घरी जर कोणी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा वयाने ज्येष्ठ असे रुग्ण असतील तर त्यांच्या लहान-मोठ्या आजारांत आणि नंतर त्यांना खायला किंवा जेवायला काय द्यावे हा एक मोठा प्रश्न कायमच कुटुंबियांपुढे ठाकलेला असतो. वेगवेगळ्या चवींचं, पथ्यकर, रुचकर, पोषक व पचावयास हलके अन्न दिवसातील वेगवेगळ्या वेळांना त्या व्यक्तीला आवडेल अशा स्वरूपात सादर करणे व त्या अन्नाची योग्य मात्रा त्या व्यक्तीच्या पोटात जाईल याकडे निगुतीने लक्ष देणे हे खरोखरी कौशल्याचे काम आहे असा माझा गेल्या काही महिन्यांचा अनुभव आहे.
वृध्दापकाळात तब्येतीचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. जोवर पेशंट हालता फिरता असतो तोवर खूप प्रॉब्लेम नसतो. परंतु काही कारणामुळे जर पेशंट रूग्णशय्येस खिळला तर त्याची काळजी खूप काटेकोरपणे घेणे आवश्यक असते. पेशंटचे पथ्यपाणी, औषधे, व्यायाम वगैरे वेळचे वेळी व व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पेशंटची स्वच्छता, वैद्यकीय तपासणी व देखभालही अनिवार्य असते. काही वेळा शस्त्रक्रिया झालेले किंवा अपघात झालेले वृध्द पेशंट मेडिकल सुपरविजनखाली असणे गरजेचे असते. हॉस्पिटल्स त्यांच्या नियमांनुसार पेशंटला फार दिवस ठेवून घेत नाहीत व डिसचार्ज देतात.
हे तर सर्वच समजून आहेत की डायबिटीज आज एक खतरनाक रूप घेत आहे. आज महानगरामध्ये तसेच गाव खेडेपण डायबिटीजच्या विळख्यात आले आहे. तुम्हाला माहित आहे का डायबिटीजचे परिणाम शरीरावर फारच नकारात्मक पडतात डायबिटीज शरीराला आतून आणि बाहेरून दोन्ही पद्धतीने नुकसान करते. तुम्हाला माहित आहे का डायबिटीजच्या पेशंटला रात्री झोप येण्यास त्रास होतो म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की डायबिटीज झोपेवर परिणाम करते? बघूया ह्या गोष्टी मध्ये किती खरे पणा आहे.
हे तर सगळेच जाणून आहे की डायबिटीजचा पेशंटवर नकारात्मक परिणाम पडतो आणि अश्या मध्ये झोपेवर परिणाम पडणे स्वाभाविक आहे.