भेळं, चाट इ. फॅन क्लब

Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13

हा धागा खास लोकाग्रहास्तव Happy

भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही Happy अगदी दहीभेळसुद्धा Wink

रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............ Happy

पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही Proud

चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... Happy

चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक Happy

हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... Happy

चटक मटक खाणार्‍या सर्व भेळकरांना अर्पण Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वारजे मधे सिप्ला सेन्टर जवळ........ krushna भेळ>>> अरेच्च्या हे माझ्या घरजवळ असुन कस मिसलं?
घाटकोपरची वेस्ट्ला अगरवाल भेपु/पापु टृय केली आहे का ? . श्क्य असल्यास जरुर ट्राय करा. >> १००% अनुमोदन.
घाटकोपरला आधी एक गल्ली खाऊगल्ली म्हणुन फेमस होती... हिंदुमहासभा हॉस्पिटल जवळ... नंतर सगळ्या गाड्या उठवल्या तिथुन... Sad
पंतनगर मधे एक दाबेलीवाला बसायचा आता असतो का नाही माहीत नाही... पण त्याच्या कडच्या दाबेली सारखी मी अजुन तरी कुठे खाल्ली नाही.

अरे, नाशिकच्या भगवतीच नाव कस नाही काढलं कोणी? इथे शेपु, पापु आणी शेजारी मलाई कुल्फी.
पुण्यातल्या बेडेकरांची मिसळ नाही आवडली... मध्येच गोड लागत होती. ठाण्यातल्या आमंत्रण ची मिसळ (तिखट) आणी वरुन ताक... चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र !!!!! सगळ थंड
नाशिकमध्ये १-२ ठिकाणी मिसळ खाल्ली होती... कृष्णा का कायतरी... नवर्याला विचारायला हवं
पुण्यात लक्ष्मीरोड वर एक हॉटेल आहे... नुपुर का काय? तिथे ओव्हरऑल सगळेच पदार्थ छान असतात.
पुण्यात आयसीसी जवळ फासोस म्हणुन एक रॅपच दुकान आहे.... तिथलं ग्रीन पनीर.... आहाहा !!!
शिवाजी पार्कातली रॅप ची गाडी (हातगाडी सारखी ).

आईग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग............ मला आता कधी देशात येत्येय आणि सगळं हादडत्येय अस झालय... Happy

विकांताला घरीच भेळ करुन खल्ली. पापु च्या पुर्‍याच नाही मिळाल्या जवळच्या देशी दुकानात... Sad संपल्या म्हणे Sad पण येत्या विकांताला लांबच्या दुकानातुन पुर्‍या आणणार आणि नक्की खाणार Happy

>>लाल चटणी (लाल मिरच्या जरा वेळ भिजवून, लसूण, मीठ)<<< मामी, या चटणीत थोड व्हिनेगर घालुन बघा... मस्त चव येते (आई ची रेसिपी) Happy

काल पुण्यात पोचल्या पोचल्या तडक जाऊन कल्पना भेळेवर स्वारी केली. कल्पना भेळ आणि आजीची पापु यांना पोटात जागा देऊन आत्मा शांत केला... Happy

नीरजा तू पण काल कल्पना भेळ खाल्लीस? मी पण खाल्ली. मी रात्री ९.३० ला जाऊन खाल्ली. तू किती वाजता गेली होतीस? आजीची पापु म्हणजे कुठली? कल्पना भेळेच्या बाजूला स्टॉल लागतो तिथली का?

हो संध्याकाळी ६ वाजता. तिथे नाही खाल्ली. पार्सल नेलं घरी.
हो हो तीच ती आजीची पापु. कल्पना भेळेच्या बाजूला गाडी आहे तिथे.

एक फोन करायचास ना. तुला भेटायला आले असते किंवा तुला घरी घेऊन आले असते.

डोंबिवलीचं नाही का कोणी ? हॉटेल रामक्रुष्ण च्या शेजारी पापु, भेळ , शेवपुरी इ. सगळे चाट पदार्थ अतिशय सुंदर मिळतात - वर उल्लेख केलेली पुण्याची सगळी ठिकाणं जाउन आले, पण डोंबिवलीची सर कोणाला नाही Happy

फडके रोडवर मॉडर्न कॅफेच्या कॉर्नरला चाटवाल्याकडे रगडा पॅटीस बेस्ट !!!!!!!

प्राजक्ता, हे मला माहित नव्हतं. आता डोंब्सला गेले की खाईन. किंबहुना खाण्याकरता जाईन.

फडके रोडवाल्याबद्दल अनुमोदन.

विकांताला घरीच भेळ करुन खल्ली. >>>
अगदि अगदी. मि पण घरि जाउन भेळ बनवुन खाल्ली (बाहेरच्या खाण्यावर सध्या बंदी आहे.) Sad

आम्ही होस्टेलला असताना भेळ बनवायचो. घरन आलेल जे खाण (चिवडा, फरसाण, चकल्यांचे तुकडे, शेव, गाठी) उरायच ते सगळ कांदा, टॉम्याटो, चुरमुरे आणी रेडिमेड चटण्या एकत्र करुन खायचो. (टोटल ७ जणी होतो). धम्माल असायची तेव्हा.

रास्ता पेठेत 'इन्टर्व्हल भेळ'! भेळ अगदी मजेदार असत पण पापु खूपछ टीपी असते. एका ताटलीत पच सहा पुर्‍या देतात सोबत कान्दा,पाणि वगैरे एतात. आपणच आपल्या हाताने खेळत खेळत त्या पपु खायच्या!

क्याम्पात हनुमान मनीराजवळची पापु आणि इतर पुरी प्रकार तर मस्तच!

