पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.
पोपटी करण्यासाठी लागणार्या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.
पोपटी करण्यासाठी लागणार्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.
पाऊस संपुन हिवाळ्यात जेंव्हा जमीन सुकायला लागते तेंव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरुन उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.
हे दोन प्रकारचे भांबुर्डे असतात कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल.
ही छोटी रोपटी असतात ती मुळासकट काढून धुवुन घेतात. रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात. मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.
आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.
त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.
आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते.
मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणतात.
आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते.
ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.
अश्विनी काल तुला खुप मिस केल.
अश्विनी काल तुला खुप मिस केल. तुझी आठवण काढल्याची पोस्ट आहे साक्षीला मागे वाच. तुला हवा असेल तर पिउ शकतेस चहा. सोबत करण्याचीही जबाबदारी घे.
मि पण येणार................
मि पण येणार................
जागुटले मी पण येणार आहे आधीच
जागुटले मी पण येणार आहे आधीच सांगितलय पण वेज पार्टीत मेधीच्या
अमेझिंग अमेझिंग अमेझिंग ..
अमेझिंग अमेझिंग अमेझिंग .. दुसरा शब्दच सुचत नाहीये
पर तुमचे परवानगी प्रकरण
पर तुमचे परवानगी प्रकरण संपलेले दिसते.
शुभांगी चांगल आहे. नाहीतरी नॉनव्हेज कितीही केले तरी पुरणे कठीणच आहे.
सोबत चहा????? अगं तू लिंबू
सोबत चहा?????
अगं तू लिंबू सरबत, मिरिंडा, ड्यूक्स लेमोनेड, व्हर्जिन लॉन्ग आयलंड आइस टि असं काहीही पिऊ शकतेस... हे काय?
बर मी येणार असले तर बरोबर थोडी मिक्सिंग कलेची झलक दाखवीन... इच्छुंकासाठी.
निधप मिक्सिंग कला कसली ? सांग
निधप मिक्सिंग कला कसली ? सांग हा आढे वेढे घेउ नको.
मासे पोपटीत टाकले तर
मासे पोपटीत टाकले तर मास्यांच्या मांसाचा खिमा राहील तळाला आणि काटे हातात येतील>>>> मासे केळीच्या पानात किंवा अॅल्युमिनीअम फॉईलमधे मसाला मारून व्रॅप करून ठेवायचे, पर्फेक्ट होतात.....
निधप मिक्सिंग कला कसली ? सांग
निधप मिक्सिंग कला कसली ? सांग हा आढे वेढे घेउ नको.<<
थोडी थांब. चुकले फकीर मशिदीकडे येऊ लागतील...
जागू ते माती लिंपून अंडी
जागू ते माती लिंपून अंडी भाजणे प्रकार मला माझ्या फ्रेंच मित्रांनी सांगितला होता. (असे केल्याने म्हणे अंडी पारदर्शक शिजतात. ) तसेच पूर्णपणे मिठात लपेटून चिकन पण भाजतात.
माझ्या घानातल्या मित्राने नारळात भरुन केलेली कोलंबी सांगितली होती. कोवळा नारळ न सोलता वरुन कापायचा. त्यात कोलंबी, लाल तिखट, मिठ, हिरवे टोमॅटो वगैरे लावून कोलंबी भरायची. त्यात ओले खोबरे घालायचे. (मूळचा नारळ खरवडायचा नाही, तसे केले तर कडसर चव येते.) आणि त्याला परत झाकण लावून, तो अख्खा नारळ शेकोटीत भाजायचा.
हे सगळे प्रयोग करुन बघा, तिथे.
अरे ते कॉकटेल बद्दल बोलत आहेत
अरे ते कॉकटेल बद्दल बोलत आहेत कि काय ?
नाहीतरी नॉनव्हेज कितीही केले तरी पुरणे कठीणच आहे. << अगदी खरं आहे.
