ajjuka यांचे रंगीबेरंगी पान

माझी मुलाखत!!

अरे लोकांनो उद्या म्हणजे २९ मे ला दुपारी २ वाजता स्टार माझा वर 'करीअर मंत्र' या कार्यक्रमात माझी मुलाखत आहे. लाइव्ह आहे आणि फोन इन.
रीकास्ट कधी आहे ते माहीत नाहीये पण रात्री असण्याची शक्यता आहे.

माझा 'श्वास' - ४

आधीच्या एका प्रकरणात म्हणल्याप्रमाणे पटकथेच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे चित्रीकरण स्थळे शोधणे. त्याप्रमाणे संदीप पुणे परीसरात आणि कोकणातही फिरत होताच. सुरूवात कुठे झाली ते वर आलंच आहे.

माझा 'श्वास' - ३

आजूबाजूला बर्‍याच मालिकांमधून किंवा काही चित्रपटांच्यात बरीच लहान मुले होती पण कोकणातल्या खेड्यातला मुलगा काही सापडत नव्हता. सगळी मुलं एकजात शहरी वळणाची. आणि वर इंग्रजी माध्यमातली होती.

माझा श्वास्’ – २

लग्नानंतर आम्ही गेलो मालवणला. मालवणच्या आसपासचा परिसर फिरत होतो. धामापुरच देऊळ ओलांडून तिथून मग नेरूरपार कडे येऊन काळश्याला खाली उतरून वनलक्ष्मीच्या बोटीतून कर्ली नदीमधे फिरून आलो. फार मस्त होता तो भाग.

माझा 'श्वास' – १

"आपल्याला इ-टीव्ही साठी एक टेलिफिल्म करून द्यायची आहे. स्पंदन या स्लॉटसाठी. त्या आंधळ्या मुलाच्या गोष्टीवर." एक दिवस संदीप ने सांगितले. ऑक्टोबर २००१ मधली गोष्ट ही. त्याआधी महिनाभर त्याने मला आंधळ्या मुलाची गोष्ट ऐकवली होती.

माझा श्वास

बरेच जणांनी बरेच दिवस आग्रह केल्यानंतर आता मी माझे 'श्वास' चे अनुभव शब्दबद्ध करत आहे. 'श्वास'च्या अनुषंगाने माझा प्रवास असणार आहे.