Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
Australia beaten by innings
Australia beaten by innings and 71 runs ... humiliated , crushed .... Add to that Ponting 0 and 9 .... I am Happy
<<अरे हे न्यू झीलंडचे लोक
<<अरे हे न्यू झीलंडचे लोक अजून भारतात काय करताहेत? जपानी लोक असते तर हाराकिरी केली असती. दुसरे कुणि असते तर रातोरात चंबूगबाळे बांधून पळून गेले असते. अजून किती मार खायचा आहे?>> झक्कीजी, एके काळीं [ फार प्राचिन काळीं नव्हे] इंग्लंडच्या वर्तमानपत्रांत भारताच्या तिथल्या दौर्यात कसोटी सामने फक्त तीनच दिवसाचे ठेवावे, असे अपमानास्पद मथळे येत व आमचा संताप होत असे; आता त्या वर्तमानपत्रांतील मथळे चुकीचे होते म्हणायचं कीं आमची ती संतापाची प्रतिक्रिया ? मला वाटतं न्यूझीलंडला सहानभूतिचीच गरज आहे व त्याहूनही महत्वाचं म्हणजे भारताला शेफारून न जाण्याची ! नशीबानं ताबडतोबच द. आफ्रिकेचा आपला दौरा आहे व आपली खरी बलस्थानं व कच्चे दुवे आपल्याला उमजण्याची संधी आहे !
सपाटून मार खात असूनही न्यूझीलंडचं क्षेत्ररक्षण मात्र हेवा वाटावा असं आहे; भारताचं क्षेत्ररक्षण आता सुधारत असलं तरीही भारतीय खेळाडूनी त्यापासून खूपच कांही शिकण्यासारखं !
भाऊ.. जबरी व्यंगचित्र...
भाऊ.. जबरी व्यंगचित्र...
येस्स.... ऑसीजचा दणदणीत पराभव झाल्याने मला पण जबरी आनंद झालाय... त्यात पॉटींगचा वर गेलेला शेंडा अजूनच लाल झालाय... पुढच्या टेस्ट मध्ये तो भरपाई करण्याचा जोरदार प्रयत्न करणार पण गोलंदाजी फारच अशक्त आहे त्याला तो तरी काय करणार... लागोपाठ दोन सामन्यात दोन वेगळ्या खेळाडूंनी दुहेरी शतक ठोकली...
पाँटिंग्चा या सामन्यातला
पाँटिंग्चा या सामन्यातला स्कोर ० (पहिल्या चेंडूवर) आणि ९.
न्युझीलंड बांग्लादेश कडून पण ०-५ असा मार खाऊनच भारतात आलेत.
भाऊ क्या बात है... मस्तच
भाऊ क्या बात है... मस्तच
१९८६ मधे ऑस्ट्रेलियात अॅशेस
१९८६ मधे ऑस्ट्रेलियात अॅशेस जिंकल्यावर पहिल्यांदाच इंग्लंड ने तेथे सिरीज मधे 'लीड' घेतला आहे. २४ वर्षांनी! ते एकमेकांशी जेवढे खेळतात त्यामानाने पाहा. मध्यंतरी एक दोन मॅचेस ते जिंकले होते पण सिरीज मधे पिछाडीवर असताना आणि जास्तीत जास्त बरोबरी करू शकतील एवढीच संधी असताना (म्हणजे समजा ०-२ ने मागे आहेत आणि अजून दोन मॅच बाकी), किंवा 'डेड रबर्स'.
२००५ आणि २००९ मधे इंग्लंड 'घरी' जिंकले आहेत पण ८६ नंतर ऑस्ट्रेलियात संधी आहे आता.
तिसर्यांदा अॅशेस हरण्याचा
तिसर्यांदा अॅशेस हरण्याचा 'विक्रम' पाँटींगच्या नावावर लागणार असे दिसते!
इंग्लंडला फक्त १-० ची आघाडी,
इंग्लंडला फक्त १-० ची आघाडी, अजून ३ सामने बाकी ; मी तरी आत्ताच निकालाबाबत बोलायचं धार्ष्ट्य नाही दाखवणार, निदान ऑसीजच्या बाबतीत ,त्यांच्याच देशात चाललेल्या मालिकेबाबत !
भाऊ व्यंगचित्र एकदम मस्त. काल
भाऊ व्यंगचित्र एकदम मस्त.
