मालिकांच्या गप्पांच्या पानावरच्या निवडक पोस्टस साठवण्यासाठी हा धागा उघडलाय.
वि.सू. १- झी मराठी/हिंदी चॅनेल किंवा चॅनेलशी संबंधित कोणत्याही व्यक्ती अगर संस्थेशी माझं कोणतंही वैयक्तिक वैर नाही. मराठी/हिंदी चॅनेल्स दर्जेदार प्रोग्राम्स दाखवू शकतात पण दाखवत नाहीत ह्याबद्दलचं दु:ख आणि राग व्यक्त करायचं हे एक माध्यम आहे. हे चॅनेल कोणतंही चॅनेल असू शकतं. आमच्या घरी झी मराठी आणि हिंदी पाहिलं जातं त्यामुळे सर्व उल्लेख त्यावरील प्रोग्राम्सबद्दल आहेत.
वि.सू. २ - कोणाच्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय किंवा इतर कसल्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास माफी असावी.
वि.सू. ३ - मी ह्या मालिका स्वखुशीने पहात नाही. घरात पाहिल्या जातात.
-----
गौतम बुध्द प्रवचनाला बसले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं कानात साठवून घेत होते. एव्हढ्यात एक स्त्री धडपडत तिथे आली. दु:खाने आणि वेदनेने तिचा चेहेरा पिळवटला होता. डोळ्यांतून सारखे अश्रू वहात होते. "महाराज, मला मदत करा, मला मदत करा. मला माझा मुलगा परत द्या. हा चमत्कार तुम्हीच करू शकता."
"बाई, शांत व्हा, काय झालंय?" बुध्दांनी विचारले.
"महाराज, मी कृशा गौतमी. माझा एकुलता एक मुलगा अचानक वारला. नवर्याच्या मागे मी त्याला तळहातावरच्या फ़ोडाप्रमाणे वाढवत होते. त्याच्याशिवाय कशी जगू? माझ्या मुलाला जिवंत करा महाराज"
"बाई, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. गावात जाऊन ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही अश्या घरातून मूठभर मोहोरा आणा."
बाई गावात घरोघर फ़िरली. पण तिला असं एकही घर मिळालं नाही. निराश होऊन ती बुध्दांकडे परतली. "महाराज, मला माझी चूक कळली. मृत्यू सर्वांनाच येतो आणि त्यावर कोणाकडेही उत्तर नाही"
कृशा गौतमी अश्या जड पावलांनी घरी परत जात असताना वाटेत तिला एक कपाळभर टिळा लावलेली बाई दिसली. तिने कृशा गौतमीला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. कृशा गौतमीने सगळी हकिकत सांगितली. बाई मंद हसली आणि म्हणाली "आज रात्री ८ वाजता झी मराठीवर माप्रिप्रिकचा एपिसोड बघ. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल"
कृशा गौतमीने ८ वाजेतो कसातरी धीर धरला. माप्रिप्रिक सुरू होताच ती सावरून बसली.
"शमिका इज नो मोअर" असं डॊक्टरांनी सांगताच अभिने देवासमोर धरणं धरलं. प्रार्थना करताना तो चेहेरा एव्हढा वेडावाकडा करत होता की त्या मोटारीचं चाक ह्याच्याही पोटावरून गेलंय की काय अशी प्रेक्षकांना शंका यावी. एव्हढ्यात कुठूनशी एक परकर-पोलक्यातली मुलगी (तीसुध्दा मुंबई सारख्या शहरात!) आली. अभिने "माझी शमिका मला दे" अशी लहान मुलं रस्त्यात बैठा सत्याग्रह करताना ओरडतात तशी आरोळी ठोकली. त्या मुलीने प्रार्थना केली, मग अभिच्या पापणीचा केस उपटून त्याच्याच तळहातावर ठेऊन त्याला (म्हणजे केसाला!) फ़ुंकर मारली आणि तुझी बाहुली तुला परत मिळेल असं म्हणून ती निघून गेली. लगेच अभिला त्याच्या आईचा फ़ोन आला की शमिका शुध्दीवर आली.
इथे कृशा गौतमीने टीव्ही बंद केला आणि मुलाला जिवंत करायला ती निघून गेली.
