एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि आपल्यापैकी कीती लोक्सना कळतो खरच डान्स?

डान्स म्हणजे मॉडर्न आर्ट नव्हे जे फक्त मोजक्याच लोकांना कळू शकेल. आणि सिनेमाच्या गाण्यांवर बसवलेले हे नाच म्हणजे काही भरतनाट्यम किंवा कथकली सारखे अभिजात नृत्यप्रकारही नाही, जे पाहताना काही समजले नाहीत तर 'तुम्हाला तो डान्सफॉर्मच कळला नाही' असे म्हणता येईल.

सिनेमाच्या गाण्यांवर बेतलेले नाच पाहताना कानावर शब्द पडत असतात, त्यामुळे जे पाहतोय ते त्या शब्दांशी सुसंगत आहे का एवढे पाहणा-याला कळते. आणि जिथे स्पर्धा आहे तिथे स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक योग्य आहेत का हेही लोक पाहतात. नाचाच्या कार्यक्रमातील स्पर्धक आडदांड, आडव्या देहाचे असतील तर तो नाच डोळ्यांना चांगला वाटेल का?

एका रविवारी सकाळी थोडा भाग बघितला. स्मिता तांबेने 'जीव रंगला' ह्या गाण्यावर नाच केला. मी गाणे फक्त ऐकलेय, चित्रपट पाहिला नाही. शब्दांवरुन तरी दोघांनी गायलेले आनंदी प्रेमगीत वाटले. पण टिवीवर स्मिताने जे काय केले ते काही कळले नाही. एकाच दृष्यात तिची एक हालचाल आंधळ्या माणसासारखी वाटली. बाकी आधी आनंदी भाव, मग प्रचंड दु:खी, कुंकू वगैरे विस्कटुन टाकले.. काय चाललेले काही कळले नाही आणि नंतरचे कमेंट्स पण मी ऐकले नाहीत. कदाचित कमेंट्सवरुन कळले असते. पण मग नाचात काय सांगायचे त्याची नंतर फोड करुन सांगावी लागली तर मग काय राहिले??

त्ञांना प्रोत्साहन द्या ना,
महागुरूंना बसवलेय ना त्या कामाला???? अजुन किती प्रोत्साहन पाहिजे?????? Proud

मुळचे ग्रेसफुल नाचणारे लोक, ज्यांच्या अंगात नाच आहे असे लोक वयोमानाने जाड झाले तरी त्यांचे नाच विसंगत वाटत नाहीत. सरोजखानचा कार्यक्रम मी ब-याच वेळेस पाहिलाय. ती विसंगत वाटत नाही नाचताना. हिंदीत एक खुप जाडा नृत्यदिग्दर्शक आहे (गणेश हेगडे????) मी त्याला एकदोनदा टिवीवर पाहिला. तो प्रचंड जाडा असुनही त्याच्या डान्सस्टेप्स अगदी सहज वाटतात. त्या स्टेप्स पाहताना शारिरीक जाडी अजिबात खटकत नाही. मी गोपिकृष्णाचेही नाच पाहिलेत. हालचाली इतक्या ग्रेसफुल असायच्या की बेढब झालेले शरीर खटकायचे नाही..

आरतीचा नाच मी पाहिला नाही. पण इथे ब-याच जणींनी तिची तारिफ केलीय. जाडी असली तरीही तिचा नाच ग्रेसफुल आहे असे इथले वाचुन वाटते.

.

साधना,नाचते ती बरी, पण माझा प्रश्न असा आहे की, सगळ्यांना नाचच का यायला हवा? ति चांगली विनोदी अभिनेत्री आहे, तिने अभिनय करावा. मृण्मयी, उर्मिला या नाच शिकलेल्या आहेत, बांधा सडपातळ आहे, बघायला बरे वाटते, इतकेच.

साधना तो गणेश हेगडे नाही नुसता गणेश (साधारणतः गोविंदाचे सगळे आजवरचे डांस त्याने कोरिओग्राफ केलेत) गणेश हेगडे पण कोरिओग्राफर आहे पण बारिक आहे (ऋतिकला बर्‍याचदा तो कोरिओग्राफ करतो) त्याचा स्वतःचा एक अल्बम आला होता मधे- दिल लगाना. असो.
विषयांतराबद्दल क्षमस्व.

