क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता सेहवागला जमले नाही म्हटल्यावर बाकीचे ड्रॉसाठीच खेळणार ना?सचिन तर मॅच वाचवणारी खेळी करू शकत नाही ना? (असं इतिहास सांगतो बुवा...आता हा इतिहास पण बदलणार Wink

आता सगळ्यांनी पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी या. (जमलं तर पेढे घेऊन)

दक्षिण आफ्रिकेत न हरता परत येणे ही प्रगतीच आहे की! आणि नंबर एक म्हटले तरी एक आणि दोन मध्ये फार फरक नाही. आणि इंग्लंड पण आम्हीच नंबर वन म्हणून क्लेम करायला लागलेत.
इंग्लंड आणि द आफ्रिकेला भारताचे नंबर वन टेस्ट टीम होणे पचलेले नाही.
आता जून २०११ पर्यंत भारतच टॉपला राहणार आणि आयसीसी अवॉर्ड घेणार.

आणि इंग्लंड पण आम्हीच नंबर वन म्हणून क्लेम करायला लागलेत.
इंग्लंड आणि द आफ्रिकेला भारताचे नंबर वन टेस्ट टीम होणे पचलेले नाही.>>>

आफ्रिकेला नक्कीच पचले नाहीये... स्मिथ तर बोलून दाखवतोच..
इंग्लंड चे सोडून द्या हो.. त्यांना प्रत्येक आशेस नंतर असं वाटतं.. इतर वेळी हा संघ कधी continuously फॉर्म मध्ये असतो????

हॅरिस निलाजर्‍यासारखा सतत "वाईड" रेषेजवळ नकारत्मक गोलंदाजी करत होता यावर कुणालाच कांही बोलायचे नाही का ?>>>>

हरीस हा एक फालतू बोलर आहे.. ते आफ्रिकेचे बिनडोक समालोचक त्याला डोक्यावर घेऊन ठेवतायत.. आणि त्यांना प्रत्येक ओव्हर नंतर वाटतंय की म्याच कधीही फिरू शकते.. त्यांच्या सामालोचानामध्ये खेळ कमी आणि भावनाप्रधानता जास्त आहे..

हरीस हा एक फालतू बोलर आहे.. ते आफ्रिकेचे बिनडोक समालोचक त्याला डोक्यावर घेऊन ठेवतायत.. आणि त्यांना प्रत्येक ओव्हर नंतर वाटतंय की म्याच कधीही फिरू शकते.. त्यांच्या सामालोचानामध्ये खेळ कमी आणि भावनाप्रधानता जास्त आहे.. >>>

२०० टक्के अनुमोदन! च्यायला प्रत्येक ओव्हर नंतर आता काही तरी होणार असे उदगार ते काढतात. लंचच्या वेळी AD म्हणाला टिव्ही सोडू नका बरं, लवकरच विकेट पडणार आहे. नानाची टांग!

मी कम्पेअर करताना स्वतःच्य चांगल्या गोष्टींशी करण्याच्या प्रयत्न करतो. म्हणजे स्वतःशी स्पर्धा स्वतःशीच असे म्हणा. त्यामुळे अफ्रिकेचे काय वाईट हे बघन्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गोष्टींना अ‍ॅप्रिशिएट करुनही आपल्यात काही चांगले आहे त्याला चांगले म्हणणे मला जास्त योग्य वाटते. सचिन आणि लक्ष्मण दोघेही उच्चप्रतीचे बॅटसमन आहेत. त्यांना जखडण्याइतकी हॅरीसची बॉलींग चांगली आहे का? बॅकफुटवर खेळायला हवंच का? गंभीर मध्ये मध्ये येऊन फ्रंटवर खेळत होता. सचिन, लक्ष्मण ह्यापेक्षा अवघड खेळी खेळलेले नाहीत का?

ड्रॉ बद्दल आनंद आहेच. पण मॉरली मलाच थोडी गडबड वाटत आहे. चौथी इनिंग आपणच थोडी निगेटिव्हली खेळत आहोत असे मला वाटते. ९० ओव्हर्स मध्ये २७५ वर ७ - ८ आउट मला चालले असते. ते फायटींग स्पिरीट कुठेही दिसत नाही. गेल्या चार ओव्हर्स मध्ये मात्र धावा निघत आहेत.

