Submitted by विद्याक on 15 September, 2013 - 22:33
आमच्या ऑफीसमधे फंड रेझर साठी जुन्या खुर्च्यांना नविन रुप देउन ( पेन्टींग, मोझॅक, मॉड पॉज..करुन.) त्या विकुन पैसे जमवायचे ठरले. तेव्हा मी कापड लावुन मॉड पॉज हे केले. मॉड पॉज हा एक प्रकारचा ग्लुच असतो तो वापरुन कापड खुर्ची ला चिकटवले. बघा, तुम्हांला आवडते का?
जुने रुप
नवे रुप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा.. भारी दिसतेय
अरे व्वा.. भारी दिसतेय
भारी आहे. जुनाटपण जाऊन मस्त
भारी आहे. जुनाटपण जाऊन मस्त झळाळी चढली. लहान मुलांच्या खोलीत शोभुन दिसेल ही खुर्ची आता.
सुंदर दिसत्येय पण मुळ खुर्ची
सुंदर दिसत्येय
पण मुळ खुर्ची आणि नव्या रुपातली खुर्ची यांच्या डिझाईन, आकार, साईझ इ इ मधे फरक जाणवतोय. कापड चिकटवण्या व्यतिरीक्त अजुन काहि बदल केले आहेत का?
जुनी खुर्ची आणि नविन मधे
जुनी खुर्ची आणि नविन मधे आकारातही फरक पड्लाय? कसं काय?
खुप छान.
खुप छान. नव निर्मितिचा आन्नद घ्या.
दोन्ही खुर्च्य वेगळ्याच
दोन्ही खुर्च्य वेगळ्याच आहेत..
हिम्सकूल +१
हिम्सकूल
+१
खालच्या फोटोतल्या खुर्चीला
खालच्या फोटोतल्या खुर्चीला बांधून का ठेवलंय ?
खालच्या फोटोतल्या खुर्चीला
खालच्या फोटोतल्या खुर्चीला बांधून का ठेवलंय ?
>> खुर्ची पळून जाऊ नये म्हणुन..
जोक्स अपार्ट.. अहो ती प्रदर्शनात वगैरे ठेवली असेल. अश्या ठिकाणी चोरी इ. होऊ नये म्हणुन सगळ्याच वस्तु अश्या बांधुन ठेवतात कश्यालातरी.
बाकी दोन्ही खुर्च्या वेगळ्याच आहेत हे खरे.
<अश्या ठिकाणी चोरी इ. होऊ नये
<अश्या ठिकाणी चोरी इ. होऊ नये म्हणुन सगळ्याच वस्तु अश्या बांधुन ठेवतात कश्यालातरी.>
अश्या प्रदर्शनाला जाण्याचा योग अजून आला नाही.
अश्या प्रदर्शनाला जाण्याचा
अश्या प्रदर्शनाला जाण्याचा योग अजून आला नाही.
>>
सॉरी मग.. मी "उद्योगी बझार" सारख्या ठिकाणी पाहीले आहे असे बांधलेले..
मला तरी जुनीच चांगली वाटली.
मला तरी जुनीच चांगली वाटली. अगदी पॉलिश पण चांगले होते.
मला तरी जुनीच चांगली वाटली.
मला तरी जुनीच चांगली वाटली. अगदी पॉलिश पण चांगले होते.
>> मलापण !!!
pahilee khurchee ameriketalee
pahilee khurchee ameriketalee aahe (neTavaroon phoTo vaaparalaa asaNaar aaNee dusaree bhaarataatalee disate
पहि ली रिपब्लिकन आणि दुसरी
पहि ली रिपब्लिकन आणि दुसरी डेमोक्रॅट आहे का?
लाजो, अग दुसरा काहीही बदल
लाजो, अग दुसरा काहीही बदल केलेला नाही . दोन्ही खुर्च्या वेगवगळ्याच आहेत. मी कापड चिकटवण्याआधी फोटो काढायला विसरले. पण माझ्याकडे साधारण त्या प्रकारची दुसरी खुर्ची होती त्याचा फोटो टाकला. फक्त तुम्हाला कल्पना यावी कि जुनी खुर्ची कशी होती आणि आता कशी दिसते याची.
भरत मयेकर, खुर्ची ऑफीस बिल्डींगच्या मुख्य दारापाशी डिस्प्ले म्हणुन ठेवली आहे. पण कुणी खुर्ची ढापु नये म्हणुन बांधुन ठेवली आहे. एवढेच कारण आहे.
धन्यवाद सर्वांचे!
हो साधना, मुलींच्या खोलीत खुपच छान दिसेल. माझ्या या खुर्चीला ऑफीसवाल्यांनी "cheeky chair" हे नांव दिले आहे. आमच्या भागातल्या न्युज पेपर मधेही या खुर्चीचे फोटो आले आहेत.
प्रसाद, पियु, लाकडाच्या
प्रसाद, पियु, लाकडाच्या खुर्च्या छानच वाटतात. पण त्यातली एखादी खराब झाली,मोडली तर हा उपायही बरा वाटतो, नाही का?
अश्विनी मामी.."स्मित"... मला अजुन स्मायली चिन्हे टाकता येत नाही.
मस्त
मस्त
धाग्याचे शिर्षक दिशाभुलकरणारे
धाग्याचे शिर्षक दिशाभुलकरणारे आहे. धागा उघडणार्यांच्या वेदनांची कदर तुम्हाला नसल्याने असे घडले असावे. कोर्टाचा निर्णय असा आहे की तुम्ही लगोलग हे शिर्षक बदलावे. त्याचप्रमाणे दोन्ही खुर्च्यांचे आधीचे फोटो टाकावेत. आधीचे फोटो नसतील तर या खुर्च्या आमच्याकडे पाठवाव्यात. आम्ही त्या जुन्या करून देवू.
