धार्मिक-साहित्य

बारह माह / गुरु अर्जन दास - (०)

Submitted by सामो on 22 November, 2021 - 15:58

शीख लोकांचे ५ वे गुरु, गुरु अर्जन देव दास यांनी लिहीलेले एक 'बारह माह' नावाचे काव्य सापडले. बारा ऋतु आणि विरहीणी म्हणजे ईश्वरापासून (शिव) वियोग झालेली आत्मारुपी वधू (जीव) अशी सांगड आढळते. हा एक पूर्वापार चालत आलेला लोकगीताचा प्रकार असून, ऋतुंचे मूडस आणि विरह ते मीलन असा वधूचा मानसिक प्रवास या गीतात रंगविलेला आहे. निसर्ग आणि अध्यात्मिक पातळीवरील प्रेम असा सुरेख संगम या पौरींमध्ये येतो. विरहाने पोळलेली नववधू शेवटी आपल्या प्रियकरास भेटल्यानंतर तिला मिळालेली असीम शांती व सुख - असे वर्णन येते.

शब्दखुणा: 

दैवी उपासनांमुळे समस्या सुटतात का?

Submitted by केअशु on 22 November, 2021 - 11:10

अस्मादिक फलज्योतिषविद्येचे हौशी अभ्यासक आहेत.

गणेशवंदना

Submitted by कविन on 13 September, 2021 - 22:51

प्रथमेश्वर तू श्रीगणनायक
गुणाधिशा तुज नमो नम:

विद्यावारिधि वरदविनायक
बुद्धिनाथ तुज नमो नम:

योगाधिप तू सिद्धीविनायक
अखूरथा तुज नमो नम:

नादप्रतिष्ठित विघ्नविनाशक
अवनीशा तुज नमो नम:

भुवनपति तू देवेन्द्राशिक
अलंपता तुज नमो नम:

मृत्युंजय तू भवभय तारक
मुक्तिदायी तुज नमो नम:
_______________________

संदर्भासाठी:
हि गणपतीची नावे आहेत. त्यांचे अर्थही खाली लिहीत आहे.

महाभारत गोष्टी लहान मुलांसाठी

Submitted by sarikasarika on 18 July, 2021 - 07:25

नमस्कार,

मला माझ्या मुलासाठी महाभारत गोष्टी रुपात पाहिजे आहे. ऑनलाइन PDF किंवा एखादी website असेल तर प्लीज इथे शेअर करा.

परशुराम

Submitted by कृतिक शैलेश पटेल on 15 May, 2021 - 10:05

रेनूकेच्या सूता तुला शिवाचे वरदान ।
अन एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।धृ।।

सर्व भक्त शिवाचे, तूच एकमेव शिष्य।
प्राप्त त्यांच्याकडून तुला, पिनाक धनुष्य।।
जन्म घेऊन ब्राम्हणाचा, क्षत्रियाचे केले काम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।१।।

सहस्त्रबाहुने जेव्हा केले, कैद रावणाला।
शिवाच्या आज्ञेने गेला, त्यासी सोडविण्याला।।
वध करून पाहरेकर्यांचा, पूर्ण केले काम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।२।।

शब्दखुणा: 

अध्याय निहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५

Submitted by शशिकांत ओक on 6 March, 2021 - 13:38

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५

श्रीस्वामी समर्थ मुखदर्शन मूर्ती

Submitted by शेखर खांडाळेकर on 8 January, 2021 - 09:03
Swami Samarth Idol, Bust of Swami Samarth, Original photograph Swami Samarth, Swami Samarth sculpture, Shri Swami Samarth

श्रीस्वामी समर्थ भक्तांसाठी वास्तुकलाशेखरची नवीन प्रस्तुती

श्रीस्वामी समर्थ मुखदर्शन मूर्ती

संकल्पना -

ध्यानमूलं गुरोर्मूति: पूजामूलं गुरो: पदम् ।
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो: कृपा ॥

गुरुमाउली श्रीस्वामी समर्थ यांच्या मुखात अनेक वेळा वरील श्लोक असे. याचा अर्थ असा की सद्गुरुच्या रूपाचे स्मरण केले असता सहजच ध्यान होते, गुरुचरणांची पूजा ही सर्व देवांची पूजा आहे, गुरुंचे वाक्य हे मंत्रमय असते आणि गुरुंची कृपा झाली तर मोक्ष मिळतो.

श्री हरी स्तोत्र मराठी अर्थ

Submitted by राधानिशा on 10 September, 2020 - 05:29

जगज्जालपालं कचत्कंठमालम्
शरच्चंद्रभालं महादैत्यकालम् ।
नभोनीलकायं दुरावारमायं
सुपद्मासहायं भजेsहं भजेsहम् ।।१।।

जे सृष्टीचं पालन करतात , ज्यांच्या गळ्यात चमचमती तेजस्वी माला आहे ;

ज्यांचं मुखमंडल शरद ऋतूतील चंद्रासमान भासतं , जे दैत्यांचा विनाश करतात ;

ज्यांची काया निरभ्र निळ्या आभाळासमान आहे , ज्यांच्या मायेवर विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे ;

आणि जे आपली पत्नी श्री लक्ष्मीदेवी यांच्यासोबत आहेत , त्या भगवंतांची मी आराधना करत आहे

शब्दखुणा: 

*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - (मेघा) (MeghaSK)

Submitted by MeghaSK on 1 September, 2020 - 03:53

नाव मेघा
गट ब
मायबोली आयडी MeghaSK

IMG-20200901-WA0017.jpg

स्पर्धेच्या निमित्ताने बर्याच वर्षांनी देवनागरी लिहिलेय,
नेहमीची गणपती ची आरती आहे.
मायबोली व संयोजक यांना धन्यवाद!!!

श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा (अ गट - चि. राजस) - वावे

Submitted by वावे on 27 August, 2020 - 11:08

IMG-20200827-WA0014.jpg

५ हे वय नसून इयत्ता आहे Happy त्याच्या संस्कृतच्या पुस्तकातला श्लोक आहे.

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य