भेळं, चाट इ. फॅन क्लब

Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13

हा धागा खास लोकाग्रहास्तव Happy

भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही Happy अगदी दहीभेळसुद्धा Wink

रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............ Happy

पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही Proud

चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... Happy

चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक Happy

हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... Happy

चटक मटक खाणार्‍या सर्व भेळकरांना अर्पण Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे रिपीट होतेय नाहि का खादाडी बाफ प्रमाणेच? म्हणजे कुठल्या शहरातल्या भागात कुठे काय मिळते.
इथे रेसीपी लिवाची काय फक्त?

बेफिकीर | 10 February, 2011 - 00:01
कोल्हापूरला भडंगांची भेळ का करतात काही समजत नाही राव!
>>>
कोल्हापुरात बहुतेक ठिकाणी, भडंग व साधे चिरमुरे ५०-५०% असे प्रमाण असते...त्यान भेळेला १ प्रकारची वेगळीच मसालेदार, तेलकट मस्त चव येते.

आमच्या मातोश्री अशी करतात, पद्धतशीर रेसीपी माहित नाही कारण खाण्याचे काम केलेय तरी लिवते...

हि पुण्याची इश्टाईल बरं का..
आंबट कैरी बारीक कापलेली,लाल तिखटाचे शेंगदाणे,लाल चणा डाळ,चिंच खजूर लाल मसाला चटणी हे सर्व घरी केलेले मातोश्रींनी.
बाकी वाटाणे हिरवे(विकतचे),लाल कांदा, हिरवी मिरचीचा ठेचा टाईप चटणी, टोमॅटो बारीक केलेला, विकतची मसूर डाळ, तिखट गाठी,बारीक शेव,तिखट फरसाण,लिंबूरस, कोथींबीर, बटाटा चुरा,कुरमुरे, जाड पोहे.

पोहे व कुरमुरे बहुधा वेगळे भाजून हिंगाची व हळदीची फोडणी देतात. मग काय काय ते मस्त मिक्स करून आमच्या हातात देतात.
एकटं कार्ट असल्याने मजा... सगळी भेळ दिवस भर जेवण म्हणून खावी अशी. दुसरे काय.

मला नाही आवडत ती मसालेदार चव भेळेत. म्हणूनच मला मुंबैवाल्या चाटमसाला घातलेल्या भेळेपेक्षा पुण्यातली आवडते.

माझा काका फार स्पेशल भेळ बनवतो. त्या भेळेची सगळी जादू त्याने केलेल्या चटणीत असते. पुदीना, कोथिंबीर आणि मिरचीचे परफेक्ट मिश्रण असते त्यात. असा मस्त झणका येतो की बस्स..

मला नाही आवडत ती मसालेदार चव भेळेत. म्हणूनच मला मुंबैवाल्या चाटमसाला घातलेल्या भेळेपेक्षा पुण्यातली आवडते>>>

मलाही अजिबात आवडत नाही.

व्वा चटकदार बा फ Happy
माझे आवडते जॉईन्ट्स -
पूणे- गणेश भेळ, सारंग बस स्टॉप पाशी असलेला वडे वाला..
नगर - एकमुखी दत्तमंदिरापाशी सोपान ची गाडी, कापडबाजारात रात्री १० नंतर येणारा सॅण्डविच वाला, दुर्गा सींग लस्सी वाला,
नाशिक - सर्कल टॉकिज पाशी वडेवाला, गाडगेमहाराज पूलाजवळ मकाजी, कोंडजी नाशिक चिवडा, पंचवटीत मुग भजी वाला,
दादर- छबीलदास जवळ्चा वडेवाला, वेस्टर्न फ्लाय ओवर खाली चायनीज गाडी
व्ही टी - स्टेशन समोरच्या रस्तापलीकडे मद्रासी गाडीवाला
सिकंदराबाद - सिताफलमण्डी चौकात ला मिर्ची वडा

ओहोहो तोंपासु

चायनीज भेळ हा प्रकार टेस्ट केलाय का? महालक्ष्मी सरस प्रदर्शनात एका स्टॉल वर याचे रेदी टू मिक्स पॅक मिळाले. अफलातून भेळ बनली.

चायनीज भेळ हा प्रकार टेस्ट केलाय. चांगला लागतो तो प्रकार!

उपासाची मिसळ हा प्रकार इथे घेता येणार नाही म्हणा , पण तोही चांगला लागत असावा, खाल्ला नाही आजवर!

कल्याणची भेळ अप्रतिमच असते... हल्ली तर २ भेळ पार्सलसाठीपण मी कर्वेनगरातुन लॉ कॉलेज रोडपर्यंत जातेच जाते ... Happy मलातरी गणेशची ठीकठीकच वाटते...
सारसबागेसमोरची संतोष भेळपण मस्त असायची.. ईतक्यात नाहीच खाल्ली मी

हल्ली तर २ भेळ पार्सलसाठीपण मी कर्वेनगरातुन लॉ कॉलेज रोडपर्यंत जातेच जाते >>>

पण मला एक समजत नाही, तो लॉ कॉलेजरोडवाला इतकी महाग का ठेवतो भेळ? २० रुपये???