पैली खुर्ची अँटीक दिसते, अन
पैली खुर्ची अँटीक दिसते, अन म्हणून व्हॅल्युएबल आहे.
तिला रंगवून, कापडवून वा इतर मार्गाने नष्टवू नका ही न वि.
वा...... मस्त मस्त
वा...... मस्त मस्त
इब्लिस, पहिली खुर्ची घरचीच
इब्लिस, पहिली खुर्ची घरचीच आहे. तिला काहीही करत नाही. माझा नवराही तिला,रंगवायला, नटवायला देणार नाही. जी खुर्ची केली ती कुणीतरी डोनेशन म्हणुन ऑफीसला दिलेली त्यावर् हा प्रयोग केला.
जयवी, धन्यवाद!
इतकी सुंदर खुर्ची आहे
इतकी सुंदर खुर्ची आहे तिच्याकडे लक्ष द्यायच्या ऐवजी काय तर म्हणे खुर्ची का बांधून ठेवली …खूपच छान नव्या स्टाईल ची खुर्ची झाली आहे माझ्या मुलींना आवडली म्हणजे छानच आहे ना !
मस्त आयडीया
मस्त आयडीया
विद्या मेल मध्ये पाहीली होती
विद्या मेल मध्ये पाहीली होती तेव्हाच खुप आवडलेली. खुप छान आयडीया आहे.
वा ! आवडली क्रिएटिविटी ! (
वा ! आवडली क्रिएटिविटी !
( पाय बांधून ठेवायची आयडिया आवडली )
>>>> पैली खुर्ची अँटीक दिसते,
>>>> पैली खुर्ची अँटीक दिसते, अन म्हणून व्हॅल्युएबल आहे. <<<<
]
]
अँटीक म्हण्जे काय? व्हॅल्युएबल म्हण्जे काय? मराठी शब्द वापरा कृपयाच्च.
हे मला थोडेसे "ठेविले अनंते तैसेचि रहावे...." या थाटाचे वाटते. दूर्मिळ आहे, जूनाट आहे, पैशाने मौल्यवान आहे, तर आहे तस्सेच ठेवा म्हणे!
[त्या जूनाट बाबरीकरता देखिल "आहे तश्शीच्च ठेवा" म्हणत होते काही लोक
[पण आम्ही आमचे जुन्या धर्मशास्त्रावरील विचार मान्डले की मात्र "टाकाऊ टाकाऊ/प्रतिगामी" वगैरे अगम्य बडबडून म्हणून कालवा करतात, हा विरोधाभास का?
>>>> तिला रंगवून, कापडवून वा इतर मार्गाने नष्टवू नका ही न वि.
हे कापडवुन काय अस्ते? नष्टवू काय अस्ते? विनाकारण नै त्या नविन शब्दांचा "शोध(?)" लावून ते घुसडवून मराठी भाषेची विटंबना करू नका, मराठी भाषेच्या नष्ट होण्यास हातभार लावू नका!
लिंटिं, खुर्चीबद्दल ठेविले
लिंटिं, खुर्चीबद्दल ठेविले अनंते तैसेची रहावे नको आणि भाषेबद्दल मात्र हवे असे का?
भाषासुद्धा नदी (आणि संस्कृती)सारखी प्रवाही हवी.(की नको?)
तसा तर तुम्ही वापरलेला 'अस्ते' हा शब्द ही प्रमाण मराठी भाषेच्या शब्दकोशात नसेल.
जागू, अविगा,अनघा,खटासि खट
जागू, अविगा,अनघा,खटासि खट तुम्हा सर्वांचे धन्यवाद!






गुरुवार पासुन प्रदर्शन सुरु झाले. आठवडाभर चालेल. एकुण ३५-३६ खुर्च्या आहेत. काहीजणांनी खुर्च्या खुप छान पेंटींग,मोझॅक्,कोलाज करुन सजवल्या आहेत. त्या बाकीच्या खुर्च्या बघायला काहींना नक्कीच आवडतील. असे वाटते म्हणुन त्यातल्याच निवडक टाकते.
१:
२:
हीच्यावर मोझॅक केले आहे
३:
४:
हीच्यावर मिशीगनचा नकाशा लावुन कोलाज केले आहे.
५:
६:
ही लहान मुलांसाठी टाईम्-आउट खुर्ची, याच्या मागे टायमर लावला आहे.
आहेत कि नाही छान छान खुर्च्या?
इब्लिस्,पियु,प्रसाद माफ करा! तुम्हांला हे आवडणार नाही. मुळ लाकडाच्या खुर्च्या छानच दिसतात. पण जर एखादी खुर्ची खराब झाली तर तिला फेकुन द्यायच्या ऐवजी तिला रंगवले, नटवले तर काय बिघडले?
इब्लिस्,पियु,प्रसाद माफ करा!
इब्लिस्,पियु,प्रसाद माफ करा! तुम्हांला हे आवडणार नाही.
>> माफी नका मागू हो (किमान माझीतरी). छान दिसताहेत बाकिच्या खुर्च्या..
फक्त तुम्ही पहिल्या फोटोत दाखवलेली खुर्ची चांगली दिसतेय मॉडिफाईड खुर्चीपेक्षा म्हणुन तसे म्हटले होते.
Pages