काल युसुफ पठाण बरोबर तिवारी मस्त खेळला. रैना, विराट कोहली, तिवारी, रोहित शर्मा ही नवी मंडळी मोठ्यांची जागा घ्यायला तयार आहेत. खूपच शुभ चिन्ह.
वनडे मॅच असुनही स्टँड्स इतके
वनडे मॅच असुनही स्टँड्स इतके रिकामे का होते?
<<काल युसुफ पठाण बरोबर तिवारी
<<काल युसुफ पठाण बरोबर तिवारी मस्त खेळला. रैना, विराट कोहली, तिवारी, रोहित शर्मा ही नवी मंडळी मोठ्यांची जागा घ्यायला तयार आहेत. खूपच शुभ चिन्ह.>>विक्रमजी, पूर्णपणे सहमत. प्रसंग ओळखून तिवारी संयमाने खेळला व पठाणला फटकेबाजीच्या संधि देत राहिला, हे परिपक्वतेचंच लक्षण !!
व्यंगचित्रातील व्यंग दुर्लक्षून दाद देणार्या सर्वांचे मनापासुन आभार.
भाऊ, पठाणी तडका/झटक्यावर एक
भाऊ, पठाणी तडका/झटक्यावर एक चित्र होऊन जाऊदे!!!
वनडे मॅच असुनही स्टँड्स इतके
वनडे मॅच असुनही स्टँड्स इतके रिकामे का होते?
>>
mi bangalore madhe asun mala bangalore madhe match aslyacha match reports madhun kalala...
ekunach ya series baddal lokanchyat udaaseenataa aahe... (ithlya post varunahi tech distay...)
organizers ni hi kaahihi ad keli navti (ind-aus test series chi khup ad karat hote)...
tyatna kal pavsachi chinha hoti ani tasa to ala hi...
वनडे मॅच असुनही स्टँड्स इतके
वनडे मॅच असुनही स्टँड्स इतके रिकामे का होते? >> रिक्षावाले ३ ते ९ पट भाडं मागत होते पाऊस सुरु झाला तेंव्हा, म्हणुनच कदचित रिकामे असतील
http://www.espncricinfo.com/india-v-new-zealand-2010/engine/match/467886...
>>> रैना, विराट कोहली,
>>> रैना, विराट कोहली, तिवारी, रोहित शर्मा ही नवी मंडळी मोठ्यांची जागा घ्यायला तयार आहेत.
कालच्या सामन्याचा खरा विजेता न्यूझीलँडच आहे. ३ बाद १०० धावसंख्या असताना रोहीत शर्मा यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला होता. तो त्यावेळी १ वर खेळत होता. अतिशय व्यवस्थित बाद होऊन सुध्दा पंचांनी त्याला बाद दिला नाही आणि आपण पूर्णपणे बाद असून त्यात संशयाला कोणतीही जागा नसताना सुध्दा हा पठ्ठ्या जागेवरून हालला नाही. अशा प्रसंगी बाद झाल्यावर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता तंबूकडे परतणार्या सुनील गावसकरची आठवण येते.
काही वेळाने पार्थिव पटेल सुध्दा बाद होऊन भारताची ४ बाद ११० अशी धावसंख्या झाली होती. शर्माला बाद दिले असते तर भारत ५ बाद ११० असा संकटात सापडला असता व नंतर सौरभ तिवारी आणि पठाण या जोडीला २०० हून अधिक धावा करणे खूप अवघड झाले असते. शर्माने नंतर ४४ धावा करताना पठाणबरोबर ८० हून अधिक धावांची भागीदारी करून भारताला सुस्थितीत नेले. पंचांची चूक न्यूझीलँडला महागात पडली.
आपण पूर्णपणे बाद असून त्यात
आपण पूर्णपणे बाद असून त्यात संशयाला कोणतीही जागा नसताना सुध्दा हा पठ्ठ्या जागेवरून हालला नाही.>>> ह्यात काही चूक आहे असे मला वाटत नाही, पंचांना त्यांचे काम नीट येत नसेल तर त्याची भरपाई खेळाडूने का करावी? बोलरकडे आउट करण्याचे ६ मौके असतात, बॅट्समनकडे एकच.
मुळात विकेटकिपरकडे गेलेला चेंडू 'कट' होउन गेला आहे हे बॅट्समनला पक्के ठाउक असतेच असे नाही, अशा परिस्थितीत तो जर वॉकआउट करत नसेल तर ते योग्यच आहे.
