Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00
झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या.
या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
र्.च्या. कं. ने. स्मिता तांबे
र्.च्या. कं. ने. स्मिता तांबे ने कोण्त्या गाण्यावर नाच केला?
तो प्रतिसाद उडवून बरेच तास
तो प्रतिसाद उडवून बरेच तास झालेले आहेत >>
मी तुमच्या साठी नाहि लिहिला हो तो. तुम्हि आधीची पोस्ट नाहि का वाचली limbutimbu ची ? त्यासाठी लिहिले. असो.
मनोजला माझ्याकडूनही विशेष
मनोजला माझ्याकडूनही विशेष अनुमोदन..
ए पे ए हा एक "हॉरर शो" आहे की
ए पे ए हा एक "हॉरर शो" आहे की काय????
कालच्या भागात नकाशाचा किस्सा
कालच्या भागात नकाशाचा किस्सा बरा सांगितला पुष्करने.....
बाकी आरती सोलान्कीचा कौतुक काल सुधा सुरु होत ,
महागुरूंना आवरा
या आठवड्याचा पहिला भाग मिसला
या आठवड्याचा पहिला भाग मिसला मी.
दुसर्या भागातले शेवटचे २ (मृण्मयी आणि उर्मिला) डान्स पाहिले. तोच तोच पणा खूप आलाय आता!
हिंदी चॅनल्स च्या रिअॅलिटी शोज मध्ये सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो. इथे त्याच त्याच लावण्या, त्याच त्याच प्रकारची गाणी यांवर विशेष वेगळ्या स्टेप्स न बसवलेले डान्स! वेगळा काहीतरी हटके डान्स प्रकार नाही!
मृण्मयी नुसती स्टेजवरून इकडे
मृण्मयी नुसती स्टेजवरून इकडे तिकडे खाली वर फक्त दाणगतासारखी फिरली फक्त... नाच ? अन त्याचेही कौतुक केले महागुरुंनी. अन तिच्या बिभत्स कृतीचेही :राग :
दुसर्या भागातले शेवटचे २
दुसर्या भागातले शेवटचे २ (मृण्मयी आणि उर्मिला) डान्स पाहिले - मी पण
मला आवडल महाग्रुंच :
मी खुष होतो तेव्हा स्टँडिंग ओबेशन
मी जास्त खुष होतो तेव्हा टोकन ऑफ अॅप्रिसियेशन (हरी पत्ती) देतो
आणि मी त्याहुनही खुष होतो तेव्हा स्टेजवर फटाके फोडतो.
उर्मिलाची लावणी झकास
मृण्मयीचा टॉमबॉय नाही आवडला. तोच तो मराठी अवघडलेपणा
बाकिच्या कोण काय काय नाचल्या म्हणे??
सुपु गेल्या - चांगला डिसिजन
नेहा जोशी - आजारी पडली (तिने चुकुन माबोवरचा हा बाफ तर वाचला नसेल ना??)
शुभांगी, परवाचा एपी नाही
शुभांगी, परवाचा एपी नाही बघितला >>>सुपु गेल्या - चांगला डिसिजन
<<< म्हणजे त्या स्वतः हून गेल्या ?
माहित नाही ग आरु पण तो विषय
माहित नाही ग आरु पण तो विषय अर्धवटच ठेवला चाणाक्ष महाग्रुंनी. सुपु आता पुढच्या आठवड्यापासुन आपल्यात नसणार अस म्हणुन पडदा पाडला त्या विषयावर. असो. पण मला तरी वाटत की त्या स्वतःहुन गेल्या असाव्यात. कारण शिकवणारे आणि पडताळणारे सगळ्यांच्यापुढे त्या थोर (अंगापिंडाने नव्हे :हाहा:)
उद्या झी टी. व्ही (हिंदी) वर
उद्या झी टी. व्ही (हिंदी) वर डी आय डी डबल्स मधे लॉकिंग पॉपिंग स्टाइल लावणी जरुर पहा ( वाजले कि बारा) :).
ट्रेलर वरून मस्तं वाटला प्रकार :).
डीजे - डीआयडी वर बाप लोक्स
डीजे - डीआयडी वर बाप लोक्स आहेत सगळे. काय नाचतात अप्रतिम.
