एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाकली जरी असली तरी आहेत ते दिसतच होतं की.. आणि फारच अचरट डान्स होते कालचे...जो प्रकार काही झालं तरी येणार नाही त्याच्या वाटेला जायचंच तरी का????????????

निंबुडा, बस्के मी 'झी मराठी' ला मेल केला होता......
त्यात 'मायबोली' ची ही लिंक दिली होती, त्यांचा रिप्लाय आला होता की "आम्ही तुमच्या मतांचा आदर करतो आणि तुमची मतं वरिष्ठ् आयोजकांकडे पाठवली आहेत" जर खरच वाचल असेल हे तर खरच बर वाटल कार्यक्रमात थोडे बदल बघुन.....

काल हे बघवेना म्हणून चॅनल चेंज हेला तर इ मराठी की सक्याद्रीला हल्लाबोल लागलं होतं काय भन्नट नाचत होते दोघं. फार पाहता आलं नाही ...पाहुणे आले अन बंद करावा लागला टीव्ही... पण त्यांचा नाच प्रचंड आवदला ... कोणी पाहिलं का काल हल्लाबोल ?

@श्वेतांबरी..

हे तू खरच सांगतेस का?
देव तुझं भलं करो...

मी सुद्धा मेल पाठवला आहे परत.. सेम लिंक धाडली आहे Happy

धन्यवाद प्रसन्न, पण मला खरच अस वाटल की आपली मते नुसती ईथे लिहुन काय फायदा त्यापेक्षा ती चॅनेल पर्यंत पोह्चावीत म्हणुन हा सगळा खटाटोप, मराठी माणसाने आता ईतका तरी पुढाकार घ्यायला हवा

<<अरे जर खरच वाचून दखल घेतली असेल तर मग "मयुरा वैद्य" अजून कशी काय टिकलिये......>> पर्याय मिळत नसावा कदाचित.....

भुंग्या, मयुरा वैद्यला तेवढाच टफ काँपिटिटर मिळत नसेल झी वाल्यांना म्हणुन टिकुन आहे तो. Happy
काल आजच्या डांसचे प्रोमोज बघितले -
गिरीजा - शारद सुंदर चंदेरी राती (कॉस्च्युम सुधारलाय) पण गाण्याची वाट लावलिये.
भाग्यलक्ष्मी - कुठल तरी सुनिधी चौहानच गाण- ऐसा है कोई दिलवाला रे (बहुदा) वाघाच कातड पांघरुन त्यात त्या शीला च्या स्टेप्स करताना पहावल नाही.
पण एकुणातच वाट लागलिये कार्यक्रमाची. उगाच स्वतःच्या हाताने कशाला स्वतःचे नुकसान करवुन घेतात काय माहित???
किशोरी मस्त दिसत होती काल.

मयुर वैद्यला काढल्यावर आपली करमणूक कोण करणार... >> कार्यक्रमाचा टिआरपी वाढावा म्हणून असले नमुने कार्यक्रमात मुद्दाम ठेवत असावेत.. Uhoh

धन्यवाद शुभांगी ताई, आणि हो किशोरी खरच छान दिसत होती काल,मला तिची 'नवरा माझा नवसाचा' मधली लावणी फार आवडते पहायला....

ए पण श्वेतांबरी ह्या लिंकवरचं सगळं जर त्या मयुर ने किंवा एपेए च्या टिमने वाचलं असेल तर त्यांना फार वाईट वाटेल Sad

द्क्षे, कळतय मला.... पण अगं सगळ्यांसमोर यांनी आपलं आणखी हस करुन घेवु नये अस वाटत मला मनापासुन.... आपण हे प्रामाणिकपणे त्यांच्याकडे पोचवतोय, त्यांना दुखवायचा खरच हेतु नाही माझा.... मराठी कार्यक्रम हिंदीपेक्षा दर्जेदार व्हायला हवेत हीच अपेक्षा आहे, कारण जेव्हा कोणितरी अमराठी बोलतो ना "क्या वो पकाव सिरियल है ए पी ए और केहते है 'अप्सरा आली' " तेव्हा त्याला आपण विरोध करु शकत नाही, गप्पच बसाव लागतं.... तर हे सगळ आयोजकांनापण कळू दे हाच हेतू आहे गं.....कोण दुखावलं गेल असेल तर मी मनापासुन माफी मागते.........