>>> मुळात विकेटकिपरकडे गेलेला
>>> मुळात विकेटकिपरकडे गेलेला चेंडू 'कट' होउन गेला आहे हे बॅट्समनला पक्के ठाउक असतेच असे नाही
आपल्या बॅटला चेंडू लागला आहे का नाही हे फलंदाजाला नक्कीच माहित असते. सनी डेज मध्ये गावसकरने अशाच स्वरूपाचे लिहिले आहे.
असो. त्याला बाद दिला असता तर सामना नक्कीच न्यूझीलंडच्या बाजूने झुकला असता.
>>सनी डेज मध्ये गावसकरने अशाच
>>सनी डेज मध्ये गावसकरने अशाच स्वरूपाचे लिहिले आहे.
अगदी अगदी... मला तर वाटतं काही "क्षणिक" अपवाद वगळता ९९% फलंदाज अन यष्टीरक्षक या दोघांना पक्के माहित असते की चेंडू बॅट ला लागला की नाही.
पण सन्नीभाई चे दिवस "जंटलमन क्रिकेट" चे होते आता "काँपिटीटीव्ह क्रिकेट" चे दिवस आहेत त्यामूळे एखाद्या फलंदाजाने माहित असून सुध्धा वॉक आउट केले नाही तर ते माफ असावे. या नाण्याची दुसरी बाजू ही की यष्टीरक्षकाने खोटे अपिल केले आणि चुकून पंचांनी ते मान्य केले तर फलंदाज "बाद" ठरतो. (य वादातूनच UDRS चा जन्म झाला खरा!) क्रिकेट चा खेळ आता "नैतीकता", "अनैतीकता" या चौकटीत बांधलेला नाही. आणि एखादा चुकीचा निर्णय देखिल सामन्याचे चित्र पालटू शकतो हे सर्वांना पक्के माहित असल्याने बहुदा फलंदाज "सेफ साईड" घेतात अन जबाबदारी पंचांवर सोपवतात.. we need to accpe that its all part of a game and view accordingly. खेळात बाकी कितीही तंत्रद्यान आलं तरी हा एव्हडा भाग मात्र "मानवीच" असावा असे मला वाटते.
या पार्श्वभूमीवर सन्नीभाई तेव्हा वॉक आउट करत होता याचं कौतूक असलच तरी आजच्या घडीला ते परिमाण तितकसं लागू होत नाही. असो हा वेगळा वादाचा मुद्दा होवू शकतो.
----------------------------------------------------------------------------------
बाकी आपले लोक विश्वचषकाच्या आधीच एकदम भरात आलेत.. चांगले आहे हा फॉर्म विश्वचषकापर्यंत टिकवा म्हणजे झाले. नाहीतर भरवश्याच्या म्हशीला...
-----------------------------------------------------------------------------------
विश्वचषकाच्या संघात मला तरी द्रविड चे स्थान कुठे दिसत नाही. काय म्हणता?
(सेहवाग, गंभीर, सचिन, रैना, धोणी, युवी, कोहली, युसुफ, झहीर, भज्जी हे तर नक्की आहेत... ऊरली एकच जागा: ईशांत्/श्रीशांत्/अश्विन्/पुजारा/नेहरा/प्रविण कुमार)
मला स्वतःला बॅटर ने आउट
मला स्वतःला बॅटर ने आउट असल्यास जावे असेच वाटायचे. पण माझ्यावर एकदा तशी वेळ आली असताना मी थांबलो. :(. त्यानंतर मी लोकांना या बाबतीत सल्ले द्यायचे ही थांबवले.
ते असो.
पण क्षेत्र रक्षण करण्यार्या टीम ची प्रत्येक डावात किमान २५ तरी खोटी अपिल असतात त्याच काय.
उदा. लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकल्यास वाएड देउ नये म्हणून केलेल कॉट बिहाईंडच अपिल तर नेहमीचच. जरा कुठे ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केल की किंवा पायाला बॉल लागला तर अगदी डीप मिड विकेट पासून सगळ्यांचे हात वर.
शेवटी बेरीज सारखीच
म्हणून अंपायरच काम त्यालाच करू देत. आणि आता तर तीन तीन असतात.
.
विश्वचषकाच्या संघात मला तरी
विश्वचषकाच्या संघात मला तरी द्रविड चे स्थान कुठे दिसत नाही. काय म्हणता? >>> द्रविड नावाचा कोट संघात घ्यावयाचा झाल्यास धोणीला यष्टीरक्षकाची वस्त्रे उतरवावी लागतील...
