Submitted by मी मुक्ता.. on 23 January, 2011 - 05:36
असे आज काही घडावे कशाने
तुझी याद यावी सुचावे तराणे...
कधी गायिलेले तराणे उमटता
अवेळीच यावे भरोनी नभाने...
नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...
नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्यात मिसळून जावे...
नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
नभाला कळावे तुझे गूज त्याने...
नभाने कथावे खुळ्या पश्चिमेला
तिने लाजुनी सप्तरंगात न्हावे...
अशी सांज बघता नुरावेच भान
तुझ्या आठवांनी झुरावेच प्राण...
पुन्हा आज काही घडे हे अशाने
तुझी याद आली नि सुचले तराणे....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त फ्लो!!! आवडली
मस्त फ्लो!!! आवडली
धन्यवाद विजयजी..
धन्यवाद विजयजी..
वाह. लय आहे. छानच.
वाह. लय आहे. छानच.
फार छान.... आवडली. दोन ओळीं
फार छान.... आवडली.
दोन ओळीं नंतर स्पेस ठेवला तर फार बरं होईल.
नभाने करावी धरा चिंब आणि
धारेने नटावे नव्या वैभवाने
यात दुसर्या ओळीत ''धरेने'' असं असायला हवं.
लय आणि गोडवा छान आहे फक्त
लय आणि गोडवा छान आहे
फक्त सुयोग्य ठिकाणी ओळींमध्ये अंतर ठेवल्यास
वाचायला सुलभ होऊन प्रभाव वाढेल.
@निनाव, धन्यवाद.. @डॉ.
@निनाव,
धन्यवाद..
@डॉ. कैलास,
:-)बदल केला आहे.. लक्षात आणुन दिल्याबद्दल आभार..
@UlhasBhide
बदल केला आहे... धन्यवाद..
छान लयबद्ध कविता.
छान लयबद्ध कविता.
धन्यवाद
धन्यवाद
सुरेख कविता! अतिशय तरल,
सुरेख कविता! अतिशय तरल, उलगडत गेलेला प्रवास खूप आवडला.
धन्यवाद क्रांति..
धन्यवाद क्रांति..
फार छान. रेशीमलडींसारखी
फार छान. रेशीमलडींसारखी उलगडणारी सहजता आहे.
आभार उमेश..
आभार उमेश..
वा, मस्त , आवडली
वा, मस्त , आवडली
धन्यवाद अवलजी...
धन्यवाद अवलजी...
सुरेख
सुरेख
मस्तच...
मस्तच...
विशालजी, अनयजी, धन्यवाद...
विशालजी, अनयजी,
धन्यवाद...
लयीत उलगडत जाणारी कविता.. कधी
लयीत उलगडत जाणारी कविता..
कधी गायिलेले तराणे उमटता
अवेळीच यावे भरोनी नभाने... >> आवडल्या.
मस्त आवडली. लयबद्ध
मस्त आवडली. लयबद्ध कविता.
असेच लिहीत रहा.
शुभेच्छा!
चैतन्यजी, भ्रमरजी, खूप आभार..
चैतन्यजी, भ्रमरजी,
खूप आभार..
hey छान आहे... निवांत
hey छान आहे... निवांत वाचली...
शब्दकळा आवडल्या...
एकाच शब्दात - "जमलीये"..
इतक्या "विचारपुर्वक"
इतक्या "विचारपुर्वक" प्रतिसादाबद्दल आभार आनंदयात्रीजी..
सुरेख.....!
सुरेख.....!
इतक्या "विचारपुर्वक"
इतक्या "विचारपुर्वक" प्रतिसादाबद्दल आभार आनंदयात्रीजी.. >>
पुरे!! कळतात टोमणे...
'कथावे' शब्द पहिल्यांदा
'कथावे' शब्द पहिल्यांदा वाचला.'कथावे'म्हणजे 'सांगावे' असे आहे का?तसे असेल तर 'सांगितले'साठी तोच शब्द कसा वापरावा.बाकी कविता लयबध्द असल्याने आवडली.
छान लड गुंफलीय.
छान लड गुंफलीय.
व्वाह! कविता आवडली. शीर्षक
व्वाह! कविता आवडली.
शीर्षक अगदी चपखल.. मस्तच..
नभाने करावी धरा चिंब
नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...
नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्यात मिसळून जावे...
नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
...नभाला कळावे तुझे गूज त्याने
ओळी आवडल्या.
..नभाला कळावे तुझे गूज त्याने
येथे 'त्याने' आहे का ' गाणे' हवे आहे?
@वाराजी, भरतजी, किरुजी, खूप
@वाराजी, भरतजी, किरुजी,
खूप खूप आभार...
@शांतिनाथजी,
कथावे म्हणजे सांगावे याच अर्थी वापरलय... ते जरा लयबद्ध आणि व्रुत्तबद्ध होण्यासाठी तसं केलय.. आभार..
@अलकाजी,
नाही.. तिथे त्यानेच हवं आहे... त्याने म्हणजे गंधाने...
प्रतिसादबद्दल धन्यवाद..
@आनंदयात्री.. ह्म्म्म...
@आनंदयात्री..
ह्म्म्म...
Pages