Submitted by अरुंधती कुलकर्णी on 9 February, 2011 - 07:29
येथे सॅलड/ सलाद, रायते, कोशिंबिरीच्या समस्त फॅन्सचे स्वागत आहे!
आपल्या आवडत्या सॅलड्स, वेगवेगळ्या कोशिंबिरी, चवदार रायत्यांची रसभरीत वर्णने करायला ही जागा खास तुमच्यासाठी! आहारातील हा प्रकार आरोग्यासाठी चांगला आणि चव, रंग, स्वाद ह्यांचीही मेजवानीच!
तुमची आवडती, हमखास किंवा जरा हटके सॅलड्स, त्यांना वापरता ती ड्रेसिंग्ज, रायते-कोशिंबिरींची माहिती इथे शेअर करा. काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा. कोणकोणत्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये इत्यादीचे कॉम्बिनेशन वापरून तुम्ही ते पदार्थ बनवता तेही सांगा.
सॅलडच्या माबोवरच्या काही पाकृ इथे आहेत.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सलाद मध्ये मला आवडणारे व
सलाद मध्ये मला आवडणारे व चवीला जबरी असे ड्रेसिंग म्हणजे मेयॉनीज, मीठ, मिरपूड यांचे.
किसलेला कोबी, कॅनमधील पायनॅपल चंक्स, डाळिंबाचे दाणे आणि हे ड्रेसिंग असे मिसळून फ्रीजमध्ये गार करत ठेवायचे. आयत्या वेळी सर्व्ह करायचे.
अकु, नेमका जाता जाता हा धागा
अकु, नेमका जाता जाता हा धागा बघितला. आता उद्या निवांत लिहिते. अतिषय आवडीचा विषय आहे माझ्या.
व्वाह, क्या बात है... अकु, लय
व्वाह, क्या बात है... अकु, लय भारी काम केलस आता नविन नविन कॉम्बोज वाचायला मिळतील
रशियन सॅलेड, पास्ता सॅलेड, पोटॅटो आणि सा(व)र क्रिम विथ स्प्रिंग ऑनियन्स, एग सॅलेड, वॉल्डोर्फ सॅलेड, ऑल एशियन ग्रिन्स विथ साते सॉस, खमंग काकडी, दह्यातली काकडीची कोशिंबीर, कढधान्यांच्या कोशिंबीरी, बुंदी रायता... एंडलेस लिस्ट
लिही नक्की. लाजो, तुझ्या
लिही नक्की.
लाजो, तुझ्या आवडीची सॅलड्स लिहिलीस, त्यांची वर्णने, कॉम्बोजही येऊदेत.
मला तर सॅलड्सचे बहुतेक सर्व प्रकार आवडतात. रायती, कोशिंबिरीबाबतही सेम. एकवेळ पोळीबरोबर भाजी नसेल तरी चालेल, पण कोशिंबीर हवीच!
दह्यातल्या कोशिंबिरी/ सलाद्स
दह्यातल्या कोशिंबिरी/ सलाद्स साठी मी दह्याबरोबर हे पदार्थ वापरते :
दही + जिरेपूड + सैंधव/ मीठ
दही + मीठ + साखर
दही + मिरेपूड + मीठ
दही + भाजलेली मिरची किंवा तळलेली भरली मिरची चुरडून + आवश्यकतेनुसार मीठ
दही + पुदिना पाने (किंवा पुदिन्याची चटणी) + आवश्यकतेनुसार मीठ
अकु, असा धागा उघडला आणि मी
अकु, असा धागा उघडला आणि मी वहावलो, तर मग बोल लावायचा नाही.
माझे अत्यंत आवडीचे (एक) सलाद
साहित्य : एक लालभडक सफरचंद, एक लेट्यूस, व्हाईट सॉस (घरी केलेला )
आधी व्हाईट सॉस करुन घ्यायचा. त्यासाठी दोन टेबलस्पून मैदा वा कणीक लोण्यावर भाजून घ्यायची. त्यातच दोन टेबलस्पून मिल्क पावडर भाजून थोडे परतायचे. थंड झाले कि हे मिश्रण घट्ट झाकणाच्या बाटलीत फ्रिजमधे ठेवून द्यायचे. व लागेल तसे वापरायचे.
आयत्यावेळी यातले दोन टेबलस्पून मिश्रण घेऊन ते कपभर कोमट पाण्यात मिसळून घ्यायचे. मग ते मंद आचेवर शिजवून घ्यायचे. शिजताना त्यात मीठ, ताजी मिरपूड आणि थोडे जायफळ किसून टाकायचे.
