मायबोलीवर कोणते सल्ले मागावेत, कोणते मागू नयेत?
मायबोलीवर "मदत हवी आहे", "माहिती हवी आहे", "कोणाशी तरी बोलायचे आहे" ईत्यादी विभागाअंतर्गत बरेच सल्ले मागितले जातात.
अगदी रुमाल कुठला घ्यायचा अश्या फुटकळ वस्तूपासून फ्रिज कसा घ्यावा यावर सल्ला मागितला जातो.
मोबाईल तर जणू सल्ल्याशिवाय घेताच येत नाही. लोकं गर्लफ्रेंड निवडताना ईतका विचार करत नसतील तितका मोबाईल घेताना चोखंदळपणा दाखवतात.
घरात ऊंदीर शिरला, हाकलू कसा? कारमध्ये डास घुसले, मारू कसे?
त्यात विवाहीत लोकं म्हटली की समस्यांचे भंडार असते.