चलनी नोटा

मोबाईल वॉलेट/ इवॉलेट अनुभव, शंका निरसन

Submitted by अश्विनीमामी on 22 November, 2016 - 23:32

पेटिएम, स्टेट बँक बडी, पे झॅप आणि इतर मोबाईल कॅश वॅलेट उपलब्ध आहेत. आता हातात कॅश नाही पण रोजचे व्यवहार तर चालवायचे आहेत. आपण कोणी ही अ‍ॅप्स वापरता का? काय अनुभव तसेच नवीन वापर कर्त्यांचे शंका निरसन व्हावे ह्या साठी धागा प्रपंच.

मी अजून एक ही अ‍ॅप डाउ न लोड केलेले नाही. बिग बास्केट, व उबर आहे. त्याला हे चालते असे ऐकले
ओला मनी

सिट्रस वॅलेट , मोबि क्विक, एअर्टेल मनी, पेयू मनी, चिल्लर, ऑक्सिजन, वॉलेट हे पर्याय अ‍ॅड केले.

बिल पे हा पर्याय वापरून नेट बँकिन्ग द्वारा खालील बिले भरता येतील.
१) प्री व पोस्ट पेड टेलिफोन बिल्ल्स.
२) डीटीएच चा रीचार्ज
३) वीज बिले

डेबिट पेटी

Submitted by योग on 18 November, 2016 - 10:14

मित्रों,

आज रात्री ठीक १२ बजे के बाद सभी मंदिर, मस्जिद, गिरीजाघर, गुरूद्वारा वा आदी सर्व प्रार्थनास्थलो के जगह रखी 'दान' पेटीया बंद होकर उनकी जगह 'डेबिट' पेटी लागू हो जाएगी.

:(काल्पनिक):

भारतात हे शक्य आहे का?

what's next?

------------------------------------------------------------------------------------------------------------
मोठ मोठाल्या व प्रसिद्ध 'दान पेटी' मध्ये १०० नाही तरी ५०० नोटा (चिल्लर) असतीलच... त्यांचे काय?
कोण बदलणार?बदलणे आवश्यक आहे का?
मुळात ते पैसे काळे का गोरे?
देवाला डेबिट कार्ड नक्कीच चालेल नाही?

विषय: 

जेंव्हा नॅनो चीप बसवली गेली आणि रंग हळूहळू उडाला...

Submitted by अतुल. on 16 November, 2016 - 08:55

(सूचना: लिखाण केवळ विनोदनिर्मिती करिता केले गेले आहे. गंभीरपणे घेतल्यास व त्रास झाल्यास लेखक जबाबदार नाही. Lol तसेच यातील घटना व पात्रे काल्पनिक असून <...वगैरे वगैरे नेहमीचेच. आणि शेवटी...>तो केवळ योगायोग समजावा)

"हेल्लो"

"हेलो. नमस्ते सर. गुड मॉर्निंग"

"झालं का तुझं?"

"सर डिजाईन झालंय. पण थोड़े इश्श्युज आहेत. आणि ट्रायल सुद्धा..."

"यार करून टाक ना पट्कन. अजून चार माणसं देऊ का तुला मदतीला? कुठं अडून राहिला आहेस तू अजून? भावा, दोन दिवसात करायचंय आपल्याला. मोठ्या सायबांना दिवसातून चार वेळा फोन येतोय पीएमओ मधून. ते परत मग मलाच विचारतात. काय उत्तर देऊ त्यांना रोज रोज तूच सांग?"

पाश्शेहजाराच्या गोष्टी: १. बचत गट

Submitted by आतिवास on 15 November, 2016 - 01:49

“आज रामा कशापायी आलाय तुझ्यासंगं गटाच्या मीटिंगला? आपलं ठरलंय न्हवं पुरूषमाणसांना नाय येऊ द्यायचं म्हणून?”  बचत गटाची अध्यक्ष असलेल्या कांताने जरा जोरातच विचारलं.
“राम राम अध्यक्षीणबाई. दादांनी सांगितलं हिकडं यायला म्हणून आलो बगा. आता तुमी नगं म्हणत असालसा तर जातो की लगेच माघारी. आपलं काय काम नाय बा, दादांचं हाये,” रामा बेरकीपणानं म्हणाला.
दादा म्हणजे प्रस्थ. केवळ गावातलं नाही तर पंचक्रोशीतलं. गेली अनेक वर्ष खासदार असलेल्या आण्णांच्या रोजच्या बैठकीतले. दादांच्या सल्लामसलतीविना आण्णांचं पान हलत नाही म्हणे. म्हणजे निदान दादा आणि त्यांची माणसं तरी असचं सागंतात.

विषय: 
शब्दखुणा: 

खर्‍या चलनी नोटाची ओळख..!!

Submitted by उदयन. on 6 July, 2012 - 03:07

नाशिक मधे काम करताना खोट्या नोटांचा फार त्रास होत आहे... १००० आणि ५०० च्या नोटामधे फारच खोट्या नोटा दिसुन येतात... बँकेत पैसे भरताना चा त्रास वेगळाच ... १ लाख भरताना ५ नोटा १००० च्या खोट्या निघाल्या..म्हणजे ५००० चा फटका..:( बँक डायरेक्ट फाडुनच टाकते...वर आपल्या नावाची कंप्लेंट सुध्दा..पोलिसांना चा त्रास सुध्दा..काही माहीती होती खोट्या नोटा कश्या ओळखायच्या तरी सुध्दा येतच होत्या..वर बँक वाले पण निट सांगत नाहीत... भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक मधे काम करणारे लोक ग्राहकांवर उपकारच करतात काम करुन ......अश्या थाटातच वावरत असतात.. उडवाउडवीची उत्तरे मिळतात..

Subscribe to RSS - चलनी नोटा