हे नीट शिजले कि थंड करत ठेवायचे.
सफरचंदाच्या चौकोनी फोडी करायच्या. लेट्यूसचे हातानेच तूकडे करायचे. सगळे अलगद हाताने एकत्र करायचे. व थंड करायचे. त्यावर सॉस टाकायचा. (मला जेवण लागत नाही, हे सलाद असले तर.)
ऐश करायची असेल तर त्यात स्वीट कॉर्न, उकडलेला बटाटा वगैरे घालायचा.
मस्त धागा ! एक रेसिपी- अर्धी
मस्त धागा !
एक रेसिपी-
अर्धी वाटी उडीद डाळ १ तास भिजवून घ्यायची. कच्चा कोबी किसून किंवा बारीक चिरुन घ्या. मग डाळ आणि कोबी मिक्स करून त्यावर लिंबू पिळा. हिरवी मिर्ची, हिंग, कढीपत्ता आणि जिरे यांची फोडणी घालून मिक्स करा. मीठ विसरू नका. ज्यांना आवडेल आणि डाएटला झेपेल त्यांनी यात थोडा ओल्या नारळाचा चव घाला.
दुसरी रेसिपी
वाफवलेले मश्रूम्स + स्वीट कॉर्न + लेट्यूस + टोमॅटो + दही ( समप्रमाणात ) घ्या. त्यात ओरिगॅनो आणि मीठ मिसळा. तयार.
अजून आठवतील तशा सांगतेच.
दिनेशदा, तुमच्या रेसिपीत
दिनेशदा, तुमच्या रेसिपीत ऑलिव्ज पण छान लागतील असं वाटतंय. मी व्हाईट सॉस घालून कधी सॅलड केले नाही. आता करून बघेन.
माझा अत्यावडता प्रकार..पण
माझा अत्यावडता प्रकार..पण आपल्या कोशिंबीरींशिवाय मला काही जास्तं माहिती नाही..बरंच झालं..ही ड्रेसिंग्स कुठे मिळतात भारतात हे ही सांगितलं तर बरं होईल..:)
आपली घरगुति कोबीची कोशिंबीर,
आपली घरगुति कोबीची कोशिंबीर, लहानपणापासून भाजीपेक्षा जास्त आवडते.
१) कोबी शक्यतो किसून घ्यायचा. त्यात दाण्याचे कूट, हिरवी मिरची आणि थोडे ओले खोबरे घालायचे. वरून हिंग जिर्याची फोडणी आणि चवीला साखर व मीठ.
२) लाल वा पांढरा मुळा घेऊन तो पाट्यावर ठेचायचा. मिरच्याही ठेचून घालायच्या. मीठ, साखर, दही व दाण्याचे कूट. वरुन फोडणी.
अकु, लिंकबद्दल धन्यवाद. वाचते
अकु, लिंकबद्दल धन्यवाद. वाचते आहे
वा!वा!! मी रमणार इथे रशियन
वा!वा!! मी रमणार इथे
रशियन सलाड - http://www.maayboli.com/node/2613
पपनस ट्रिट - http://www.maayboli.com/node/3537
बाकी, आठवेल तशा पाकृ लिहिन नक्की
दिनेशदा, मस्त वाटतेय व्हाईट
दिनेशदा, मस्त वाटतेय व्हाईट सॉसमधील कृती. मी एरवी व्हाईट सॉसमध्ये उकडलेल्या भाज्या ( बटाटा, श्रावण घेवडा, स्वीट कॉर्न, गाजर, बटाटा, बेबी कॉर्न इत्यादीपैकी जे आवडेल ते) घालून मीठ, मिरपूड भुरभुरवते. एखादी मिरची भाजून चुरडून घालते. क्वचित कधी कॅनमधील पायनॅपल चंक्स किंवा पाकवलेली चेरीही घालते. (पण त्याने हे सॅलड जरा जास्त गोड होते!)
अजून ऐश करायची असेल तर वरून किसलेले चीज. मग हे वन डिश मीलच होते. किंवा पोळी/ ब्रेड बरोबर देखील खाता येते.
लाल, पांढरा मुळा पाट्यावर ठेचण्याची कल्पना भारीये!
भरपूर वाहवलात इथे तरी चालेल. जास्तीत जास्त कॉम्बोज, कृती येऊ देत.
मितान, कोबी + उडीद डाळ असे
मितान, कोबी + उडीद डाळ असे कॉम्बो खाल्ले नव्हते कधी. आता करुन बघेन.
