निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु,
काल खुप इच्छा होती पण जमलं नाही..(वर्किंग डे असल्यामुळे)
११ वाजता मी कल्पना केली की सगळे जमलेत आणि दिनेशदा सगळ्यांना छान माहिती देत आहेत अशी !
Happy

अचानक काम आल्याने मला जमलं नाही.... मी एका चांगल्या अनुभवास मुकलो.
डॉक,
सेम टु सेम !
पुढच्या वेळी असं म्हणु नका, मी पण नाही म्हणणार !
Wink

अनिल Happy

विजय, साधना मला ते सावलीने दिलेल झाड कुठे दिसल नाही. चर्चा दिसली. प्लिज मला कुठल्या पानावर आहे ते सांगा. उत्सुकता लागली आहे.

मी तर काल रात्री वाचले की तुम्ही सर्वजण जमणार आहात Sad

महाराष्ट्र नेचर पार्क मध्येही भेटू या का एकदा?

आता बदलापुरच्या गटग नंतर देशिल काय राणिच्या बागेचे फोटो ?
जागु,
अनुमोदन !
जिप्सी,
लवकरात लवकर सादर कराल हिच अपेक्षा ठेवुन आम्ही (नुसतीच) वाट पहात आहोत.
Happy

तसा मी काल आलो असतो तर आतापर्यंत फोटो आणि वृतांत दोन्ही टाकले असते !
Lol

तसा मी काल आलो असतो तर आतापर्यंत फोटो आणि वृतांत दोन्ही टाकले असते !

अनिल आता पुढच्या गटगच्या वृतांताची जबाबदारी तुमच्यावर.

जागु,
मी तर गंम्मत केली होती, मला माफ कराल हि अपेक्षा !
कारण वृतांत या शब्दाचा अर्थ काय आहे,हे अलिकडेच कळायल लागलेयं !
Happy

नाही नाही अनिल आता तुम्हाला कोणीच माफि देणार नाही. साधना, मी, जिप्सि, यो-रॉक्स कोणीच माफि देणार नाहीत तुम्हाला आता तुम्हाला पुढचा वृतांत द्यावाच लागेल. पुढच्या गटग पर्यंत वृत्तांत ह्या शब्दाचा अर्थही तुम्ही शोधुन काढणार आहात आणि लिहीणार आहात.

मी प्रयत्न करेन असं मी त्यांना म्हटलं होतं कारण घरी पाहुणे होते. पण नाहीच जमलं.... पुढच्या खेपेला नक्कीच.

अनिल सावलि ची लिन्क http://www.maayboli.com/node/21676?page=3
साधना सावली ने तुला झाडाचा पत्ता दिला होता का?
नन्तर मनाला चुट्पुट लागायला नको.पुण्याला शोधण्या पेक्षा ठाणे परवडेल.

नाही हो विजय, सावलीचे फुल पांढरे आहे आणि ते शेफ्लेराचे आहे. सोनसावरीचे झाड मी पारसिक वर शोधते. मला दिसले नाही कधी. सामान्यतः फुले आलेली झाडे माझ्या नजरेतुन सुटत नाहीत तरी परत एकदा शोधेन. पारसिकवर सगळी लाल काटेसावर आहे.

गटग कसं झालं? वृत्तांत टाका लवकर.
जागू, विजय साधनाने लिंक दिली आहे. ते झाड बघायच असेल तर ठाण्याचा पत्ता सांगु शकते.

मी वृ लिहुन योग्याच्या स्वाधिन केलाय आता तो फोटू डकवुन इथे कधी टाकतो ते पाहायचे.. Happy

मी वृ लिहुन योग्याच्या स्वाधिन केलाय आता तो फोटू डकवुन इथे कधी टाकतो ते पाहायचे..>>>>>यो रॉक्स लवकर फोटो डकवून टाक रे वृतांत. Wink

योग्या, ५०० व्या पोस्टीबद्दल मी तुझे नी धागामालकिण जागुचे अभिनंदन करायला आले तर इथे बॅडमिंटनचा डाव रंगलाय...... Happy

साधना, माधव Happy

मी आज वृतांतामध्ये फोटोची लिंक टाकतो. उद्यापर्यंत येईल सचित्र वृतांत Happy

खालील झाडे मला लोणावळ्यात दिसली. लांबुन गुलमोहरासारखाच भास झाला. पण पाने आणि फुले दोन्ही वेगळीच. ह्याचे फुल मोठे आहे. जवळुन तर खुपच सुंदर दिसत होती फुल. काय नाव आहे ह्या झाडाचे ?
jhad_0.JPGjhad1_0.JPG

ही झाडं बँगलोरला खुप आहेत.
त्याला फ्लेमिंग ट्युलिप म्हणतात असे कुठेसे वाचले.