आपण ह्या पेक्षा जास्त वाईट कंडिशन मध्ये जास्त चांगले खेळलो आहोत!

होय तेच मलाही म्हणायचे आहे.. पीच अवघड आहे हे खरे आहे.. पण आपण ह्यापेक्षा अवघड पीच वर जास्त चांगले खेळलो आहोत.. आणि जिंकायसाठी खेळणे ह्या पीच वर राहू दे.. पण आणि थोड्या धावा नक्क्कीच होऊ शकतात...

३४० होणे शक्य नाही हे ओळखून, व्यवस्थित ठरवून डिफेन्सिव खेळून अनिर्णित ठेवला सामना भारताने. तारतम्य यालाच म्हणत असावेत.

रन रेट कमी वाटला तरी त्याचे काहीच महत्व नव्हते. ज्यांनी टीव्हीवर पाहिला त्यांना दिसले असेल की गंभीर, द्रवीड, सचिन, लक्ष्मण सगळ्यांनी अतिशय सहजपणे खेळ केला. कुणीही अडखळतो आहे किंवा पहिल्या डावासारखे भेदक गोलंदाजीच्या दडपणाखाली आहेत असे काही दिसले नाही. आरामात पण भक्कम बचावात्मक खेळत होते. स्टंपच्या फूट फूट भर बाहेर चेंडू सतत टाकले गेले तेंव्हा तर सरळ लाथाडायला सुरुवात केली.

आफ्रिकेने एकदम उत्साहाने सुरूवात केली होती सकाळी. पार गांजून गेले संध्याकाळपर्यंत.

ते फायटींग स्पिरीट कुठेही दिसत नाही. गेल्या चार ओव्हर्स मध्ये मात्र धावा निघत आहेत. >> म्हणजे नक्की काय करायला हवे ? अरे एकदा मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा नाही हे ठरल्यावर रन रेट किती ठेवला अशा गोष्टींनी काय फरक पडतो ? strike rotate करायला हवा अस म्हणताना असेच करताना run of the play मध wicket जाउ शकते असा विचार करु शकतात ना ? जोवर comfortably defend करताहेत तोवर काय फरक पडतो ? पुढे असा ही विचार कर कि ह्याच टिमविरुद्ध आपण ODI खेळणार आहोत, "we can play this attack comfortably" can be a statement of intent.

सेहेवागच्या स्ट्राईक रेट वरुन सामना अनिर्णित ठेवण्यासाठीच आपण पहिल्या क्षणापासुन खेळलो, खेळाला सुरवात केली होती. नकारात्मक खेळ...

सेहेवागच्या स्ट्राईक रेट वरुन सामना अनिर्णित ठेवण्यासाठीच आपण पहिल्या क्षणापासुन खेळलो, खेळाला सुरवात केली होती. नकारात्मक खेळ...

३४० होणे शक्य नाही हे ओळखून, व्यवस्थित ठरवून डिफेन्सिव खेळून अनिर्णित ठेवला सामना भारताने. तारतम्य यालाच म्हणत असावेत.

+ १०००००

"डर के आगे ड्रॉ रिझल्ट है" हा अ‍ॅप्रोच ठेवूनच आज भारताने फलंदाजी केली. निदान लंचपर्यंत तरी जिंकण्याचा प्रयत्न करून पहायला हवा होता. समजा लंचपर्यंत २-३ जण गेले असते, तर लंचनंतर सामना वाचवण्याचा प्रयत्न करता आला असता. पण पहिल्या चेंडूपासूनच प्रयत्न केला नाही याचे वाईट वाटते. आज भारताने ८२ षटके खेळून फक्त १६६ धावा केल्या (सरासरी २.०२). त्यातली स्मिथ (४ षटकात २७) व पीटरसन (२ षटकात ५) या दुय्यम गोलंदाजांची षटके काढून टाकली, तर उरलेल्या ७६ षटकात फक्त १३४ धावा होतात (म्हणजे प्रत्येक षटकात जेमतेम पावणेदोन धावा). आपली इतकी वाईट अवस्था का व्हावी?

कोणी कितीही समर्थन केले तरी आज भारताने सर्वांची निराशा केली हे नक्की.