तात्पर्य: गौतम बुध्दांना जे जमलं नाही ते केकतेने करून दाखवलंय. तस्मात केकताम शरणं गच्छामि.
रच्याकने, ज्या डॊक्टरला माणसाची शुध्द गेली आहे का जीव हे कळत नाही तो शमिकावर उपचार करतोय आणि वर अभिला सांगतोय की काळजी करण्याचं काही कारण नाही? ये बात कुछ हजम नही हुई. दवा आणि दुवा जिवंत माणसावर परिणाम करतात हो, मेलेल्या माणसावर नाssssssही.
सही आता जरा जान मे जान आ गयी
सही आता जरा जान मे जान आ गयी मेरे!! आलीस का बाई? लई झ्याक वाटलं बघ तुझ्या पोस्टी पाहून ..
मंडळी धन्यवाद!
मंडळी धन्यवाद!
सुगरणीचा खोपा म्हणे बाहेरून
सुगरणीचा खोपा म्हणे बाहेरून लहान दिसला तरी आत पिल्लांसाठी खूप जागा असते. अगदी तस्संच पेंडश्यांचं घर बाहेरून लहान दिसत असलं तरी आत खूप जागा दिसतेय. अभि आणि शमिका ह्यांना पकडापकडीचा खेळ खेळण्याइतकी जागा आहे आत. हा, आता ते घर गहाण टाकल्यावर अभिला ते सोडवता आलं नाही तर हे प्रेमी जीव कुठे बागडणार ही चिंता तमाम लव्हबर्डसप्रेमींना सतावते आहे. एक वेळ फ़्लेमिंगोंना जागा नसली तरी चालेल पण अभि-शमिकासाठी तरी शिवडीला एक कोपरा राखून ठेवायलाच हवा अशी मागणी त्यांच्याकडून होते आहे.
नर्मदा परिक्रमा पूर्ण
नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याची आस बाळगून तो गृहस्थ कित्येक दिवसांपासून मार्गक्रमण करत होता. दिवस ढळत आला तरी तो घनदाट अरण्यातून वाट काढत चालत होता. अचानक एका वळणावर एक धिप्पाड पुरुष त्याला सामोरा आला. पांढरीशुभ्र वस्त्रं, उंचीपुरी शरीरयष्टी, करारी चेहेरा आणि कपाळावर भळभळणारी जखम. चिरंजीवी अश्वत्थाम्याचं दर्शन ह्या भागात अनेक जणांना झालं आहे ह्याची त्या गृहस्थाला कल्पना होती पण हे भाग्य आपल्याला लाभेल हे त्याला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. तो क्षणभर अवाक होऊन पहात राहिला.
"मला जरा मदत करता का?"
"माझं भाग्यच. तुम्हाला तुमच्या जखमेवर लावायला तेल हवं आहे ना? हे घ्या" तेलाची बाटली पुढे करत तो गृहस्थ म्हणाला.
"तुम्ही ओळखलेलं दिसतंय मला. तेल नकोय हो. डोकंदुखी थांबवण्याचा काही उपाय आहे का तुमच्याकडे? झंडू बाम वगैरे?"
"झंडू बाम?" गृहस्थाने आ वासून विचारलं. अश्वत्थामा बराच "वेल इन्फ़ॊर्मड" आहे तर - त्याला वाटून गेलं.
"असे दचकू नका हो. ते एक गाणं सारखं वाजत असतं त्यात उल्लेख आहे ना झंडू बामचा. त्याबद्दल बोलताना ऐकलंय मी लोकांना"
"असं असं, हे घ्या बाम. त्या गाण्याने डोकं उठवलंय होय तुमचं?"
"नाही हो. सूर्यास्त झाला की घराघरात तो टीव्ही का काय म्हणतात तो लागतो ना. मग थोड्या थोड्या वेळाने कसले कसले चित्रविचित्र आवाज येतात. ’हॆहॆहॆ कुंकू’ असं कोणी बाई ओरडते, मग ’आली आली भाग्यलक्ष्मी’ चा गजर होतो. त्यानंतर ’माझिया प्रियाला प्रीत कळेना’ चा पुकारा. मग ’लज्जा लज्जा लज्जा’. ९ वाजले की माझे तर पायच लटपटायला लागतात. कोणी एक बाई आत्यंतिक वेदनेने ’आआआ’ असंच ओरडत असते. मला अशी शंका आहे की माझ्या कपाळावरच्या जखमेपेक्षाही भयानक जखम तिच्या कपाळावर असणार बघा" डोक्याला बाम चोपडत अश्वत्थाम्याने खुलासा केला.
