भेळं, चाट इ. फॅन क्लब

Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13

हा धागा खास लोकाग्रहास्तव Happy

भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही Happy अगदी दहीभेळसुद्धा Wink

रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............ Happy

पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही Proud

चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... Happy

चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक Happy

हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... Happy

चटक मटक खाणार्‍या सर्व भेळकरांना अर्पण Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी : सही आहेत फोटो ........... Happy
या फोटोंप्रित्यर्थ आज (पण) मी पापु खाणार, पण घरची. काल निधपतै स्पेशल आजीची पापु खाल्ली २ प्लेटी ................... Happy

आयला, जबरी आहे हे सगळे!!!
राजकोटला असताना संध्याकाळी बाहेर पडले की पापु मस्टच, गुजरात्यांचे ते 'स्टेपल डाएट' असल्याने चौकाचौकात ठेलेवाले असत. तिथे मिनरल वॉटर पाणीपुरी नामक प्रकारही पाहिला, काय दम नाय!
सोलापूरात तर पापुवाला जेवढा कळकट आणि मटक्यात जितका खोल हात बुडवेल तितकी पापु टेस्टी हे सूत्र आहे.
पुण्यात फुले मंडईतल्या पुणेरी मधली भेळही खास, ते हाटेलच आता बंद झाले.

madhe thailand madhe 1ka chhotya island var ek atrangi thai prakaar khalla...

ata naav aathvat nahi...
pan kanda, tomato, kothimbir, mirchi, lime juice, rice flakes (churmure) ani minced smoked pork...
MAHAAAAAAAAAN hota...

pork aivaji chicken, beef ani tofu cha option hi hota...

अश्विनी के | 14 February, 2011 - 10:25
नीरजा तू पण काल कल्पना भेळ खाल्लीस? मी पण खाल्ली. मी रात्री ९.३० ला जाऊन खाल्ली. तू किती वाजता गेली होतीस? आजीची पापु म्हणजे कुठली? कल्पना भेळेच्या बाजूला स्टॉल लागतो तिथली का?

प्रतिसाद नीधप | 14 February, 2011 - 10:27
हो संध्याकाळी ६ वाजता. तिथे नाही खाल्ली. पार्सल नेलं घरी.
हो हो तीच ती आजीची पापु. कल्पना भेळेच्या बाजूला गाडी आहे तिथे.

एक फोन करायचास ना. तुला भेटायला आले असते किंवा तुला घरी घेऊन आले असते.

>>>>

13 cha ravivaari sandhyakaali 7.30 la mi pan khaalli....
Lol

पुण्यात शुक्रवारात रतन सायकल मार्ट<<< आईग्ग काय आठवण काढली.. याच्या सायकली चालवतच शिकले मी सायकल....

>>
mi pan...

by d ve..
pan ata Rajesh chi bhel titki gr8 naste...
ratan kadun bajirao rd kade jatana watet ujvikade Ganesh Bhel ahe (suprasiddh chain madhla nahi...) tyachi Farsaan Bhel mahaan aahe..

majhya office madhe kahi lokaanni 1 Samarth Bhel aanli hoti...
sarasbaag cha ithun...
Kordi bhel.. pan barobarcha kharda jaaaaaaaaaaam tikhat hotaa...
jyanni havrepana karun khalla tyaanna paar dusrya divshi pan jaanvat rahila... Wink

अंक्या, मी रविवारी रात्री साडेनऊला खाल्ली. गिरिजात फ्रूटसॅलड खाता खाता सगळीकडे शोधत होते कुणी माबोकर बसलेत का हादडत ते Lol

स्स्स्स्स्स्स्स्स्स..... काय एक से एक फोटो टाकलेत!!! भो आ क फ!!! किती लाळ गाळायची आता.... हा धागा मी मन घट्ट करून वाचते, पण काय पण उपयोग नाही.... कालच गणेशची भेळ चापली तेव्हा जीव जरा कुठे थंडावला... आज बघते तो परत तोंपासु फोटो!! अशानं कसं व्हायचं?!!!!! Proud

अशानं कसं व्हायचं >>>>>>>>> फार चिंता करायची नाही अकु..... Happy
एके दिवशी पापु, तर दुसर्‍या दिवशी भेळ अशी दिवसांची वाटणी करायची आणि रविवारी दोन्ही खायचं ......... Happy