>>> चौथी इनिंग आपणच थोडी निगेटिव्हली खेळत आहोत असे मला वाटते. ९० ओव्हर्स मध्ये २७५ वर ७ - ८ आउट मला चालले असते. ते फायटींग स्पिरीट कुठेही दिसत नाही.

१०० टक्के सहमत.

मास्तुरे , सचिन बिचीन बाद झाल्यावर आपली मंडळी ७-८ बादपर्यन्त थाम्बत नाहीत ना Happy ... एकदम १० बादलाच थाम्बते त्यांची घरंगळ. त्यामुळे तशी कॅल्क्युलेटेड रिस्क घेणे आपल्या अवसानघातकी लोकांना शक्य नाही. ड्रॉ होणारी म्याच आपण लीलया हरू शकतो...: Proud

३४० म्हणजे आपण जिंकू शकतच नाही... मग नं १ कसे काय? ३४० झाले नसते तरिही चालले असते, पण पुसटसा प्रयत्नही करायचा नाही...

माझ्या मते जिंकण्यासाठी खेळायला हवे Happy ... आपण न हरण्यासाठी खेळलो :अरेरे:. येथे attitude महत्वाचा आहे. हाच फरक आहे स्तिव वॉ च्या नेतृत्वात आणि आपल्या धोणीच्या.

मास्तुरेंच्या मताशी सहमत.

चौथी इनिंग आपणच थोडी निगेटिव्हली खेळत आहोत असे मला वाटते.

चांगले वेगवान गोलंदाज हाताशी असताना फिरकी सुरू करून फलंदाज खेळणारच नाहीत असं क्षेत्ररक्षण लावल्यावर त्या प्रकाराला नकारात्मक नाही म्हणायचं का ?
जाऊ देत ना धावा. दोन्हीकडून वेगवान मारा असता तर धावाही झाल्या असत्या आणि चुकाही. कुणीतरी जिंकलं असतं.

>>> चांगले वेगवान गोलंदाज हाताशी असताना फिरकी सुरू करून फलंदाज खेळणारच नाहीत असं क्षेत्ररक्षण लावल्यावर त्या प्रकाराला नकारात्मक नाही म्हणायचं का ?

स्मिथने बराच वेळ बहुतेक सर्व क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या जवळ उभे केले होते. यात फलंदाजाचा जवळ उडालेला झेल पकडायचे डावपेच होते. पण त्यात चेंडू जरा उचलून मारला असता तर थेट चौकार जाण्याचाही धोका होता. पण २-४ चौकार गेले तरी चालतील, पण विकेट मिळणे महत्वाचे आहे हे ओळखूनच तो क्षेत्ररक्षण लावत होता. त्याचे हे डावपेच नकारात्मक नव्हते. आपल्या फलंदाजांनी मात्र २-४ फटके उचलून मारून गोलंदाजाची लय बिघडवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. सचिनची फलंदाजी (९१ चेंडूत फक्त १४ धावा. त्यात एकही चौकार नाही) आणि हॅरिसची गोलंदाजी (३०-१९-२९-0) हे आपल्या बचावात्मक अ‍ॅप्रोचचे प्रातिधिनिक उदाहरण आहे.

trike rotate करायला हवा अस म्हणताना असेच करताना run of the play मध wicket जाउ शकते असा विचार करु शकतात ना >>

असामी विकेट स्ट्राईक रोटेट न करताही जाऊ शकतात. पहिल्या इनिंग मध्ये गंभीरच्या ऑफला एकाच जागेवर सलग अडीच ओव्हर्स बॉल टाकल्यावर गंभीरने बॅट लावलीच. सेहवागला बॉल सोडावा की नाही ह्याचा विचार करताना बॅट लावावी वाटलीच.तस्मात नुस्ते उभे राहिल्यावर विकेट लावून धरता येत नाही असे वाटते.

सचिन, लक्ष्मण कडे प्रचंड स्किल असल्यामुळे ७ प्लेअर्स उभे असूनही विकेट नाही गेली. तिथे इतर कोणी असले असते तर विकेट नक्की गेली असती.

