Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
१११/३ ... काहीही होउ शकतं...
१११/३ ... काहीही होउ शकतं...
पुढच्या २ दिवसात पाऊस किंवा
पुढच्या २ दिवसात पाऊस किंवा ढगाळ वातावरण असेल आणि दोन्ही दिवशी मिळून ३-४ तास खेळ झाला तरी आपण जिंकू. पण लख्ख ऊन पडले तर आफ्रिका जिंकेल.
पावसाची शक्यता आहे म्हणूनच
पावसाची शक्यता आहे म्हणूनच द.आफ्रिका ४.५ च्या सरासरीने होतील तेव्हढ्या धावा आजच करून घ्यायला बघत होते. सचिनने मधूनच एखाद्-दुसरी ओव्हर टाकणं, हे आजचं आणखी एक शुभलक्षण. विश्वचषकात अशी फिरकीतली विविधता खूप उपयोगी पडूं शकते.
<<लक्ष्मणची इनिंग बघण्याचे भाग्य लाभले>>केदारजी, १००% सहमत. किती शांत, एकाग्र होऊन खेळत होता. ९वी विकेट पडल्यावर होतील तेव्हढ्या धावा संघासाठी जमवाव्या म्हणून त्याला शतकाचा विचार न करतां धोका पत्करावा लागला. एक अप्रतिम खेळी !
आताची जोडी उद्या सकाळी लवकर फुटली तर द. आफ्रिकेवर खूपच दडपण येऊं शकतं. श्रीशांतने आज छान गोलंदाजी केली. भज्जीचे चेंडूपण वळत व उसळतही होते. नक्कीच आशा वाटण्यासारखी स्थिती आहे !! ऑल द बेस्ट, इंडिया !!
हरभजनच्या बरोबरीने मधूनमधून
हरभजनच्या बरोबरीने मधूनमधून सेहवागच्या फिरकीचा देखील उपयोग करून घेतला पाहिजे.
इंग्लंड....
इंग्लंड....
ऑस्ट्रेलिया -) एक डाव १५७
ऑस्ट्रेलिया -):अरेरे: एक डाव १५७ धावानी हरणं व तेही अॅशेस मालिकेत !
संध्याकाळ पर्यंत निकाल लागवा
संध्याकाळ पर्यंत निकाल लागवा ही अपेक्षा
<<संध्याकाळ पर्यंत निकाल
<<संध्याकाळ पर्यंत निकाल लागवा ही अपेक्षा>> पण कुणाचा, हाच तर खरा सस्पेन्स आहे !!!
(No subject)
:d
आज सकाळी आकाश निरभ्र असून ऊन
आज सकाळी आकाश निरभ्र असून ऊन पडलेले आहे. दुपारनंतर पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. आफ्रिका पहिल्या २-३ तासातच फटकेबाजी करून ३०३ च्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयन्त करेल. काल पुजारीने कॅलिसचा सोडलेला सोपा झेल महागात पडणार.
कॅलिस पडला.
कॅलिस पडला.
आणि आता डी व्हिलिअर्सला
आणि आता डी व्हिलिअर्सला पंचांनी पाडला.
<<कॅलिस पडला>>पडला? मॅचमधल्या
<<कॅलिस पडला>>पडला? मॅचमधल्या सर्वोत्तम चेंडूने स्रीशांतने काढला त्याला !
डी व्हीलीअर्स पण गेले; भज्जीने सापळा लावून त्याला पायचीत केलंय. द.आफ्रिका- १३७-५. सामना हातात आल्यासारखा वाटतोय आता !!
आता बाउचरची पाळी.
आता बाउचरची पाळी.
बाउचर गेला रे....
बाउचर गेला रे.... टाळ्या
1४३/६
>>> मॅचमधल्या सर्वोत्तम
>>> मॅचमधल्या सर्वोत्तम चेंडूने स्रीशांतने काढला त्याला !
अनुमोदन. जबरदस्त चेंडू होता तो.
मॅचमधल्या सर्वोत्तम चेंडूने
मॅचमधल्या सर्वोत्तम चेंडूने स्रीशांतने काढला त्याला ! >>> अगदी अगदी
डी व्हिलिअर्सला धापला
स्टेन पण गेला. कुठल्याही
स्टेन पण गेला. कुठल्याही परिस्थितीत पुढच्या तासाभरात सामना संपविला पाहिजे.
