पेशवा यांचे रंगीबेरंगी पान

विज्ञान - वाद नव्हे फक्त संवाद

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

प्रथम विज्ञानवादी ह्या संकेत-नामा खाली लिहिणार्‍या मायबोली-मित्रांना धन्यवाद व एक मोठा शाउट-आऊट विज्ञान विषय मायबोलीवर पुन्हा झोतात आणल्याबद्दल व वैयक्तिक, माझ्या विज्ञानविषयक विचारांची धूळ झटकायला उद्युक्त केल्याबद्दल. जिथे शक्य आहे तिथे संदर्भ (बाळबोध) दिलेले आहेत. बाकी ....

विज्ञान - तडक्या शिवाय

विज्ञाना संदर्भातील मूलभूत गृहीतके [] अशी आहेत

विषय: 
प्रकार: 

साजणवेळा अ‍ॅप

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मित्राने ही आयफोन अ‍ॅप बनवली आहे

शब्दवेध, पुणे सादर करीत आहे
प्रतिभासंपन्न कवी ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित 'साजणवेळा'

साजणवेळा भाग १
साजणवेळा भाग २

विषय: 
प्रकार: 

नख

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पुन्हा शोधावी का तिला ?
किती सहज उकरायची गाडलेले कबुलीजबाब
फुल्या शिवलेले डोळे
फुल्या शिवलेले ओठ
कधी हसत कधी रडत
विचारायची नुसत्या खुणांनी
'कशी दिसते ह्या नवीन टाक्यांत?'

लांबसडक बोटे, न्याहाळायची ती
कधी शापा सारखी कधी श्वापदा सारखी
बिलगायची अशी की नक्षत्र भारले आभाळ व्हायचे शरीर
कधी हिंस्रतेने करायची शिकार
धारदार, रासवटतेने झालेला छिन्नविछिन्न देह
शिवत बसायची तासंतास
तिने पाळलेली बेवारशी विरह-गाणी
पाहायचो घुटमळताना तिच्या आसपास...

पुन्हा शोधावी का तिला ?
मला भेटून ती निराश झाली तर?
मन धजत नाही, हे रिकामेपण झाकता येत नाही
तिने दिलेल्या जखमा पुन्हा पुन्हा गोंजारताना

प्रकार: 

मराठी स्टूडंट फिल्म सपोर्ट

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

चित्रपट : ओढ
दिग्दर्शक : नैना पानेमंगलोर

हा चित्रपट दिग्दर्शक तिच्या थेसिस चा भाग म्हणुन बनवत आहे व त्यासाठी ती क्राऊड सोर्सींगच्या मदतिने पैसे उभे करत आहे. चित्रपटाबद्दल वाचायला व बघायला इथे मिळेल. ही क्राउड सोर्सींग साईट सुद्धा आहे. तेंव्हा जरूर मदतीचा विचार करा...

डिस्क्लोजर : मी ह्या चित्रपटाशी सलग्न कोणालाही ओळखत नाही.

विषय: 
प्रकार: 

प्रार्थना

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

प्रार्थनेचे हात जुने होत नाहीत, विटत नाहीत, विरत नाहीत
धोकादायक वस्तूंची विल्हेवाट कशी लावतात?
चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार ऐकताना
पाऊस बनून कोसळावेसे वाटते आहे
माझी म्हणावी अशी जमीन उरलेली नाही
माझे म्हणावे असे आकाश उरलेले नाही
वीजा, ढग, सोसाट्याचा वारा ह्यांचा वरखर्च...
रकाने मारलेल्या मन-देहाला झंकारणे झेपणार की नाही?

रात्र उलटताना पुन्हा पुन्हा त्याच दिवसापाशी सोडते
उजेडाची भुक, उजेडाची तहान
घनघोर पसरलेले उजेडाचे रान
उजेडाची श्वापदे त्यांचे स्वप्न-भक्षी दात
उजेडाची भिती मागते माझे प्रार्थनेचे हात...
दिसू लागतो राक्षस श्रद्धेमागे मेलेला

ऋतू

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

डोळ्यात ऋतू पावसाचे
ढगाआड ऊन - हसू ओठांवरचे?

कळेना वळेना पंख निळ्या फुलपाखराचे - जपण्यास दिले का?
पान पान उतरवूनी आलो स्पर्शाकाठी तुझ्या
मेंदी ओले हात वणवा जपतात म्हणतेस का?

एक लाट अर्धी अर्धी कशी वाटून घ्यावी?
ही चोरपावलांची भाषा नकळत उमलून यावी...
स्वर बघ दारापाशी सुया घेऊन आले
हे दोन पावली अंतर एकदम वयात आले!

डोळ्यात म्हणे ऋतू पावसाचे
गहिवरातले चंद्र भेटीत न्हाले!

प्रकार: 

जातकुळी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काही वर्षापूर्वी बार्न्सच्या पुस्तकभांडारात
आवडतीच्या सिंगलशॉट मोका सकट मी.
दिशाहीनतेचे डर्टी हॅरी पोईंट फोर्टी फोर मॅग्नम खेळवत...
आजूबाजूची टेबले एकटेपणाच्या गर्दीने व्यापलेली
तेव्हा भेटले होते पहिल्यांदा दहा तोंडाचे ते मूल
लॅगरांज बिंदूचा रोग झालेले...
लहानपणी आईने सांगितलेली धृवाची कथा...
अढळपदातला अध्याहृत बंदिवास...

विषय: 
प्रकार: 

बायकानो तुम्ही असे कपडे घालता म्हणुनच...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बायकानी कमे कपडे घातले म्हणुनच त्यांच्याशी गैरवर्तन झाले ? मग हे
जरूर वाचा : http://www.slutwalktoronto.com

विषय: 
प्रकार: 

वावर

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

असे पुरुष,
पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा
बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून
असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त
तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ

असे पुरुष,
शिकवलेले असते त्यांना लहानपणापासून
पाहिलेले असते त्यांनी,
काका, मामा आणि बापाला सफाईदारपणे
आणलेले हात वापरताना...
साला ते चुकत नाहीत
शेंडीला गाठ मारून घोकतात सगळ्या ऋचा
घेतात कानमंत्र बापच्या मांडीवर

प्रकार: 

कोणत्या प्रकारचा जिनीअस तुम्ही आहात?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तिशी ओलांडाल्यावर असे वाटले का की मुलभूत, अचाट असे काही तरी करायचे राहून गेले? आपण सुधा ऑल्सो रॅन ह्या वर्गवारीचा एक भाग झालो?

असे वाटले असेल तर खालील लिंक जरूर वाचा (अर्थात तुम्ही अधी वाचले असेलच किंवा तुम्हाला हे अधिपासुनच माहीती असेलही :-))

जिनिअस

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - पेशवा यांचे रंगीबेरंगी पान