पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.
पोपटी करण्यासाठी लागणार्या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.
पोपटी करण्यासाठी लागणार्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.
पाऊस संपुन हिवाळ्यात जेंव्हा जमीन सुकायला लागते तेंव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरुन उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.
हे दोन प्रकारचे भांबुर्डे असतात कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल.
ही छोटी रोपटी असतात ती मुळासकट काढून धुवुन घेतात. रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात. मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.
आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.
त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.
आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते.
मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणतात.
आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते.
ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.
<< अलिबागला केल गटग तर मी
<< अलिबागला केल गटग तर मी करेन त्याची व्यवस्था.. >>
कसली ? शेणाची ?
आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद,
आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, नांदगाव, मुरुड सगळंच छाने ग जागू..
यापैकी कुठेही राहण्याची
यापैकी कुठेही राहण्याची व्यवस्था मी पण करुन देऊ शकते..
>>> हमारे जासूस कोने कोने मे फैले हुवे है..हा हा
कसली ? शेणाची ? दिवा घ्या
कसली ? शेणाची ? दिवा घ्या >> हवी अस्ल्यास अख्ख्या शेणखळीची सुद्धा..
मेघा मागच्यावर्षी मे महिन्यात
मेघा मागच्यावर्षी मे महिन्यात आम्ही मुरुडला गेलो होतो. खुप आवडला तो परीसर आम्हाला. आता परत जायच झाल की तुलाच कळवेन.
मला पण पायजे पोपटी... पण मी
मला पण पायजे पोपटी... पण मी मेधाच्या पार्टीत.
मेधा, शेण नाही गं, ओल्या मातीने लिंपतात ते मडकं...
चालेल ग मंजे.. पण मी तर
चालेल ग मंजे.. पण मी तर शेणाने लिंपलेलच बघितलय..
ए मला पण घ्या रे या गटग ला...
ए मला पण घ्या रे या गटग ला... बाकीच्या गटग्ला नसले म्हणुन काय झाले
<< हवी अस्ल्यास अख्ख्या
<< हवी अस्ल्यास अख्ख्या शेणखळीची सुद्धा.. >>
म्हणजे ? आम्हाला गोठ्यात बांधणारेस की काय ?
गटगला मी पण स्टॉल लावेन २०
गटगला मी पण स्टॉल लावेन २० रु. प्लेट >>> ए मावशे येक पिलेट दे...
मला पण भुजिंग (मी हा प्रकार प्रथमच ऐकते आहे पण इंटरेस्टींग वाटतोय वर्णनावरून.) >>> जल्ला नाम ही काफी है... विरारला मिळतो हा तोंपासू प्रकार
इन्द्रा
इन्द्रा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/10112
मंजू तुझ्याकडून मातीने
मंजू तुझ्याकडून मातीने लेपलेली पोपटी.
इंद्राने अॅडव्हन्स मध्ये बुक केलेय प्लेट. हेच मनीऑर्डरने पाठव पैसे.
हेच मनीऑर्डरने पाठव पैसे. >>>
हेच मनीऑर्डरने पाठव पैसे. >>> आमच्या कडे फकस्त रजनीऑर्डरने पैसे पाठवायची गैरसोय आहे... :p
इंद्रा म्हणजे नोटांची नाणी
इंद्रा म्हणजे नोटांची नाणी होऊन येत असतील पैसे
अहो..... आम्हि पण यायच
अहो..... आम्हि पण यायच म्हणतोय..... कस करायच
कस करायच ? वर फोटोसकट रेसिपी
कस करायच ? वर फोटोसकट रेसिपी टाकलेय की.
अहो..... आम्हि पण यायच
अहो..... आम्हि पण यायच म्हणतोय (गटग ला)>>>> अहो ह्याच कस करायच.
तशि तुमचि परवानगि असेल तरच
परवानगी वरती परवानगी हा शब्द
परवानगी
वरती परवानगी हा शब्द तरी दिसतो का ते बघा कोणाच्या पोस्ट मध्ये ?
जागू, ते पर आहेत म्हणून
जागू, ते पर आहेत म्हणून पर-वानगी मागताहेत. या की पर, पोपतीत घातलेली वान्गी मिळतील की तुम्हाला
पर अजून परकेच आहेत म्हणून
पर अजून परकेच आहेत म्हणून परवानगी मागताय्त जागू..
(No subject)
परवानगी? म्हंजे काय? खरेच
परवानगी? म्हंजे काय? खरेच सांगतो, हा शब्द मी माबोवर पहिल्यांदाच वाचतोय
आणि हे गटग कुठे आणि कधी आहे? डीटेल्स द्या.
आगाऊ हे गटग कुठे आणि कधी
आगाऊ :d
हे गटग कुठे आणि कधी आहे? डीटेल्स द्या. >>> डिटेल्ससाठी गटगचे संयोजक विनय भिडे यांच्या प्रत्येक पोष्टी लक्ष ठेवून असा...
ठरली की नाय अजून पोपटी पार्टी
ठरली की नाय अजून पोपटी पार्टी ठरवा लवकर!!!
अलिबागला ठरवा नायतर नागावला पण ठरवा पन मला विसरू नका!
गटग कुठे आणि कधी आहे? डीटेल्स
गटग कुठे आणि कधी आहे? डीटेल्स द्या. >>> ठरवण्याकरता बैठक घ्यावी लागेल अम्या..:फिदी:
च्या मारी....... मला बोलवायला
च्या मारी.......
मला बोलवायला विसरू नका........
कृष्णदेवराय तुम्हाला कसं
कृष्णदेवराय तुम्हाला कसं विसणार /\
मला बोलवायला विसरू
मला बोलवायला विसरू नका........ >> ओके... आता लक्षात ठेवलेय.. परत बारस करु नकोस.. नाहीतर तु या गटगला मुकशील
अरे खरच सिरियसली म्हणताय का ?
अरे खरच सिरियसली म्हणताय का ? मी तर आत्तपर्यंत मस्करीच करत होतो...:अओ:
Pages