स्टेन गेला ! झहीरचे तीन आ़खूड
स्टेन गेला ! झहीरचे तीन आ़खूड टप्प्याचे चेंडू व मग पूर्ण लाबीचा आऊट स्विंगर. स्लीपमध्ये झेल देवून स्टेन परतीच्या मार्गावर ! १५५-७
हुर्रे. ८७ रन ने जिंकलो.
हुर्रे. ८७ रन ने जिंकलो. जियो लक्षा.
जितम जितम...
जितम जितम...
हाच तर खरा सस्पेन्स आहे !!!
हाच तर खरा सस्पेन्स आहे !!! >>> भाऊ सस्पेन्स संपला... आता एखाद धम्माल व्यंगचित्र येऊ देत
<<आता एखाद धम्माल व्यंगचित्र
<<आता एखाद धम्माल व्यंगचित्र येऊ देत >>इंद्रधनुष्यजी, तुमच्या पोस्टमधलं नाचणारं चित्र यापलिकडे धम्माल कांही असूं शकतं ! निदान आज तरी !!
इतकी शिस्तबद्ध, योजनापूर्वक केलेली गोलंदाजी भारताकडून क्वचितच पहायला मिळते. अभिनंदन !
लैच भारी.. आता पुढचा सामना
लैच भारी.. आता पुढचा सामना जिंकून मालिका जिंकली पाहिजे दक्षिण आफ्रिकेत..
जमलय. साखर सम्राटांनी आधीची
जमलय.
साखर सम्राटांनी आधीची बाकी व आजचा असे ३-४ ट्रक कृपया आमचेकडे पाठवायचे करावे.
मजा आली. मस्त जिंकलो. आपली
मजा आली. मस्त जिंकलो. आपली पहिल्या दिवशीची पडझड पाहून आफ्रिकेची देखील दोन्ही डावात पडझड होईल असे वाटले होते. पहिल्या डावात आफ्रिका जेमतेम १३१ करेल असे मात्र अजिबात वाटले नव्हते. सचिनचा या विजयात फारसा हातभार नव्हता. पण लक्ष्मण, झहीर, भज्जी यांनी अप्रतिम कामगिरी केली. पुजारा फलंदाजीत फार काही केले नाही, पण दोन्ही डावात चांगले झेल घेतले. त्याने त्सोत्सोबेला अप्रतिम धावबाद सुध्दा केले. द्रविडची निवृत्ती आता अगदी जवळ आली आहे असे वाटते. सेहवागने लक्ष्मणकडून काही टिप्स घेतल्या पाहिजेत. नाहीतर तिसर्या कसोटीत चवताळलेल्या आफ्रिकेकडून परत एकदा वाट लागेल.
जिंकलो !!!! केदार, गोडायवा
जिंकलो !!!!
केदार, गोडायवा आण आता..
पुन्हा एकदा लक्ष्मण. एका
पुन्हा एकदा लक्ष्मण.
एका वर्षात चार वेगवेगळ्या देशांविरूद्ध मॅच जिंकणार्या खेळी. केवळ अप्रतीम.
ही मॅच माझ्या स्मरणात डेल स्टेनच्या बॉलिंग मुळे ही राहील.
लक्ष्मण चा डेब्यू ही असाच संस्मरणीय होता. लो स्कोअरिंग मॅच मधे तिसर्या इनिंगला आपले ७ आउट झाल्यावर असाच ५० -६० नी स्कोअर वाढवला होता. आणि ती मॅच आपण तेवढ्याच फरकाने जिंकलो होतो.१९९६ अहमदाबाद. विरुद्ध साउथ आफ्रिका (डोनाल्ड असताना)
<< पण लक्ष्मण, झहीर, भज्जी
<< पण लक्ष्मण, झहीर, भज्जी यांनी अप्रतिम कामगिरी केली. >> मास्तुरेजी, श्रीसांथचंही नाव हवंच हो यात ! आज खूपच चांगली गोलंदाजी केलीय व शहाण्य्या मुलासारखा वागलाय हो तो ! एका अप्रतिम बाऊन्सरन त्यान कालीसचा कांटा काढून विजयाचा मार्ग सुकर केलाय आज !!
आज मस्त वाटलं... श्रीशांन्त
आज मस्त वाटलं... श्रीशांन्त ने कालिस ला टाकलेला बाऊन्सर काय होता!!
बा द वे पॉन्टिन्गची आज ड्रेसिंग रूम मध्ये काय अवस्था असेल !! विचार करून आसुरी आनंद होतोय ...
Pages