पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.
पोपटी करण्यासाठी लागणार्या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.
पोपटी करण्यासाठी लागणार्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.
पाऊस संपुन हिवाळ्यात जेंव्हा जमीन सुकायला लागते तेंव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरुन उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.
हे दोन प्रकारचे भांबुर्डे असतात कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल.
ही छोटी रोपटी असतात ती मुळासकट काढून धुवुन घेतात. रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात. मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.
आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.
त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.
आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते.
मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणतात.
आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते.
ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.
जागु, एका मित्राकडुन ऐकलं
जागु, एका मित्राकडुन ऐकलं होतं हे. जनरली अलिबागच्या जवळ होतो का गं हा प्रकार??
हे भुजिंगच्या जवळपासच आहे का
हे भुजिंगच्या जवळपासच आहे का ?
योडी अग जिथे शेतं आहेत तिथे
योडी अग जिथे शेतं आहेत तिथे होते ही पोपटी.
मस्त्!!आजपर्यंत फक्त वाचलं
मस्त्!!आजपर्यंत फक्त वाचलं होतं य पोपटी बद्दल!! आता तुझ्यामुळे नक्की काय करतात ते बघायला पण मिळाले!! तुमच्या शेतात केली होती का हि पोपटी??
बरोबरे योडे.. तोंपासू जागू..
बरोबरे योडे..
तोंपासू जागू.. ओले वाल आल्यावर लगेचच एक गट्ग ठरवून टाक ग..
मस्त मस्त
मस्त मस्त
मेधा त्यासाठी तुम्हाला नाईट
मेधा त्यासाठी तुम्हाला नाईट गटग करावा लागेल.
अग हल्ली बारा महिने ओले वाल येतात. पण गावठी आता सुरुवात होतेय.
रोचिन, माझ्या आईकडे केली होती ही. माझ्या घरीही करतो आम्ही.
विनय अलिबाग, उरण आणि जिथे हे शेंगांचे प्रकार पिकतात तिथे करतात ही पोपटी.
तोंपासू जागू.. >>>> खरच मेधा
तोंपासू जागू.. >>>> खरच
मेधा मीपण येईल गटगला
लोकहो, एक पोपटी गटग व्हायलाच
लोकहो, एक पोपटी गटग व्हायलाच पायजेल.
जागू, प्लीज अॅरेंज कर. तूझ्यापेक्षा योग्य व्यक्ती कुणीच नैये.
विनय, भुजिंग म्हणजे चिकन घातलेले पोहे.
भारीच की! मी कध्धीसुद्धा ऐकलं
भारीच की!
मी कध्धीसुद्धा ऐकलं नाहीये या प्रकाराबद्दल!
लोकहो, एक पोपटी गटग व्हायलाच
लोकहो, एक पोपटी गटग व्हायलाच पायजेल >>> ए, हो! हो!!
गुजराथमधे असताना वलसाडच्या समुद्रकिनार्यावर खायचो आम्ही हे. भेळ्पुरी/पाणीपुरी ऐवजी आमची पावलं पोपटीच्या स्टॉलकडेच वळायची
अरे वा, सगळे साग्रसंगीत !!
अरे वा, सगळे साग्रसंगीत !! माझ्या आजोळी त्यात पावट्याच्या शेंगा आणि अंडी (अख्खी) टाकतात. भाबूर्ड्याचा पाला माहित आहे. शेतात असतो, पण त्याच्यावर पाय पडला तरी उग्र वास येतो. पण तो भाजीत वापरतात हे माहीत नव्हतं.
अकाली पडणार्या पावसातही, या भाज्या आपले ताळतंत्र टिकवून ठेवताहेत, हे कौतूकाचे.
चला अलिबागला मी सोय करतो
चला अलिबागला मी सोय करतो सगळ्यांची राहायची... जागूला घेउन तुम्ही या..
जल्ला हाय काय नी नाय काय ?
जागू हो ग करच तू अॅरेंज गटग.
जागू हो ग करच तू अॅरेंज गटग. मी अगदी पुण्याहुन येइन
जागू मस्तच!!!! हे सगळे एकदा
जागू मस्तच!!!!
हे सगळे एकदा भटकंती (कोरलई) मध्ये दाखवले होते. दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे त्यात अंडी देखील टाकली होती.
विनय, भुजिंग म्हणजे चिकन
विनय, भुजिंग म्हणजे चिकन घातलेले पोहे.