जागू, माझ्या ऑफिसजवळ आहे हे झाड, नेमके आजच याचे खाली पडलेले एक फुल उचलुन घेतले Happy

रच्याकने, पवई हिरानंदानी परीसरातही हिरानंदानी बिल्डरने बरीच चांगली झाडे लावली आहेत आणि देखभालही चांगल्याप्रकारे केली आहेत.
मी पाहिलेली या परीसरातील मला ओळखु आलेली काही झाडे:
१. कदंब (ऑफिसला जाताना रस्त्याच्या दुतर्फा लावली आहेत. सध्या फुल बहरण्यास लागली आहे).
२. सप्तपर्णी
३. उंडी
४. वर जागूने दिलेल्या फोटोतली झाडे

जागुचे पहिले झाड स्पॅथेडिया आहे. याची फुले अगदी प्लॅस्टिकसारखी चमकतात उन्हात. आता फुलावर यायला लागलेय हे झाड. पुढच्या महिन्यापर्यंत भरुन जाईल फुलांनी. दुसरेही झाड त्याच फुलांचे आहे काय? मी ह्याचे मोठे वृक्षच पाहिलेत त्यामुळे फुले जवळुन पाहिली नाहीयेत अजुन. शिवाय ती फुले कायम कपासारखी वरती तोंड करुन असतात त्यामुळे कॅमे-यात बंदिस्त करुनही आतली रचना पाहता येणार नाही. आता कोणी मुद्दाम माझ्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली तर गोष्ट वेगळी Happy

काल विजयच्या बदलापुर फार्मला भेट दिली. i was really feeling J Happy

फार्म मस्त आहे, भाज्या वगैरे लावल्यात (माझ्या फ्रिजमध्ये आहेत आज Happy ) आणि झाडेही भरपुर लावलीत जी अजुन बाल्यावस्थेत आहेत. एकुण रचना पाहता लवकरच तिथे एक छानसे जंगल होईल असे वाटते आणि विजयचा तोच हेतू आहे.

विजयनी श्री. राजेंद्र भट उर्फ राजुदादा ह्या शेतक-याशी ओळख करुन दिली. त्यांचाही फार्म पाहिला. राजुदादांनी त्यांचे शिक्षण जरी इंजिनीअरींग मध्ये केले असले तरी ब-याच वर्षांपुर्वी तो नाद सोडुन ते शेतीत उतरले. एकुणच निसर्गाचे अफाट ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि शेतीविषयक भरपुर अभ्यासही. ते स्वतः शेतीविषयक लेक्चर्स देतात्/अभ्यासवर्ग/वर्कशॉप्स घेतात. ऑर्गनिक आणि नॅचरल अशी दोन्ही प्रकारची शेती ते बदलापुरला त्यांच्या जागेत करतात आणि त्यापासुन उत्पन्न घेतात. चांगल्या प्रतीच्या झाडांची नर्सरीही त्यांच्या जागेत आहे. त्यांचा फार्म ऑर्गॅनिक शेतीसाठी properly certified आहे. त्यांच्याशी बराच वेळ शेतीविषयक आणि सध्याच्या केमिकल शेतीपासुन सेंद्रीय शेतीकडे कसे जावे यावरही बरीच चर्चा झाली. माझ्याकडे जरी सध्या शेत नसले तरी भाऊ शेती करतोय आणि त्याला ही चर्चा बरीच फलदायी ठरली. विजयचे यासाठी आभार मानावे तितके थोडेच. त्यांच्या फार्मचे फोटो आहेत जे इथे टाकते रात्री.

Pages