Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13
हा धागा खास लोकाग्रहास्तव
भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही अगदी दहीभेळसुद्धा
रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............
पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही
चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही....
चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक
हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा...
चटक मटक खाणार्या सर्व भेळकरांना अर्पण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पण भेळ, चाट आणि आंबट शौकीन
मी पण भेळ, चाट आणि आंबट शौकीन .
सगळे ऑलरेडी फॅन असतातच की
सगळे ऑलरेडी फॅन असतातच की ह्या पदार्थांचे. यम्मी........
मी पण... आईस पानीपुरी..
मी पण...
आईस पानीपुरी.. अहाहा, इमॅजिन करुनच तोंडाला पाणी सुटलं.
समोसा चाट, आईस पानीपुरी- प्रभादेवीला सिद्धीविनायक मंदिराच्या शेजारीच एक दुकान आहे तिथे झक्कास मिळतात हे आयटम्स.
मुलुंड चेकनाक्याला एक दुकान आहे, नाव लक्षात नाही आता. तिथेही मस्त मिळतं चाट.
पुण्यात सध्या गणेश भेळ गाजत
पुण्यात सध्या गणेश भेळ गाजत असली तरीही पुर्वी नळस्टॉपपाशी एक माणूस गाडी लावायचा. १९७५ ते १९८० या दरम्यानची बाब आहे ही! तो इतका काळकुट्ट होता की काही जण त्याला ब्लॅक मॅन म्हणायचे.
साठ पैशाला भेळ!
पण तुम्हाला सांगतो लाजो... . काय भेळ असायची ती! अक्षरशः भेळेची व्याख्या होती ती व्याख्या! भेळ असावी तर अशी!
भेळेत जे हिरवे तिखट घालतात ते वेगळे मागून घ्यायचे, म्हणजे मिक्स करू द्यायचे नाही त्याला. आणि साधारण चार घासांनंतरच्या घासाबरोबर ते थोडेसे खायचे. अप्रतिम!
मी तर तिखट विकतच घेतो ते अनेकदा! 'शेपरेट'!
धन्यवाद!
धागा आवडला.
- 'बेफिकीर'!
त्या माणसाच्या गाडीचे नांव
त्या माणसाच्या गाडीचे नांव होते संगीता भेळ!
दादर शिवाजी पार्क च्या गटगला
दादर शिवाजी पार्क च्या गटगला मी आणि मधुरा हमखास फ्रँकी खातो...
सध्या डहाणुकर कॉलनीत एक गाळा
सध्या डहाणुकर कॉलनीत एक गाळा आहे साधा गाळा! नाव पुन्हा पाहून लिहीन!
पण तेथे यु पी आणि राजस्थान स्टाईलचे पदार्थ मिळतात.
समोसा चाट
छोले समोसे
आलू टिक्की
लय जबरी प्रकार देतात ते करून! आणि विविध पराठेही!
डाबेली हा प्रकार मात्र
डाबेली हा प्रकार मात्र तितकासा आवडू शकलाच नाही.
का कुणास ठाऊक?
पण कर्वे रोड आणि प्रभात रोड यांना जोडणारा जो कॅनॉल रोड आहे तिथली पापु झक्कास!
पापु मधे उकडलेला बटाटा आणि
पापु मधे उकडलेला बटाटा आणि भिजवलेले मूग असं स्टफिंग सगळ्यात बेष्ट. रगडा, भिजवलेली बुंदी इत्यादी लोक सगळी मजा घालवतात.
बादवे.. पार्ला वेस्टला स्वामी विवेकानंद रोडवर इर्ल्याचा बसस्टॉप आहे दादरकडे जाणार्या बाजूचा. त्या बसस्टॉपच्या मागे जो भेळ/ पापु वाला आहे त्याच्याइतकी बेस्ट भेळ आणि पापु आणि शेपु मी बाकी मुंबईभरात कुठे खाल्ली नाहीये. अगदी शिवाजी मंदीरच्या बाहेरचा भेळवाला, जुहूला अपना बझारच्या बाहेरचा, पार्ल्यातला वर्मा की शर्मा, मालाडचा पण दुबे की शर्मा की वर्मा इत्यादी सगळे या इर्ल्यावाल्यापुढे काहीच नाहीत.
मग त्यातल्या त्यात सुभाष रोडवरचा गणेश भेळवाला चालेल... पण या सगळ्या तश्या भय्या भेळी...
खरी भेळ खायची तर पुण्यात टिळक रोडवर कल्पना भेळ. दाढीवाला करायचा तेव्हापासून खात आलेय. आता त्याचा नातू असतो. गिरिजाच्या बाजूला एक कोपरा आहे त्याचा युगानुयुगे. पुण्यात गेलेय आणि कल्पना भेळेकडे चक्कर मारली नाही असं होत नाही..