मला वाटल भुजिंग म्हणजे कुठल्या गावाबद्दल बोलतोय का विनय
असुदे, नुतन, चिंगी पाउस थांबला की करुया पार्टी
प्रिती बर झाल सांगितलस पोपटीचाही स्टॉल असतो ते. गटगला मी पण स्टॉल लावेन २० रु. प्लेट
दिनेशदा भांबुर्डा दुसर्या कुठल्या भाजीत नाही टाकत फक्त पोपटीतच टाकतात. आणि अंडी आमच्याकडेही टाकतात. मी असही ऐकलय की अंड्याला पुर्ण भिजवलेल्या मातिने लेपुन मातीचे त्याला कव्हर करुन ते आगीत भाजुन खातात.
जल्ला ३१ दिसेंबरला तरी खायला
जल्ला ३१ दिसेंबरला तरी खायला घाल आम्हाला जागू काहितरी ..:अरेरे: भट आशिर्वाद देतील तुला:फिदी:
विनय, अलिबागल पोपटी
विनय, अलिबागल पोपटी करण्यासारखी जागा पायजे. शिवाय पोपटी ही स्पेशॅलिटी आहे. एक्सपर्टच पायजे.
मस्त
मस्त
मी ऱोह्याला असताना पाहिले
मी ऱोह्याला असताना पाहिले आहेत हे सगळे उपद्व्याप! पण मस्तच पार्टी!!
विनय उरण काय नी अलिबाग काय
विनय उरण काय नी अलिबाग काय पोपटी झाल्याशी मतलब.
पोपटी पोपटी ऐकुन वर्षे लोटली,
पोपटी पोपटी ऐकुन वर्षे लोटली, जल्ला कोणितरी खायला घाला ती आता?
वेज पोपटीची तयारी मीकरु शकते
वेज पोपटीची तयारी मीकरु शकते अलिबागेत.. जागू तू नॉन्व्हेजची तयारी कर..
चला ठरल तर पोपटी गटग.. हाकानाका..
विनय, भुजिंग म्हणजे चिकन
विनय, भुजिंग म्हणजे चिकन घातलेले पोहे.
>>> ते मला माहित्येस लोक्सांनो... मी कोकणस्थ ब्राम्हण आहे, महिन्यातुन एकदा तरी मी भुजिंग खातोच्.. जवळपासच आहे का अस विचारल , प्रोसेस त्याची ...
जाउ दे मला कुठे बनवायचय ... मला तर खायचय ...:फिदी:
भट आशिर्वाद देतील
भट आशिर्वाद देतील तुला:फिदी:
विनय ते मला माश्यांच्या रेसिपिवरच मिळतात
अखी, कृष्णा धन्स.
अलिबागल पोपटी करण्यासारखी
अलिबागल पोपटी करण्यासारखी जागा पायजे. >>> जागा आहे , चिंता नसावी.
शिवाय पोपटी ही स्पेशॅलिटी आहे. एक्सपर्टच पायजे. >>> जागू नान वेज , मेधी वेज... ठरल..
जागे.. तुम्ही तो भांबुर्डीचा
जागे.. तुम्ही तो भांबुर्डीचा पाला घात्ल्यावर मडक्याच थोबाड लिंपत नाही का शेणाने?? बघ लिंपून अजून खमंग लागते पोपटी.. अहाहाहा.. लईच तोंपासु..
प्रिती बर झाल सांगितलस
प्रिती बर झाल सांगितलस पोपटीचाही स्टॉल असतो ते. गटगला मी पण स्टॉल लावेन २० रु. प्लेट >>> जागू, तुझी जोरदार कमाई होईल मग!
वापीला तर (आम्ही रहायचो ते गाव) थंडीच्या दिवसांत रोजच्या भाजी मंडईत सकाळी सकाळी गेलं तर मिळायची ही तयार पोपटी (बाकी, यात अंडी अफलातून लागतील.)
जागू, विनय बाफ काढ, तारीख
जागू, विनय बाफ काढ, तारीख ठरवा, नोंदणी सुरु करुया.
जवळपासच आहे का अस विचारल ,
जवळपासच आहे का अस विचारल , प्रोसेस त्याची ...
इथे शोध की भुजिंग म्हणुन.. थंडने दिलीय त्याची रेसिपी.
आणि असल्या खायच्या गटगंना मला विसरु नका बाबानु...... उगाच माझे शाप घेऊ नका.
Pages