते नक्की २०० चा आकडा पार करतील
अर्थातच तो सामना भारताविरुध्ध असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे मलिंगा ने पण केली का हॅट ट्रिक? छान! आता हॅट ट्रिक स्पर्धा चालू झाली आहे काय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने: काल रोच आणि आज लिंगा, दोन्ही बाबतीत कमकुवत संघ विरुध्ध संघ आहेत- हे पण फिक्स्ड आहे काय? जिंकणार नाही तर निदान बक्कळ पैसे कमवून घ्यावेत
असाम्या,
तसे आहे तर मग विरू खेळतोय तरी कशाला ? बात हजम नही हुवी..
>>मागे वार्न ने जाडेजा येत्या २-३ वर्षांमधे best all rounder होईल असेही tweet केले होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो पण त्यात "फिक्स्ड" करण्या सारखे काही नव्हते
खरे खोटे देवालाच माहित, पण
खरे खोटे देवालाच माहित, पण धोनीचे fielding side बद्दलचा cricinfo वरचा comment नि वयाबद्दलची comment वेगळी आहे. तसेच कोणी तरी धोनी इतरांना consult का करत नाहि असे विचारले आहे त्याचे उत्तर पण त्याने दिलय.
http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/current/sto...
"Maybe if we would have fielded slighted better, we would have won the game by one run because you realise in these games the importance of one run," Dhoni said. "I don't think we can improve the fielding very much because we have got quite a few slow fielders in the side. "
"If you are not 100% sure of something, you have got experienced players in the side whom you can always approach because at the end of the day the motivation is to take the best decision at the right time. That's what I was interacting with him since he was close to me."
हा नवीन विषय घ्या
हा नवीन विषय घ्या चघळायला
http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/england/9409472.stm
तसे आहे तर मग विरू खेळतोय तरी
तसे आहे तर मग विरू खेळतोय तरी कशाला ? बात हजम नही हुवी.. >> कदाचित नसेल खेळणार पुढच्या सामन्यांमधे, माझ्या आठवणींप्रमाणे सेहवाग ने शेवटची balling केलेली Asia Cup (June) मधे., तिथेही final चा आधी तो injured झाला. तेंव्हापासून तो balling करत नाहिये, apparently he can bat, which is possible.
आपली फील्डिंग चांगली होत नाही
आपली फील्डिंग चांगली होत नाही असे धोनी म्हणाला तर त्यात चूक काय?
नासीर हुसेनने कॉमेंट्रीत इंडियन फील्डर्स आर ओल्ड असे म्हटले होते आणि दादाला तिथे अनुमोदन द्यावे लागले होते. एकेरी धावा वाचवायचा प्रयत्न अजिबात होत नव्हता.
स्ट्रॉसच्या खेळीने धोनीचे डोके (असल्यास ) बधीर झाले होते .
हे इंडियन एक्स्प्रेस मधून.The Indian huddle was pretty noisy during the final moments of Sunday’s India vs England tied game. Excited voices suggested ideas to a surpringly stunned-looking Mahendra Singh Dhoni as England finally showed signs of faltering during what had so far seemed a perfectly-planned chase. The 43rd over of the England innings, in which Zaheer Khan dismissed Ian Bell (69) and Andrew Strauss (158), didn’t just give India a window of opportunity but also raised the decibel level in the huddle.
The subsequent seven overs were to show two things: Team India works on the combined wisdom of the seniors in the squad and, contrary to the general perception, Dhoni isn’t quite an instinctive leader. Several times during that exhilarating period of play, Dhoni changed his decision if he came across an interesting suggestion.
After Zaheer’s double strike in the first over of the powerplay, Dhoni weighed his options. With the part-timers Yuvraj Singh (7) and Yusuf Pathan (3) collectively completing their quota, the skipper had to pick the right specialist for the ‘death overs’ job. It is learnt that Dhoni wanted pacer Munaf Patel to bowl the 44th over but Virender Sehwag was of the opinion that leg-spinner Piyush Chawla suited the situation better. With Chawla conceding just 2 runs, Sehwag was vindicated and India had gradually got the grip on the game.