आरती कुणाला ग्रेस्फुल वाटत असेल तर क्षमस्व पण मला तरी ती सगळ्या गाण्यात स्टेप्स पाट्या टाकत करत असलेली दिसली. असो. जाड असणे हे व्यंग नाही पण त्याचा ग्रेसफुली वापर करणे ही कला आहे.
उदा. निर्मिती सावंत आणि वरती कुणी म्हणाल्याप्रमाने- सरोज खान, फराहा खान, गीता कपुर (ह्या सगळ्या जाड्या कॅटॅगरीत मोडतात पण नाचायला लागल्या की भले भले थक्क होतात)

आणि टि.व्ही वाल्यांना काय सिद्ध करायचे आहे? एवडी जाड आसुन पण काय नाचते पहा? पण म्हणुन तिची मृण्मयी, उर्मिला याच्यांशी स्पर्धा होवु शकेल काय?

साधना.......धन्यवाद गं, मनातलं टाईपलस....
अगं खरच एक्स्प्लेन करावा लागला स्मिताचा डान्स... म्हणजे अर्थ असा होता कि ती एक आंधळी स्त्री असते आणि तिच तिच्या नवर्‍यावर खुप प्रेम असत, विश्वास असतो, पण नंतर तिला कळत (कस ते माहीत नाही) कि तो तिच्याशी प्रामाणिक नाही मग ती तुटते....... अस काहीस होत ते.
<<एकाच दृष्यात तिची एक हालचाल आंधळ्या माणसासारखी वाटली>> मला ही हेच वाटल आणि गेस्टला (त्यावेळी मला वाटत गेस्ट सुप्रिया होती) पण तेच वाटल.....

आरती मु्ळची नाचणारी आहे की नाही माहित नाही पण तरी खूप चांगल नाचते. आता तिच्याकडे लचकणारी कंबर नाहिये पण ज्यांच्या आहेत त्यांच्यापैकी कितिजणींच्या लचकतात? मी काही तिचि वकिल नाही पण फक्त जाड आहे म्हणुन तिने नाचु नये हे मला पटत नाही.

इथे जर कोणाला राग आला असेल तर माफी असावी मी आपल मनात आल ते सांगुन टाकल.

साधना,नाचते ती बरी, पण माझा प्रश्न असा आहे की, सगळ्यांना नाचच का यायला हवा

आता नाचाच्या कार्यक्रमात भाग घेतला म्हणजे नाच यायलाच हवा.... अगदीच शिकाऊ उमेदवार असेल तर स्पर्धा कशी होणार?

रच्याकने, आरती ग्रेसफुल आहे का ते माहित नाही, कारण मी अजुन तिला पाहिलेले नाही पण जाड असली तरी माणसे ग्रेसफुल नाच करु शकतात. इथे तिची तारीफ वाचुन मला वाटले की कदाचित ती वासरात लंगडी पण शहाणी गाय आहे

सगळे निरुत्तरीत प्रश्न आहेत.
१) आरती खरच नाचते का? (स्पर्धेच्या या लेवलला कोळिणीचा 'मला लगीन कराव पाहिजे' खरच दर्जेदार आहे का?)
२) गिरीजाला आजवर कुणीतरी कंबर हलवताना पाहिलेय का??
३) मृण्मयी कायमच चेहर्‍यावर लहान मुलीचे भाव का ठेवते अगदी कॅबरे गाण्यालाही??
४) स्मिता तांबेने कितीही डिसेंट नाच केला तरी ती चीप का वाटते??
५) उर्मिला कानेटकर मीच स्पर्धा जिंकणार या अविर्भावात का नाचते प्रत्येकवेळी?
६) ऐन मध्यावर सुरेखा पुणेकर का गेल्या कार्यक्रमातुन?
७) सोनाली खरेच एलिमिनिशन किती खर होत?
८) नेहा जोशी खरच आजारी पडली की तिने कार्यक्रम सोडला?
९) नेहा पेंडसे नेहमी उथळ गाण्यांवरच का नाचते?
१०) मराठी कार्यक्रमात हिंदी गाणीच का जास्त घेतली जातात नाचण्यासाठी?
११) ह्या सगळ्या किती शास्त्रीय नृत्य शिकल्या आहेत?
१२) अप्सरा निवडताना कुठली फुटपट्टी लावली होती?
१३) पुष्कर श्रोत्री खरच चांगला होस्ट आहे का?
१४) परिक्षक निवडताना प्रत्येक वेळी फुलवा खामकर घरच्या आहेरासारखी रिझर्व सीटवर का असते?
१५)सर्वात महत्वाचे खरच सचिनला महागुरु म्हणावे का? त्याला अस कितिस कळत नाचातल?