तोंपासु...
नीधप, ते आहेच, त्याशिवाय
नीधप,
ते आहेच, त्याशिवाय शिवाजीनगरची झटका भेळ (तो म्हातारा मानेला झटके द्यायचा म्हणून) आणि सदाशिव पेठेतील पुष्कराज की पुष्कर्णी भेळ!
आह!
सोलापुरला पापु एकदम झकास
सोलापुरला पापु एकदम झकास मिळते. कधी खाल्ली नसेल तर त्या भागात गेलात तर नक्की खाउन बघा.
तिकडे पापु चे पाणी गोड्-तिखट असे वेगवेगळे नसते. एकच पाणी ते लाल मिरचीचा ठेचा आणी कांद्याची पात घालुन बनवुन माठात ठेवलेले आणी त्यात भरपुर बर्फ त्यामुळे तिखट आणि थंडगार पाणी.
मी ठाण्यात कुठेतरी गरम पापु पण खाल्ली आहे पुर्या इतक्या गरम असतात की जिभेला चटका बसला होता.
तसही पापु बनवण्याची पध्दत वेगवेगळ्या भागात वेगवेगळी असते. म्हणजे पुणे-मुंबई कडे, सोलापुर कडे सांगली-कोल्हापुर कडे.
कुठलीही असली तर पापु हा माझा आणि माझ्या नवर्याचा खुप आवडता प्रकार आहे.
हो झटका आणि पुष्करिणी
हो झटका आणि पुष्करिणी आहेच.
मधे झटका भेळवाला गायब झाला होता एकदा.
पुष्करिणी हल्ली फार गोड गुळचट भेळ करतो. आम्ही कधीतरी शाळेतून घरी जाताना खायचो तिथे तेव्हा महान वाटायची.
कोथरुडडेपोच्या गणेश भेळ मधुन
कोथरुडडेपोच्या गणेश भेळ मधुन खास रामदास भेळ मागुन खायची. एकदम तोंपासु.
बाकी विश्रामबागवाड्याजवळ, तांबडी जोगेश्वरीमंदीराजवळ फेमस गाड्यावरची भेळ एकदम तोंपासु.
तिपाईवर मिळणारी हराबरा चाट (चना जोर गरम), मटकी भेळ.
खेड शिवापुरला मिळणारी कुठल्याही दुकानातली कोरडी भेळ वरुन मिरचिचा ठेचा व शेपरेट कांदा अहाहा
धायरीला मिळणारी अमृत भेळ मधली ओली भेळ (जास्तीचा पुदीना वापरतात हिरव्या चटणीत)
पापु तर माझा वीकपॉईंट. रपॅ सद्ध्यातरी गणेशवाल्यांकडेच खातेय.
हातात भेळीचा पुडा घेवुन तुळशीबागेत केलेली खरेदी एकदम झकास होते अस ऐकलय.
अनु ३, ती पुरी गरम नसते.
अनु ३, ती पुरी गरम नसते. त्यात रगडा भरतात ना तो सतत विस्तवावर असतो. त्यामुळे चटका बसतो.
पुष्कर्णी भेळ विश्रामबाग
पुष्कर्णी भेळ विश्रामबाग वाड्याशेजारी आहे. शनिपारा जवळ, चितळ्यांच्या दुकानाशेजारी.
माझ्यामते चटण्या भेळेची चव ठरवतात. भेळवाल्याकडे जशा चटण्या मिळतात, त्याची रेसेपी कुणाला माहित असेल इथे टाका.
नीधप, मस्त आठवण करुन दिलीस.
नीधप, मस्त आठवण करुन दिलीस.
खरच कल्पना भेळ (गिरीजा पाशी) मी पण खुपदा खाल्ली आहे. तिथेच एक पापु ची गाडी असते एका आजींची त्यांच्याकडची पापु पण छानच.
गेल्या दहा-बारा वर्षात
गेल्या दहा-बारा वर्षात पुण्यात ज्या भेळींचा उदय झालाय त्या किंवा पुलापलिकडच्या भेळी मला फारश्या माहीत नाहीत. एकदा गणेश भेळ प्रकरण खाउन पहायचं राह्यलंय.
सोलापुरला पापु एकदम झकास
सोलापुरला पापु एकदम झकास मिळते. कधी खाल्ली नसेल तर त्या भागात गेलात तर नक्की खाउन बघा. >>> आता खाऊन परत कस बघणार ?
अरे हो ती आजींची पापु, शेपु
अरे हो ती आजींची पापु, शेपु महान असते. कल्पना भेळेकडे पार्सलची ऑर्डर द्यायची आणि आजींकडे एक पापु चापायची असा नेहमी उद्योग असतो माझा.
