Submitted by मी मुक्ता.. on 23 January, 2011 - 05:36
असे आज काही घडावे कशाने
तुझी याद यावी सुचावे तराणे...
कधी गायिलेले तराणे उमटता
अवेळीच यावे भरोनी नभाने...
नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...
नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्यात मिसळून जावे...
नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
नभाला कळावे तुझे गूज त्याने...
नभाने कथावे खुळ्या पश्चिमेला
तिने लाजुनी सप्तरंगात न्हावे...
अशी सांज बघता नुरावेच भान
तुझ्या आठवांनी झुरावेच प्राण...
पुन्हा आज काही घडे हे अशाने
तुझी याद आली नि सुचले तराणे....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त!
मस्त!
एकदम हळूवार,तलम, तरल.
एकदम हळूवार,तलम, तरल. नजाकतीची. आवडली.
@माणक्या, आर्च... खूप खूप
@माणक्या, आर्च...
खूप खूप धन्यवाद.. 
नाही.. तिथे त्यानेच हवं
नाही.. तिथे त्यानेच हवं आहे... त्याने म्हणजे गंधाने...
असे असेल तर
नभाला कळावे तुझे गूज त्याने-
येथे कळवावे नको का?
नभाला त्याने तुझे गुज कळवावे
नभाला त्याने तुझे गुज कळवावे किंवा
नभाला त्यामुळे (त्याने) तुझे गुज कळावे हे दोन्ही समानार्थीच आहेत... नाही का?
this is cool....i liked it.
this is cool....i liked it.
खूप आवडली.मस्तच.
खूप आवडली.मस्तच.
@नेतिरी, नोरा, आभार..
@नेतिरी, नोरा,
आभार..
'त्याने', म्हणजे त्यामुळे,
'त्याने', म्हणजे त्यामुळे, हे मला आता समजले.
धन्यवाद.
welcome अलकाजी..
welcome अलकाजी..
मस्त. खूप खूप आवडली.
मस्त. खूप खूप आवडली.
आभार सुरेखाजी..
आभार सुरेखाजी..
सहीच
सहीच
एकदम मस्त
एकदम मस्त
खूप आवडली
खूप आवडली
धन्यवाद अंजलीजी, पक्वाग्रज...
धन्यवाद अंजलीजी, पक्वाग्रज...
क्या बात है !!
क्या बात है !!
Pages