’पवित्र रिश्ता असणार’ तो गृहस्थ पुटपुटला. त्याच्या नर्मदा परिक्रमेचं सारं श्रेय ’पवित्र रिश्ता’ लाच तर होतं.
"तुम्हीही आता जास्त वेळ थांबू नका इथे. त्या पलीकडल्या तीरावर आवाज थोडा कमी येतो. ही बामची बाटली ठेवून घेऊ शकतो का मी?" अश्वत्थाम्याने विचारलं.
"हो, हो, नक्कीच"
"वत्सा, तुजप्रत कल्याण असो" अश्वत्थाम्याने तोंडभरून आशिर्वाद दिला. तो अंतर्धान पावला आणि हातातल्या घड्याळात ७ वाजायला ५ मिनिटंच आहेत हे पाहून त्या गृहस्थाने झपाट्याने जंगल तुडवायला सुरुवात केली.
निदा फ़ाजलींचा मूळ शेर असा
निदा फ़ाजलींचा मूळ शेर असा आहे:
कुछ तबियतही मिली ऐसी, चैनसे जीनेकी सूरत ना हुई
जिसको चाहा उसे अपना ना सके, जो मिला उससे मुहोबत ना हुई
त्यांची माफ़ी मागून:
कुछ घरवाले ही मिले ऐसे, चैनसे टीव्ही देखा ना गया
जो प्रोग्राम अच्छा लगा उसे देख न सके, जो देखना पडा वो अच्छा नही लगा
स्वप्ना ,
स्वप्ना ,
मूळ शेरः अर्ज किया
मूळ शेरः
अर्ज किया है......
हौसला तो तुझमे भी ना था, मुझसे जुदा होनेका
वरना, काजल तेरी आखोमे पहले तो कभी फ़ैला न था
बदललेला शेरः
अर्ज किया है......
हौसला तो तुझमे भी ना था, चॅनॆल बदलनेका
वरना, रिमोट तेरी हाथोंसे पहले तो गिरा न था
अरेच्चा! मी पोस्टस टाकायला
अरेच्चा! मी पोस्टस टाकायला लागल्यापासून हा बाफ ओस पडला की पोस्टस जमल्या नसतील तर तसं सांगा की राव. नुसत्या वाखाणणार्याच प्रतिक्रिया असायला हव्यात असं नाहिये काही. काहीच प्रतिक्रिया आल्या नाहीत तर पुढे लिहायचं की नाही ते कळत नाही......
अग लिहि गं तू तुझं काम कर
अग लिहि गं तू तुझं काम कर छानच जमल्यात सगळ्या पोस्टस..
स्वप्ना.....माझ्या पोस्टीनंतर
स्वप्ना.....माझ्या पोस्टीनंतर तुझी पोस्ट पाहिली की वाटतं लोकांना हा ड्युप्लिकेट आयडीचा प्रकार वाटेल का काय एक दिवस
अरे, मी पण आहे इथे. वाचतेय
अरे,
मी पण आहे इथे. वाचतेय अधुन मधून वेळ मिळेल तसं. स्वप्ना, तू लिहित रहा गं.
वाटलं तर वाटू देत लोकांना तू
वाटलं तर वाटू देत लोकांना तू कशाला टेन्शन घेतेस? मग माझा आय डी बदलू का? पण तू तुझे लिखाण थांबवू नकोस एवढेच
स्वप्ना तु लिहित रहा...
स्वप्ना तु लिहित रहा...
लगे रहो स्वप्नाबाई!
लगे रहो स्वप्नाबाई!
छान !
छान !
तुमच्या अश्या भन्नाट्ट पोष्टी
तुमच्या अश्या भन्नाट्ट पोष्टी वाचून मी हसून हसून मेले हो!! काही प्रतिसाद द्यावा तर काय द्यावा हेही कळेना मला!!
लगे रहो!!
