पोमोसची प्रतिकृती
मी विविध देशातील नाणी व नोटांचा संग्रह करतो हे अनेकांना माहित आहे. त्यामुळे बरेच लोक वेगळे काही दिसले की माझ्यासाठी ठेवतात. इटलीत अन्नुचार्य ज्वालामुखीमुळे आठ दिवस अडकुन पडलेली सिमोना काल पॅसॅडेनाला परतली. येतांना टर्की व ग्रीस खाली असलेल्या एका छोट्या बेटावर पसरलेल्या सायप्रस नामक देशाचे एक दोन युरोचे नाणे (माझ्या वैयक्तिक जालावर नसल्याचे पाहुन) आणले.