एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कडे दिसत आहे. पण इथे पेस्ट केल्यावर सेम problem होतोय.
mÕÕÆ®ÕvÕ, DÕÕlÕÕ lÕè cÕnÕiÕá© PÕÕuÕÕ DÕÕnímÕ. KÕjb lÕj lÕáuÕÕ `DÕjí-lÕájí' DÕmÕb mÕbyÕÕíOÕCÕb yÕbo JÕÀjÕ³ÕuÕÕ nkÕb. JÕÀuÕÕkÕblÕ cnCÕèvÕ lÕè KÕèhÕ®Õ cÕÕíþÕ DÕÕnímÕ. hÕCÕ lÕmÕb JÕÀÕ³Õ DÕÕcnÕÇ DÕÕÆcÕlÕÕYÕ yÕ®®ÕvÕuÕÕmÕá×, `lÕÕí' DÕÕÆcÕlÕÕYÕ cnCÕlÕÕí! DÕÕcÕ®³ÕÕmÕÕþÕÇ DÕpÕèvÕnÕÇ lÕè lÕÕí `nÕ cÕÕPÕÕ cÕÕiÕ& SJÕÀuÕÕ' cÕOÕuÕÕ yÕÕuÕmÕÕÆ®ÕvÕ DÕÕnímÕ, ÕÆJÕÀbkÕÕ `oáJÕwJÕÀÕÇ hÕí oáJÕwJÕÀÕÇ nÕí, ³ÕÕ mÕÊÕí hÕí mÕÊÕÕ' cnCÕCÕÕjÕ DÕkÕKÕU YÕÕT DÕÕnímÕ. lÕáPÕÕ DÕÕÆYÕvÕ³Õ, lÕáPÕÕ vÕÕ®Õ, lÕáPÕb JÕÀuhÕJÕÀ ÕÆoioMÕ&vÕ, lÕáPÕÕ JÕÀÕíkÕUÕ iÕÕí[ ®ÕínjÕ... ³ÕÕkÕj DÕÕcnÕÇ KÕèhÕ hÕÏícÕ JÕÀjlÕÕí DÕpÕèvÕnÕÇ! cnCÕèvÕ lÕj nÕ hÕ$Õ hÕÏhÕb®Õ...
DÕcÕçíuÕ jcÕíµÕ JÕÀ[è

अरे मस्त लेख आहे तो सॉलिड सोललाय महागुरूना. त्याला उत्तर म्हणून एका पंख्याने लेख टाकलेला पण त्यात काही दम नव्हता.
त्यानंतर काही दिवस तरी महागुरू चुप बसलेले पण ..... पुन्हा....

आता तर मला तो राखी सावंतच्या वळणावर चाललाय अस वाटत

देऊदत्त नी दिलेली लिंक गुगल क्रोममध्ये वाचताच येत नाही पण आयई मध्ये व्यवस्थित दिसतंय.

लोकसत्ताच्या पानावर जाऊन 'लोकप्रभा' वर क्लिक करा. मागील अंक मध्ये '२१.११.२००८' चा अंक सिलेक्ट करा. त्यात 'लाईफ झिंगालाला' या सदरात सदर लेख आहे. एवढं स्वतःबद्दल छापून येऊनसुद्धा परत स्वतःला 'महागुरु' म्हणवून घेऊन जजच्या खुर्चीवर बसायला गेंड्याचीच कातडी हवी. मान गये सचिन. Angry

आऊटडोअर्स, धन्यवाद! Happy इन्टरनेट एक्स्प्लोररवर हा लेख व्यवस्थित दिसला आणि वाचला पण! जबरदस्त आहे! Happy

svalekar, तुम्ही घेतलेल्या कष्टाबद्दल अनेक आभार! ज्यांना हा लेख दिसत नाही, त्यांना आता तो अगदी नक्की दिसेल... Happy

एवढा जुना लेख आहे हा आणि इतका संयतपणे लिहिलेला आहे... 'महागुरु'ने तो नक्कीच वाचला पण असेल, पण त्याच्या वागण्यात काडीमात्रही बदल झालेला नाही. धन्य आहे!!!!! _____/\_____

बाकी, कार्यक्रमाविषयी, पुष्कर श्रोत्रीचे विनोद सिझनच्या शेवटाला खरोखर चांगले झाले. गिरिजा ओक मध्ये जरा इम्प्रूव्हमेन्ट जाणवली. सगळ्याच कलाकारांचे कष्ट लक्षात येत होते. सुरुवातीला न आवडलेला हा कार्यक्रम, शेवटाला चटका लावून गेला. पुष्कर श्रोत्रीच्या कुटुंबाची सरप्राईझ व्हिजिट असलेल्या दिवशीचा भाग फार फार आवडला! Happy

महाअंतिम फेरीविषयी बोलायचं तर फार छान झाला तो कार्यक्रम! मनोरंजक होता अगदी.

महागुरुचे महागुरुपद मिरवणे हा एक भाग आणि जजेसना शेवटी मताधिकार न देणे, स्वत:चा ५०% वाटा मतात ठेवणे, ह्या गंभीर बाबी दूर्लक्षिल्या, तर मला हा कार्यक्रम ओव्हरऑल आवडला....

बापरे काय लेख लिहीला आहे...एकदम सह्हीच Happy
असच पाहीजे कुणीतरी महागुरुला बोलायला पाहीजे. मला हे माहीत नव्हत की हा कार्यक्रम ही त्याचाच आहे आणि महागुरु तो स्वतः बनला आहे ते.

Pages