ऋतू
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
11
डोळ्यात ऋतू पावसाचे
ढगाआड ऊन - हसू ओठांवरचे?
कळेना वळेना पंख निळ्या फुलपाखराचे - जपण्यास दिले का?
पान पान उतरवूनी आलो स्पर्शाकाठी तुझ्या
मेंदी ओले हात वणवा जपतात म्हणतेस का?
एक लाट अर्धी अर्धी कशी वाटून घ्यावी?
ही चोरपावलांची भाषा नकळत उमलून यावी...
स्वर बघ दारापाशी सुया घेऊन आले
हे दोन पावली अंतर एकदम वयात आले!
डोळ्यात म्हणे ऋतू पावसाचे
गहिवरातले चंद्र भेटीत न्हाले!
विषय:
प्रकार:
शेअर करा
स्वर बघ दारापाशी सुया घेऊन
स्वर बघ दारापाशी सुया घेऊन आले
हे दोन पावली अंतर एकदम वयात आले!>>>
व्वा!
रचना नीटशी समजली नाहीच, पण खोल आहे इतके तरी समजले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
-'बेफिकीर'!
आवडली.
आवडली.
एक लाट अर्धी अर्धी कशी वाटून
एक लाट अर्धी अर्धी कशी वाटून घ्यावी?
ही चोरपावलांची भाषा नकळत उमलून यावी...
आणि
हे दोन पावली अंतर एकदम वयात आले!
मस्त!
पान पान उतरवूनी आलो
पान पान उतरवूनी आलो स्पर्शाकाठी तुझ्या
मेंदी ओले हात वणवा जपतात म्हणतेस का?
>> सुंदर!
पेशवा.... तुझी कविता....
पेशवा.... तुझी कविता.... पूर्ण कविता हा एक सुंदर अनुभव असतो. वाह!
वा जया...
वा जया...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! आवडली. पान पान उतरवूनी
वा! आवडली.
पान पान उतरवूनी आलो स्पर्शाकाठी तुझ्या
मेंदी ओले हात वणवा जपतात म्हणतेस का? >>>> सुरेख!
एक लाट अर्धी अर्धी कशी वाटून
एक लाट अर्धी अर्धी कशी वाटून घ्यावी?
ही चोरपावलांची भाषा नकळत उमलून यावी... > अहा !
पूर्ण कविता हा एक सुंदर अनुभव असतो. वाह! >>+१.
गाण्यात वेळ न घालवता कविता कर
बायकोचे ऐक ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे दोन पावली अंतर एकदम वयात
हे दोन पावली अंतर एकदम वयात आले! >> पेशवे...!!!!!
सुरेख!
सुरेख!
मस्तच बरंका श्रीमंत
मस्तच बरंका श्रीमंत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)