एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक भा प्र.

माप्रिप्रीक मधली शमिका नाचत नाही का?
म्हणजे ती या अप्सरांमधे नाहिये म्हणून्.. नाहीतर मी हा प्रोग्राम अगदीच कधीतरी बघितलाय. २-३ वेळाच.
पण एक आपली शंका आली म्हणून विचारलं. Happy

आरती सोळंकी मुळे कलात्मक आणि विनोदी अशी दोन्ही अंगे दणदणीत असणारा कार्यक्रम बघायला मिळतो आहे. तिलाच विजेती घोषीत करायला हवे शेवटी. म्हणजे हा कार्यक्रम फु बाई फु पेक्षा सॉल्लीड कॉमेडी होईल!!!

कालचा भाग पाहिला.

सारिका हिंदीत का बोलते?? मी तर ऐकलेले की ती मराठी आहे म्हणून! काही मराठी सिनेमांमध्ये कामही केले आहे ना तिने?? Uhoh

काल नेहा पेंडसे आजारी असल्यामुळे बाहेर गेली कार्यक्रमातून अस पुष्क्याने जाहीर केलं...... अश्या कश्या आजारी पडतात या अप्सरा???? (डाएटींग वर असाव्यात ईथले प्रतिसाद वाचुन..............)

<<१५)सर्वात महत्वाचे खरच सचिनला महागुरु म्हणावे का? त्याला अस कितिस कळत नाचातल? >>...त्याची काही काही निरीक्षणं फार सूक्ष्म-अचूक असतात ! अमुक एक बिट मिस झाला...आणि ते रिप्ले दाखवतात त्यामुळे कळतं. नाहीतर एवढं लक्ष देउन कुठे नाच पाहतो आपण?

अर्थात काही काही वेळेला ते फार वहावत जातात हे खरंच!

>>>>>डाएटींग वर असाव्यात ईथले प्रतिसाद वाचुन
झेपत नाहीत ती कामं करतात कशाला कळत नाही.. डाएटींग, डान्स वगैरे.. Happy

बाकी अ.डों. ना अनुमोदन..

काल का परवा पहिल्यांदा पाहीला हा प्रोग्राम
...नेहा पेंडसेनी "मोरा गोरा अंग लैले" वर बॅले केला...ओके टाइप्स
नंतर कथकली हा नृत्यप्रकार जिने कोणी केला तो फारच भयंकर होता.

हल्ली कार्येक्रम हा आरती काकूंच्या स्मृती अर्रर स्तुती प्रीत्यर्थ चालवतात कि काय असा वाट्त ..
किती ते कौतुक ?

सचिन काका तर आपल्या बाल्पनिच्याच आठवणीत रमलेले असतात
त्यांची तो पुष्कर काका अजून लाल का पिवळी करत असतो

त्या मयुरी मावशी मात्र त्यांचे डोळे का भुवया उडवून मला फार्र फार्र घाबरवतात
मग मी टीवी दान्न्दीशी बंद करून , म्यान वासेस वाईल्ड बघत बसतो

'चॅनल बदलुन मॅन वर्सेस वाईल्ड बघत असतो' अस म्हणायच आहे का प्रसन्न.. टी व्ही बंद करुन कसे बघणार कार्यक्रम... (हलके घ्या)
बाकी आरतीच्या बाबतीत सहमत.......

>>>मग मी (एक) टीवी दान्न्दीशी बंद करून , (दुसर्‍यावर) म्यान वासेस वाईल्ड बघत बसतो
असं म्हणायचं असावं त्यांना. Proud

कालच्या एपिसोड चे अपडेट्स नाही टाकले कुणी. मी काय बी बघितलं न्हाई काल. Proud
लवकर सांगा.

प्रोमोज मध्ये त्या अभिची अप्सरा (शमिका) आता ए.पे.ए. मध्ये एंट्री करत आहे असे दाखवत होते गेले काही दिवस.

मी हल्ली एपिसोड्स बघतच नाही..... इथेच इतकी उद्बोधक आणि कार्यक्रमबाह्य निरिक्षणं वाचायला मिळतात की बस्स.... Wink

तसेही अप्सरांमध्ये बघणेबल कोणीच नाही......... आणि मयुरी वैद्यला बघण्याएवढी वाईट वेळ अजून आलेली नाही Proud

प्रोमोज मध्ये त्या अभिची अप्सरा (शमिका) आता ए.पे.ए. मध्ये एंट्री करत आहे असे दाखवत होते गेले काही दिवस.

>>>>>>>>>>>>> हो हो काल कुणी तरी चंद्रकोरीवर बसून (पडदानशीन) या बिचार्‍या पृथ्वी तलावर अवतरतेय असं काही तरी दाखवलं होतं. देवा काय काय बघायला लावणार आहेस !...ती बहुतेक शमिका असावी!

