भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011
तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/
सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.
सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.
सचिन चे शतक. मला साइट लोड होई
सचिन चे शतक. मला साइट लोड होई परेन्त धीर धरवेना
टीवी समोर नाच केला ढिन्चॅक. ढिंचॅक.
गो साहेब गो.
मामी, बघा गो गो म्हणलात अन
मामी, बघा गो गो म्हणलात अन साहेब गेले...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामींना ईथे यायला बंदी करायला हवी
पैसा वसूल बॅटींग चालू आहे
पैसा वसूल बॅटींग चालू आहे राव..
(एक निरीक्षणः चेंडू थोडासा मुद्दामून हळू टाकला: taking pace off the ball, तर फलंदाजाला थोडं अवघड जातय- आपले गोलंदाज लक्ष ठेवून असतीलच!)
युवी गेला.. फॉर्मात आला गडी, आपले डावपेच यशस्वी!!
आता पठाण आणि धोणी मिळूण ऊर्वरीत ४ षटकात ५० मारतील काय?
------------------------------------------------------------------------------
आपले गोलंदाज किती धावसंखेत ईं. ला रोखतात एव्हडेच पहायचे. भारताने हा सामना किमान ५०+ च्या फरकाने जिंकायला हवा.
छ्या काय हे. सचिन - युवी
छ्या काय हे.
सचिन - युवी गेल्यावर लाइन लागली आत परत जायला !! नाहीतर शेवटी २-३ ओवर्स मधे अजून २५-३० जोडता आले असते ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
खरचं शेपटाने कारण नसताना अती
खरचं शेपटाने कारण नसताना अती वळवळ केली. पण सुरवातीची इंग्लंडची विकेट टू विकेट बॉलिंग लक्षात घेता हा स्कोर चांगला आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साहेबांचं ४७व्या शतकाबद्दल अभिनंदन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कम्मॉन इंडीया!
<<अरे भल्या माणसा, तुझ्या
<<अरे भल्या माणसा, तुझ्या पोतड्यांभर अनुभवातून , तुला शक्य असेल तर, आम्हाला कांहीतरी निश्चित डावपेच किंवा भाकित सांग ना आजच्या सामन्याबद्दल >> हे सगळं मीडिया नवाच्या भस्मासुराला खाद्य म्हणून असतं. धोनी स्वतःचं आणि त्याच्या थिंक टँकचं डोकं वापरणार की वेगवेगळ्या महानुभवांनी दिलेले सल्ले वाचून /ऐकून ठरवणार?
दादाची कॉमेंट्री आवडली आपल्याला.
शास्त्रीबुवांचं खेळात पूर्ण लक्ष नाही. पहिला चौकार विसरले? जरा कमी बोलले तर चालेल की!
भाऊ.. गांगुलीची कॉमेंट्री
भाऊ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गांगुलीची कॉमेंट्री चांगली होती... सगळ्यात इरिटेटींग होतं ते कोणीही ६ मारल्यावर बाजूला येणारा Total no of sixes in tournament चा काऊंटर... अरे who cares ??? सचिनचे सिक्स बघा आणि खुष व्हा ना.. कशाला हवेत एकून सिक्स किती ते !!!
मै, पन्ना ठिके पण ३४० नॉट बॅड..
इंग्लंडच्या दोन हुकमी
इंग्लंडच्या दोन हुकमी गोलंदाजांवर आज साहेब व इतरानी ठरवून हल्ला चढवला . अँडरसन ९.५ शटकात ९१ धावा !स्वानवर तर साहेब सुरवातीलाच तुटून पडले. आजच्या खेळात [ फलंदाजीत] भारताची योजनाबद्धता जाणवली. तशीच गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात असेल तर काळजीचं कारणच नाही. चषक जिंकण्याच्या आशा पल्लवित होताहेत !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मुन्नाचा कॅच ऑफ द मॅच
मुन्नाचा कॅच ऑफ द मॅच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चावलाला त्याच्या तिसर्या
चावलाला त्याच्या तिसर्या षटकानंतर आता लय सांपडली. इंग्लंडची दूसरी विकेट त्याच्या नांवावर.
सामना रंगतदार होणार अशी चिंन्ह !
अरे, त्या स्ट्रॉसला घ्यारे
अरे, त्या स्ट्रॉसला घ्यारे कुणीतरी आऊट लवकर !
Eng १६३/३ drama and
Eng १६३/३
drama and again-
163 / 2
आज अवघड दिसतेय...
आज अवघड दिसतेय...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
साहेबांना बॉलिंग देऊन बघावी
साहेबांना बॉलिंग देऊन बघावी धोणीने.. तेवढ्यासाठी मैदानात नक्की येतील ते......
one magic ball.........
Eng मस्त खेळतय Bell gone,
Eng मस्त खेळतय![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Bell gone, not sure if it's good thing or bad. He was cramping so may have helped to have him around preventing sharp singles ?
पॉवर प्ले ची कमाल?? आता तरी
पॉवर प्ले ची कमाल??
आता तरी गळती लागेल अशी आशा!!!!
मॅच रंगत्ये बोल्ड
मॅच रंगत्ये बोल्ड
Bell gone, not sure if it's
Bell gone, not sure if it's good thing or bad. >> turned out to be good thing, हुश्श !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लास्ट ओव्हर कोण ताकणार ??
लास्ट ओव्हर कोण ताकणार ??
मुनाफ पटेलने फुल लेन्ग्थ
मुनाफ पटेलने फुल लेन्ग्थ डिलिव्हरी का टाकली त्या शहजादला? सिक्स मारली त्याने.. फुकटात हातातली मॅच गेली..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
टाय! आता?
टाय!
आता?
