पोपटी पार्टी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 November, 2010 - 04:24

पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.

पोपटी करण्यासाठी लागणार्‍या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
Popati.jpg

पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.

पोपटी करण्यासाठी लागणार्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.

Popati2.jpgPopati3.jpg

पाऊस संपुन हिवाळ्यात जेंव्हा जमीन सुकायला लागते तेंव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरुन उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.

हे दोन प्रकारचे भांबुर्डे असतात कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल.
popati14.JPGpopati12.JPG

ही छोटी रोपटी असतात ती मुळासकट काढून धुवुन घेतात. रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात. मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.

Popati1.jpg

आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.

popati11.jpg

त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.

Popati5.jpg

आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.
Popati6.jpg

साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात.

साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते.

मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणतात.
popati7.jpgpopati8.jpgpopati9.jpg

आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते.
popati10.jpg

ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पोपटीने तोंडाला पाणी सुटलं..... फक्त आमच्याकडे (नवी मुंबई ..... नेरुळ्,करावे,बेलापूर,दारावे,उलवा,गव्हाण परिसर ) भांबुर्ड्या च्या पाल्याला...... भांबरुटाचा पाला म्हणतात.

हे महान प्रकरणेय... एकदा खाल्लंच पाहिजे. आणि तिकडे भुजिंगची रेसिपी वाचून शाकाहारीवरून मांसाहारीवर जावे काय असे वाटायला लागलेय!

खायला आपण कधीही तयार.. अम्या मला विसरू नकोस!!

२५ आणि २६ डिसेंबर जमणार असेल सगळ्यांना
तर अलीबाग पासून ४ किमी वर आक्षी , नागाव गावात किंवा आसपासच्या गावात सोय बघणे चालू आहे.
ट्रीप फक्त ५० लोकांकरता मर्यादीत असेल, कारण या पेक्षा जास्त क्षमता गावात कोनाकडेही राहायची नाही, नाहितर मग वेगळी व्यवस्था बघायला लागेल. मेधा तुझी मदत लागेल.
बाकी माहिती लवकरच देण्यात येइल...:संयोजक मोड ऑफ:

सह्ही....पोपटी भी और पोपटी पार्टी की आयडिया भी Happy

आधी पोपटी पार्टी वाचल तर मला वातलं कुठली नवी पोलिटीकल पार्टी हाय की काय... पोपटी झेंडावाली Proud Lol

खल्लास पाककृती जागू.
आक्षी, नागाव, उरण, ठाणे, विरार, पुणे, मुंबई सह पोपटी गटग झालेच पाहीजे.
करा लोकहो मज्जा करा, पोपटी खा, भुजींग खा. आम्ही नुसते इथुन वृत्तांत वाचून कोळसा होणार. Proud

वॉव. विचार करुनच काय मस्त लागेल असं वाटतय. Happy जागु तुझ्याकडे रहायलाच यायला हव आता. कुरियर करुन चालणार नाही Wink

जबरीच! खाना-खजानात संजिव कपुरने सेम असलिच 'उंधियोची' क्रुती दाखवली होती. भाज्या केळिच्या पानात गुंडाळुन मडक्यात रचली होती.

२५-२६ डिसेंबर? वॉव! आधी बोटीने अलिबागला आणि मग रात्री पोपटी पार्टी .... अफलातून बेत आहे Happy

भ्रमर मासे पोपटीत टाकले तर मास्यांच्या मांसाचा खिमा राहील तळाला आणि काटे हातात येतील. मासे खुप लवकर शिजतात एकवेळ कोलंबी चालु शकेल. चांगली आयडीया दिलीस. एकदा कोलंबी टाकुन बघेन.

बिनय, मेधा, इंद्रा पहिला नाव नोंदणी चालु करा म्हणजे तशी अ‍ॅरेंजमेंट करायला लागेल ना. आणि हो एका मडक्यात भागणार नाही. ४-५ मडकी लागतील. शिवाय लाकडही तेवढीच लागतील. जागाही ऐसपैस बघ.

मनिषा २ प्लेटचे ५० रु.

कैलास तुम्ही कुठले आहात ?

निधप खाउन बघच एकदा.

रैना, सिंडरेला, वित्तंबुगा, मृण्मयी, चातक, रुनी, सावली, प्राजक्ता, श्री तुम्हा सगळ्यांचे विषेश धन्यवाद.

लाजो आपण गटगच्या गृपचा करुया पोपटी झेंडा.

नीतिनचंद्र - पावटा, मेदळ ह्या शेंगा होळीच्या हंगामात येतात म्हणुन तेंव्हा करतात. एकदा का शेंगांना सुरुवात झाली की पोपटीलाही सुरुवात होते.

सुकी हे काय बाबा नविन आल्यासारख विचारलस ?

आक्षी, नागाव, उरण, ठाणे, विरार, पुणे, मुंबई सह पोपटी गटग झालेच पाहीजे.

झालेच पाहिजे.. झालेच पाहिजे..............

ह्या गटगला आमंत्रण दिसतय का कुठे ? मालक व्यवस्था करणार आहेत. तोपर्यंत कोण कोण येणार ते लिस्ट बनवुन ठेवा.

मी पण येणार पोपटी खायला. पण मी सुद्धा मंजुडीप्रमाणे मेधाच्या पार्टीत. पोपटी खाताना बरोबर चहा प्यायचा असतो का?

Pages