पोपटी पार्टी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 November, 2010 - 04:24

पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.

पोपटी करण्यासाठी लागणार्‍या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
Popati.jpg

पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.

पोपटी करण्यासाठी लागणार्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.

Popati2.jpgPopati3.jpg

पाऊस संपुन हिवाळ्यात जेंव्हा जमीन सुकायला लागते तेंव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरुन उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.

हे दोन प्रकारचे भांबुर्डे असतात कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल.
popati14.JPGpopati12.JPG

ही छोटी रोपटी असतात ती मुळासकट काढून धुवुन घेतात. रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात. मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.

Popati1.jpg

आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.

popati11.jpg

त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.

Popati5.jpg

आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.
Popati6.jpg

साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात.

साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते.

मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणतात.
popati7.jpgpopati8.jpgpopati9.jpg

आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते.
popati10.jpg

ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाकृंकडे कधी डोकावणे होत नाही. पण ही पोपटी अफाटच दिसतेय. खरेच करून खाऊन बघायला पाहिजे. विनय, गटगची माहिती टाक हां लवकर. मी पण येणार. Happy

अय्यो आढेवेढे नाही पण बायांनो तुमच्या उपयोगाची नाही ती कला बहुतेक. वाया गेलेल्या लोकांसाठी आहे ते
कधीमधी वाया जायला मला आवडेल .... Happy

पोपटी खाताना बरोबर चहा प्यायचा असतो का?

काय हे.... सौभद्रची आठवण झाली... अरसिक किती हा......
(अश्वे हलकेच घे हा.... नायतर मला टाकशील पोपटीत Happy )

मासे टाकल्यावर पोपटीचा अगदी खिमा होतो..कोलंबी ची पोपटी ठीक होते... पण वालां ची आणि कोंबडीची पोपटी म्हणजे एकदम जबराट होते. ... बादवे,मी नेरुळ्गावात रहातो. Happy

नायतर मला टाकशील पोपटीत Lol पोपटी खाताना चहा? काय अरे! 'लो एम इज क्राईम' बरं का केश्वे. Proud

आधीचे १७ कुठे आहेत ? >> आधीच्या सतरांचा हिशोब लावायलाच आलोय ना!

झ का स. नॉन व्हेज खात नाही आणि जागूच्या भाज्यांची नावंही ठाऊक नसतात म्हणून नव्हते फिरकले इकडे. न आल्यापेक्षा, येऊन झालेल्या पोपटी पार्टीच्या अनावर इच्छेचं काय करायचं याचाच पस्तावा झालाय. Proud जाहीर गटग ठरवा. Happy

नॉन व्हेज खात नाही आणि जागूच्या भाज्यांची नावंही ठाऊक नसतात म्हणून नव्हते फिरकले इकडे.

हा अन्यायच झाला म्हणायच. माझ्यावर पण आणि तुझ्यावरपण.

.

मी तुमच्यापैकी कोणालाही ओळखत नाही. पण या गटगला मलापण यायचं आहे. मी येउ शकते का? (म्हणजे येणारच आहे....फक्त औपचारिकपणे विचारल्यासारखं केलय Happy ). पण मी मेधा यांच्या पार्टीमधे.

हायला ! किती मडकी आणावी लागतील ना !
मी खड्डे खणायला मदत करेन Proud व्हेज पोपटीतील वांगं सोडून काहीही खाईन.
त्या पोपटीच्या एका मडक्यात प्रयोग म्हणून काही वाट्या तांदूळ धुवून/२ तास भिजवून्/निथळवून टाकले तर स्मोक्ड पोपटी भात तयार होईल का? पण मग अख्ख्या शेंगा नाही टाकता येणार, दाणे टाकावे लागतील.

नीरजा, अशी मस्त वातावरण निर्मिती झाली आहे ना पोपटी पार्टीची ! कधी एकदा सगळे बस वगैरे करुन उरण्/अलिबागला जातोय आणि ते काय ते खातोय असं झालंय. पण मस्त थंडीचा गारठा पाहिजे तेव्हा. शेकोटी भोवती मस्त शेकायला बसायचं पोपटी खात खात. शुक्राची चांदणी दिसायला लागेपर्यंत गप्पा हाणायच्या.

अगं ते पोपटी म्हणजे काहीतरी खरपूस भाजलेलं असं चित्र आहे डोळ्यासमोर (आम्ही होळीत कांदे बटाटे भाजून खायचो). बरं, नाही म.दूध आणि चहाचं बोलणार. तांब्याबर पाणीच ढोसेन Proud

बरं Happy

शेतातल्या काळोखात, शेकोटीच्या उजेडात, पत्रावळीवर पोपटीतील नक्की कोणता पदार्थ खातोय ते चाचपडल्याशिवाय कळणार नाही Proud
नाहीतर जागू पोपटी बनवून ढणाढणा ट्युबलाईटच्या उजेडात स्टॉल लावेल आणि स्टीलच्या ताटात पोपटी देईल, मग निर्माण झालेल्या वातावरणाचा पचका Biggrin

अरे वा :).
मज्जा ना. पण जब तक चाय ना हो चिजो का मजा हि महि आता. हे आपल माझ मत. पोपटि झालि कि थोड्या लोकांसाठि चहा पण करु... कस वाटतय?

Pages