>>हॉटेल रामक्रुष्ण च्या शेजारी पापु, भेळ , शेवपुरी इ. सगळे चाट पदार्थ अतिशय सुंदर मिळतात
त्यचं नाव प्रजापति चाटवाला!!डोंबीवलीतला नं. १ चा चाटवाला आहे तो!!

रगडा पॅटिसमधे पॅटिसवर घट्ट रगडा घ्यायचा, बाकी चटण्या वगैरे घालून शेव-कांदा घालायच्या अगोदर त्यावर पाणीपुरीचं पाणी घालायचं, शेव-कांदा घालायचा आणि गट्टम्...... याद करोगे!! Happy

भय्याकडे रपॅ खाताना त्याला पापुचं पाणी घालायची स्टॅन्डिंग इन्स्ट्रक्शन द्या... याद करोगे!! Happy

लाजो, तू हा धागा चालू केल्यामुळे पापु शेपु रपॅ वाल्यांच्या बिझनेस मध्ये तेजी आल्याचं नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलय. त्यामु़ळे ते तुला कमिशन देणे लागतात. Happy

हॉटेल रामक्रुष्ण च्या शेजारी पापु, भेळ , शेवपुरी इ. सगळे चाट पदार्थ अतिशय सुंदर मिळतात >>>> प्राजक्ता, शेकडो मोदक. त्या गाळामालकाची गाडी होती पूर्वी. प्रजापती नावं त्या गाडीचं. अप्रतिम चाट आयटम्स असतात त्याच्याकडे.

लाजो, पापात वाटेकरी हो, ह्या धाग्यामुळे माझे डाएट मोडुन वीकेंडला बटाटेवडे, भेळ, पापु आणि रगडा पुरी हे प्रकार मनसोक्त खाल्ले गेले Sad

असो, भेळ्/पापु प्रकार घरीच खायचे, म्हणजे पाहिजे तेवढे खाता येतात. बाहेर गाडीवर एकापेक्षा जास्त डिश मागायला ऑक्वर्ड वाटते Proud कॉलेजात असताना आम्ही तिघी मैत्रिणी एकावेळी एकच डिश ऑर्डर करायचो, एक संपली की दुसरी अशा ४-५ वेळा घ्यायचो, गाडीवाला चाट पडायचा Lol

पुण्यातली यादी वर आहेच. औंधमध्ये दीपक स्वीटस दुकानात अप्रतिम चाट/पापु/भेळ मिळते. बनवणार्‍या भय्याची पूर्वी आमच्या घराजवळ गाडी होती. रविवार पेठेत पुरोहित स्वीटस मध्ये अप्रतिम सामोसा चाट मिळतो. तो खाउन झाला की त्याच्या समोरच्या गाडीवर साबुदाणा वडा/काकडीची कोशिंबीर चापायची. सुख Happy जोगेश्वरी मंदिरासमोरच्या बोळात भेळ्/पापु छान मिळते.

लाजो, पापात वाटेकरी हो, ह्या धाग्यामुळे माझे डाएट मोडुन वीकेंडला बटाटेवडे, भेळ, पापु आणि रगडा पुरी हे प्रकार मनसोक्त खाल्ले गेले << ज्ञाती, मला माझ्या कर्मांची फळं भोगायला लागतायत हे काय कमी आहे... हा बाफ काढला आणि मी इकडे ऑस्ट्रेलियात बसुन नुसत्याच मिटक्या मारत्येय... डिसेंबरात देशात आल्याशिवाय मला यातल काह्ही काह्ही चाखता येणार नहिये Sad

मंजुडे Sad

मी अमि<< मी येतेच आहे डिसेंबरात.. कमिशन म्हणुन, भेळ पपु भरपुर खाणार Happy

लाजो अग तु किती जणांना (भारताबाहेरच्या) त्रास दिलायस ग............... Wink
२ दिवस संध्याकाळी भेळ बनवती आहे पण ?????????????????????????????
आता कधी भारतात परत जाईन अस झाल आहे.

भेळ हा घरी करायचा पदार्थ नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. भेळ नेहमीच्या भेळवाल्याकडे खावी. मस्त उन्हाळ्यातली निवांत संध्याकाळ असावी, बरोबर जीवाभावाच्या मैत्रिणी असाव्यात. मधूनच पलिकडे बसलेल्या गजरेवाल्याच्या पुढ्यातल्या मोगर्‍याचा वास दरवळून जावा. मैत्रिणींबरोबर गॉसिपींग करत भेळेचा आस्वाद घ्यावा Happy

ज्ञाती, मला माझ्या कर्मांची फळं भोगायला लागतायत हे काय कमी आहे.>>> ओह तुला देवाने ऑलरेडी शिक्षा दिली आहे तर..भगवान के घर देर है Proud

अंजली, भेळ खाण्याच्या उद्देशावर ते अवलंबून आहे. केवळ पोटोबाच्या हेतुने खाणार असशील तर माझ्या पहिल्या प्लॅनप्रमाणे खा. Proud
दुसरा एक प्लॅन जरा वेळाने लिहीन.

सह्ही धागा. Happy

थोड्या उशिरानेच पण मीसुद्धा घेतले या फॅनक्लबचे सदस्यत्व Proud
माझ्या आवडीचा चाट प्रकार म्हणजे "छोले समोसा" :-). समोसा कुस्करून त्यावर छोले नंतर आंबटगोड चटणी. स्लर्पsssssssss Happy

माझ्याकडुन काही Happy

पाणीपुरी
गावच्या जत्रेतील शेव आणि ओली भेळ
पावभाजी
गरमारगम पॅटिस

Pages