वैभव यांचे रंगीबेरंगी पान

अमेरिकन समाजातील स्त्रीची परिस्थिती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आतापर्यंत महिला दिनाच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी भारतीय समाजातील स्त्रीमुक्तीविषयी बरंच काही लिहीलं आहे. अमेरिकन समाजातील स्त्रीच्या परिस्थितीविषयी माहिती करुन घेणेही उपयुक्त ठरेल या अनुषंगाने काही अनुभव मांडत आहे. इथे राहणाऱ्या भारतीय समाज हा अमेरिकन समाजाचाच अविभाज्य भाग असल्याने मी इथल्या भारतीय लोकांनाही त्यात सामिल केले आहे.

विषय: 
प्रकार: 

शर्यत

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

जवळजवळ पाच हजार वर्षेतरी उलटून गेली असतील. पण ससा आणि कासव मात्र तारुण्याने ओथंबून वहात होते. त्यातल्यात्यात ससा वयाने आणि आकारानेही मोठा होता. कासव लहान होत आणि त्याला सशाविषयी नितांत आदर होता. सशा कासवाची मैत्री साऱ्या जंगलाचं कुतूहल बनून राहीली होती. ससा आणि कासव जेव्हा भेटत तेव्हा कासव प्रेमापोटी ससा-कासव भाई भाईचे नारेही देत असे.

प्रकार: 

जिप्सी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

साधारणत: साडेसहाचा सुमार असेल. गजबजलेल्या रानडे रोडवरुन 'तो' प्लाझाच्या दिशेने चालत होता.आजूबाजूला लोकांची तुफान गर्दी होती. असंख्य वाहनांचे हॉर्न एकामागून एक वाजतच होते. या प्रचंड तोबा गर्दित जो तो आपआपल्या ठिकाणी भरभर जाऊ पहात होता. संध्याकाळ असूनही उन कायम होतं. उन्हात वाहनांच्या काचा चमचमत होत्या. एक प्रकारचं चैतन्य सगळ्या वातावरणात भरुन राहिलं होतं. त्याची पावलंही त्या गर्दित भराभर पडत होती. पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक त्याच्या ह्रुदयाची धडधड वाढत होती. अखेर एकदाचं जिप्सी आलं. त्याने क्षणभर श्वास घेतला आणि तो आपल्या नेहमीच्या टेबलावर जाऊन बसला.

विषय: 
प्रकार: 

मुंबई हल्ल्यावरील राम प्रधान समितीचा अहवाल

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मुंबई वरील २६/११ च्या अतिरेकी हल्लयावरचा राम प्रधान समितीचा अहवाल महाराष्ट्र टाईम्सने फोडला आहे. त्याचा दुवा खाली देत आहे

राम प्रधान समितीचा अहवाल (पीडीएफ)

प्रकार: 

भारतातील भ्रष्टाचार - अमेरिकन चश्म्यातून

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

विमानाचे दरवाजे उघडले आणि एक ओळखीचा वास नाकात शिरला. मुंबई विमानतळावर, विशेषतः तुम्ही परदेशात वास्तव्य करुन येत असाल तर हा वास लगेच जाणवतो. इमिग्रेशन, स्वाईन फ्लू तपासणी, कस्टम्स वगैरे सोपस्कार पार पडले आणि टॅक्सी पकडण्यासाठीच्या खिडकीवर येऊन थडकलो. एक व्यवस्थित दागिने घातलेल्या जाडेलशा बाईंनी २४१२ हा टॅक्सीचा नंबर सांगितला आणि हातात एक रसीद दिली.

विषय: 
प्रकार: 

चंद्रावरचे पाणी कोणी शोधले?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सँटा मोनिकामधील एका उंच इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील कचेरीत बसून मी इंटरनेटवर भारतीय वृत्तपत्रं चाळत होतो. तो दिवस शुक्रवार असल्याने अॉफिसात जरा ढिलं वातावरण होतं. जसं जसं मी वाचू लागलो, तस तसं माझी छाती अभिमानाने फुगू लागली. कॉलर ताठ व्हायला लागली. मानवी इतिहासाला वेगळे वळणच जणू काही भारताच्या चांद्रयान १ या मोहिमेमुळे लागल्याचा एकंदरीत सूर वृत्तपत्रांमध्ये होता.

विषय: 
प्रकार: 

असेही एक विसर्जन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

संध्याकाळचे सहा वाजलेले. लॉस एंजलिसजवळच्या मॅनहॅटन बीचवर कडकडीत उन पडलं होत. आमच्या कॅलिफोर्नियात उन्हाळ्यात संध्याकाळी सहा वाजता कडकडीत उन असतं. समोर समुद्राला भरती आली होती. रविवार असल्याने सगळा किनारा वाळूत खेळणाऱ्या बाळगोपाळांनी आणि सूर्यस्नान करणाऱ्या ललनांनी भरुन गेला होता. समुद्रापासून थोडं दूर वाळूवर चार पाच व्हॉलीबॉलच्या जाळ्या लागल्या होत्या. एकंदरीत वातावरण उत्साही होतं.

प्रकार: 

मंथन - मराठी साहित्याचे इ-प्रसारण

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"तुमची पिढी वाचतच नाही."

मी अमेरिकेतल्या एका प्रतिष्ठीत मध्यमवयीन मराठी गृहस्थांशी फोनवरुन बोलत होतो, तेव्हा त्यांनी हा बॉम्ब टाकला. मी हबकलोच. त्या गृहस्थांविषयी मला आदर होता (आणि आहे). अमेरिकेतून निघणारं एक मराठी मासिक तरुण मंडळी का वाचत नाहीत या विषयावर आम्ही फोनवरुन बोलत होतो.

विषय: 
प्रकार: 

डान्स इंडीया डान्स...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दुपारचे बारा वाजले होते. मी खिडकीतून बाहेर बघितलं - एकाबाजूला अथांग असा प्रशांत महासागर पसरला होता. दुसऱ्या बाजूला गजबजलेलं सँटा मोनिका अाणि लॅास एंजेलिस. सूर्याची किरणे निळ्याशार सागरपटलावर चमचम करत होती.

विषय: 
प्रकार: 

गाभ्रीचा पाऊस - बावनकशी सोनं!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

रस्त्यातून चालताना हलकेच ठेच लागावी आणि ज्यामुळे ठेच लागली तिथे उकरुन पहावं तर बावनकशी सोन्याची वीट सापडावी असंच काहीसं माझ्या बाबतीत नुकतंच झालं. लॅास एंजेलिसच्या भारतीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट बघायला गेलो अन् जसजसा गाभ्रीचा पाऊस समोर उलगडत गेला तस तशी जाणीव होऊ लागली - हे काहीतरी विलक्षण आहे.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - वैभव यांचे रंगीबेरंगी पान