भेळ बारा रुपयाच्या वर गेली की ती 'विकत घेऊन खाताना' अनिवासी भारतीय असल्यासारखे वाटायला लागते.

सातारला प्रक्रुती हेल्थ रीसॉर्टमध्ये विना मसाला, तिखट अशी भेळ मिळायची आधी, ज्यात प्रोटीन्स असणारे व तत्सम पदार्थ मुबलक असायचे. खास मसाला, तेलकट न आवडणार्‍यांसाठी. अजुनही मिळते का ते माहित नाही.

चायनीज भेळ हा प्रकार पार्ल्यातल्या समर हार्वेस्टमधे स्टार्टर म्हणून मिळतो. ती उत्तम असते. बाकी ठिकाणची मला तरी काही खास वाटली नाहीये.

दांडेकर पुलावरुन सारसबागेकडे जाताना डाव्या बाजुला (समर्थ मठासमोर) मामांची भेळ मिळते. मस्त लागते. (दुकानाचे नाव काहीतरी वेगळे आहे पण मामांची भेळ म्हणुन खुप वर्षापासुन फेमस आहे)

माझ्या अंगणात असून मला कसं माहीत नाही या भेळेबद्दल. बहुतेक मला कल्पना भेळेपलिकडे काही दिसत नसावे पुण्यात आल्यावर.. Happy

हल्ली ५ पाणीपुर्‍या पण १०रु ला मिळतात मग भेळ २०रु शक्यता आहे. बाकी महागाई सगळीकडेच सारखीच. भेळ कशी काय अपवाद असेल्??:स्मित:
गेले ते दिन गेले ५रुला ६ पाणीपुर्‍या आणि वर एक मसाला पुरी.

ते खरं आहे मंजु,

पण तो बहुधा खूप ग्राहक असल्यामुळे काही प्रमाणात शोषणच करत असावा. अ‍ॅक्च्युअली, भेळेभेळेत सुक्ष्म फरकच असतात. त्याची भेळ एक्स्ट्रॉ ऑर्डिनरीली चांगली आहे असे वाटत नाही मला. अर्थात, हे माझे मत!

जंगली महाराज रोडवर एक मनमीत म्हणून हॉटेल निघाले होते. आता आहे की नाही पाहिले नाही.

तेथे चाटच मिळायचे. आणि बास्केट चाट हा प्रकार भारी असायचा.

मात्रः

इन्दोरच्या सराफ्यावरील चाट

आणि

मथुरेचे समोसा चाट

हे दोन पदार्थ 'वर्थ गोईन्ग देअर' आहेत.

दादरला सिटिलाईट सिनेमाला लागूनच्या गल्लीत भेळवाला आहे, त्याच्याकडचे सर्वच पदार्थ अप्रतिम!! कित्येक वाढदिवसांच्या ट्रिटा तिथेच झाल्या आहेत.

हल्ली पारेख महालाच्या खाली एक भेळेची गाडी लागते, त्याच्याकडची चवही सुंदर आहे.

नी, व्हॉट अबाऊट एल्को पाणीपुरी??? Happy

ठाण्यात चाट पदार्थांचं जेवण करायचं असेल तर पाचपाखाडीला प्रशांत कॉर्नर किंवा त्याच्याशेजारी श्रीकृष्णा स्वीट्स... एरवी राम मारुती रोडवर एव्हिनिंग स्नॅक्स Happy

जयपूरची 'प्याजवाली कचोरी' हा अचाट प्रकार असतो.

आणि राज कचोरी तर तब्बल पस्तीस रुपयांना!

त्यात काय काय!

दही, चटण्या, कांदा, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे, शेव, पुर्‍या, मिरचीचे बारीक तुकडे, चाट आणि इतर मसाले!

अर्धे जेवणच असते राज कचोरी!

अगं मंजू, एल्को महानच की. लिहिलंय बघ वरती.
पण माझे मार्क मुंबईत इर्ल्याच्या गाडीलाच सगळ्यात जास्त Happy
अर्थात एल्को मधली व्हरायटी तिथे नाही म्हणा...

परवा पुण्यातच कोथरुडला एका दुकानात चक्क 'मावा कचोरी' मिळाली.

गोड असते. त्याबरोबर साखरपाणी चटणी म्हणून देतात.

लागते भारी तशी, पण नेहमीची कचोरी आपल्यासारख्यांना अधिक आवडत असावी.

नी, व्हॉट अबाऊट एल्को पाणीपुरी???>>>

मला कुणी एल्को पाणीपुरी म्हणजे काय ते सांगेल का? ऐकलेलेही नाही!

बांद्रा वेस्टला एल्को मार्केट म्हणून शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. तिथे एल्को चाट म्हणून दुकान आहे भेळ, पापु इत्यादी सगळ्या वस्तूंचे. तिथल्या सगळ्याच वस्तू खूप फेमस आहेत.

पिंपळे सौदागर मधे कुनाल आयकॉन समोर जोरदार पापु मिळते.

बाकी चाट विशाल नगर च्या बधाई स्वीट मधे झक्कास........

तसेच......... वारजे मधे सिप्ला सेन्टर जवळ........ krushna भेळ.

Pages