पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.
पोपटी करण्यासाठी लागणार्या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.
पोपटी करण्यासाठी लागणार्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.
पाऊस संपुन हिवाळ्यात जेंव्हा जमीन सुकायला लागते तेंव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरुन उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.
हे दोन प्रकारचे भांबुर्डे असतात कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल.
ही छोटी रोपटी असतात ती मुळासकट काढून धुवुन घेतात. रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात. मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.
आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.
त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.
आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते.
मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणतात.
आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते.
ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.
शुभांगी तु येणार असशील तर
शुभांगी तु येणार असशील तर नक्कीच.
रुपाली तु पण ये ग.
मेधा म्हणजे आधी व्हेज खायला अलिबागला जायच आणि मग नॉनव्हेज खायला उरणला जायच का ?
जागू, विनय बाफ काढ, तारीख
जागू, विनय बाफ काढ, तारीख ठरवा, नोंदणी सुरु करुया.
मॅनेजरसाहेब आले ऑर्डर द्यायला. आता मला विचारतील भुजिंग कुठे म्हणुन
<< तुम्ही तो भांबुर्डीचा पाला
<< तुम्ही तो भांबुर्डीचा पाला घात्ल्यावर मडक्याच थोबाड लिंपत नाही का शेणाने?? >>
नाय, पण या पार्टीला न येणार्याच थोबाड मात्र......
जागू, विनय बाफ काढ, तारीख
जागू, विनय बाफ काढ, तारीख ठरवा, नोंदणी सुरु करुया.>>>>>जोरदार अनुमोदन
नाही पण मला भुजिंगपण पाहिजे
नाही पण मला भुजिंगपण पाहिजे हां...
मी काय म्हणतो ...उरणलाच जाउ कसे?
जागे.. मालक लोक्सांची
जागे.. मालक लोक्सांची राहाय्ची व्यवस्था अलिबागेत कर्णारेत ना म्हणून म्हटल मी.. तुझ्याकडे होणार असेल तर उरणलाच करुया..
जल्ला तारीख ठरवा... मग बाफच
जल्ला तारीख ठरवा... मग बाफच काढतो... जागूला विचारुन..
हमारा नारा
चलो अलिबाग
खाओ पोपटी
.....
मेधे म्हणजे शेणाचा वास मिक्स
मेधे म्हणजे शेणाचा वास मिक्स होतो का ग त्यात ? थांब अजुन अश्विनी नाही आली नाहीतर ती नाक बंद करुन घेईल.
उगाच माझे शाप घेऊ नका.
मागच्या जन्मी तु तापट ऋषी होतीस का ?
मागच्या जन्मी तु तापट ऋषी
मागच्या जन्मी तु तापट ऋषी होतीस का ?
छे बाई ऋषीबिशि काही नाही.. मी सगळ्या जन्मात मांसाहारी होते आणि राहिन...
मस्त !! वाचुनच तोंडाला पाणी
मस्त !!
वाचुनच तोंडाला पाणी सुटले ...
एकदा खायला पाहिजे हा प्रकार ....
कुठे होतात ह्या पार्ट्या ...माबोकरांना घेवुन अशी एखादी पार्टी करायला हरकत नाही ...
(असाच एक मी चिकनचा प्रकार ऐकला होता ... चिकन पुर्ण स्वछ करुन सगळे मसाले आत भरायचे ...मग त्याला कणकेचे जाडसर आवरण तयार करायचे अन मग ते आगीट ठेवायचे ..कणकेचे आवरण नारळाच्या करवंटी सारखे कडक होई पर्यंत ते शिजते ... मग वरचा कणकेचा लेयर काढुन ते सर्व्ह करतात ...)
मला पण भुजिंग (मी हा प्रकार
मला पण भुजिंग (मी हा प्रकार प्रथमच ऐकते आहे पण इंटरेस्टींग वाटतोय वर्णनावरून.)
उरणलाच जाऊ या ..... (अलिबाग गटगचा एक्का राखून ठेवू या :फिदी:)
विनय राहायची सोय होत असेल तर
विनय राहायची सोय होत असेल तर अलिबागेतच जाऊ. उरणला यायच असेल तर दिवसा पोपटी करु.