अरे देवा!!
मी काही दिवसांपूर्वी इथे विचारलं होतं, की ती शमिका नाचत नाही का? म्हणून!!
भोगा आता आपल्या प्रश्नांची फळं!! Sad

<<काल नेहा पेंडसे आजारी असल्यामुळे बाहेर गेली कार्यक्रमातून अस पुष्क्याने जाहीर केलं.>>
हो की काय? मी मागच्या आठ्वड्यात बघितलच नाही.
फुलुनी सान्गितल की ती ( नेहा)काम करत असलेल्या मालीकेच्या शुटीन्ग मुळे तीला इथे वेळ देण अशक्य झाल्यामुळे तीनी डान्स विसरल्याच नाटक केल.आणि तिला बाद केल.
रच्याकाने फुलु म्हणजे फुलवा खामकर. ती माझी नातेवाइक आहे.

एपेए च्याच वेळेला इ-टीव्हीवर एक नाचाचा रिअ‍ॅलिटी शो असतो. काल झलक बघितली. एपेए पेक्षा लssssssssय भारी वाटला. (अर्थात तसे सगळेच शो एपेए पेक्षा चांगले असतील म्हणा). त्याची tag line पण सही आहे - 'बकबक कमी, डान्सची हमी'. महाग्रु वाचत असाल तर बोध घ्या! Happy

परवा जग्गुदादा होते गेस्ट परिक्षक म्हणून... आणि त्यांच्या विनंतीवरुन कोणीच बाहेर गेले नाहीत. ४ जणीच राहिल्या होत्या. आणि काल पाचवी दाखल झाली.. शमिका(मृणाल दुसानिस)

मृण्मयी, गिरिजा, आरती, उर्मिला आणि मृणाल. अशा पाच जणी आहेत... कॉलबॅक बहुतेक कॅन्सल झालेला दिसतोय.. बाकीच्यांना वेळ नसल्यामुळे किंवा त्यांनी नकार दिल्यामुळे.. म्हणूनच नवीनच वाईल्ड कार्ड एंट्री दिलीये...

तुम्ही लोकं इतके बघु तरी कसे शकता अजुन? काय त्या जाड्या धबाड्या मराठी नायिका.
एक दोन भाग बघितले त्यात तरुण असुन पण त्यांची पोटं काय सुटलीत.

त्यांनी डिआडी बघावा हिंदीतला व गप्प बसावे.

झलक मध्ये पण इतके काहि खास नाचत नाहीत , डिआडि एकदम उच्च.
सचिन बद्दल न बोललेले बरे... आचरट पणा सोडेल तर बरे होइल.

अजून एक मोठा फालतू point तुम्ही सगळ्यांनी मिस केलेला आहे .

ते पुष्कल काका कि नाही .. प्रत्येक नाच (?) झाल्यावर जेव्हा गुण जाहीर करतो, कि बै तुला दहा पैकी समजा ७ गुण मिळाले आहेत,

तर मग तो पुढे हि टेप का लावतो , म्हणजेच तुला १०० पैकी ७० गुण मिळाले आहेत!!!!!!!
आता हे कशाला सांगायला हवं, त्याने काय फरक पडणार आहे?
जर १० पैकी ७ तर १०० पैकी ७० रच असणार....
पब्लिक काय " चू*" आहे काय?

प्रत्येक नाचानंतर हे तो बडबडतो, आणि टाळ्या वाजवायला सांगतो, असला डोका सटकतो ना...

Lol
पुष्क्याला आपलं गणित चांगलं आहे हे दाखवायचे असेल
असो, उत्तम डान्स पहायचेच असतील तर डाइंडा, झदिजा (हा तर केवळ माधुरीसाठी पहावा) असे मातबर कारेक्रम आहेतच की.

डिआडी मध्ये डान्सच्या नावाखाली कवायती करतात असे वाटते. हिप हॉप, लॉक एंड पॉप अशी काहितरी नावं देऊन कवायती करत राहतात. एक चकधूम धूम नावाचा प्रोग्राम येतो तोही तसाच

<<काय त्या जाड्या धबाड्या मराठी नायिका>> Lol
मी पण हेच म्हटल होत " गिरीजा" आणि "आरती" जाड्या आहेत.
तर कोणीतरी म्हटल होत गिरीजा ला जाडी म्हणु नका प्लीज.
अरे जाड्या आहेत तर जाड्या आहेत.
न म्हणण्यानी, त्या बारीक थोड्याच होणार आहेत?
आजच्या " टेलीरन्जन" मधे अरुण काकतकर" यानी पण हेच म्हटलय.

Pages