टाय.. :(
टाय..
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
चावलाची ४९वी ओव्हर घातक ठरली
चावलाची ४९वी ओव्हर घातक ठरली ! १२ चेंडूत ३० वरून सामना न जिंकता येणं अशोभनीय. शेवटच्या दोन ओव्हर हरभजन व झहीरऐवजी मुनाफ व चावला ? इथंच गोची झाली असावी .
पण रंगतदार सामना हे नक्कीच. धोनीचं टेंपरॅमेंट कौतुकास्पद. स्ट्रॉसला मानलं. कॉलींगवूडसारख्या अनुभवी फलंदाजाने अवसानघातकी खेळ करणं इंग्लंडला महागात पडलं. झहीर व भज्जी हे आपले दोनच गोलंदाज जागतिक दर्जाचे, हेही सिद्ध झालं. निकाल दोनही संघांसाठी न्याय्य !
त्यांच्या ८ विकेटस गेल्यात
त्यांच्या ८ विकेटस गेल्यात आपले सर्व गडी बाद झालेत. मॅच टाय झाली आहे हा अंतिम निकाल आहे ?
मुनाफची शोर्ट रन, शेवटचा
मुनाफची शोर्ट रन, शेवटचा चेंडू न खेळणे, आणि शहझादला टाकलेला बट्टा मारण्यासारखा चेंडू महागात पडला. त्यांच्या anderson ने टाकलेला नो बोल आणि चौकार त्यांना महागात पडला.
दोन्ही टीमसाठी जिंकण्यासारख्या स्थितीतून हरणे अशोभनियच. म्हणून निकाला तसा न्याय करणारा आणि आपल्या मर्यादा उघड्या पडणारा.
दर वेळेस ३४०-३५० रन काढणे शक्य नाही आणि समोर चांगली फलंदाजी असेल तर दर वेळेस टाय हि शक्य नाही. एक फलंदाज काढून गोलंदाज खेळवावा तर कोणी पर्याय देखील नाही. हा कप कोण जिंकेल सांगणे कठीण आहे, पण आपण नक्कीच एक दोन घरे खाली आलो आहोत फेवरीट संघ म्हणून.
झहीर व भज्जी हे आपले दोनच
झहीर व भज्जी हे आपले दोनच गोलंदाज जागतिक दर्जाचे, >> भज्जी विकेट कुठे काढतोय ???
माझ्यामते भारतीय फलंदाजांनी पॉवर प्ले फुकट घालवले तिकडेच कमी पडलो... वीस धावा आणखीन हव्या होत्या त्यावेळी.. ३७० चे लक्ष्य साधले असते तरच आरामात जिंकणार होतो.. असो हार नाही तर टाय सही !
विश्वविजेते बनायचे असेल तर भारतीय संघाला बरीच मेहनत घ्यावी लागेल
<< एक फलंदाज काढून गोलंदाज
<< एक फलंदाज काढून गोलंदाज खेळवावा तर कोणी पर्याय देखील नाही.>> चावलाला सुरवातीच्या सत्रात चेंडूला उंची द्यायला प्रोत्साहन देणें व दुसर्या सत्रात, आजच्यासारखी गरज भासल्यास, लेगस्टंपच्या बाहेरून [उजव्या हाताच्या फलंदाजाना] चेंडू आंत आणण्याचा डावपेंच अवलंबण्यास सांगणे हा पर्यायच शिल्लक रहतो असं मला वाटतं; हा डावपेंच "नीगेटीव्ह टॅक्टीक"मधे मोडत असला तरीही नियमबाह्य नाही व शेन वॉर्न सारख्यानीही सचिनला रोखण्यसाठी त्याचा अवलंब केला होता. थोडक्यात "ऑप्टीमम युटिलायझेशन ऑफ अॅव्हेलेबल रिसोर्सेस " हाच पर्याय [अर्थात, अनुभवानिष्ठीत अधिकार नसलेल्या मला सुचलेला ! ].
त्यांच्या ८ विकेटस गेल्यात
त्यांच्या ८ विकेटस गेल्यात आपले सर्व गडी बाद झालेत. मॅच टाय झाली आहे हा अंतिम निकाल आहे ? >> मला पण हेच वाटले. पुर्वी ज्या संघाच्या कमी विकेट्स तो विजेता असा नियम होता का? मला होता असं वाटतंय... किंवा असायला तरी हवा.
चावलाला दोन्ही षटकार लेग
चावलाला दोन्ही षटकार लेग स्टंप बाहेरून गोलंदाजी टाकतानाच मारले आणि विकेट जेव्हा ऑफ स्टंप वरून टाकला तेव्हा मिळाली. चावला दुसर्या ओव्हर पासून मात्र चांगली गोलंदाजी करत होता. त्यामुळे त्याला खेळवावा आणि उंची ही देऊ दयावी.
भज्जी विकेट टेकर गोलंदाज अजिबात वाटत नाही पण सध्या पर्याय नाही म्हणून चालू दे.
गंभीर किंवा युवराज ऐवजी अश्विन ला चेंज म्हणून खेळवावे का? आपली फलंदाजी नाहीतरी सर्वांचा उपयोग न करता ३०० च्या पुढे धावा करू शकते.
त्यांच्या ८ विकेटस गेल्यात
त्यांच्या ८ विकेटस गेल्यात आपले सर्व गडी बाद झालेत. >>> मलाही तसेच वाटले होते, आपण हरतो की काय म्हणून. असो . पण आता द अफ्रिकेला हरवायलाच हवे आपण , पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने! शेवटी पॉइन्ट्स टॅलीवर दोन सारखे गुण असलेले संघ असतील तेव्हा हे सगळे नडते
Pages