अलिबागला ६० लोकांची राहण्याची
अलिबागला ६० लोकांची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे , माझ्या खास मित्राकडे...
खाण्याची चिंताच नाही ... बाकी राहिल्...:डोमा: त्याच काय होईल्...:फिदी:
शेणाचा वास मिक्स होतो का ग
शेणाचा वास मिक्स होतो का ग त्यात ? >>> नाही होत.. अजून्च खमंग लागत ग.. बघ एकदा करुन..
भुजिंग.... http://www.maaybol
भुजिंग....
http://www.maayboli.com/node/10112
हा प्रकार घरी करण्यासारखा नाही. भरपुर लोक पाहिजेत खायला. उरण/अलिबाग गटगला करण्यासारखा आहे एकदम ...
अलिबागला ६० लोकांची राहण्याची
अलिबागला ६० लोकांची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे , माझ्या खास मित्राकडे... >>> कोणे तो??
मेधा म्हणजे नक्की कस लेपायच
मेधा म्हणजे नक्की कस लेपायच शेण ? पाल्यवर टाकायच का ?
बघा तुम्हीच ठरवुन नाहीतर
बघा तुम्हीच ठरवुन नाहीतर म्हणाल मी कटवते सगळ्यांना. राहण्याची सोय असेल तर चांगलच आहे ना. आणि शिवाय राहायचे म्हटले म्हणजे फॅमिल्या आल्याच.
शेणाचा वास मिक्स होतो का ग
शेणाचा वास मिक्स होतो का ग त्यात ? >>> कोणाला शेण खायचय का ?
कोणे तो?? >>> आक्षीचा श्रीधर भाटे..
<< भरपुर लोक पाहिजेत खायला.
<< भरपुर लोक पाहिजेत खायला. >>
किंवा थोडी माणस पण भरपूर खाणारी.
<, कोणे तो?? > नसत्या चवकश्या
माझ्या खास मित्राकडे... >>>
माझ्या खास मित्राकडे... >>> कोणे तो??
>>
none other than अमित देसाई..
अरे वा म्हणजे आक्षी नागाव का
अरे वा म्हणजे आक्षी नागाव का विनय ?
छान आहे म्हणतात आक्षी नागांव.
येस येस येस. बोला तारीख काय
येस येस येस. बोला तारीख काय ठरवायची ?
याकरता प्लानिंगला वेळ
याकरता प्लानिंगला वेळ लागेल.... अस मला वाटतय.
किंवा थोडी माणस पण भरपूर
किंवा थोडी माणस पण भरपूर खाणारी.
असुदे सारखी.
अरे वा म्हणजे आक्षी नागाव का
अरे वा म्हणजे आक्षी नागाव का विनय ? >>> मी खुद्द आक्षीचा आहे...
नक्की कस लेपायच शेण ? पाल्यवर
नक्की कस लेपायच शेण ? पाल्यवर टाकायच का ? >>> जागू.. शेंगा, इतर सामग्री नि भांबुर्डीचा पाला अगदी शीग लागेपर्यंत भराय्चा नि मग त्यावर शेणानं लिंपायच अस्त.. नक्की सांगते तुला थोड्या वे़ळात.. यामुळे मडक उलट ठेवल शेकोटीत तरी शेंगा सांडत नाहीत.. अलिबागला केल गटग तर मी करेन त्याची व्यवस्था..
आहाहा, सॉलीड भूक लागली
आहाहा, सॉलीड भूक लागली वाचून!
माझ्या कोब्रा बायकोकडून हा प्रकार अनेकदा ऐकला आहे, जिथे कुठे कधी करणार आहात तिथे मला बोलवाच, आमच्या एक्स्पर्टला घेउन येतो.
आगावा लोनावळ्यातच आहेस ना
आगावा लोनावळ्यातच आहेस ना सद्ध्या ..मग येताना पुणेकरांबरोबर ये...
आगाऊ त्यापेक्षा तुमच्या
आगाऊ त्यापेक्षा तुमच्या बायकोलाच सांगा करायला आम्हीच सगळे तिथे येतो
Pages