आज संध्याकाळी पापु
आज संध्याकाळी पापु खाल्ल्याशिवाय काही माझा आत्मा थंड व्हायचा नाही.
एकदा गणेश भेळ प्रकरण खाउन
एकदा गणेश भेळ प्रकरण खाउन पहायचं राह्यलंय. >>>
गणेश भेळ पुण्यात मान राखून आहे , म्हणा पुण्यात सगळेच आणि सगळच मान राखून आहे...
पण मुंबईच्या भेळेची सर नाही त्याला... आबंटपणा फार असतो पुण्यात भेळीत ..
अग त्या पुर्या मोठे बल्ब
अग त्या पुर्या मोठे बल्ब लाऊन एका मोठ्या काचेच्या पेटीत ठेवल्या होत्या आनी त्यामुळे त्या खुप गरम झाल्या होत्या नंतर तो माणुस म्हणाला इथे पब्लिकला अशीच आवडते. (बरच मोठ दुकान होत ते पापुच).
खरतर पापु ही दुकानात खायची गोष्टच नाही पण एक नातेवाईक घेउन गेले होते.
वॉव काय छान छान धागे काढतायत
वॉव काय छान छान धागे काढतायत सगळेजण. पार्ल्यात शर्मा ची पाणिपुरी एकदम फेमस!
इकडे अमेरिकेत अजून ते तंत्र जमायचय. सध्या एकदम टॉप पाणिपुरी घरीच बनवते आणि सगळ्यांना खायला घालते
१. कराडला घाटावर भेळ,
१. कराडला घाटावर भेळ, पाणीपुरी अप्रतीम मिळते. त्यातल्या त्यात गणेश भेळ वाल्याची तर अफाटच असते. आमच्या गावात भडंगची भेळ करतात सगळीकडे चुरमुर्याची असते.
२. कोल्हापुरला राजाभाऊंची भेळ
३. कोल्हापुरला विद्यापीठ हायस्कूलच्या जवळ मिळणारे चाट.
४. आमच्या धन्यांच्या हातची पाणीपुरी
मुंबईतल्या भेळींमधे कांदा,
मुंबईतल्या भेळींमधे कांदा, टॉमेटो, दाणे इत्यादी वस्तू असल्याच तर केवळ दर्शनापुरत्या असतात. बटाटा मात्र मुबलक असतो.
पुण्याला कांदा, टॉमेटो, दाणे, चुरमुरे हे बेसचे घटक असतात. आम्ही मूळचे सांगलीकर... दाण्यांशिवाय कसे जगावे...
हडपसरला (सोलापुर हायवेवर)
हडपसरला (सोलापुर हायवेवर) भाजी मार्केटजवळ केशर भेळ मिळते. तो भेळेत कच्छी दाबेली मसाला टाकुन देतो, चांगली लागते.
सातारला,
राजवाडा चौपाटी - ऑल ईंडीया नावाचा भेळवाला, झंकार भेळ देतो, त्या भेळेचे ३-४ चमचे खाल्ले कि नाक, डोळे, मधुन पाणी येते ईतकी तिखट असते.
चारभिंती पायथा (वर च्या रोड्ने गेलात कि)-)स्वाद ईव्हिनींग स्पॉट आहे, याची गोड भेळ १ नं. असते.
कोल्हापुर - भवानी मंडप - राजाभाऊ भेळ, १ नं.
जल्ला भुक लागली
जल्ला भुक लागली
नगर रोडला एक सुकी भेळ मिळते.
नगर रोडला एक सुकी भेळ मिळते. माझे बाबा त्याचं वर्णन करून सांगत असतात पण मी खाल्ली नाहीये अजून.
त्यांचा ठेचा स्पेशल असतो म्हणे.
गौतम, राजाभाऊ भेळीची आठवण
गौतम, राजाभाऊ भेळीची आठवण करून दिलीस अन दिल एकदम तिखट झाला ना राव ! कॉलेजात असताना ह्या सगळ्याला भरपेट चालना मिळायची अगदी चलन नसतानाही. भारताबाहेर असलं कि या सगळ्याची उणीव भासतेच.
खरय अगदी मराठी कुडी, इथे घरी
खरय अगदी मराठी कुडी,
इथे घरी केलेलीच छान लागते. इथे खुप जणांनी सांगितल म्हणुन प्रित मध्ये खायला गेलो होतो ते पण भारतातुन आल्याआल्या लगेच आजिबात चांगली न्हवती.
लाजो कसला धागा चालु केलायस..... आता हे सगळ नुसत वाचायच
भारतात परत जाईन तेव्हा खुप उपयोगी , बर्याच चांगल्या ठीकाणी जाता येईल.
Pages