Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
आता पॉन्टिंग व त्याचा संघ
आता पॉन्टिंग व त्याचा संघ बांग्लादेश, केनया, आर्यलँड, झिम्बॉब्वे अशा संघासोबत टेस्ट मॅच खेळेल, म्हणजे त्याला ५० शतकं मारता येतील.
कलिस जाऊ शकतो जवळ.
<<आता पॉन्टिंग ...... म्हणजे
<<आता पॉन्टिंग ...... म्हणजे त्याला ५० शतकं मारता येतील.कलिस जाऊ शकतो जवळ.>> अरे, म्हणजे साहेब तिथंच उभे राहून ह्यांची वाट बघत थांबणार असं म्हणायचंय कीं काय ! कालीसला वाकुल्या दाखवत त्याच्या नाकावर टीच्चून आजच पन्नाशी ओलांडायची तर तयारीच केलीय साहेबानी !!
आणि त्या मॅग्राला "वचने कीं दरिद्रता" माहित नसावं; अरे, नुसतं बोलायचंच आहे ना, मग पाँटींग १०० कसोटी शतकं करेल व २५,००० कसोटी धावाही करेल, असंच म्हण ना ! उगीचच आमच्या साहेबांच्या शतकांची व धावांची फूटपट्टी रे कशाला वापरतोस !!!
ऑस्ट्रेलियन्स कधीपासून
ऑस्ट्रेलियन्स कधीपासून वैयक्तिक विक्रमांसाठी खेळायला लागले बुवा? ते काम गावसकर्, तेंडुलकर यांचे नाही का?
की आता सामना जिंकणे अशक्य झाले म्हणून त्यातल्या त्यात निदान रेकॉर्ड्स तरी जमवावेत असे वाटतेय की काय?
एक चांगलं झालं. वंशवादी कमेंट्स करणार्या प्रेक्षक आणि खेळाडूंच्या देशात पाकिस्तानी वंशाचा एक मुस्लिम खेळाडू कसोटी संघात सामील झाला.
बंगलोरच्या 'त्या' डॉक्टरला आता नुकसानभरपाई द्यायला नको !
<<की आता सामना जिंकणे अशक्य
<<की आता सामना जिंकणे अशक्य झाले म्हणून त्यातल्या त्यात निदान रेकॉर्ड्स तरी जमवावेत असे वाटतेय की काय?>> शिवाय, ज्या "अॅशेस" म्हणजे अमॄतकुंभ असल्यासारखा डोक्यावर घेवून नाचत होते, तेंही साधंच मडकं असल्यासारखं झालंय, हेंही झोंबतंय इंग्लंड व ऑसीजना !
ऑसीज २८०; इंग्लंड ७८-०.
तुम्ही जरा क्रिकेटवर बोला ना
तुम्ही जरा क्रिकेटवर बोला ना राव. उगाच क्रिकेट न खेळणार्यांबद्दल बोलण म्हणजे अगदी दॅटस नॉट क्रिकेट.
बर ते असो. आपण मॅच जिंकणार आहोत. :).
आता यावर कुणाचे काही म्हणणे असल्यास बोला.
काल एका बॉलला पिचवर टप्पा पडल्यावर धूळ उडालेली पाहिली.
सायबांनी एक्कावनची पावती
सायबांनी एक्कावनची पावती फाडली!
अन् तेही षटकार ठोकून!!
सायबांचे एक्कावन्नाव्वे शतक..
सायबांचे एक्कावन्नाव्वे शतक.. भारत पुन्हा हारणार की काय?
इआन गोउल्ड्चे २ सुपर डिसिजन्स
इआन गोउल्ड्चे २ सुपर डिसिजन्स .. टेस्ट रँकिंगच माहीत नाही पण अफ्रिका स्लेजिन्ग्च्या बाबातीत तरी ऑसीजना मागे टाकून नं १ होणार नक्की !!!
This wicket is certainly
This wicket is certainly under-prepared; the ball is swinging, spinning. and bouncing awkwardly. 93 of Gambhir and century of Sachin are praiseworthy, although both of them had a share of luck. 279-6 is a creditable but not a winning score here. The second new ball is now slightly old and India can still hope to put up a reasonably good total, if Sachin holds on. S.A. will also find it difficult to bat on this wicket. Something sensational is on cards !!