म्हणजे नक्की काय करायला हवे >> अ‍ॅस इफ तो रेग्युलर खेळ आहे असे समजून नॉर्मल रेट ने क्रिकेट खेळने. धावगतीचे मला टेन्शन नाही. पण नं १ टीम असलेल्या लोकांनी, ते ही फॅब ३ असताना आला बॉल सोडायचा, पॅडला लावायचा वा प्लेड करायचा हा अ‍ॅप्रोच चुकीचा होता. मध्ये कित्येक बॉलवर सचिन, गंभीर शॉटस खेळू शकले असते. जिंकने ही गोष्ट अलहिदा पण वाईट बॉलला शॉट मारायला काय प्रॉब्लेम?

आणि फायटींग स्पिरीटचे उत्तम उदाहरण म्हणजे सचिनचे पहिल्या इनिंग मधील शतक. तिथेही त्याचा रनरेट अतिशय कमी होता, पण तिथे रनरेट काय होता हे कधीही बघीतले जाणार नाही. आणि मी नेमका तोच फरक सांगायचा प्रयत्न करतोय.

we can play this attack comfortably" can be a statement of intent. >>> कमॉन हॅरीस?? हॅरीस? इव्हन आय कॅन प्ले हिम. ते दोघे खेळताना हॅरीसने जास्त ओव्हर्स टाकल्या. स्टेनला तर द्रवीड व गंभीरनेही काही जबरा शॉट मारल्या. (द्रविडच्या डायरेक्ट प्लेअर कडे Happy ) आणि त्याच अ‍ॅटॅकवर आपण दुसरी मॅच जिंकली आहे, त्यामुळे आय डोन्ट थिंक दॅट वॉज इंटेट. फक्त ठरवून विकेट फेकायची नाही, धावा नाही निघाल्या तरी बेहत्तर हा इंटेट होता.

नं १ टीम कडून अपेक्षा करणे अवास्तव ठरू नये. असो मॅच संपली. अ‍ॅनॅलिसीस करून फायदा नाही. सेलीब्रेशन म्हणून मस्त पैकी जेवण घरी बनत आहे. Happy

>>> माझ्या मते जिंकण्यासाठी खेळायला हवे ... आपण न हरण्यासाठी खेळलो . येथे attitude महत्वाचा आहे.

१०० टक्के सहमत.

त्याच अ‍ॅटॅकवर आपण दुसरी मॅच जिंकली आहे,>>त्याच अ‍ॅटॅक वर पहिली मॅच घालवली आहे Happy

नं १ टीम कडून अपेक्षा करणे अवास्तव ठरू नये. >> नं १ असणे आणी dominating No 1 असणे ह्या दोन गोष्टींमधे प्रचंड फरक आहे हे लक्षात घेऊन सगळे बघ. उत्तरे सापडतील.

मुळात मी आपण डॉमिनेटींग असायला हवे हा अ‍ॅप्रोच घेतच नाहीये. डॉमिनेटींग असणे व स्पिरीटने खेळणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मीच सचिनचे शतक किती सुपर्ब होते असे वर दोनदा लिहिले आहे. तिथे सचिन बचावात्मक पवित्र्यातच खेळत होता, त्यामुळे डॉमिनेट असणे हा भाग नाही तर गिव्ह अप करणे ह्या अ‍ॅप्रोच बद्दल मला वाईट वाटले.
आपण जिंकण्याची शक्यता जवळ जवळ नव्हतीच. सेहवाग लागला असता तरच, त्यामुळे जिंकलेली मॅच ड्रॉ केली असेही नाही, तर ड्रॉ करण्याच्या अ‍ॅटिट्युड बद्दलच मी बोलत आहे.

ऑस्ट्रेलियाची मॅच हारली म्हणून लोकांनी सोडली, लक्ष्मण-इशांतने वापस आणली, जिंकली सुद्धा. त्यात डॉमिनेटींग अ‍ॅटिट्युड नव्हता, तिथे लढ लेका हे होते. तसे काहीसे मी म्हणतोय. मे बी मला आधी नीट म्हणता आले नसावे.

आज सकाळी मॅच वाचविली हे कळाल्यावर चांगले वाटले. ३४० चेस करण्यासाठी सेहवाग ने १००-१५० लौकर करणे आवश्यक होते. नंतर स्मिथ ने निगेटिव्ह बोलिंग्/फिल्ड चालू केले असते. स्मिथ ने काल अर्धा तास द्यायला हवा होता रिझल्ट साठी.