त्यांचे मेंटॉर्स पण मेहनत घेतात ते दिसत. (फक्त अंगचटीला जास्ती येतात मुलं- मराठी डोळ्यांचा दोष :डोमा:)
विषयांतर होतय पण कुणी मागच्या
विषयांतर होतय पण कुणी मागच्या वेळचा काटे नही कटते बघितला का डीआयडीमधे? अप्रतिम नाचले ते दोघे.
अजिबात कुठेही व्हल्गर वाटले नाहीत.
अप्सरा च्या वेळि इटीव्हीवर
अप्सरा च्या वेळि इटीव्हीवर हल्ला बोल प्रोग्राम असतो. काल बिलनचि नागिन निघालीवर मस्त डान्स केला. ति मुलगी आधी ह्या सचिनच्या च प्रोग्राममधे होति. तो प्रोग्राम बराच बरा आहे अप्सर्रापेक्शा.
आरे, काल त्या चिमुरड्या
आरे, काल त्या चिमुरड्या साक्षीने सगळा अप्सरांना अस्मान दाखविले. काय ग्रेस होता...... सगळ्यांच्या तोंडात माराल्यासारखी झाली. मला तर आवडली ति छोटी.
ती आता स्पर्धक म्हणुन असणार आहे का? सुपु च्या जागेवर
नेहा जोशी - आजारी पडली (तिने
नेहा जोशी - आजारी पडली (तिने चुकुन माबोवरचा हा बाफ तर वाचला नसेल ना??)
>>>
मलाही अगदी असंच वाटलं, गुब्बे
डी आय डी डबल्स मधे लॉकिंग
डी आय डी डबल्स मधे लॉकिंग पॉपिंग स्टाइल लावणी ( वाजले कि बारा) म्हणजे फारचा वरचा दर्जा होता.
विषयान्तर तरी हे डिआय्डी
विषयान्तर
तरी हे डिआय्डी उपपर्व असल्यानी तितके 'वॉव' डान्सेस नाही पाहायला मिळत, मेन पर्व असतं त्यावेळी मास्टर टेरेन्स आणि मास्टर रेमो चे एक से एक डान्सेस म्हणजे व्हिज्युअल ट्रिट असते !!
असो, ज्यांना पहायचय त्यांच्यासाठी:
रोबॉटिक 'वाजले कि बारा' http://www.youtube.com/watch?v=duk9b1zEGUI
सुरेखा पुणेकर यांच्या भावाचे
सुरेखा पुणेकर यांच्या भावाचे लग्न आहे म्हणुन त्या पुढील भागात दिसणार नाहीत. पण एका समारंभात बोलताना त्या म्हणाल्या : "मी "रियॉलिटी शो' मधील नायिका नाही, तर "रियल शो'मधील नायिका आहे. स्टेजवर एका टेकमध्ये परफॉर्मन्स करणारी मी नायिका आहे. त्यामुळे त्या "एकापेक्षा एक'मधील नायिकांशी माझी स्पर्धाच होऊ शकत नाही''
सुपु, यांच्या कार्यक्रमातील
सुपु, यांच्या कार्यक्रमातील सहभागाने झी ला आणि महागुरुंना कार्यक्रमाचा टी आर पी वाढेल अशी अपेक्षा असावी. पण प्रेक्षकांनी पाठ फिरवली असेल त्यामुळे त्यांची कार्यक्रमातून गच्छंती झाली असेल. पण ते उघडपणे बोलण्यापेक्षा "त्यांना स्पर्धक म्हणून घेतले गेलेच नव्हते" अशी सारवासारव करत असतील.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, असा एकूण प्रकार दिसतो.
सुरेखा पुणेकर यांच्या भावाचे
सुरेखा पुणेकर यांच्या भावाचे लग्न आहे म्हणुन त्या पुढील भागात दिसणार नाहीत. पण एका समारंभात बोलताना त्या म्हणाल्या : "मी "रियॉलिटी शो' मधील नायिका नाही, तर "रियल शो'मधील नायिका आहे. स्टेजवर एका टेकमध्ये परफॉर्मन्स करणारी मी नायिका आहे. त्यामुळे त्या "एकापेक्षा एक'मधील नायिकांशी माझी स्पर्धाच होऊ शकत नाही''
>>>>>>>>>>> काहिच्या काहि. आधी सु.पु.बद्दल खूप ऐकुन होते म्हणून त्यांच्याकडुन फार अपेक्षा होत्या,पण त्यांचे डान्स बघुन बाकिच्या बर्या वाटल्या. काहि नाचतच नव्हत्या त्या.