[ Sorry, my P.C. is refusing to type in Marathi to-day]
टेस्ट महान अवस्थेत आहे...
टेस्ट महान अवस्थेत आहे... बरोबर अर्धा खेळ झाला आहे.... भज्जीनी साहेबांना नीट साथ दिली तर जबरीच...
स्टेन जबराट गोलंदाजी करतोय.. मॉर्कल पण मस्त साथ देतोय.. पण त्सोत्सोबे आणि हॅरिस बकरा होऊ शकतात... त्यात साहेब जबरीच फॉर्म मधे आहेत... मॅच निकाली होणार हे नक्की...
इयन गोल्डचे दोन्ही डिसीजन्स खरच जबरी होते... भज्जीच्या वेळचा तर क्लासच.... स्मिथ बेकार चिडला होता...
साहेब - भज्जी ५० धावांची
साहेब - भज्जी ५० धावांची भागीदारी.
भज्जीनी नुकतीच स्टेनला सिक्सर
भज्जीनी नुकतीच स्टेनला सिक्सर मारली.. महान शॉट... एकदम झकास ऑन ड्राईव्ह..
काल साहेब २४-२५ वर खेळत
काल साहेब २४-२५ वर खेळत असताना हॅरिसच्या गोलंदाजीवर एक पायचितचे जबरदस्त अपील पंचांनी फेटाळले. रिप्लेमध्ये चेंडू लेगस्टंपला चाटून जात असल्याचे दिसले.
आजच्या पहिल्या षटकात साहेब सारखे चकत होते. स्टेनच्या एका चेंडूला बॅट लावल्यावर चेंडू बाउचरच्या हातात गेला. पंचांनी अपील फेटाळले. रिप्लेमध्ये चेंडू बाउचरच्या हातात पोहोचताना जमिनीला लागल्याचे दिसले.
नंतरही साहेब अनेकवेळा चाचपडत खेळत होते.
एकंदरीत साहेबांचे हे शतक फारसे आवडले नाही.
मास्तुरे , मला तर याच्या
मास्तुरे , मला तर याच्या बरोबर उलट वाटतय . भारतीय पिच आहे , न्यूझिलंड चे गोलंदाज ११०-१२० च्या वेगात गोलंदाजी करतायत अशा वेळी तर भज्जी सुद्धा शतक मारतो ,त्यात काय विशेष ?
बॉल भयानक स्विंग आणी सीम होतोय , स्टेन गन अगदी भरात आहे , दुसर्या बाजूने भराभर विकेट पडतायट अशावेळी चाचपडत का होईना केलेल शतक हेच खर शतक .!
मास्तुरे.. अगदी खरय.. पण
मास्तुरे.. अगदी खरय.. पण तरीही सध्या ज्या पद्धतीत साहेब खेळत आहेत ते बघता शतका पेक्षा साहेब टिकून खेळतायेत ते जास्त महत्त्वाचे आहे...
अरुण लालच्या मते साहेबांना त्यांच्या ऑफ स्टंप बद्दल पूर्ण खात्री आहे त्यामुळे ते जे चाचपडतानाचे फटके होते ते जाणून बुजून होते म्हणे.. पण ह्या मताला कितपत महत्त्व द्यायचे ते तुम्हीच बघा...
मास्तुरे, खेळपट्टी तितकीशी
मास्तुरे,
खेळपट्टी तितकीशी चांगली नाही. अशा खेळपट्टीवर स्टेनसारख्या बॉलरला खेळणे अजिबात सोपे नाही. खेळपट्टी आणखी आणखी खराब होत जाणार. अशा conditions मध्ये साहेबांनी शतक केले हेच बहादुरीचे काम आहे.
गेले गेले.. साहेबच गेले....
गेले गेले.. साहेबच गेले.... जबरी बॉल वर विकेट.. दांडी गुल..
पिछाडी भरून काढली साहेबांनी.
पिछाडी भरून काढली साहेबांनी. आणखी काय हवंय?
मित्रहो, मला हे मान्य आहे की
मित्रहो, मला हे मान्य आहे की स्टेन भयानक गोलंदाजी करत होता. पण हॅरिस व त्सोत्सोबेसमोर सुध्दा साहेब चाचपडत होते. त्यामुळे हे शतक फारसे भावले नाही. सचिनचा नेहमीचा क्लास जाणवला नाही.
That's it!!! अफ्रिकेचा स्कोर
That's it!!! अफ्रिकेचा स्कोर पार केला..