मात्र बघणार्‍यांना जाम बोअर झाले असेल Happy स्कोर बघता अजिबात प्रयत्न केलेले दिसत नाहीत. रन करण्याची संधी घ्यायचीच नाही याच अ‍ॅप्रोच ने पूर्वी बर्‍याच मॅचेस हरलेल्या आहेत, यावेळेस हरले नाहीत ते चांगले आहे.

एकूण रिझल्ट आवडला. अ‍ॅप्रोच नाही.

गिव्ह अप करणे ह्या अ‍ॅप्रोच बद्दल मला वाईट वाटले.
आपण जिंकण्याची शक्यता जवळ जवळ नव्हतीच >>अरे पण मुळात जिंकण्याची शक्यता नाही म्हटल्यावर गिव्ह अपचा प्रश्नच कुठे आला ? मॅच हरतो तर न १ बद्दल परत ताशेरे असते सगळीकडून. आधीच न १ बद्दल सतत शंका कुशंका सुरू आहेत त्यात हि सिरीज हरतो तर त्याला अजून भांडवल दिल्यासारखे झाले असते ना. माझ्या मते काल ३०० झाले तिथेच मॅच चा निकाल draw or RSA win निश्चित झाला. ह्या दोघांमधे Draw is what anyone would prefer. At the end of the day score books will only record it as "series draw". बाकी सगळे मिथ्या आहे Happy

ऑस्ट्रेलिआ नं १ वर होते तेंव्हा गोर्‍या समिक्षकांना शंका नाही आल्या, जणू तो त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. आणि सेल्फ डाऊटमधे आपले लोकही काही कमी नाहीत.
स्मिथने ३००ला डिक्लेअर करुन शेवटच्या १५ ओव्हर्स आपल्याला खेळायला लावल्या नाहीत तिथेच कोण कोणाला घाबरतो आहे ते कळले. त्याच्या जागी स्टीव्ह वॉ असता तर त्याने अशी रिस्क घेतली असती.
आपला कालचा खेळ ट्रेडिशनल क्रिकेटींग सेन्स होता, त्यात काहीच चूक नाही.
रच्याकने, माझ्या स्वप्नात येउन गावसकरने दिलेला दृष्टांत बरोबर ठरला!!!

त्याच अ‍ॅटॅकवर आपण दुसरी मॅच जिंकली आहे,>>त्याच अ‍ॅटॅक वर पहिली मॅच घालवली आहे
पहिल्या सामन्यात झहीर नव्हता राव!

इतर बाबतीत अल्पसंतुष्ट असणार आपण भारतीय क्रिकेट आणि सचिनच्या बाबत बकासूर होतो. आता टीमने आधीच ठरवले की ड्रॉसाठी खेळायचे आणि ते यशस्वीपणे घडवून आणले, हे यश आहे.

एबी डिव्हिलियर्सने मालिका आम्ही ३-० जिंकू असे आधी म्हटले होते, तेव्हा हा रिझल्ट नक्कीच चालेल.
पण अजूनही गोलंदाजीचे काही खरे नाही. आता श्रीसंत आफ्रिकेत, इशांत ऑस्ट्रेलियात आणि आर पी सिंघ इंग्लंडमध्ये खेळवायचा असे स्पेशलायझेशन करावे लागेल.
वन डे मध्ये गंभीर सेहवाग दोघेही नाहीत का?

आगाऊ मोदक!
स्टीव्ह वॉ असता>>> पण त्याच्याकडे शेन वॉर्न, मॅग्रा सारखे भरवशाचे बॉलर्स असायचे.
झाले ते ठीकच, पण एक गोष्ट सलते ते तीन-साडेतीन दिवस रंगलेला सामना शेवटच्या एक-दिड दिवसात अगदीच रटाळ झाला. (अर्थात हाही खेळाचाच भाग)