वर्षू धन्यवाद. प्रसिक तसे
वर्षू धन्यवाद.
प्रसिक तसे केले तरी हरकत नाही. छान लागतील.
निधपच्या आढेवेढ्यांना सुरुवात झाली.
दिनेशदा तुम्ही आधी शहाळ्यात
दिनेशदा तुम्ही आधी शहाळ्यात मासे शिजवण्याबद्दलही लिहील होतत कुठेतरी. हे सगळे प्रकार करायला हरकत नाही. पोपटीच्याच शेकोटीत नारळ टाकायचा. हा.का. ना. का.
नी , सांग की ग भाव कसला
नी , सांग की ग भाव कसला खातेस्??:हाहा:
मिक्सिंग कला????
अय्यो आढेवेढे नाही पण बायांनो
अय्यो आढेवेढे नाही पण बायांनो तुमच्या उपयोगाची नाही ती कला बहुतेक. वाया गेलेल्या लोकांसाठी आहे ते...
शहाळी ठेवा मिक्सिंगसाठी...
शहाळी ठेवा मिक्सिंगसाठी...
आक्षी, नागाव, उरण, ठाणे,
आक्षी, नागाव, उरण, ठाणे, विरार, पुणे, मुंबई सह पोपटी गटग झालेच पाहीजे.<<<<< नक्की कुठ, आणि केव्हा होणार आहे
नीधप, मिस्किंग कला म्हणजे
नीधप, मिस्किंग कला म्हणजे कॉकटेल कला काय? हॉटेल मॅनेजमेंटला होता एक मित्र त्याचे प्रयोग आमच्यावर व्हायचे.
नी, शहाळ विथ ताडी का
नी, शहाळ विथ ताडी का कॉय्??:फिदी:
सुक्या चुकला पीर मशिदीत
शहाळं विथ ताडी.. अरे
शहाळं विथ ताडी.. अरे देवा...
शहाळ्यात इतर बरे जिन्नस घालतात...
वाया गेलेल्या लोकांसाठी आहे
वाया गेलेल्या लोकांसाठी आहे ते...
>>
मी येईन मग..
शुकू.. शहाळ विथ ताडी..
शुकू.. शहाळ विथ ताडी.. आssssहा ! ईट् साऊंडस झिंगारोssssssssss!
शहाळ्यात इतर बरे जिन्नस
शहाळ्यात इतर बरे जिन्नस घालतात... << जिन्नसची खुन्नस नको तेव्हा शहाळ्यात ताडी-माडीची जोडीच बरी.
योडे ताडी तिकडे सर्रास मिळत
योडे
ताडी तिकडे सर्रास मिळत असेल अलिबागला. आम्ही मुरुडला गेलो होतो तेंव्हा तिथे ताडी पाहीली होती.
अगदीच वाईट लागतं ते. ताडीमधे
अगदीच वाईट लागतं ते. ताडीमधे कसलं काही मिक्स करताय. ताडी नुसतीच बरी फारतर पाणी घाला.
शहाळ्यात ताडी म्हणजे दोन्हीचा नास.
बाकी मिळेल ती ताडी अस्सलच
बाकी मिळेल ती ताडी अस्सलच असेल आणि योग्य पद्धतीनेच केलेली असेल याची खात्री नसेल तर न प्यायलेली बरी.
नी अग ताज्या ताडी माडीने
नी अग ताज्या ताडी माडीने मॉकटेल होत ग बायो
आता समस्त सुकि जमात काय विचार करेल तेच जाणो
पर्सिक तुझ जाळ टाकुन मागच्या
पर्सिक तुझ जाळ टाकुन मागच्या पोस्टी वाचुन ये मग कळेल.
जाउदे पण नुसत नारळपाणी
जाउदे पण नुसत नारळपाणी सगळ्यात उत्तम
अलिबागला ताडी सकाळीच देतात.
अलिबागला ताडी सकाळीच देतात. संध्याकाळी प्यायलेली ताडी चढते.
Pages