उपासाची मिसळ असते तर भेळ का नसावी?? Wink

बटाट्याच्या चिवड्यात उकडलेला बटाटा कुस्करून, काकडी बारीक चिरून घालावी. भाजलेले शेंगदाणे घालावेत. त्यात खजूर-चिंचेची चटणी आणि हिरव्या मिरच्या-कोथिंबीर-पुदिन्याची चटणी मिसळावी. जिर्‍याची पावडर आणि मीठ चवीनुसार घालावे. लिंबू पिळावे आणि वर बटाट्याची/रताळ्याची शेव भुरभुरवून खायला द्यावे. Happy

काल खल्ली एकदाची पापु आणि समोसा चाट... आता कसं जर्रा बर्र वाटतय Happy

मंजुडी, उपासाच्या भेळेत बटाट्याच्या चिवड्याऐवजी साबुदाण्याचा प्लेन चिवडा (तळुन करतात तसला) वापरायचा आणि मग उकडलेला बटाटा वगैरे तु लिहीलयस तस सगळं घालायचं. मस्त लागतं Happy

ओये आज उपवास नी इथे कसल्या कसल्या आंबट Wink गप्पा चाल्ल्यात...आता मला पापु खायला उद्यापर्यंत वाट पहावी लागणार Sad
मी कल्याणात राहते. आमच्या घराजवळच्या पापुची टेस्ट अजून कुठेच चाखली नाही. खडकपाड्यातून आत गेल्यावर गोकुळ नगरीच्या समोर जय अंबे भेळपूरी सेंटर आहे, अप्रतिम भेळ मिळते Happy
पापुसाठी कमिशनर बंगल्यासमोर एक गाळा आहे तिथे पापु,रगडा,दपु, शेपु हे सगळंच मस्तय Happy
स्टेशनला गेल्यावर शेटे क्लासेससमोर अंबिका चाटवाल्याकडे पापु अन चायनीज भेळ खासियत आहे.

मधुरिमा स्वीट्सच्या समोर पप्पूची सँडविचची गाडी आहे, तिथलं चाट ब्रेड बटर म्हणजे पर्वणीच! मी कधीकधी सँडविच न घेता नुसतच ब्रेड बटर घेते. तोंपासू आहे एकदम! Happy वर बटाट्याच्या फोडीवर तो चाट मसाला भुरभुरून खायला देतो. चकटफू Proud

@ टोकूरिका
च्यामारी, कोणीतरी आहे इथे कल्याणकर... Happy

स्वामीनारायण मंदिराजवळ 'अजय'ची गाडी- शेवपुरी बेस्ट असायची.

शिशु विकास शाळेजवळ आहे एक गाडीवाला - पाणीपुरी चांगली करतो.

खडकपाडा सर्कल पासून पुढे गेलात बिर्ला कॉलेजच्या दिशेने, सिल्वर आर्चच्या शेजारी एकाची गाडी लागते ( नाव विसरलो ). रगडा पॅटिस चांगलं बनवतो.

खडकपाडा सर्कल पासून बेतूरकर पाड्याच्या दिशेने गेलात ( स्वामी समर्थांच्या मठाकडून ) गौरी अपार्टमेंट मध्ये एक आहे भेळ, चाट वाला. लक्ष्मीनारायण त्याचं नाव. बरे बनवतो पदार्थ.

रामदेव हॉटेलच्या बाजूला एक दाबेलीवाला आहे. त्याची जाम फेमस होती दाबेली. आता चव जराशी बिघडलेय पण अगदीच वाईट नाही. त्याच्याच पुढे महाजन वाडी हॉल जवळ एक दाबेलीवाला बसतो. त्याला आम्ही 'गरीबों का दाबेलीवाला' म्हणायचो ( इतर ठिकाणांपेक्षा याच्याकडे १रुपया भाव कमी असायचा.). शिवाजी चौकात एक दाबेलीवाला आहे तो पण चांगली करायचा दाबेली.

अवांतर : भेळ, चाट या बाबतीत भिकार ठिकाण म्हणजे 'नवी मुंबई'. बिकानेर (खरंतर भिकानेर म्हणायला हवं) याच्या दुकानात चाट खायला अज्जिबात जाऊ नका. इकडे सी वूड्स मध्ये एक पाणीपुरीवाला मुश्किलीने सापडलाय जो बरी बनवतो.

काश्मीर मध्ये चाट म्हणजे चाटच असतं. भेळेत फक्त आंबटतिखट पाणी आणि वर ढीगभर चाट मसाला. Uhoh

गोड पाण्याशिवाय भेळ खाववली नाही अजिबात.

वा.

Pages