पण शेवटच्या २ षटकात घोळ झाला. इंग्लंडचे शेपूट इतके फटके देईल असे वाटले नव्हते.
Spot-fixing? Oz-Zimbabwe World Cup match under ICC scanner
http://www.indianexpress.com/news/spotfixing-ozzimbabwe-world-cup-match-...
<< हा नवीन विषय घ्या चघळायला
<< हा नवीन विषय घ्या चघळायला >> ऑलीव्हर ब्रेटने सचिन व स्ट्रॉसच्या डावांची तुलना करताना दोन मूलभूत गोष्टींचा उल्लेख करणं अत्यावश्यक होतं - १] स्ट्रॉसला ३३८ धावांचा पाठलाग करायचा होता, सचिनला डाव उभारायचा होता; त्यामुळे स्ट्रॉस किमान ६ची सरासरी प्रथमपासून ठेवत होता; २] जर एक फलंदाज आक्रमक खेळून धावसंख्या वाढवत असेल तर दुसर्याने त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे क्रमप्राप्त; सेहवाग सुरवातीपासून आक्रमकच असतो,त्यामुळे सचिनचा सुरवातीचा खेळ संथ वाटणारच. ८०च्या आसपास त्याचा स्ट्राईक रेट १०० झाला होता.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
"चघळण्याचा" उद्देश एव्हढाच कीं केवळ गोर्यानी लिहीलंय म्हणून तें ब्रह्मवाक्य समजून स्वीकारायचं नाही !
हे वाचा(च)....थोडं फिल गुड
हे वाचा(च)....थोडं फिल गुड आर्टीकल.....
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/501138.html
भाउ, त्याने म्हणलच आहे की
भाउ, त्याने म्हणलच आहे की सचिन ची इनिंग जस्त चांगली होती..
Statistically, the Strauss innings was superior to Tendulkar's, both in terms of runs scored (158 to 120) and strike rate (108.96 runs per 100 balls to 104.34).
In truth however, it would be curmudgeonly to say the England captain produced the better innings. In keeping with the result of the match, let's call it a tie.
<< भाउ, त्याने म्हणलच आहे की
<< भाउ, त्याने म्हणलच आहे की सचिन ची इनिंग जस्त चांगली होती..>> षड्जपंचमजी, त्याने सचिनची इनिंग कमी/जास्त चांगली होती असं म्हटलंय हा माझा मुद्दा नव्हताच. जर एकाने सुरवातीला संथ खेळी केली म्हणत असाल तर त्याच "ऑब्व्हीअस" कारणही दोघांच्या इनिंग्जची तुलना करण्यासाठी लिहीलेल्या खास लेखात देणं अत्यावश्यक आहे, हा मुद्दा होता. तसं, "वॅगन व्हील" दाखवून व आंकडेवारी देऊन मी देखील पानं भरूं शकेन कीं !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
[रच्याकने, त्याने सचिनची इनिंग जास्त चांगली होती असं नाही म्हटलंय; "let's call it a tie." म्हटलंय. पण खरंच तो माझा मुद्दा नव्हताच ].
संघाच्या वाढत्या वयाबद्दल
संघाच्या वाढत्या वयाबद्दल धोनीच्या वक्तव्याने भारताला विश्वचषक जिंकण्याच्या आशेला चांगलाच धक्का बसतो. असले बेताल वक्तव्य निदान स्पर्धा सुरु असतांना कर्णधाराने करायला नको.
स्पॉट फिक्स बद्दलच्या योग यांच्या मताशी सहमत.
मजेशीर...http://www.espncrici
मजेशीर...http://www.espncricinfo.com/page2/content/story/503659.html
<< असले बेताल वक्तव्य निदान
<< असले बेताल वक्तव्य निदान स्पर्धा सुरु असतांना कर्णधाराने करायला नको. >>
भाऊ ...
भाऊ ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाऊ, जबरीच!
भाऊ, जबरीच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयर्लंड विरुद्ध इंग्लंड त्याच
आयर्लंड विरुद्ध इंग्लंड त्याच मैदानावर ५० ओव्हरीत फक्त ३२७ धावा करू शकला. त्यातही शेवटच्या ओव्हरीत फक्त ९ धावा! बोला, कसा जिंकणार भारत?