शेवटच्या एक दोन षटकात झहीरचा
शेवटच्या एक दोन षटकात झहीरचा ब्राव्हो गेम... पार केलं एकदाचं आफ्रिकेला ..
फक्त २ च का असेना,
फक्त २ च का असेना, त्यांच्याहून अधिक धावा झाल्याने मानसिक समाधान आहे.
द. अफ्रिका १ बाद. आज अजून दोन तरी बळी घेतले, तर भारतीय संघाचे मनोधैर्य प्रबळ होईल. आणि आणखी एका विजयाची आशा निर्माण होईल. आणि उरलेला सामना बघायला मजा येईल.
हॅरीस, नाइट वॉचमन पण गेला..
हॅरीस, नाइट वॉचमन पण गेला.. कॅलिस जर गरज असेल तरच खेळायला येणार आहे.. सामना बराच रंगतदार होईल अशी चिन्हे आहेत..
साहेब फक्त एकच :खोखो" आणि ते
साहेब फक्त एकच :खोखो"
आणि ते क्रिकेट खेळत नाहीत.. खेळवतात.
सचिनचं हे शतक मला जाम आवडलं. मला वैयक्तिक विक्रमात एरव्हीही रूची नाही. पूर्वी सारेच विक्रमादित्यच असायचे टीममधे. अमूक शतकं, तमुक झेल, अमूक बळी आणि तमूक तमूक... फक्त विजयश्री तेव्हढी नसायचि.
अॅलन बोर्डर चांगला खेळत असताना २८ शतकांवर बास करून दहा हजार धावा घेऊन निवृत्त झाला.
स्टिव्ह वॉ चा सख्खा भाऊ फॉर्म हरवला म्हणून घरी बसवला गेला.. आपले विक्रमादित्य आठवा. सलग अमूक अमूक सामने हा ही विक्रम असतो.
शेन वॉर्न.. खेळू शकत असताना निवृत्त
नाही म्हणायला स्टीव्ह वॉ खेळत राहीला. पण तो जिंकत असतानाही त्याला बसवून पॉटींगकडे नेतृत्व गेलं. असो.
<<सचिनचा नेहमीचा क्लास जाणवला
<<सचिनचा नेहमीचा क्लास जाणवला नाही.>> मला वाटतं जवळपास स्टेन व मॉर्केल इतकीच भेदक गोलंदाजी त्सोत्सोबेही काही स्पेलमध्ये करत होता व रिव्हर्स स्विंगही. हॅरिसबद्दल म्हणाल तर मलाही प्रथम
सचिनचा बचावात्मक पवित्रा पाहून आश्चर्य वाटलं होतं. पण चेंडू कांहीसा जुना होणं व तोपर्यंत आपण तिथं असणं याला त्याने त्यावेळी धावा जमवण्यापेक्षा प्राधान्य दिलं असावं. व तें किती शहाणपणाचं होतं हे भज्जी व झहीरने जमवलेल्या धावांवरून सिद्ध झालं; झहीर स्टेनला व मॉर्केलला चेंडू नवीन असताना असा खेळूं शकणं अशक्य होतं !
या वि़केटमुळे सामन्यात कांहीतरी "सेंन्सेशनल" घडणार आहे, व तेही भारताच्या बाजूने, असं माझी मनोदेवता मला वारंवार कां बजावते आहे !!
तर सचिनच हे शतक आवडण्याचं
तर सचिनच हे शतक आवडण्याचं कारण म्हणजे संघाला गरज असताना मोक्याच्या वेळि या धावा आल्यात. लक्ष्मणच्या नावावर अशा जिगरी खेळ्या सर्वाधिक असाव्यात. त्याची हुकलेली शतकं ९३, ९९ आणि ७८ सुद्धा ही विक्रमांच्या पुस्तकांवरून ओवाळून टाकावीत अशी.
५० वं शतक हे ११८ धावांच असायला हवं होतं १८ धावांमुळं संघाचा डावाचा पराभव टळला असता. त्या मानहानीकारक पराभवापुढं ५० व्या शतकाचा आनंद मला तरी नाही घेता आला. लक्ष्मण समोर असल्यावर नववा आणि दहावा फलंदाजही खेळतो. अर्थात त्यालाही मर्यादा आहेत तशा सचिनलाही आहेत. पण ५० व्या शतकाचं महत्व त्यानं ओळखायला हवं होतं. १०० पूर्ण झाल्यावर तो अगदी शिस्तीत बाद झाला असं माझं मत बनलं. ग्रॅहॅम स्मिथ हेच बोलला.