आता द्रविड आणि धोणी यात उजवा कोण हा परत वादाचा मुद्दा
>>> काल युसुफ पठाण बरोबर
>>> काल युसुफ पठाण बरोबर तिवारी मस्त खेळला.
काल पठाण चांगला खेळला. परंतु मला युसुफ पठाण बद्दल अजूनही फारसा भरवसा वाटत नाही. त्याच्यात सातत्याचा अभाव आहे. तो एखादा डाव खेळतो आणि पुढचे बरेच डाव फारसे काही करत नाही. तो बरेच झेलही सोडतो.
>>> (सेहवाग, गंभीर, सचिन, रैना, धोणी, युवी, कोहली, युसुफ, झहीर, भज्जी हे तर नक्की आहेत... ऊरली एकच जागा: ईशांत्/श्रीशांत्/अश्विन्/पुजारा/नेहरा/प्रविण कुमार)
यातले सेहवाग, गंभीर, सचिन, रैना, धोणी, युवी, कोहली, आणि झहीर हे ८ जण सर्व सामने खेळतील. उरलेल्या ३ जागांसाठी एक फिरकी गोलंदाज असणार (भज्जी किंवा अश्विन. पण पसंती भज्जीलाच असणार. ) आणि २ मध्यमगती गोलंदाज असणार (प्रविण कुमार, नेहरा, स्रिसंथ किंवा इशांत). पुजाराला पहिल्या ११ त स्थान मिळेल असे वाटत नाही. रैना, कोहली किंवा युवी सलग २-३ सामन्यात अपयशी ठरले किंवा त्यांची तंगडीबिंगडी दुखावली असेल तरच युसुफला संधी मिळेल.
>>यातले सेहवाग, गंभीर, सचिन,
>>यातले सेहवाग, गंभीर, सचिन, रैना, धोणी, युवी, कोहली, आणि झहीर हे ८ जण सर्व सामने खेळतील.
मास्तुरे,
दुखापतींचा अपवाद वगळता मला वाटतं सेहवाग, गंभीर, सचिन, रैना, धोणी, युवी, भज्जी, आणि झहीर हे लोकं सर्वच सामने खेळतील.
नेहरा, ईशांत, झहीर तीघेही एकत्र कुठलाही सामना खेळतील असे वाटत नाही कारण हे सामने आशिया खंडात होणार असल्याने गोलंदाजीपेक्षा फलंदाजीवर भर जास्त असेल.
तेव्हा या ऊर्वरीत तीन जागांसाठी प्रत्त्येक सामन्यागणिक या पैकी एक निवडतील असे वाटते:
नेहरा/ईशांत (गोलंदाज)
प्रवीण कुमार्/पठाण (अष्टपैलू. त्यातही पाठाण ला संधी अधिक कारण पुन्हा आशिया खंडात फलंदाजी निर्णायक ठरू शकते, शिवाय युसुफ ची गोलंदाजी कामचलाऊ आहेच)
कोहली/शर्मा/पुजारा (कोहलीचे चांसेस अधिक आहेत अलिकडचा फॉर्म बघता..)
किंव्वा पार्थिव पटेल/दिनेश कार्तिक (अधिकचा यष्टीरक्षक खेळवायचा असल्यास)
आगामी द. आफ्रिका दौरा कसोटी संघाच्या दृष्टीकोनातून अधिक महत्वपूर्ण असेल.
द्रविडला वन डे मधे फार पूर्वी
द्रविडला वन डे मधे फार पूर्वी पासून जागा नाही. तो उगाच आपल ग्रेग चॅपल मुळे व किपिंग करून जागा टिकवत होता. (बाय द वे. ग्रेग चॅपल ऑस्ट्रेलियाची निवड समिती असणे आणि ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी चालू त्याच वेळी असणे यात योगायोग नाही असे मला वाटते.)
माझ्या मते सेहवाग, गंभीर, सचिन, रैना, धोणी, कोहली, आणि झहीर नक्की. युवी, शर्मा, युसुफ यांच्यात चुरस. (पाचवा बॉलर म्हणून उपयोगी) शिवाय धोणीचा आवडता म्हणून जडेजा. तिवारी, पुजारा, कुणी अनफीट असेल तर.