कोबीबरोबर किंवा गाजर, काकडी, श्रावण घेवडा ( वाफवलेला), मोड आलेले मूग ह्यांबरोबर भिजवलेली मुगाची डाळ, मीठ, साखर, हवे असल्यास तिखट / मिरची आणि वरून फोडणी हे कॉम्बोही मस्त लागते.
फोडणीत कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घातल्यास अजूनच फर्मास चव!
मंजूडी, धन्स गं.... मस्त
मंजूडी, धन्स गं.... मस्त लिंक्स दिल्यास. मला सॅलड टॅगमध्ये नव्हत्या मिळाल्या त्या. त्यांना संपादित करून त्यात सॅलड टॅग अॅड करता येईल का बघ ना!
बटाटा सलाद (german style) ही
बटाटा सलाद (german style)
ही माझ्या german आजेसासूबाईंची पाककृती आहे आणि त्यांच्या मला आवडणाऱ्या पाककृतींपैकी एक आहे. यात काही german brands चि नावे आहेत. पण त्याला आपल्या देशात मिळणारा substiute ´brand वापरावा.
साहित्य:
४ मध्यम उकडलेले बटाटे
branntweinessig (Spirit vinegar, also known as table vinegar)- व्हिनेगर (कुठल्याही कंपनीचा Brannt-Wein व्हिनेगर चालेल. General super market मध्ये मिळतो.
Mayonnaise (फक्त Tommy company ´चाच वापरा - आजेसासूबाईंची टिप)
१ छोटे हिरवे किंवा लाल सफरचंद
१ छोटा कांदा, १ गाजर, २ व्हिनेगरमध्ये टिकवलेल्या काकड्या (Essig-Gurken)
मीठ, काळी मिरी
कृती:
१. ४ उकडलेले बटाटे घ्या आणि त्यांचे काचऱ्यांसारखे बारीक तुकडे करा.
२. व्हिनेगरमधील काकड्यांचेही बारीक तुकडे करा.
३. गाजर खिसून घ्या.
४. कांदा बारीक चिरून घ्या.
५. सफरचंदाचे बारीक काप करून घ्या.
६. सर्व गोष्टी एकत्र मिसळा.
७. २ चमचे Brannt-Wein Essig, ३ मोठे चमचे Mayonnaise, मीठ आणि मिर पुड चवीपुरते टाका.
८. सर्व जिन्नस एकत्र मिसळून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या.
एका तासानंतर Salad खाण्यासाठी तयार होते. चवीप्रमाणे आणखीन Essig किंवा Mayonnaise घातले तरी चालेल.
हे पण एक भारी सॅलड ड्रेसिंग
हे पण एक भारी सॅलड ड्रेसिंग आहे : लिंबाचा रस + ऑलिव्ह ऑईल / रिफाईन्ड ऑईल + जिरेपूड + मिरेपूड + मीठ + कोथिंबीर. हवं असल्यास त्यात लसणाच्या पाकळ्याही ठेचून घालता येतात.
मोड आलेली कडधान्ये वाफवून किंवा टोमॅटो, स्वीट कॉर्न इ. बरोबर मस्त लागते हे ड्रेसिंग.
हे एक आगळे वेगळे कॉम्बो . पण
हे एक आगळे वेगळे कॉम्बो . पण जेवताना किंवा जेवणानंतर लाईट डेसर्ट म्हणून खुपच छान लागते. घट्ट लागलेले ताजे दही + एकदम मस्त पिकलेला आणि सोलून बारीक फोडी केलेला पपया + लालबुंद डाळिंबाचे दाणे एकत्र करून वरून, पुदिना, मीठ, चाट मसाला घालून थंड खावे.
मेथीची कोशिंबीर : मेथीची केवळ
मेथीची कोशिंबीर :
मेथीची केवळ पाने + दाण्याचे कुट + खोबरे + मीठ + साखर + लिंबु + वरून घालायला मोहरी, लाल मिरच्यांची फोडणी
पांढरा कांदा (पातळ उभा चिरून)
पांढरा कांदा (पातळ उभा चिरून) + खवलेलं खोबरं + दही + मीठ + साखर.
कैरी-कांदा : कैरी सोलून बारीक
कैरी-कांदा :
कैरी सोलून बारीक फोडी करून + पांढरा कांदा बारीक चिरून + भाजलेल्या जिर्याची पूड + मीठ
व्वा, मामी, पांढर्या
व्वा, मामी, पांढर्या कांद्याबरोबर खोबरं आणि कैरी कांदा माझ्यासाठी नवीन!! मेथीच्या कोशिंबिरीत मी लिंबाच्या रसाच्या ड्रेसिंग ऐवजी दही + मिरपूड + मीठ वापरते. तशीच पालकाचीही कोशिंबीर मस्त लागते. आता ह्या स्टाईलनेही करायला हवी.
