वेचीत वाळूत शंख शिंपले......

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कसं ना आपण मोठ्ठे होता होता बालपण हरवतं ... आणि पुन्हा मग थोड्याच काळात आपल्याच मुलांच्या रुपात पुन्हा गवसतं.. आता लेकाला बघून पुन्हा वाटतं आपणही लहानपणी समुद्र ..पाणी.. ते शंख शिंपले...किनार्‍यावरची वाळू बघून असंच हरकून जायचो... तासनतास खेळायचो... न कंटाळता न दमता... मुरुडेश्वरच्या विस्तीर्ण समुद्रकिनार्‍यावर श्रेयानही तसाच मस्त एंजॉय करत होता.

पण छोट्या पिल्लाला घेउन पाण्यात मस्ती करणं मला शक्य नव्ह्तं. मग शंख शिंपले शोध.. स्टारफिश बघ...वेगळ्या अनोख्या वाटणार्‍या गोष्टींचे फोटो काढ असं करून जेव्हा कंटाळा आला.. मग टाईमपास म्हणून समोर दिसणार्‍या मोठ्या शंकराचं चित्र काढुया म्हणत.. हा एक वाळूतल्या चित्राचा प्रयत्न केलाय.
बरं जमलंय असं वाटलं म्हणून तुम्हा मायबोलीकर मित्र् मैत्रींणींसोबत शेअर करतेय.

shiv1.jpgshiv2.jpgshiv3.jpgshiv4.jpg

खुप छान.. आमचा गुरुमठ मुर्डेश्वरपासुन जवळच आहे. त्यामुळे मुर्डेश्वरला जाणे होतेच. तिथला मंदिराचा परिसर सुद्धा छान आणि मुख्यत्वे स्वच्छ आहे. baakI phoTo aaNi lekh lavakar yevude. Happy

मस्तच!!!!
बरं जमलंय असं वाटलं >> बरं नाही छानच जमलय.. नि शेवटच्या फोटोत पुर्ण चित्र छानच वाटते आहे..>>>>>यो ला अनुमोदन Happy