खुर्ची

आठवणींचा ठेवा ...आराम खुर्ची

Submitted by मनीमोहोर on 16 August, 2021 - 07:29

आठवणींचा ठेवा ...आराम खुर्ची

मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर मैत्रिणीच्या पिकनिकचे फोटो बघत होते. लोकेशन सुंदर होतं. खोलीची छानशी गॅलरी आणि गॅलरीतून समोर दिसणारी हिरवीगार टेकडी, त्यावरून वहाणारे छोटे छोटे झरे, ढगांमधून सूर्य हळूच डोकावत असल्याने हिरवळीवर पडलेलं कोवळं सोनेरी ऊन ... फ्रेम अप्रतिम होती होती. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते गॅलरीतल्या आराम खुर्चीने, जिने मला कमीत कमी पन्नास वर्षे तरी मागे नेलं.

विषय: 

जुन्या खुर्चीचे नवे रुप

Submitted by विद्याक on 15 September, 2013 - 22:33

आमच्या ऑफीसमधे फंड रेझर साठी जुन्या खुर्च्यांना नविन रुप देउन ( पेन्टींग, मोझॅक, मॉड पॉज..करुन.) त्या विकुन पैसे जमवायचे ठरले. तेव्हा मी कापड लावुन मॉड पॉज हे केले. मॉड पॉज हा एक प्रकारचा ग्लुच असतो तो वापरुन कापड खुर्ची ला चिकटवले. बघा, तुम्हांला आवडते का?

जुने रुप
130908_0000.jpg

नवे रुप
130906_0001.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

ग्रॉपुल्याची खुर्ची

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'व्हेकेशन'ला जाऊन आलं की वर्णनं आणि छायाचित्र टाकणं हे मायबोलीवर जवळपास मँडेटरी झाल्यासारखं आहे. लोक रम्यातीरम्य जागी जातात. आम्ही रम्य जागी जायला मिळालं नाही की जागेत रम्यता शोधतो.

सचित्र प्रवासवर्णन करून माय्बोलीकरांना नुस्तं जळवून जळवून टाकायचं ठरवलं होतं पण..!

गेल्याच आठवड्यात आम्ही अ‍ॅलबामा राज्यातल्या बोरखेडीएवढ्या मोठ्या गावी गेलो होतो. गावात बघायला काय काय आहे अशी पृच्छा केल्यावर, 'बरंऽच काही' असं उत्तर मिळालं. ३ पेट्रोलपंपं, मोठी - छोटी धरून १० हॉटेलं, एक बोलिंग अ‍ॅली आणि जवळपासच्या परिसरात (सर्वानुमते) नयनरम्य (ठरायला हरकत नसलेली) नॅशनल फॉरेस्टातली वाट एवढा ऐवज मिळाला.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - खुर्ची