वाचतोय ग आम्ही
वाचतोय ग आम्ही स्वप्ना...
मज्जा पण येतीये
अभिला सिक्स पॅक्स!!
अभिला सिक्स पॅक्स!!
ए स्वप्ना, असं काही करू नकोस.
ए स्वप्ना, असं काही करू नकोस. मी मस्करीत म्हटलं होतं सगळ्यांना धन्स!
एक यकिंश्चित वानर आपल्यासमोर,
एक यकिंश्चित वानर आपल्यासमोर, प्रत्यक्ष लंकापतीसमोर, निधडी छाती काढून उभा आहे हे पाहून रावणाच्या दोन्ही तळपायांची आग त्याच्या दहाही मस्तकात गेली.
"ह्याच्या शेपटीला आग लावून द्या म्हणजे कळेल त्याला आमच्याशी वैर धरलं की त्याचे काय परिणाम होतात ते" त्याने हुकूम सोडला.
लगेच सेवक पुढे आले. मारुतीच्या शेपटीला तेलात बुडवलेले कापडाचे बोळे बांधायला त्यांनी सुरुवात केली. मारुतीराय आपलं शेपुट लांब करू लागले. रावणाच्या सेवकांनी आपलं काम चालू ठेवलं. मारुतीरायांनी शेपूट लांब केलं रे केलं की नव्या दमाचे सेवक तेलात बुडवलेले कापडाचे बोळे घेऊन येत आणि शेपटीला बांधून टाकत.
शेवटी शेपूट लांब करून करून मारुतीराय थकले. त्यांनी शेपूट लांब करायचं थांबवलंय हे पहाताच रावण गडगडाट करत हसला.
"तुझ्या लांब होत जाणार्या शेपटाचं इथे कोणाला कौतुक नाही रे. ह्या शेपटापेक्षाही लांबत जाणारी एक गोष्ट पाहिलीय आम्ही"
"काय म्हणतोस काय रावणा? कोणती आहे ती गोष्ट?" मारुतीरायांनी नवलाने विचारले.
"झी मराठीवरच्या मालिका" रावणाने पुन्हा हसत खुलासा केला.
मूळ शेरः अर्ज किया
मूळ शेरः
अर्ज किया है......
कौन देता है उम्रभरका साथ फ़राझ
लोग तो जनाजेमेभी कांधे बदलते रहते है
शायराची माफी मागून बदललेला शेरः
अर्ज किया है......
कौन देता है उम्रभरका साथ यहा
लोग तो टीव्हीपरभी चॅनेल्स बदलते रहते है
अग सगळ्या पोस्ट प्रतिक्रिया
अग सगळ्या पोस्ट प्रतिक्रिया म्हणुन दिसत आहेत की तुच तशा टाकल्या आहेस?
अग, मीच टाकल्या आहेत तश्या.
अग, मीच टाकल्या आहेत तश्या.
"सकाळी सकाळी कुठे चाललेस
"सकाळी सकाळी कुठे चाललेस एव्हढ्या लगबगीने?" दिनकररावांनी बायकोला विचारलं.
"विचारलंत! सिध्दीविनायकाला चाललेय नारळ द्यायला" वसुधाताई पायात चप्पल सरकवताना म्हणाल्या.
"सिध्दीविनायकाला नारळ? अगं पण कांद्याचे भाव उतरले नाहियेत अजून बाजारात. आत्ताच काय नारळ फ़ोडते आहेस?"
"जेव्हा उतरतील तेव्हा पाच नारळांचं तोरण देईन हो. हा नारळ त्याच्यासाठी नाहिये काही"
"मग? बंड्याची परिक्षा अजून सुरू पण झालेली नाहिये. तेव्हा तोही प्रश्न नाही. मग आहे कसला नारळ हा?"
"अहो, मानव आणि अर्चना हनिमूनला गेले ना त्याचा"
"मानव आणि अर्चना? अग मानवच्या बायकोचं नाव मनिषा आहे. आणि त्यांचं लग्न होऊन चांगली ४ वर्षं झालीत. आता कसले हनिमूनला जातात?"