<< आयर्लंड विरुद्ध इंग्लंड
<< आयर्लंड विरुद्ध इंग्लंड त्याच मैदानावर ५० ओव्हरीत फक्त ३२७ धावा करू शकला >> एकाच मैदानावर अगदी तेच संघसुद्धा वेगळ्या दिवशीं खेळले, तरी ५० षटकांच्या सामन्यात धावफलकात अविश्वसनीय तफावत होऊं शकते. मला वाटतं हा निकष लावून " कसा जिंकणार भारत?" हा प्रश्न विचारणं उचित नाही , विशेषतः हा प्रश्न विचारायला आपली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, व्यूहरचना इ.इ. इतर अनेक औचित्यपूर्ण निकष सहज उपलब्ध असताना !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भारतात एकदिवसीय सामन्यांसाठी
भारतात एकदिवसीय सामन्यांसाठी एकुण ३३-३४ मैदाने असुनही ७-८ ठीकाणीच का सामने खेळवत आहेत? मागच्या विश्वचषकाच्यावेळी बर्याच ठीकाणी सामने झाले होते.
जिथे पैसा बक्कळ, तिथे करावा
जिथे पैसा बक्कळ, तिथे करावा खेळ
फुकट न घालवणे काळ, इतर ठिकाणी
विनायक, एकदा पंचांशिवाय खेळ
विनायक, एकदा पंचांशिवाय खेळ यशस्वी झाला तर हळू हळू समालोचनकारांना नि नंतर खेळाबद्दल रकाने च्या रकाने लिहिणार्या समीक्षकांना हि हाकलून द्या.
आमच्या गल्ली क्रिकेटमधे पंच नाही, समालोचनकार नाहीत, त्याबद्दल कधी कुणि लिहीले नाही, तरी अतिशय जास्त मजा यायची खेळायला (आणि हो, पैसे पण मिळाले नाहीत खेळण्याबद्दल, जिंकलो म्हणून फेरारी, आवडी सोडा, साधी जुनी सायकल सुद्धा मिळाली नाही!)
पण निखळ आनंद! कधी शाळा सुटते नि खेळायला जातो असे व्हायचे.
आजकाल म्हणे कुणाला संघात घ्यायचे कुणाला नाही यावरून कप्तानाला डोकेदुखी होते! आमच्या वेळी कसे सगळे उघड होते, ज्यांच्याजवळ बॅट, चेंडू, स्टंप, इ. असेल तेच खेळणार, बाकीचे नाही, साधा निकष. कुठे स्टॅटिस्टिक्स नाही, पिच कसेहि असले तरी तेच ठरलेले गोलंदाज.
आजकाल काय, ११ जण ख्ळणार नि ११ कोटी लोक उगाचच कामधंदे सोडून वेळ वाया घालवणार!
जिथे प्रेक्षक बसण्याची
जिथे प्रेक्षक बसण्याची कपॅसिटि बक्कळ, तिथे लावावा खेळ
न करावा खेळ, इतर ठिकाणी
फक्त ११ कोटी? झक्की,
फक्त ११ कोटी? झक्की, अमेरिकेतल्या ब्लडी इंडियन लोकांबद्दल बोलताय काय?
ललित मोदी ने देखिल टाय होणार
ललित मोदी ने देखिल टाय होणार असे म्हणले होते -- Incidentally, Warne has led Rajasthan Royals — the team in which Modi is accused to have stakes — in all seasons of the IPL.
अनेक कारणे.
१. शेन वोर्न ट्विट
२. ललित मोदी ट्विट
३. युसुफ पठाण च्या एवजी धोनी आला.
४. विकेट पडत नसतानाहि यसुफ पठाणला गोलंदाजी दिली नाहि
५.शेवटच्या चेंडुवर ४/६ मारण्याचा प्रयत्न केला नाहि शिवाय दुसरी रन हि काढण्याचा प्रयत्न केला नाहि
६. स्ट्रोस १३ व १११ वर दोनदा आउट होता
७. झहीर खानने ४२ व्या ओव्हरपुर्वी एकहि योर्कर टाकला नाहि. पहिल्या योर्कर ४२व्या ओव्हर मधे ज्यावर स्ट्रोस आउट झाला.