<<<मराठी कार्यक्रमात हिंदी गाणीच का जास्त घेतली जातात नाचण्यासाठी?>>> अगदी अगदी, फार राग येतो मला या गोष्टीचा मराठी गाणी नसल्यासारख वागतात.... कि यांना कोरिओग्राफ करता येत नाहीत मराठी गाणी..?????

शुभांगी, प्रचंड प्रचंड अनुमोदन १०० %. हमारे मुह की बात छिनली आसे म्हणतात ना तसेच.

- गिरीजा चे XXXL दात पाहूनही सगळे जण तिला "तु फार सुन्दर दिसते आहेस" असे परत परत का सान्गतात?
- अप्सरान्चे कौतुक झाले की त्या उड्या मारत पुक्याला मिठि का मारतात?
- आरती सतत वेड्यासारखी का हसते?
- महा"पीळ"गुरु...स्वत:ला गाणे, नाच, शेर, साहित्य, ठेका, expressions वगैरे सगळ्यातले महागुरु का समजतात?
-comments देताना परिक्शक स्वतःला मराठी फार नीट बोलता येत नाही असे का भासवतात. (एका ५ शब्दान्च्या वाक्यात ३ व्हिन्ग्लिश वर्ड्स यु नो?)

-comments देताना परिक्शक स्वतःला मराठी फार नीट बोलता येत नाही असे का भासवतात. (एका ५ शब्दान्च्या वाक्यात ३ व्हिन्ग्लिश वर्ड्स यु नो?)
ऑसम, फॅन्टॅब्युलस, माईंड ब्लोईंग याला काय मराठी प्रतिशब्द आहेत का?? आणि असले तरी परिक्षकांना माहिती पाहिजेत ना? आणि माहिती असुन त्यांनी उच्चारले तर त्या अप्सरांना कळायला पाहिजेत ना? Lol Rofl
नाहितर अप्रतिम नाच केलास, चेहर्‍यावरचे भाव अतुलनिय होते अस परिक्षकांनी म्हणल्यावर त्यांची तोंड बघत बसतील या अप्सरा Lol

आजकाल डान्स चे प्रचन्ड gymnastiकीकरण झाले आहे असे सगळ्याच डान्स शोजवरून वाट्ते. साधा सोपा पण छान नोर्मल डान्स क्वचित आढळतो. जसा वैजयन्तिमाला चा मधुमती मधला नाच.

<<< स्वत:ला गाणे, नाच, शेर, साहित्य, ठेका, expressions वगैरे सगळ्यातले महागुरु का समजतात? >>.

मलाही 'एकापेक्षा एक' हा प्रोग्राम सुरू झाल्यापासून पडलेला प्रश्न आहे.

आजकाल डान्स चे प्रचन्ड gymnastiकीकरण झाले आहे असे सगळ्याच डान्स शोजवरून वाट्ते. साधा सोपा पण छान नोर्मल डान्स क्वचित आढळतो. जसा वैजयन्तिमाला चा मधुमती मधला नाच.

अगदी अगदी प्रचंड प्रमाणात अनुमोदन
सगळ्याच डान्स शो मध्ये कसरती केल्यासारखं नाचतात

डोक्यात जात ते

पण आपल्या मूर्ख अप्सरांना त्या कसरती सुद्धा नीट करता येत नाहीत...

आणि काल गीरीज्याच्या साखरपुड्याची पब्लिक मध्ये चर्चा करण्याची गरज मला कळली नाही
...
असो

जे जे होईल ते ते पाहावे (आन कुत्र्यागत हसावे )

अस काय करताय.. महागुरुंनी झलक दिखला जा मध्ये पहिला नंबर नव्हता का मिळवला?????????

>>>>>>>>>> नच बलिये मध्ये ..... तेपण सुप्रियाबरोबर.
तेव्हापासुनच कदाचित त्याचा गैरसमज झालाय कि त्याला उत्तम नाच येतो Uhoh

फिल्म इंडस्ट्रिमध्ये एक गैरसमज आढळतो - एखाद्या माणसाने २०-३० वर्षे त्याच्यात काढलीत म्हणजे तो त्याशी रिलटेड फिल्ड्स्मह्द्ये अगदी एक्पर्ट झालाय.... महागुरूचे तेच झालेय.

कालाय तस्म्ई नमः
बिरजू महाराज, सितारादेवी, गोपीक्रिश्न महाराज वगैरे लोक ज्यान्नी आपली आयुष्ये न्रुत्यकलेसाठी वाहीली ते सुद्धा स्वतःला शेवट्पर्यन्त साधक समजत. (महागुरु नाही)
इथे म्हणजे..... "आपलीच मान आणि आपलाच दिवा"

Pages