बॉलर मधे मुनाफ, श्रीशांत, इशांत, प्रविण आलटून पालटून . त्या विनय कुमारला विसरलेत वाटत. तो उदानकट चांगला आहे अस म्हणतात. प्रग्यान टीम मधे असेल भजी बरोबर. अश्विन मला खूप चांगला वाटला होता.
मला वाटतं भज्जीची गोलंदाजी
मला वाटतं भज्जीची गोलंदाजी आता सर्वच संघाना खूपच "प्रेडिक्टेबल" झाली आहे. चांगले फलंदाज त्याला आरामात रिव्हर्स फ्लिकच नाही तर रिव्हर्स फटकेही मारतात. आपल्या विकेटसवर चेंडू सहसा बाऊन्स होत नसल्याने त्याच्या गोलंदाजीची धार इथे कमी झालेली दिसते. म्हणूनच संघात "सरप्राईज एलीमेंट" म्हणून एखादा तरी लेग स्पिनर उपलब्ध असावा. सचिन जर गोलंदाजीवर थोडं लक्ष केंद्रीत करून हा भार उचलायला तयार असेल तर उत्तमच; नपेक्षा, डावरा , चेंडूला उंची देणारा ओझा विकेटच्या दोनही बाजूनी [अधिक वेळ विकेटच्या उजव्या बाजूने, "ओव्हर द विकेट" ] गोलंदाजी करून ही उणीव भरून काढू शकतो. भज्जी हा सर्वच सामन्यात खेळलाच पाहिजे असं गृहीत धरू नये, एव्हढंच मला प्रामाणिकपणे वाटतं.
द्रवीड नाही, लक्ष्मण पण
द्रवीड नाही, लक्ष्मण पण नाही!
निदान सामना हरल्यावर 'द्रवीड हळू खेळला, म्हणून आपण हरलो' असे म्हणता यावे म्हणून तरी त्याला घ्यायला पाहिजे.
झक्की ...
झक्की ...
द्रविड वन डे मधे गांगुली
द्रविड वन डे मधे गांगुली कप्तान असताना जेव्हा कीपर झाला तेव्हा अतिशय चांगला खेळत होता. बरेच 'चेस' त्याने व युवराज/कैफ ने जिंकून दिले आहेत. तो स्वतः कप्तान झाला तेव्हापासून सगळे बिघडले.
भारतात आता पिचेस कशी बनवतात त्यावर आहे. पाटा असतील तर द्रविड ची गरज नाही. पण २००६ च्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सारख्या बनवल्या तर नक्कीच लागेल. तेव्हा देशात असून सुद्धा भारत, पाक, लंका, बांगला देश सगळे सेमी च्या आधीच बाहेर गेले होते, कारण पिचेस नेहमीसारखी नव्हती.
येथे माहिती आहे
http://www.espncricinfo.com/ci/engine/series/232694.html
त्याला बाद दिला असता तर सामना
त्याला बाद दिला असता तर सामना नक्कीच न्यूझीलंडच्या बाजूने झुकला असता.
तशा पंचाच्या चुकांमुळे भारताचाहि पूर्वी तोटा झाला होत. कुणि एक पंच तर सरळ पाँटिंगलाच विचारायचा! तो कशाला नाही म्हणेल? बादच आहे म्हणेल! असला आचरटपणा, खेळाचा खंडोबा चालवून घेतलेला आहे.
भारतात आता पिचेस कशी बनवतात त्यावर आहे.
आयला, इतकी सगळी प्रगति झाली, अजून पिचेस चे स्टँडर्ड बनवता येत नाही का क्रिकेट खेळणार्या इतक्या देशात कुणाला? चक्क भेगा पडलेल्या पिचवर काय खेळायचे? उलट चांगले स्टँडर्ड पिच बनवले म्हणजे गोलंदाजांची खरी कसोटी लागेल!
झक्की तसे नाही. भेगावाली
झक्की तसे नाही. भेगावाली वगैरे नाही भारतात वनडे ला नेहमी असतात तशी पिचेस.
<<आयला, इतकी सगळी प्रगति
<<आयला, इतकी सगळी प्रगति झाली, अजून पिचेस चे स्टँडर्ड बनवता येत नाही का क्रिकेट खेळणार्या इतक्या देशात कुणाला? >> पंचांचे चुकीचे निर्णय, पिचेसची वेडसर विविधता इ. सर्वच " ग्लोरीअस अनसर्टनटीज ऑफ क्रिकेट " या ब्रिटीशानी ठेवेलेल्या गोंडस नावाखाली झाकली जातात !!:हहगलो:
Pages