कालचा एपिसोड अधुन मधुन बघितला
मला जे दिसल ते :
१) गिरीजा ओक - उडी निंदे आँखोंसे उडी - नाच केला का तिने?? सालसा कुठेही दिसला नाही मला. फक्त गोल गोल फिरत होती. कॉस्च्युम कॅरी करण म्हणजे डांस नव्हे हे तिला कोरिओग्राफरने सांगितल नसेल का?? (माझा तिच्यावर काही वैयक्तित राग नाही पण आता वाईट मत होत चाललय तिच्या नाचाबद्दल). सगळ्या बीट्स चुकत होत्या तरी महाग्रुंनी तिला टोकन ऑफ अ‍ॅप्रिसियेशन दिल. हे म्हणजे सरळ सरळ एल्बीडब्ल्यु असताना सचिनने आपली बॅट दामटवण झाल Sad
२) आरती सोळंकी - कुणाच्या व्यंगावर बोलु नये. पण तिला साजेश्या स्टेप्स का नाही सुचवत कोरिओग्राफर? तिने जांभुळ पिकल्या झाडाखालीवर जो नाच केला तेवढा वाईट नाच मी आजपर्यंत कधी कुठेच पाहिला नव्हता. मला तिची कीव आली. तिच टॅलेंट वाया चाललय या कार्यक्रमात अस मनापासुन वाटत. तिने वेळीच बाहेर पडाव.
३)नेहा पेंडसे - वेस्टर्न कपडे घातले आणि चार दोन उड्या मारल्या व सेक्सी हावभाव केले की संपला डांस असा अविर्भाव का असतो नेहमी? तिला दुसर काही करता येत नाही का??
४) सोनाली खरे गेली - अर्थात ज्या रेटने ती नाचत होती कचकड्याच्या बाहुली प्रमाणे, ती जाणारच होती.
बाकिच्यांबद्दल मला काही माहित नाही मी बघितले नाही.
पुन्हा एकदा किशोरी शहाणे सुंदर दिसत होती.
महाग्रुंबद्दल मला काहीच बोलायच नाही.
पुष्कर श्रोत्रीला काही पर्याय असेल तर झी वाल्यांनी जरुर विचार करावा.

खरंच ईटीव्हीवरचा हल्लाबोल चांगला आहे यापेक्षा आणि इतरही रिअ‍ॅलीटी शोज चांगले असतात.

त्यांच्यापैकी कोणी जर हा धागा वाचत असेल तर उत्तम गोष्ट आहे, सुधारणा तरी होईल. सचीन पिळगावकरांपेक्षा योग्य महागुरु मराठी फिल्म इंडस्ट्रीमधे नाहीच का याचाही शोध घ्या म्हणाव. आणि मयुर वैद्यची कॉरिओग्राफी चांगली आहे, केवळ त्याच्या तश्या असण्यावर कॉमेंट करायचे असतील तर ही ती जागा नव्हे. त्याच्या नाचाबद्दल नक्कीच बोलावं.

हल्ल बोल चे जजेस ( हर्षल-विठ्ठल) खूप सही कोरिओग्राफर आहेत.
गेलय वर्षी सोनी टि.व्ही. वरच्या डीपीएल ( डान्स प्रिमिअर लिग) मधे त्यांची 'वेस्टर्न योद्धा' टिम जिंकली फिनाले , अगदी सिझन गाजवला होता हर्षल विठ्ठल नी, मस्तं गृप डान्सेस असायचे त्यांचे.

हो प्रसन्न,zeemarathi@zeenetwork.com हाच आहे ई-मेल आय डी.....
पण मी पहिलं "my apsara" ईथे झी मराठीच्या वेबसाईट वर लिहिल होत मग त्यांचा मेल वरील आय डी वरुन आला. लिंक http://www.zeemarathi.com/EPEApsaraali/MyApsara.aspx

मुली- मुलींचा कार्यक्रम असल्याने मी बघते नेहमी... अगदीच काही वाईट नाही वाटत बघायला! आणि आपल्यापैकी कीती लोक्सना कळतो खरच डान्स? त्या अप्सरांचे प्रयत्न अगदी खरे वाटतात! त्ञांना प्रोत्साहन द्या ना, किती टीका करतात.. Sad

एकही नवी कमेंट नाही????
प्रोग्राम बंद झाला की माबोकरांनी तो बघायचा बंद केला?

प्रोग्राम बंद झाला की माबोकरांनी तो बघायचा बंद केला?

बंद कसला होतोय?? माबोकरच कंटाळले बहुतेक.....

एकही नवी कमेंट नाही????
प्रोग्राम बंद झाला की माबोकरांनी तो बघायचा बंद केला?>> अमि, मी आज हेच टायपणार होते, पण तु लिहेलेस. माझे तर टि.व्ही. पाहाणेच बंद झाले आहे(courtsy-new c.ds of Jingla toons)इथेच काहीतरी कळायचे.
उर्मिलाने कशावर नाच केला? नंतर तिच्या आईला मिठि पण मारली आसे कळाले. माझी आई म्हणालि, पण तिला गाणे आठवेना. त्या उर्मिलासाठीच पाहात होते मि.

Pages