८. पहिल्या ओव्हर मधे सेहवागचा आउट होण्याचा ३ वेळा प्रयत्न.
९. पियुश चावलाला ४९वी ओव्हर दिली जो पहिलीच आतरराष्ट्रिय मैच खेलत होता.
१०. हरभजनने स्ट्रोस चा सोपा झेल सोडला.
११. सचिन मैदानाबाहेर गेला.
<< पण निखळ आनंद! >> झक्कीजी,
<< पण निखळ आनंद! >> झक्कीजी, काय नेमकं मर्मावर बोट ठेवलंय तुम्ही ! ज्या मुलांची उंचीसुद्धा बॅटएवढी नाही, त्याना क्रिकेटचा पेहराव चढवून कोचींगसाठी नेटवर नेणारे आताचे महत्वाकांक्षी पालक दिसले कीं त्या मुलाना क्रिकेटचा " निखळ आनंद " कसा काय कळणार असाच प्रश्न पडतो !
८. पहिल्या ओव्हर मधे सेहवागचा
८. पहिल्या ओव्हर मधे सेहवागचा आउट होण्याचा ३ वेळा प्रयत्न.>>> अक्षरशः सहमत आहे.
अरे काय चाललय काय? आयर्लंड ईं
अरे काय चाललय काय?
आयर्लंड ईं चा सामना परवाच्या भारत वि. ईं च्या रोखाने चाललाय...? केविन ओब्रायन ने एकाहाती निव्वळ कत्तम केलीये ईं. ची... ४३ चेंडू ८३ आणि खेळतोय...
महान! भन्नाट! इतकी आक्रमक फलंदाजी मी तरी अलिकडे पाहिलेली नाही...
तेच ग्राऊंड, तेच पिच, ..... बेंगालुरू ला पहिले फलंदाजी करणार्या संघाने गाफिल राहू नये..
रविवारी भारतावि. आयर्लंड आहे... ई. च्या गोलंदाजांच्या चिंधड्या ऊडवल्या आहेत.. आपल्या गोलंदाजांनी नक्कीच घाबरायला हवय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शांत डोक्याने ऊर्वरीत सामना खेळले तर जिंकू शकतील..
(हा सामना पण फिक्स्ड आहे का? टाय होईल का?):०
----------------------------------------------------------------------------
बांगाला वि. देखिल आयर्लंड जिंकायला हवे होते पण उगाच सामना घालवला.. शिवाय बां च्या प्रेक्षकांनी खूप जल्लोश करून दबाव आणला होता...
पुन्हा सर्व तेच चालू आहे....
पुन्हा सर्व तेच चालू आहे.... आयर्लंड आरामात एक दोन धावा शकतय...... ई. त्या ओब्रायन ला अगदी सहज्/फालतू गोलंदाजी करतय... ५९ धावा ५७ चेंडूत हव्या आहेत..
ओब्रायन ४९ चेंडूत १००- हेडन चा फास्टेट हंड्रेड चा विक्रम मोडलाय....
too much of coincidence??
आपल्या सामन्या प्रमाणेच पुढील षटकात काही चमत्कार होणार का का आयर्लंड जिंकणार? ओब्रायन ज्या प्रकारे खेळला, आयर्लंड जिंकायलाच हवाय... go ires go..
केविन ओब्रायन ला मानल. ५० बॉल
केविन ओब्रायन ला मानल. ५० बॉल मधे १००, विश्वचषकमधील रेकॉर्ड. सामना एकहाती फिरवणे यालाच म्हणतात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयर्लंड ने इंग्लड्ला फेस
आयर्लंड ने इंग्लड्ला फेस आणलाय...
रच्याकने, हि पण मॅच फिक्स असण्याला वाव आहे, इंग्लंड चे गचाळ क्षेत्ररक्षण, हातात्ले झेल सोडने,
Pages