मंडळी हो... कालच्या खेळाच्या बाबतीत काहीसे असे म्हणता येईल.. No Risk No Rewards... दोन्ही संघांनी थोडेफार तसेच केले.. स्मिथनी लवकर डिक्लीअर करुन भारताला खेळायची संधी द्यायची रिस्क घेतली नाही आणि त्यामुळेच पर्यायानी आपल्याला जिंकण्याची रिस्क घेण्याची गरज वाटली नाही... कारण तो कदाचित अतातायीपणा ठरला असता. कारण ५व्या दिवशीच्या पीच वर ३०० पेक्षा जास्त धावा हे तसे अवघड काम आहे.. मग तिथे कोणीही असो.. दुसर्‍या टीमकडे सुद्धा जिंकू न देण्यासाठीचे डावपेच असतातच.. त्यामुळे धावा करण्याचा खूप प्रयत्न करुनही काहीच धावा झाल्या नाहीत पण विकेट तेव्हढ्या गेल्या असेही घडणे शक्य आहे... तेव्हा बचावात्मक खेळून ड्रॉ घडवून आणणे हे जास्त चांगले...

>>> माझ्या मते काल ३०० झाले तिथेच मॅच चा निकाल draw or RSA win निश्चित झाला.

माझ्या मते आपण आपल्या संघाला (आणि आपल्या संघाने स्वतःला) फारच अंडर एस्टिमेट करत आहोत. आपण प्रयत्न केला तर जिंकू शकतो याबद्दल आपल्या संघाला स्वत:बद्दल आणि आपल्याला आपल्या संघाबद्दल अजिबात आत्मविश्वास वाटत नाही. नंबर १ च्या संघाला स्वतःबद्दल असा आत्मविश्वासाचा अभाव शोभनीय नाही.

यापूर्वी १९७९ मध्ये ४३९ धावांचा पाठलाग करताना गावसकरने द्विशतक झळकावून भारताला विजयाच्या जवळपास नेऊन ठेवले होते. भारताचे शेवटी ८ गडी बाद होऊन ४२९ धावा झाल्या होत्या. १९८६ मध्ये जगप्रसिध्द टाय टेस्टमध्ये शेवटच्या दिवशी भारताने ३४८ धावांचा पाठलाग करण्याचा जवळपास यशस्वी प्रयत्न केला होता. विजयासाठी फक्त एक धाव कमी पडली होती. २००८ मध्ये सुध्दा भारताने ३८७ चा यशस्वी पाठलाग केला होता.

काल मी अशा स्वरूपाच्या खेळाची अपेक्षा करत होतो.

अर्थात कालच्या खेळात सचिनचा अजिबात दोष नाही. तो जेव्हा खेळायला आला (जवळपास ४८ षटकानंतर भारत २ बाद १०६ झाल्यावर), तेव्हा जिंकण्याची शक्यता पूर्णपणे मावळलेली होती. सेहवाग, गंभीर व द्रविडने अजिबात प्रयत्नच केला नाही.

मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही. काल जबरदस्तीने मॅच पहावी लागली..
मला एक प्रश्न पडलाय

आपण त्यांचे दोनदा दहा गडी आउट केले कि नाही ?
त्यांनी कुठं तसं केलं ? मॅच संपली तेव्हा आपले तीनच आउट झाले होते. मग त्यांचे तीन आउट असताना त्यांचा काय स्कोर होता ते पहायचं ना..

मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही.

हरकत नाही. पण जो प्रश्न इथं उपस्थित करण्यात आलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आणि मुलभूत स्वरूपाचा आहे. इथं कुणी उत्तर देऊ शकेल असं न वाटल्यानं काल गोळादांडूसंगणक हर्ष भोगले यांना गबोल वर गाठलं. गबोलवर त्यांना चाटत असताना त्यांनी गोळादांडूपंढरी उर्फ आयसीसीकडे चौकशी करावी असा एक मोलाचा सल्ला दिला.

येणेप्रमाणे आम्ही लंडनस्थित कार्यालयास दूरध्वनी केला असता त्यांनी मुख्यालय सध्या तुमच्याच राष्ट्रात बारामती गावी असल्याची महत्वपूर्ण माहीती पुरवली.

येणेप्रमाणे आम्ही गोळादांडूअध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी या प्रश्नात आम्ही जातीने लक्ष घालू असं आश्वासन दिलं आहे.

सांजसंध्या, 'तसा' नियम नाही.
हाच जर रणजीतला सामना असता तर पहिल्या डावातल्या २ धावांच्या आघाडीच्या जोरावर भारत विजयी (किमान जास्त गुण मिळवणारा) ठरला असता.

Pages