...........म्हणून
...........म्हणून त्यांच्याकडुन फार अपेक्षा होत्या,पण त्यांचे डान्स बघुन बाकिच्या बर्या वाटल्या<<<<< .... मलातरी सुपु ठिक वाटल्या पण ईतरांचे डान्स म्हणजे.... कॉलेज गॅदरिंगची मुलमुली त्यांच्यापेक्षा निट पर्फॉम करतात,
मलातरी सुपु ठिक वाटल्या पण
मलातरी सुपु ठिक वाटल्या पण ईतरांचे डान्स म्हणजे.... कॉलेज गॅदरिंगची मुलमुली त्यांच्यापेक्षा निट पर्फॉम करतात,>>>>>>>>>>>> अनुमोदन्,पण माझ्यामते सुपु डान्स असा काहि करतच नव्हत्या,नुसत्या एका जागेवरच उभं राहुन हाताच्या हालचाली करायच्या.बाकिच्या अॅटलिस्ट स्टेजभर फिरायच्या तरी.
पण माझ्यामते सुपु डान्स असा
पण माझ्यामते सुपु डान्स असा काहि करतच नव्हत्या,नुसत्या एका जागेवरच उभं राहुन हाताच्या हालचाली करायच्या.बाकिच्या अॅटलिस्ट स्टेजभर फिरायच्या तरी. भान .अगदी अगदी............तुला मोदक.
आता आजच्या भागातला गिरीश ओकच्या मुलीचा काहीतरी खूप कॉमेडी डान्स असावासं वाटतं. बाबूजी जरा धीरे चलो वर. काल कधीतरी पाहिलं.
युप्पी आज मज्जाये माझी.. टिंग
युप्पी
आज मज्जाये माझी..
टिंग टिंग
मी आज अप्सरा आली बघून खूप हसणार
टिंग टिंग
लावणी करणार्या प्रत्येक
लावणी करणार्या प्रत्येक कलाकाराची अदा ही वेगवेगळी असते माझ्यामते. आपण पाहिलं तर लावणीत अंगाची फार हालचाल केली जात नाही. लिला गांधी, जयश्री गडकर, उषा चव्हाण या तिघिंचीही तुलना केली तर जयश्री गडकर अंगाची फार हालचाल न करता नुसत्या हावभावावर लावणी पेलायच्या.. तिथेच उषा चव्हाणने काही लावण्यांमध्ये उड्या सुद्धा मारलेल्या आहेत. चित्रपटात लावणी असेल तर त्या नृत्यात बाहेरचे काही नृत्यप्रकार, छोटे अविष्कार बहुतेक घालावे लागत असावेत, ते चित्रपट पाहूनच लावणीबद्दल आपली एक विशिष्ट मतप्रणाली निर्माण झाली आहे. खरी लावणी ही एक नुसती अदाकारी असून त्यात नृत्य फार कमी असावे. त्यामूळे सुरेखा पुणेकरची लावणी मला तरी बरी वाटली...
तसे 'आता वाजले की बारा' मध्ये
तसे 'आता वाजले की बारा' मध्ये अमृता खानविलकरने उड्याच उड्या मारलेल्या आहेत.
सोनाली खरे गेली न?
सोनाली खरे गेली न?
सचिन किंवा एपए टिम नक्की हे
सचिन किंवा एपए टिम नक्की हे पान वाचते.
काल ट्रेलर पाहिला, सर्व अप्सरांची (थुलथुलित) पोटं झाकली होती..
सचिन किंवा एपए टिम नक्की हे
सचिन किंवा एपए टिम नक्की हे पान वाचते.
काल ट्रेलर पाहिला, सर्व अप्सरांची (थुलथुलित) पोटं झाकली होती..
>>>
मलाही काल तसंच वाटलं
शिवाय सुपुंना सोडचिठ्ठी दिली. नेहा जोशीला आजाराचे कारण सांगून कटवली तेव्हाही असेच वाटले होते.
Pages