"अहो तुमचा चुलतभाऊ मानव नव्हे हो. पवित्र रिश्तामधला मानव"
"असं होय. पण त्यांचं लग्न तर आधी झालं होतं ना? मग तेव्हा नाही गेले हनिमूनला?"
"तेव्हा कसले जातात? डोकं वर निघेल तर ना सगळ्या अडचणींतून."
"अच्छा, आता संपल्या वाटतं सगळ्या अडचणी किंवा सवय झाली असेल. प्रेक्षकांना झाली ना तश्शीच. आणि काय ग, अगदी काल-परवाच्या एपिसोडपर्यंत ती अर्चना ’शोले’तल्या ठाकूर बलदेवसिंगसारखी शाल पांघरून फ़िरत होती. आता बरी टुणटुणीत झालेय हनिमूनला जायला"
"शाल पण घेऊन जातेय ना ती हनिमूनला"
"अरेच्चा! मला वाटत होतं हनिमूनला नवर्याला घेऊन जातात. हीहीही"
"फ़ालतू विनोद नकोयत."
"बरं, बरं, कुठे जातेय जोडगोळी?"
"पुण्याला"
"पुण्याला? हनिमूनला?"
"का? आपण नव्हतो गेलो?"
"अग, आपला काळ वेगळा होता. आता लोक स्वित्झर्लंडला वगैरे जायचे पण दिवस गेले. काल ऒफ़िसमधला एक जण अंटार्क्टिकाला जाऊन आला हनिमूनवरून. आणि हे पुण्याला चाललेत."
"सगळी सोंगं आणता येतात बरं पण पैश्याचं नाही आणता येत"
"मग पुण्याला जाण्याएव्हढे पैसे तरी कुठून आले?"
"अर्चनाच्या वडिलांनी दिले"
"अरे वा! तुझ्या वडिलांनी मला कधी फ़ुटकी कवडी दिल्याचं आठवत नाही"
"माझ्या माहेरी फ़ुटक्या कवड्या साठवून ठेवायला कोणी वेडे नाहियेत तुमच्या घरातल्यांसारखे"
"बरं बरं, तुला उशीर होत असेल ना? जा तू"
"अंगावर शेकायला लागलं की माघार घ्यायची तुमच्या घराण्यात सवयच आहे. जाउ देत. आता ’बप्पा”ला सांगते, लवकरच अर्चनाची कूस उजवू देत. म्हणजे ५ नारळांचं तोरण देईन"
"देवा सिध्दीविनायका! आमचा वाली तू, पण तुझा वाली कोण रे बाबा?" दिनकररावांनी कपाळाला हात लावला.
मूळ शेरः अर्ज किया
मूळ शेरः
अर्ज किया है......
मेरे राहबर, मुझे गुमराह कर दे
सुना है के मंझील करीब आ गयी
शायराची माफी मागून बदललेला शेरः
अर्ज किया है......
मेरे बॉस, मुझे ऑनसाईट भेज दे
सुना है के झी मराठीपे नयी सिरियल आ गयी
ऑनसाईट जा के भी कुछ नही होगा
ऑनसाईट जा के भी कुछ नही होगा झी मराठी अलग रूपमे तेरा पीछा करेगा ....
स्वप्ना, कशी गं इतकं भन्नाट
स्वप्ना, कशी गं इतकं भन्नाट लिहू शकतेस??? खरंच फू बाई फू चं स्क्रीप्ट लिहि तू
स्वप्ना : माझा पवित्र
स्वप्ना : माझा पवित्र रिश्ताशी काही रिश्ता नाही. त्यामुळे विचारावे लागतेय. ते दोघे हनीमूनला गेलेत म्हणजे मालिकेतून गायब झालेत की अख्ख युनिट घेउन हनीमूनला गेलेत.
हे दोघे झलक दिखला जा मध्ये आहेत ना?
ऑफसाईट ? आम्ही तर देवाजवळ
ऑफसाईट ? आम्ही तर देवाजवळ प्रार्थना करतो की तुमच्या घरचा रिमोट तुटू दे आणी टीव्ही झी मराठीवरच अडकून पडू दे. मग आम्हाला चुरचुरित वाचायला मिळेल.
मस्तच स्वप्नाबाई,तुस्सी
मस्तच
स्वप्नाबाई,तुस्सी ग्रेट हो!!!!
Pages