अर्थात ४०० बळी साठी फॉर्म गेलेला असतानाही कुढणा-या कपिलसारखी सचिनची स्थिती नाहीय. त्याची बॅट आजही खणखणीत आहे आणि त्याच्यात भरपूर क्रिकेट शिल्लक आहे हे आजच्या शतकाने दाखवून दिलंय.. मला ५१ वं शतक यासाठी आवडलं.
सायबांचे एक्कावन्नाव्वे शतक..
सायबांचे एक्कावन्नाव्वे शतक.. भारत पुन्हा हारणार की काय? >>>> दोन वाक्यांचा संबंध आहे का?
सचिनचा नेहमीचा क्लास जाणवला नाही >>> उलट आहे असे मला वाटले. गोलंदाजांना श्रेय द्यायला हवे असे मला वाटते. सचिनच्या जागी तिथे सेहवाग असतात तर फार तर दोन ओव्हर्स नंतर आऊट झाला असता.
आज सचिन / स्टेन मधील उत्कृष्ट स्पर्धा पाहिली. स्टेन कधी वर तर कधी सचिन. शिवाय तिन्ही फास्ट बोलर्स अप्रतिम बोलिंग टाकत होते. संयमाने, निग्रहाने ही खेळी त्याने व गंभीरने खेळली. ही लाईव्ह पाहण्याचे भाग्य लाभले असे म्हणू का?
गंभीरला सलग अडीच ओव्हर तीथेच बॉल टाकल्यावर पण बॉलला बॅट लावायचा मोह का व्हावा? कधी शिकणार?
सलग एक तासाच्या वर गंभीर स्टेनला आणि सचिन मॉर्केलला सामोरा जाऊ शकला नाही हे ही वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. प्रत्येक ओव्हरला जीव मूठीत धरुन होतो. सॉटसोबेच्या पहिल्या ओव्हर मध्ये जेंव्हा त्याने सचिनला ३ बॉल त्रास दिला, त्यानंतर मारलेला पुल हा अप्रतिम होता.
भारत जिंकणार!
आज सचिन / स्टेन मधील उत्कृष्ट
आज सचिन / स्टेन मधील उत्कृष्ट स्पर्धा पाहिली. स्टेन कधी वर तर कधी सचिन. शिवाय तिन्ही फास्ट बोलर्स अप्रतिम बोलिंग टाकत होते. संयमाने, निग्रहाने ही खेळी त्याने व गंभीरने खेळली. ही लाईव्ह पाहण्याचे भाग्य लाभले असे म्हणू का?
अगदी..
मी तर ब-याच दिवसांनी क्रिकेट पाहीले आफ्रीकेत मॅचेस असल्याने.
मी तर ब-याच दिवसांनी क्रिकेट
मी तर ब-याच दिवसांनी क्रिकेट पाहीले आफ्रीकेत मॅचेस असल्याने. >>
अफ्रीका असो की ऑस्ट्रेलिया, दिवस असो की रात्र, क्रिकेट हे व्रत कधीही सोडू नये. त्यातल्या त्यात सचिन टीम मध्ये असेल तर अजिबात नाही.
उपाखफा, >>>५० वं शतक हे ११८
उपाखफा,
>>>५० वं शतक हे ११८ धावांच असायला हवं होतं १८ धावांमुळं संघाचा डावाचा पराभव टळला असता. त्या >>>मानहानीकारक पराभवापुढं ५० व्या शतकाचा आनंद मला तरी नाही घेता आला. लक्ष्मण समोर असल्यावर >>>नववा आणि दहावा फलंदाजही खेळतो. अर्थात त्यालाही मर्यादा आहेत तशा सचिनलाही आहेत. पण ५० >>>व्या शतकाचं महत्व त्यानं ओळखायला हवं होतं. १०० पूर्ण झाल्यावर तो अगदी शिस्तीत बाद झाला असं >>>माझं मत बनलं. ग्रॅहॅम स्मिथ हेच बोलला.
तेंडुलकर १११ धावांवर नाबाद राहिला होता. तुमची काहीतरी गल्लत झालेली दिसते.
Pages