अनघा, अजून येऊ देत जर्मन सलाद रेसिपीज.
कोशिंबीरी माझ्या पण आवडत्या.
कोशिंबीरी माझ्या पण आवडत्या. कोबी आणि काकडी भयंकर आवडतात.
ह्या काही:
मुळ्याचा चटका
यजेनोवा (Jarzynowa) सॅलड
कोबीची कोशिंबीर
हनी लेनम ड्रेसिंग पण छान लागते. ऑऑ + मध + लिंबाचा रस समप्रमाणात.
पालक बारीक चिरुन + स्ट्रॉबेरी तुकडे + वॉलनट तुकडे किंवा सुर्यफुलाच्या बिया आणि हनी लेमन ड्रेसिंग. मस्त लागते.
पालकाची पचडी. पालक, टोमॅटो,
पालकाची पचडी. पालक, टोमॅटो, कांदा बारीक चिरून त्यात मीठ, साखर, दाण्याचं कूट आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेली फोडणी.
कोबीची मीठ, साखर, हिरवी मिरची, दाण्याचं कूट आणि लिंबू पिळून पचडी. अशीच पातीच्या कांद्याचीही, पण त्यात फोडणी हवी. कोबीला नाही घालत मी.
कुठलीही पचडी हाताने कालवायची, चमच्याने नाही.
फोडणीत हिरवी मिरची घालून त्यावर परतून वाफवलेला गाजराचा कीस - त्यात मीठ, साखर आणि लिंबू पिळून.
बीट कच्चा किसून त्यात आलं, मिरची, साखर, मीठ, दाण्याचं कूट घातलेली किंवा बीट उकडून दह्यातली.
सफरचंदाची किंवा केळ्याची - मीठ, हिरव्या मिरच्या आणि दही घालून - ही थोडी जास्त तिखट करायची.
चिंचगूळ घातलेलं वांग्याचं भरीत.
चिंच, गूळ, लाल तिखट, मीठ, असल्यास डाळिंबाचे दाणे घातलेली काकडीची कोशिंबीर - यात लाल मोहरी फेसून घातली तर बहार!!
ग्रीन वे नावाच्या ब्रॅन्डचं सेसमी जिंजर ड्रेसिंग घालून बारीक किसलेलं गाजर किंवा कोबी.
लेट्यूसची पानं, बारीक चिरलेला
लेट्यूसची पानं, बारीक चिरलेला कांदा, मीठ साखर, सगळं नीट एकत्र करून वरून जीरं-मोहरी-हिंग-हळदीची फोडणी द्यायची. फोडणीत भरलेल्या मिरच्या घालायच्या.
पापड गॅसवर भाजून त्यावर थोडे
पापड गॅसवर भाजून त्यावर थोडे खोबरेल शिंपडून कुस्करायचे. त्यात हि मिरची अन लाल कांदा बारीक चिरून घालायचा . थोडे ओले खोबरे मिसळायचे. डाळी तोय - भात, बाळ कैरीचे लोणचे अन ही कोशिंबीर .
(यात पापडाऐवजी निखार्यावर भाजलेले सुके बांगडे घातल्यास अजून बहार )
मॅरथॉन मॅंगोचे चौकोनी तुकडे ( आधी फ्रीज मधे ठेवून थंड करुन ) घट्ट दह्यात घालायचे. वर सुकीमिरची अन मोहरी यांची फोडणी .
दोडक्याच्या शिरांची तीळ,
दोडक्याच्या शिरांची तीळ, शेंगदाणे घातलेली चटणी...अहाहा...
चटणी कुठून आली इथे? Xmas
चटणी कुठून आली इथे?
Xmas पार्टी सॅलड. तयार सॅलड मिक्समध्ये कोवळा पालक, संत्र्याच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, चेरी टोमॅटो, पिटा चिप्स चे तुकडे इ.
मलाही या फॅन क्लबची मेंबरशीप
मलाही या फॅन क्लबची मेंबरशीप हवीय
रेसिप्या विशेष काही येत नाहीत. इथे बघुन ट्राय करीन्/करवीन
सॅलड प्रेमींसाठी:
http://www.sanjeevkapoor.com/Search.aspx?SearchText=salad
बित्तु, गल्ली चुकलं
बित्तु, गल्ली चुकलं
Pages